उद्योगपतींवर आत्महत्येची वेळ; हे 'मेड इन इंडिया' की 'डेड इन इंडिया'? - धनंजय मुंडे

मुंबई : मागील २ दिवस बेपत्ता असलेले ‘सीसीडी’चे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. सिद्धार्थ यांनी मंगळुरु येथील नेत्रावती नदीत आत्महत्या केली असल्याचं सांगितलं आहे. आज नदीत त्यांचा मृतदेह सापडला आहे. यावरून आत्महत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच सिद्धार्थ यांनी एक पत्र देखील लिहिले होते.
व्ही. जी सिद्धार्थ कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांचे जावई आणि प्रसिद्ध कॅफे चेन कॅफे कॉफी डे चे मालक आहेत. सिद्धार्थ हे सोमवारी आपल्या कारने प्रवास करत होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले. मंगळुरू येथील नेत्रावती नदीच्या परिसरात ते असल्याची माहिती मिळाली होती. कर्नाटक पोलिसांनी नदी आणि आसपासच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. अखेर ३६ तासांनंतर त्यांचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला.
सीसीडी चे सर्वेसर्वा व्ही.जी. सिद्धार्थ यांच्या आत्महत्येचे वृत वेदनादायक आहे. सिद्धार्थ यांनी स्वदेशात मोठा व्यवसाय उभारला. ३० हजार रोजगार उपलब्ध करून दिले. देशातील तरुण उद्योजकांनी आत्महत्या करणे दुर्दैवी आहे. सरकारच्या धोरणाला काय म्हणावे मेड इन इंडिया की डेड इन इंडिया?” असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
CCDचे सर्वेसर्वा व्ही.जी. सिद्धार्थ यांच्या आत्महत्येचे वृत वेदनादायक आहे. सिद्धार्थ यांनी स्वदेशात मोठा ब्रँड उभारला. ३० हजार रोजगार उपलब्ध केले. देशातील तरुण उद्योजकांनी आत्महत्या करणे दुर्दैवी आहे. सरकारच्या धोरणाला काय म्हणावे मेड इन इंडिया की डेड इन इंडिया? #RIPVGSiddhartha pic.twitter.com/XL2FYruhMc
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) July 31, 2019
दरम्यान, नोटबंदीनंतर अनेक उद्योग संपुष्टात आले तर अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याचे आरोप विरोधकांनी अनेकवेळा केला होता. अशा आर्थिक गर्तेत अडकलेल्या मोठ्या उद्योगांचे हे एक उदाहरणच म्हणावे लागेल, कारण अशा घटना यापुढे देखील पाहायला मिळतील अशी शंका अनेकांनी व्यक्त केली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं