महत्वाच्या बातम्या
-
राज्यात मृत्यूंच्या आकडेवारीत तफावत? | नाही, उलट दैनंदिन तांत्रिक अडचणींमुळे आकडा अधिक दिसतोय - सविस्तर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर राज्य अनलॉक होत असताना कोरोनामुळे झालेले एकूण मृत्यू आणि दैनंदिन मृत्यूच्या आकडेवारीत तफावत दिसून आली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्यावर मृत्यू लपवण्याचे आरोप करत असले तरी प्रत्यक्षात जास्तीचे मृत्यू दाखवण्याचा प्रकार समोर आला. यात प्रत्यक्ष मृत्यूंपेक्षा सरकारने २५१८ अधिक मृत्यू दाखवल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. राज्य सरकार कोरोनाबाबत लपवाछपवी करत नसून सर्वकाही पारदर्शी असल्याचा सरकारचा दावा आहे. मात्र, राज्य सरकार व आरोग्य विभागाकडून दररोज कोरोनाबाबतची सविस्तर आकडेवारी जारी केली जाते. ही दोन्ही आकडेवारी तपासल्यास मृत्यूसंख्येत मोठा फरक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्य सरकार आकडेवारी लपवतंय असं म्हणण्यापेक्षा माहिती संकलित करण्याच्या त्रुटीतून उलट जास्त मृत्यू दाखवले जातं आहेत असं समोर येतंय. त्यामुळे विरोधकांचा दावा देखील फोल ठरतोय.
4 वर्षांपूर्वी -
हमीभाव वाढवल्याचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा - राजू शेट्टी
केंद्र सरकारने बुधवारी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. यानुसार, धानाच्या हमीभावात क्विंटलमागे ७२ रुपयांची किरकोळ वाढ करण्यात आली असून डाळी, तेलबिया व तृणधान्ये यांच्या हमीभावात देखील भरीव वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हमीभाव वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
4 वर्षांपूर्वी -
नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचं निश्चित
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीने जोर धरलेला असतानाच महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आलं आहे. तसा प्रस्तावच सिडकोने मंजूर केला आहे, अशी माहिती राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार - राज्य सरकार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंतचे पिककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात केली होती. त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. मंत्रिमंडळाच्या मान्यतेमुळे पिककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना ३ लाख रुपयांपर्यंतचे पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार सेवेत असणाऱ्या आणि निवृत्त पोलिसांसाठी 2 लाख हक्काची घरं उभारणार
पोलिसांच्या घरांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागून निवृत्तीनंतर त्यांची घरासाठीची वणवण थांबावी यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी नगरविकास विभाग विशेष धोरण तयार करत आहे. गृह आणि गृहनिर्माण या विभागांच्या समन्वयाने लवकरच त्याला अंतिम स्वरूप देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडले जाणार आहे. तशी माहिती एकनाीथ शिंदे यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
१०'वीच्या विद्यार्थ्यांचा जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यात निकाल जाहीर होण्याचे संकेत
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी 28 मे रोजी दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत निकष जाहीर केले. त्यानंतर त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला. शाळांना शासनानं ठरवून दिलेल्या माध्यमिक शाळांकडून काम सुरु करण्यात आलं आहे. महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरावड्यामध्ये जाहीर होणार आहे. शाळांकडून दहावीच्या निकालसंदर्भातील शासन निर्ण्ययानुसार गुण नोंदवण्यात येत असल्याची माहिती आहे.
4 वर्षांपूर्वी -
कर्तव्यदक्ष महिला अधिकारी | गटार स्वच्छ आहे की नाही याची खात्री करण्यासाठी स्वतः गटारात उतरल्या
भिवंडी महानगरपालिकेच्या महिला अधिकारी सुविधा चव्हाण यांचे सध्या सर्वच स्तरांतून कौतूक होत आहे. कारण ही तसेच आहे. महिला अधिकारी असलेल्या सुविधा चव्हाणने गटार स्वच्छ आहे की नाही? हे पाहण्यासाठी चक्क गटारात उतरल्या. तपासणीदरम्यान, त्यांना स्वच्छतेच्या कामावर संशय आला होता. त्यामुळे त्यांनी एका शिडीच्या साह्याने गटारीत उतरत पाहणी केली. काही ठिकाणी त्यांना अपेक्षेप्रमाणे स्वच्छता पाहायला मिळाली. पण अनेक ठिकाणी मात्र घाण दिसल्याने त्यांनी संबंधित आधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच फटकारले.
4 वर्षांपूर्वी -
बीड | परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्याचा मार्ग मोकळा | उद्योग मंत्रालयाची मंजुरी
बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील सिरसाळा येथे MIDC उभारण्यात येणार आहे. सिरसाळा येथे MIDC उभारण्याच्या प्रस्तावाला महाराष्ट्राच्या उद्योग मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नानंतर ही एमआयडीसी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे टिकेल, काम करेल आणि आगामी लोकसभा, विधानसभा सुद्धा...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एकांतात झालेल्या संवादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिल्यांदाच बोलले आहेत. ठाकरे आणि मोदी यांच्या भेटीबाबत बोलताना त्यावर किंचितही विचार करण्याची गरज नसल्याचा दावा शरद पवार यांनी केलाय. इतकंच नाही तर त्यांनी महाविकास आघाडीबाबतही मोठं भाकीत केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापन दिनी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय.
4 वर्षांपूर्वी -
मोर्चा सुद्धा आणि टेक्निकली डोकं लावून पुढची भूमिका, पहिली जबाबदारी माझी | आंदोलनाची टॅगलाईन असेल...
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा जाहीर केली आहे. येत्या 16 जूनला कोल्हापुरातून पहिला मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. हे आंदोलन मूक असेल. या आंदोलनाची टॅगलाईन “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय” अशी असेल. त्यादिवशी लोकप्रतिनिधींना बोलावं लागेल. मी काय जबाबदारी घेणार हे त्यांना सांगावं लागेल, असं संभाजीराजे म्हणाले. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका जाहीर केली.
4 वर्षांपूर्वी -
केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून लोकशाही मोडून काढण्याच प्रयत्न | पत्रकारितेची अवस्था सुद्धा गंभीर - अजित पवार
केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून देशात एकता, अखंडता आणि सर्वधर्मसमभावाच्या विचारांना धक्का देण्याचं काम सुरु आहे. लोकशाही व्यवस्था आणि राज्यघटनेला झुंडशाहीचे धक्के देऊन मोडून काढण्याचा प्रयत्न सुरु असून हे गंभीर आहे अशी टीका महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्यावेळी मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आज राष्ट्रवादीची परिस्थिती आणखी चांगली असती - जयंत पाटील
आज (१० जून) राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापन दिन आहे. या दिनानिमित्त राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक खंत व्यक्त केली आहे. २००४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आज परिस्थिती आणखी चांगली असती अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला २२ वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्ताने ते एबीपी माझाशी बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षाचा प्रवास उलगडताना महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीत आपल्या पक्षाचा सिंहाचा वाटा असल्याचं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाघाशी मैत्री केली जात नाही | वाघ ठरवतो मैत्री कधी करायची ते - संजय राऊत
काल पुण्यात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील असं म्हणाले की वाघाशी मैत्री करायला आम्ही कधीही तयार आहोत कारण दुश्मनी वाघाशी नव्हतीच. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप युतीसाठी जणून काही चंद्रकांत पाटलांनी ऑफरच दिली असं दिसून आलं.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचा आज स्थापना दिन | पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना का आणि कशी केली होती ?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४’च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
4 वर्षांपूर्वी -
राजकीय आशीर्वाद? | फडणवीसांच्या पुतण्याने आरोग्य कर्मचारी म्हणून कोरोना लस घेतली | RTI मध्ये सत्य उघड
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या 25 वर्षीय पुतण्याने वयाचे निकष पूर्ण होण्याआधीच कोरोना लस घेतल्यामुळे समाज माध्यमांवर प्रश्नांचा जोरदार मारा करण्यात आला होता. 1 मे पासून 18 वर्षावरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यास सुरुवात झाली. परंतु, त्यापूर्वीच पंचविशीतील तरुणाला लस कशी मिळाली? असा सवाल विरोधकांकडून त्यावेळी विचारण्यात येत होता. या मुद्द्यावरुन देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार टीका झाली. दरम्यान, फडणविसांसोबत पुतण्याचं नातं असलेल्या तन्मनने आरोग्य कर्मचारी असल्याचं सांगत कोरोनाची लस घेतल्याचं माहिती अधिकारातून उघड झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
बारामतीच्या चहावाल्याकडून मोदींना दाढीसाठी 100 रुपयांची मनी ऑर्डर | म्हणाला साहेब, दाढीऐवजी लसीकरण वाढवा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाढीची सध्या खूप चर्चा होत आहे. त्यांच्या दाढीच्या स्टाइलची लोक नोबेल पुरस्कार विजेते रवींद्र नाथ टागोर यांच्यासोबत तुलना करत आहेत. पण काही लोक असेही आहेत, ज्यांना पंतप्रधानांच्या दाढीची स्टाइल आवडलेली नाही. यामधून एक बारामतीचा चहावाला देखील आहे. त्याने पंतप्रधानांच्या दाढीवर आक्षेप घेत त्यांना दाढी कट करण्याची मागणी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला ६०० कोटीची आर्थिक मदत | कामगारांना पगारही मिळणार
महाराष्ट्राची लाल परी अर्थात एसटी (ST) गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात सापडल्याचं पहायला मिळत आहे. याच एसटी महामंडळाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला 600 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महानगरपालिकेत 5 वर्षात 1 हजार कोटींचा घोटाळा – आशिष शेलार
पहिल्याच पावसात मुंबईची तुंबापुरी झाल्याने भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि मुंबई महापालिकेवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधीशांचा वसुलीचा नादच खुळा, नेमेची येतो पावसाळा, अशा काव्यमय शब्दात भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच महापालिकेत पाच वर्षात एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
आगामी BMC निवडणुक | उत्तर भारतीय मतदारांचा फटका त्यात शिवसेनासोबत नाही | भाजपची महत्वाची बैठक
संपूर्ण देशात अत्यंत महत्वाच्या अशा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने तयारी सुरु केली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाची आज मुंबईत महत्त्वाची बैठक होत आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने काही नेत्यांवर महत्वाची जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांची दिल्ली भेट राजकारणासाठी नव्हती, ज्यांना राजकारण दिसते ते धन्य होत - शिवसेना
सत्तेत एकत्र नसलो याचा अर्थ नातं तुटलं असा होत नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात सांगितले. राजकीय मतभेद होणे म्हणजे व्यक्तिगत नाते सैल पडले असे होत नाही. पुन्हा व्यक्तिगत नात्यागोत्यांत फक्त सत्ता हाच नात्यांचा धागा नसतो. ही नाती शिवसेनेने नेहमीच सांभाळली आहेत. नरेंद्र मोदी – उद्धव ठाकरे भेट जशी राजशिष्टाचाराचा भाग होती तशीच व्यक्तिगत नात्याचीही होती. त्यामुळे दिल्लीतील या भेटीवर यापुढे बराच काळ चर्चेचा धुरळा उडत राहील.
4 वर्षांपूर्वी