महत्वाच्या बातम्या
-
कोरोना संपलेला नाही | गर्दी, आरोग्याचे नियम मोडलेले चालणार नाही - मुख्यमंत्री
महाराष्ट्रात सोमवारपासून ‘ब्रेक दि चेन’अंतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होत आहेत. मराठवाड्यात औरंगाबाद मनपा क्षेत्र, जालना, नांदेड आणि लातूर शहर पहिल्या स्तरात असल्यामुळे या ठिकाणी सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू होणार आहेत. मात्र मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे या गोष्टी अनिवार्य असून औरंगाबाद शहरात व्यापाऱ्यांना आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. नाशिक, सोलापूर जिल्ह्यांमध्ये सकाळी ७ ते ४, तर जळगाव जिल्ह्यात सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस | 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
केरळ मधून द्रुतगतीने दोनच दिवसांत महाराष्ट्रात दाखल झालेल्या मोसमी पावसाची राज्यातील घोडदौड सुरूच असून, दोन दिवसांत त्याने ३० टक्के भाग व्यापला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांनंतर आता त्याने मराठवाडय़ातही प्रवेश केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका | उद्यापासून अनलॉक प्रक्रिया सुरु | नवे नियम जाणून घ्या
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येत आहे. राज्य सरकारकडून लॉकडाऊन शिथिलतेसाठी पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत. याबाबतची नवी नियमावली देखील जारी करण्यात आली आहे. या पाच टप्प्यांपैकी ठाणे जिल्ह्यात ठाणे महापालिका आणि नवी मुंबई महापालिका क्षेत्र दुसऱ्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आलं आहे. तर कल्याण डोंबिवली महापालिका, मीरा भाईंदर महापालिका, भिवंडी महापालिका, उल्हासनगर महापालिका तसेच अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, मुरबाड नगर पंचायत आणि संपूर्ण ग्रामीण क्षेत्र हे तिसऱ्या टप्प्यात समाविष्ट करण्यात आले आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये नव्या नियमावलीनुसार सोमवारपासून (7 जून) नेमकं काय सुरु, काय बंद असेल याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | मराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार | जयंत पाटलांचं मोठं विधान
मराठा आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील मराठा समाजाच्या भावना तीव्र झाल्या आहेत. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणासाठी मोर्चा काढला. आता खासदार संभाजी छत्रपती यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. मराठा आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत, असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे सोमवारी राज्यात एकाचवेळी एक हजार ठिकाणी आंदोलन - नाना पटोले
केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही भाववाढ अशीच चालू राहिली तर डिझेल १०० रुपये लिटर होण्यास फार दिवस लागणार नाहीत. स्वयंपाकाचा गॅसही ९०० रुपये झाला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त आहे त्यात महागाईचा मार सहन करावा लागत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
संभाजीराजे माझे धाकटे भाऊ, आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत - उदयनराजे भोसले
खासदार संभाजी छत्रपती यांनी अखेर रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पहिला मराठा मोर्चा 16 जूनला | छत्रपती संभाजीराजेंची रायगडावर घोषणा, ठिकाणही निश्चित
खासदार संभाजी छत्रपती यांनी अखेर रायगडावरून मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या 16 जून रोजी मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळावरून हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा संभाजी छत्रपती यांनी केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ही लोकं काही काळ आमच्यासोबतही होती, त्यामुळे त्यांचा आवाका किती आहे हे आम्हाला ठाऊक आहे - अजित पवार
मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारणारे माथाडी समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडाडून टीका केली आहे. काहीजण भावनेच्या आहारी जाऊन बोलतात. कायदा आणि संविधान बघत नाहीत. ही लोकं काही काळ आमच्यासोबत होती. त्यामुळे या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, असे अजित पवार यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
शिवराज्याभिषेक दिन | मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासहित समस्त महाराष्ट्राकडून महाराजांना वंदन
दरवर्षी 6 जून हा दिवस शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जातो. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शिवराज्याभिषेक दिन हा अत्यंत साधेपणाने साजरा केला जात आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
Crime Patrol | भाजप नगरसेवकाची महिला तलाठ्याला शिवीगाळ करत मारहाण
नंदुरबारमधील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक गौरव चौधरी यांनी तहसीलदार नियुक्त वाळू तपासणी पथकातील महिला तलाठींना मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या पथकातील महिला तलाठी निशा पावरा यांना नगरसेवक गौरव चौधरी यांनी शिवीगाळ करत मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिकाऱ्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आहे
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांनो! | तलाठी कार्यालयात हेलपाटे न मारता मिळवा शेतजमिनीचा असा ऑनलाईन 'डिजिटल 8-अ'
डिजिटल 8अ (Digital 8A ) म्हणजे वेगवेगळ्या गट क्रमांकांमध्ये विभागलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनींची माहिती एकत्रितपणे 8-अ म्हणजेच खाते उताऱ्यावर नोंदवलेली असतो. तसेच अनेक योजनांसाठी हे कागदपत्र आवश्यक असते. 8अ काढण्यासाठी अनेकदा तलाठी कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागत असत, मात्र आता डिजिटल 8अ मुळे आपणास घरबसल्या देखील हा दाखला मिळणार आहे, तो कसा काढावा याबाबत सर्व माहिती जाणून घेऊयात,
4 वर्षांपूर्वी -
Bhulekh Mahabhumi | प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्रिका) ऑनलाईन कसं काढायचं?
केंद्र सरकारनं सामान्य नागरिकांसाठी स्वामित्व योजना आणली आहे. या योजनेविषयी अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं, “स्वामित्व योजना आता देशभरातल्या सगळ्या राज्यांमध्ये राबवली जाणार असून यामुळे ग्रामीण नागरिकांना त्यांच्या घराचं आणि जमिनीचं प्रॉपर्टी कार्ड दिलं जाणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिवराज्याभिषेक दिनी भगवा फडकवण्याला विरोध करणाऱ्या सदावर्ते यांना भाजपाची फूस - हसन मुश्रीफ यांचा आरोप
मराठा आरक्षणाला विरोध करणारे गुणरत्न सदावर्ते यांनी राज्य सरकारच्या आणखी एका निर्णयावर आक्षेप घेतला आहे. भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण करुन राष्ट्रगीत गाणे म्हणजे राष्ट्रद्रोह आहे, या कृतीमुळे देशातील एकता आणि अखंडता धोक्यात येऊ शकते असं मत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मांडलं आहे. ६ जूनला भगवा ध्वज फडकावून शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून तशा प्रकारचे आदेश सर्व शासकीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मोर्चातील मेटेंच्या भाषणात केंद्राच्या जवाबदारीचा उल्लेखच नाही | फक्त फडणवीसांचा जयजयकार अन राज्य सरकारवर टीका
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांनी महाविकास आघाडी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. येत्या 5 जुलैपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य करा. अन्यथा 7 जुलैला सुरु होणारं पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, अशा शब्दात मेटे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाची लढाई फक्त आजच्या मोर्चापुरती नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर हा लढा सुरुच राहणार, ही तर फक्त सुरुवात आहे, असंही मेटे यांनी म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाचा अहवाल एका अडाणी माणसानं दिला याचंच आश्चर्य - विनायक राऊत
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या नारायण राणे समितीने काय दिले लावले हे सर्वांनाच माहीत आहे, असं सांगतानाच मराठा आरक्षणाचा अहवाल एका अडाणी माणसाच्या हातून दिला गेला याचंच आश्चर्य वाटतं, अशा शेलक्या शब्दात विनायक राऊत यांनी राणेंवर टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | नारायण राणे मुख्यमंत्री होते तेव्हा आरक्षण का दिले नाही? - अजित पवारांचा सवाल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल (४ जून) मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य केले आहे. यावेळी बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंवर टीकास्त्र सोडलं. ते म्हणाले की, नारायण राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी आरक्षण का नाही दिलं. पवार साहेब समोर आलं की वाकून नमस्कार करायचा आणि नंतर असं बोलायचं, असं ते म्हणाले.
4 वर्षांपूर्वी -
केंद्र सरकार केवळ हेडलाईन मॅनेजमेंटमध्ये व्यस्त | राज्यांना कशापध्दतीने लस पुरवठा करणार ते सांगावे - राष्ट्रवादी
केंद्र सरकारने निव्वळ हेडलाईन मॅनेजमेंट करण्याऐवजी देशाचा एक चार्ट बनवून देशातील जनतेसमोर ठेवावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठका घेत आहेत ही चांगली गोष्ट आहे परंतु बैठका घेऊन फक्त या महिन्यात १२ कोटी, डिसेंबरपर्यंत २१० कोटी लसी उपलब्ध होईल असे सांगणे किती योग्य आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
बीड | मराठा मोर्चा सांगून भाजपच मोर्चा काढण्याच्या तयारीत?
मराठा आरक्षणासाठी मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रमक झाला आहे. अशात आज (५ जून) मराठा मोर्चा निघणार आहे. “बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला, तरी मोर्चा निघणार,” असा निर्धार शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा मोर्चा निघणार आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
अखेर महाराष्ट्र ‘अनलॉक’ आदेश निघाले | पाच टप्प्यात असे हटणार निर्बंध
राज्यातील कोरोना लॉकडाऊन अंतर्गतचे निर्बंध शिथिल करणारी नवीन नियमावली राज्य शासनाने शुक्रवारी मध्यरात्री जाहीर केली असून ती सोमवार, ७ जूनपासून लागू होणार आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश काढला. ३ जून रोजी संपलेल्या आठवड्याच्या सरासरीनुसार भरलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण आणि पॉझिटिव्हीटी दर या आधारे प्रत्येक जिल्हा प्रशासन नियमावली संदर्भात स्वतंत्र आदेश काढतील, पण या दोन निकषांच्या आधारे नियमावली कशी असेल हे राज्य शासनाने निश्चित केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 62 पदांची भरती
पीसीएमसी भरती २०२१. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अधिसूचना जारी केली असून २८ एएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि फार्मासिस्ट पदांसाठी अर्ज मागविला आहे. इच्छुक आणि पात्र अर्जदार मुलाखतीसाठी येऊ शकतात, पीसीएमसी भरती 2021 साठी 07 आणि 08 जून 2021 रोजी मुलाखत घेतली जाईल.
4 वर्षांपूर्वी