महत्वाच्या बातम्या
-
शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमध्ये अर्धा तास खलबतं, कारण गुलदस्त्यात
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एक बैठक झाली आहे. शरद पवार हे सायंकाळच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर शरद पवार आणि मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास 40 मिनिटे बैठक झाली.
4 वर्षांपूर्वी -
मुक्ताईनगर भाजप मुक्त होण्याच्या दिशेने | भाजपच्या आजी-माजी 10 नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
भारतीय जनता पक्षाला शिवसेनेने आणखी एक मोठा झटका दिला आहे. जळगावातील मुक्ताई नगरपालिकेचे 10 नगरसेवक हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. हे सर्वच्या सर्व 10 नगरसेवक शिवसेनेत दाखल झाले आहेत. जळगाव महानगरपालिकेनंतर आता मुक्ताई नगरपालिकेतील नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपला हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
नारायण राणे पनवती | सिंधुदुर्ग भवन बनवलं आणि कोकणवासीयांना फसवून भूखंड लाटला - खा. विनायक राऊत
राज्यातील तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर सडकून टीका करणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे यांना शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. नारायण राणे पनवती आहेत. म्हणूनच भाजपने त्यांना अडगळीत टाकलं आहे, असा खोचक टोला विनायक राऊत यांनी नारायण राणे यांना हाणला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण व छत्रपतींचा सन्मान कसा करतात हे भाजपाला शिकवू नका - प्रविण दरेकर
संभाजीराजे यांना मोदींनी का भेट दिली नाही यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली होती. त्यांच्या टीकेला आता विधान परिषद विरोधी पक्षनते प्रविण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या आमदाराने उभारलेल्या कोविड सेंटरची योगी सरकारला भुरळ | मुख्य सचिवांची आ. निलेश लंकेशी चर्चा
महाराष्ट्र सरकार मागील अनेक दिवसांपासून कोरोना नियंत्रण करण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. यामध्ये अनेक लोकप्रतिनिधी देखील महत्वाची भूमिका बजावत आहेत. महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी लोकसहभागातून उभारलेल्या कोविड सेंटरची चांगलीच चर्चा आहे. परदेशातूनही या सेंटरला मदत मिळत आहे. तसेच, आता या कोविड सेंटरची उत्तर प्रदेश सरकारला देखील भूरळ पडली आहे. उत्तर प्रदेशात सामान्य लोकांसहित योगी सरकारमधील मंत्री आणि आमदारांनी देखील कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
तौत्के चक्रीवादळ | उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि जयंत पाटील यांच्या शिक्षिकेची मदतीसाठी हाक
तौत्के चक्रीवादळाने कोकणासहित पालघर पट्ट्यात प्रचंड नुकसान झालं आहे. मुंबई आणि आसपासची ठाणे आणि विरार पट्ट्यातही नुकसान झालं आहे. मात्र आता या वादळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिक्षिकेचंही मोठं नुकसान झालं आहे. उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील या तिन्ही बड्या नेत्यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे या ९० वर्षांच्या आहेत.
4 वर्षांपूर्वी -
बुलढाणा | शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न | मतदारसंघात खळबळ
कोरोना आपत्तीत निरनिराळी वक्तव्य करून चर्चेत आलेले शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गाडी घरासमोर जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यांच्या घरासमोर त्यांची 4 चाकी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या घटनेमुळे बुलडाण्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हा पूर्वनियोजित कट होता, असा गंभीर आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
श्रीमंत मराठ्यांना एक टक्काही आरक्षण नको, पण बहुजनांना जो न्याय, तोच गरीब मराठ्यांनाही द्या - संभाजीराजे छत्रपती
मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापत चालला आहे. अशात खासदार संभाजीराजे सध्या महाराष्ट्राभर दौरा करत मराठा समाजाच्या व्यथा जाणून घेत आहेत. आज (२६मे) औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना संभाजीराजे यांनी भाष्य केले आहे. गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची वेळ आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतात फेसबुक बंद होणार, पुढचा नंबर कोणाचा? | जयंत पाटलांचे सूचक ट्विट
केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यातील नव्या मार्गदर्शक तत्त्वांचा स्वीकार करण्यासाठी देण्यात आलेली मुदत उलटून गेल्याने फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम यांसारख्या समाजमाध्यमांवर बंदीची टांगती तलवार आली आहे. त्यामुळे, भारतात फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर बंद होणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. याबाबत, जलसंपदामंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मराठा आरक्षणाबाबत सुधारणा व बदल करण्याचा अधिकार आता संसदेला - घटनातज्ज्ञ उल्हास बापट
कालच छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, “मराठा आरक्षणाबाबत मी अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी काही सल्ले दिले आहेत. त्याची माहिती सरकारला देणार आहे. आंदोलन हा एक भाग असू शकतो. पण मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय सूचना करता येईल? मराठा आरक्षणावर काय कायदेशीर मार्ग आहे? याची माहिती घेण्यासाठी हा दौरा करण्यात येत आहे. त्यातून समाजाच्या व्यथाही समजून घेता येणार आहे, असं संभाजी छत्रपती म्हणाले होते.
4 वर्षांपूर्वी -
१२ आमदारांची नियुक्ती १५ दिवसात होणं अपेक्षित होतं, राज्यपालांचं वर्तन घटनेशी सुसंगत नाही - घटनातज्ज्ञ उल्हास बापट
राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेला विषय म्हणजे राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावांची यादी. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने तिन्ही पक्षातील १२ सदस्यांच्या नावांची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. पण, राज्यपालांकडून अनेक महिने उलटून गेले असूनही अद्याप या नावांना मंजूरी मिळालेली नाही. त्यामुळे हे प्रकरण आता न्यायालयात जाऊन पोहोचलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अडाणीपणाचा कळस | वेबसाईट मालकांच्या नियंत्रणात नसणाऱ्या गुगल ऍडसेन्स जाहिरातींवरून सेनेवर धार्मिक टीका
भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांना भाजपने मुंबईची जवाबदारी दिल्याने ते भलतेच जोश मध्ये आले असून दिवसभर वायफळ ट्विट आणि व्हिडिओ रेकोरिंग करून ट्विट करत बसणं हा त्यांचा उद्योग झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे अतुल भातखळकरांवर शिवसेना धार्मिक दृष्ट्या लक्ष करून, शिवसेनेला हिंदुत्वपासून वेगळं करणं हेच लक्ष दिलं आहे का असा प्रश्न त्यांच्या मागील ट्विटचा इतिहास पाहिल्यावर उपस्थित होऊ लागला आहे. मात्र ते इतकं सहज आहे का याची त्यांना देखील खात्री नसावी.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | राज्यात यापुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही - आरोग्यमंत्री
होम आयसोलेशनमध्ये असलेले अनेक कोरोना रुग्ण बाहेर फिरत असल्याचं दिसत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात या पुढे कुणालाही होम आयसोलेशन ठेवण्यात येणार नाही. रुग्णाला आता कोविड सेंटरमध्येच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
त्यांना कोकणाने दोन-दोन वेळा नाकारलं | आरोप करणाऱ्याला गर्दीत खूप मागे उभे केले होते - उदय सामंत
शिवसेनेचे नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रत्नागिरीत गुप्त बैठक झाल्याच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उदय सामंत हे स्वत:हून फडणवीसांच्या भेटीसाठी आले होते, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी केला होता. उदय सामंत यांनी निलेश राणेंच्या या आरोपाला उत्तर दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर भेटू पाहत होते, या अभिनेत्री कोणते प्रश्न घेऊन भेटल्या होत्या? - सचिन सावंत
मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटते. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नाही, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मांडलेल्या भूमिकेतील एका मुद्द्यावर बोट ठेवत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत सवाल केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
गौप्यस्फोट की राजकीय पुड्या? | रत्नागिरी गेस्टहाऊसवर उदय सामंत फडणवीसांना भेटायला तडफडत होते - निलेश राणे
शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट घेतल्याचा दावा केला जात आहे. रत्नागिरीत सामंत आणि फडणवीसांची गुप्त भेट झाल्याचा दावा भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान निलेश राणे लोकसभेत दोनवेळा रत्नागिरी मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. मात्र याच मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादीतील मंत्री, खासदार आणि आमदारांची मजबूत पकड असल्याने केवळ राजकीय संभ्रम निर्माण करण्यासाठी असं ट्विट केल्याचं म्हटलं जातंय.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई पोलिसांच्या टीमने रश्मी शुक्लांचा हैदराबादेतील निवासस्थानी जबाब नोंदवला
फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांनी अखेर वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवला आहे. हैदराबादमधील त्यांच्या निवासस्थानी जाऊन मुंबई पोलिसांच्या ५ अधिकाऱ्यांच्या टीमने शुक्लांचा जबाब घेतल्याची माहिती आहे. जबाबात फोन टॅपिंग प्रकरणात एफआयआरमध्ये लावले गेलेले आरोप शुक्ला यांनी फेटाळले. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या हैद्राबादमध्ये केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | …तर भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देईन, संभाजीराजे छत्रपती आक्रमक
राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी आताच खासदारकीचा राजीनामा देईन, असा इशाराच भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिलाय. संभाजीराजे छत्रपती यांनी आज सोलापुरात पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. सुप्रीम कोर्टाने गायकवाड समितीचा अहवाल रद्द केल्यानंतर मराठा समाजातील प्रमुखांची आरक्षणाविषयीची भूमिका जाणून घेण्यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे हे राज्य दौऱ्यावर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे तोडणारे कोकणात जाऊन झाडांची चिंता व्यक्त करत आहेत - आ. भाई जगताप
महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट असताना राजकीय वर्तुळात अनेक विषयांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी सूरु आहेच. महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्षामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे ज्यांनी कापली ते कोकणात जावून झाडांची चिंता व्यक्त करत आहेत. जरा तपासून घ्या स्वत:ला’ अशा शब्दांत काँग्रेसचे मुंबई शहर अध्यक्ष भाई जगताप यांनी टीका केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
छत्रपती संभाजीराजेंच्या नावातील छत्रपती या उपाधीची केवळ निवडणुकीत वापरण्याइतपतच मोदींच्या लेखी किंमत आहे - काँग्रेस
मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस पेटत चालला आहे. यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी संभाजीराजेंना भेटले का नाही यावर देखील पाटील पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
4 वर्षांपूर्वी