महत्वाच्या बातम्या
-
Sarkari Naukri | महाराष्ट्र टपाल विभागात २४२८ जागांसाठी भरती | शिक्षण १०'वी उत्तीर्ण
राज्यातील दहावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी चालून आली आहे. महाराष्ट्र टपाल विभागात (महाराष्ट्र डाक विभाग) ग्रामीण डाक सेवक (जीडीएस) या पदांसाठी २ हजार ४२८ उमेदवारांची भर्ती केली जाणार आहे. या संदर्भातील जाहिरात इंडिया पोस्टच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी त्वरीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
4 वर्षांपूर्वी -
कोविन अँपवर नोंदणी असेल तरच लस मिळणार हे कृपया समजून घ्या, दुसरा डोसवाल्यांना प्राधान्य - महापौर
मुंबईच्या गोरेगावमधील नेस्को कोरोना केंद्र आणि बीकेसी केंद्रावर लसीकरणासाठी नागरिकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. लसींचा तुटवडा असल्याने आपल्यालाच लस मिळावी म्हणून नागरिकांनी पहाटे 7 वाजल्यापासून केंद्रावर गर्दी केल्याने दोन किलोमीटरपर्यंत ही रांग गेली आहे. त्यांची मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दखल घेतली आहे. नागरिकांनी केंद्रावर गर्दी करू नये. कोविन अॅपवर नोंदणी करणाऱ्यांनाच लस मिळणार आहे. तसेच ज्यांचा पहिला डोस झालेला आहे, त्यांनाच प्राधान्याने डोस दिला जाणार असल्याचं महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजीव सातव यांची प्रकृती स्थिर असून कुठलीही गंभीर लक्षणे नाहीत | पुण्यातच उपचार - कुटुंबीयांची माहिती
कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांची प्रकृती स्थिर असून कुठलीही गंभीर लक्षणे नाहीत. मात्र केवळ पर्यवेक्षण व रुटीन तपासणीसाठी मुंबई येथील पथक येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी गुरुवारी दिव्य मराठीशी बोलताना दिली आहे. खासदार राजीव सातव मागील आठवड्यातच हिंगोली येथे आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोविड रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा व रुग्णांची परिस्थिती याची सविस्तर चौकशी केली होती. जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढल्यास काय उपाययोजना कराव्या लागतील याची माहितीही त्यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेऊन घेतली होती. त्यानुसार त्यांनी पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे हिंगोली जिल्ह्यातील सुविधांबाबत कळविले होते.
4 वर्षांपूर्वी -
पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण, घरीच क्वारंटाईन
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतंच पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या भगिनी आणि बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनाही कोरोनासदृश लक्षण दिसत होती. त्यामुळे त्या घरीच विलगीकरणात उपचार घेत होत्या. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील लसीकरणाची गती मंदावल्यास कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते - तज्ज्ञांचा इशारा
देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. संक्रमणामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा 1.5 कोटींच्या पार गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 50 लाख 78 हजारांपेक्षा जास्त लोक बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांचा आकडा पाहिला तर विक्रमी 2.70 लाख लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी मंगळवारी 2.62 लोक रिकव्हर झाले होते. ओव्हरऑल रिकव्हरी रेटमध्येही 1.8% ची वाढ झाली आहे. हा आता 82.08% झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात वेळोवेळी राजीनामे मागता, आता देशात स्मशाने धगधगत असताना कुणाचा राजीनामा मागावा? - शिवसेना
कोरोना परिस्थिती नीट हाताळली नाही, असा कांगावा करीत महाराष्ट्राचे सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजप पुढारी करीत असतात. खरं तर हाच न्याय सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला लावला तर काय होईल? याचा विचार भाजप पुढाऱ्यांनी करायला हवा. देशात आरोग्यविषयक अराजक निर्माण झाले. त्यास फक्त केंद्रातील सरकार जबाबदार आहे. यावरच सर्वोच्च न्यायालयाने मोहर मारली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मारलेले ताशेरे गंभीर आहेत. त्याबद्दल आता भाजप पुढारी कोणाकोणाचे राजीनामे मागणार आहेत? असा सवाल शिवसेनेनं केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देशातील कोरोना स्थितीवर भाष्य करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | लसीकरणासाठी गर्दी-धक्काबुक्की, सोशल डिस्टन्सिगचे पालन न केल्याने पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
कालच्या २४ तासांत ३ लाख ६० हजार ९६० नवे करोना रुग्ण आढळले असून यासोबत देशातील करोना रुग्णसंख्या १ कोटी ७९ लाख ९७ हजार २६७ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे ३२९३ रुग्णांच्या मृत्यूमुळे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख १ हजार १८७ वर पोहोचली आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासात २ लाख ६१ हजार १६२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४८ लाख १७ हजार ३७१ जणांनी करोनावर मात केली आहे. मात्र देशात कोरोना वेगाने पसरतोय आणि देशाची चिंता वाढताना दिसतेय.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग यांच्याविरुद्ध पहिला गुन्हा दाखल | भ्रष्टाचारासह अॅट्रॉसिटी आणि विविध 22 कलमान्वये गुन्हे
मुंबई व ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त तसेच माजी गृहमंत्र्यांवर १०० कोटींचा हप्ता मगितल्याचा आरोप करणारे परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातील सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. भीमराज घाडगे यांच्या तक्रारीवरून परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामध्ये भ्रष्टाचारासह जातीवाचक शिवीगाळ व अन्य काही गंभीर प्रकरणांचा समावेश असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
4 वर्षांपूर्वी -
Corona Pandemic | लॉकडाउनमध्ये किमान १५ दिवसांची वाढ होण्याचा अंदाज
राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे 1 पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या 1 मे रोजी राज्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. राज्यात सर्वांचं मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लगेच मोठ्या प्रमाणावर लस मिळणार नसल्याने राज्यात 1 मे रोजी लसीकरण करण्यात येणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Vaccination | राज्यात 1 मे पासून लसीकरण होणार नाही - आरोग्यमंत्री
राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे 1 पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे येत्या 1 मे रोजी राज्यातील 18 वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
मोठा निर्णय | ६ हजार कोटी खर्चून १८ ते ४४ वर्ष वयोगटातील सगळ्या नागरिकांचं मोफत लसीकरण
राज्यातील जनतेला कोरोनावरील लस मोफत देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून मोफत लसीकरणाचा मुद्दा चर्चेत होता. तशी मागणी सर्वच स्तरातून केली जात होती. अखेर आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. १८ ते ४४ वर्ष वयोगटात असलेल्या ५ कोटी ७१ लाख नागरिकांचं मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी साधारणत: लसींचे १२ कोटी डोस लागतील. यामुळे राज्याच्या तिजोरीवर साडे सहा हजार कोटींचा भार पडेल.
4 वर्षांपूर्वी -
रश्मी शुक्ला अडचणीत येताच भातखळकरांचे CBI मधील सूत्र कार्यरत | प्रथम भातखळकरांना दिली गोपनीय माहिती?
वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवले आहेत. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर आहेत. एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या मुंबईतील सायबर सेल विभागाने हैदराबादच्या डीजीपींच्या हस्तक्षेपाने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन
मुंबई कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांचं निधन झालं आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्य शिक्षण मंडळाचा महत्वाचा निर्णय | १२वीच्या परीक्षेसाठी आदल्या दिवसापर्यंत अर्ज भरण्याची मुभा
कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १०वीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र १२वीच्या परीक्षा होणारच असा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी राज्य शिक्षण मंडळाने काही महत्त्वाची पावलं उचलली आहेत. विद्यार्थ्यांना बारावीची परीक्षा सुरु होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत अर्ज करण्याची मुभा देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ग्रामीण भागात बायका डायरेक्ट नवऱ्याचं नाव घेत नाहीत | तसंच मीडियावाले डायरेक्ट मोदींच नाव न घेता 'सिस्टिम' म्हणतात
भारतात कोरोनाच्या दुस-या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. कोरोनासाठीच्या खास वैद्यकीय सेवा तर दूरच पण लोकांना रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन आणि औषधे देखील मिळत नाहीये. कोरोनामुळे जीव गेला तर स्मशानभूमी आणि कब्रस्तानात जागा सापडत नाहीये. अतिशय चिंताजनक परिस्थिती भारतात निर्माण झाली आहे. यावर परदेशी माध्यमांनी मोदी सरकारला कोंडीत पकडले आहे. जाणून घ्या परदेशी मीडिया हाऊस काय म्हणत आहेत..
4 वर्षांपूर्वी -
आज राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक | १८ वर्षांवरील सगळ्यांना मोफत लस दिली जाणार?
केंद्र सरकारनं १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांच्या लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. देशातील अनेक राज्यांनी मोफत लसीकरणाची घोषणा केली आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अशातच आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थिती, मोफत लसीकरण, लॉकडाऊन याचसोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. आज दुपारी साडेबारा वाजता मंत्रिमंडळाची ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना परिस्थितीतही CBI राज्यात येते | पण कोरोना परिस्थितीमुळे चौकशीला येऊ शकत नाही असं रश्मी शुक्लांचं उत्तर
वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवले आहेत. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मुंब्रा भागातील प्राईम क्रिटिकेयर या खाजगी हॉस्पिटलला आग | 4 रुग्णांचा मृत्यू
मुंब्रा शहरातील कौसा भागात असलेल्या प्राईम क्रिटिकेयर सेंटर या हॉस्पिटलमध्ये बुधवारी सकाळी पहाटे 3 वाजता भीषण आग लागली. या घटनेत 4 रुग्णांचा मृत्यू झाला असून 20 रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आग लागल्यानंतर आयसीयूतील 6 रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत असताना 4 रुग्णांचा मृत्यू झाला. यास्मिन शेख ( 46 वर्षे), नवाब शेख (47 वर्षे), हलिमा सलमानी (70 वर्षे), हरीश सोनावणे (57 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.
4 वर्षांपूर्वी -
कौतुकास्पद | राष्ट्रवादीचे आ. निलेश लंके थेट कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची देखभाल करत आहेत
राज्यातील कोरोना परिस्थिती ही दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. दरम्यान राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाणार का? हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
4 वर्षांपूर्वी -
देशात अव्वल | महाराष्ट्राने आज दीड कोटी लसीकरण पूर्ण केले | आरोग्य यंत्रणा करतेय उत्तम कामगिरी
राज्यातील कोरोना परिस्थिती ही दिवसेंदिवस गंभीर होत असताना दिसत आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहिमेवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस दिली जाणार आहे. दरम्यान राज्यात 18 वर्षांवरील नागरिकांचे मोफत लसीकरण केले जाणार का? हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिकांनी हा निर्णय झाला असल्याचे म्हटले होते. मात्र अद्याप यावर मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण आलेले नाही. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाष्य केले आहे.
4 वर्षांपूर्वी