महत्वाच्या बातम्या
-
तर रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी आम्ही रुग्णालयांना सुजय विखे-पाटील यांचाच नंबर दिला असता - जयंत पाटील
आम्हाला आधी कळालं असतं तर रेमडेसिविर इंजेक्शन्स मिळवण्यासाठी आम्ही रुग्णालयांना सुजय विखे-पाटील यांचाच नंबर दिला असता, असा टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. हा प्रकार अतिश्य गंभीर आहे. औरंगाबाद उच्च न्यायालायने त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. लोकप्रतिनिधी इंजेक्शन्स घेऊन बसायला लागले आणि त्यांचे वाटप करत असतील तर वैद्यकीय यंत्रणांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन मिळण्यात अडथळे येतील, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
मोदींवर पूर्ण विश्वास, ते मद्रास कोर्टाच्या टिप्पणीला गांभीर्याने घेतील असा मला विश्वास - संजय राऊत
आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं चित्रं ज्या पद्धतीने निर्माण केलं जात आहे. त्यावरून हे फार मोठं षडयंत्र असू शकतं. भारताची अर्थव्यवस्था नष्ट करण्याचं हे मोठं षडयंत्र असू शकतं, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा गंभीर दावा केला. राष्ट्रीय स्तरावर भारताचा अपमान होत असेल तर त्यात राजकारण करण्याची गरज नाही.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत राज्यभर दौरे, आरोग्यमंत्र्यांना जेवणासाठीही वेळ अपुरा, गाडीतच अल्पोपहार घेतला
महाराष्ट्रातील कोरोना स्थिती गंभीर असून सरकार, आरोग्य यंत्रणा ही स्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सध्या राज्याला पुन्हा फीट बनवण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळेच टोपेंना आपल्या बिझी शेड्यूलमधून जेवणासाठीही वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. त्याचे कारण असे की, औरंगाबाद विमानतळावर गाडीत बसून अल्पोपहार घेतानाचा राजेश टोपे यांचा व्हिडीओ समोर आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात समन्स
वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात समन्स बजावण्यात आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने रश्मी शुक्ला यांना समन्स पाठवले आहेत. महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला सध्या केंद्र सरकारकडे प्रतिनियुक्तीवर आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अमली पदार्थाच्या खोट्या गुन्ह्यात गुंतवण्याच्या प्रकरणात थेट सहभाग | तरी भाजपकडून परमबीर यांची ठाणे पोलिस आयुक्तपदी नियुक्ती - लेटर बॉम्ब
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पाेलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातील पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी लेटरबॉम्ब टाकला आहे. परमबीरसिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे पत्रच घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लिहिले आहे. परमबीरसिंग १७ मार्च २०१५ ते ३१ जुलै २०१८ अशी सलग तीन वर्षे ठाणे शहराचे पोलिस आयुक्त होते. त्या काळात घाडगे हेही तिथे पोलिस निरीक्षक होते.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग यांचा अॅन्टालिया रोडवर ६३ कोटीचा बंगला | एका गुन्ह्यात २०० कोटींचा भ्रष्टाचार - पोलीस अधिकाऱ्याचे आरोप
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पाेलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातील पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी लेटरबॉम्ब टाकला आहे. परमबीरसिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे पत्रच घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लिहिले आहे. परमबीरसिंग १७ मार्च २०१५ ते ३१ जुलै २०१८ अशी सलग तीन वर्षे ठाणे शहराचे पोलिस आयुक्त होते. त्या काळात घाडगे हेही तिथे पोलिस निरीक्षक होते.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | परमबीरसिंग एका पोलिस निरीक्षकाच्या बदलीसाठी घ्यायचे १ कोटी - पोलीस अधिकाऱ्याचे आरोप
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पाेलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्याविरुद्ध अकोल्यातील पोलिस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक बी. आर. घाडगे यांनी लेटरबॉम्ब टाकला आहे. परमबीरसिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे पत्रच घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महासंचालक व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लिहिले आहे. परमबीरसिंग १७ मार्च २०१५ ते ३१ जुलै २०१८ अशी सलग तीन वर्षे ठाणे शहराचे पोलिस आयुक्त होते. त्या काळात घाडगे हेही तिथे पोलिस निरीक्षक होते.
4 वर्षांपूर्वी -
शुभं बातमी | राज्यात गेल्या ६ दिवसांत तब्बल ४ लाख ४२ हजार रुग्ण कोरोनामुक्त झाले
महाराष्ट्राला एक अत्यंत मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर आणि वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली होती. मात्र, आता एक सकारात्मक बातमी अशी की आज (२६ एप्रिल) राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट झाली आहे. राज्यात आज 48 हजार 700 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर आणखी एक चांगले वृत्त असे की, आज कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडाही मोठा आहे. राज्यात तब्बल 71 हजार 736 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार व जनतेच्या एकत्रीत प्रयत्नांना यश येतंय | कोरोनाबाधितांच्या आकड्यात कमालीची घट
महाराष्ट्राला एक अत्यंत मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर आणि वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली होती. मात्र, आता एक सकारात्मक बातमी अशी की आज (२६ एप्रिल) राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट झाली आहे. राज्यात आज 48 हजार 700 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर आणखी एक चांगले वृत्त असे की, आज कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडाही मोठा आहे. राज्यात तब्बल 71 हजार 736 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सुखद बातमी | राज्यातील कोरोनाची लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ओसरणार - टास्क फोर्सचा अंदाज
महाराष्ट्राला एक अत्यंत मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यात सुरू असलेला कोरोनाचा कहर आणि वाढत्या रुग्णसंख्येने चिंता वाढली होती. मात्र, आता एक सकारात्मक बातमी अशी की आज (२६ एप्रिल) राज्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्यात मोठी घट झाली आहे. राज्यात आज 48 हजार 700 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर आणखी एक चांगले वृत्त असे की, आज कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडाही मोठा आहे. राज्यात तब्बल 71 हजार 736 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसजी कृपया खोटे बोलणे थांबवा, त्या यादीत महाराष्ट्रात असलेल्या प्रकल्पांचा समावेश - सचिन सावंत
केंद्र सरकारने महाराष्ट्राला रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा पुरवठा करताना इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट मदत केली आहे. त्यामुळे महाविकासआघाडीमधील बोलघेवड्या नेत्यांनी रोज उठून कांगावा करु नये, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. सध्या लोक दु:खात आहेत. त्यामुळे त्यांना अशाप्रकारचे राजकारण पसंत पडणार नाही. केंद्र आणि राज्य सरकार आपापल्यापरीने महाराष्ट्राला मदत करत आहेत. त्यामुळे मदत मिळत नसल्याचा कांगावा बंद करावा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
4 वर्षांपूर्वी -
आमदार, खासदार खरेदीसाठी पैसा आहे, पण व्हेटिलेटर, इंजेक्शन, औषधोपचार यासाठी पैसा नाही - असीम सरोदे
भारतात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेचे रूपांतर भयानक संकटात झाले आहे. रुग्णालये भरली आहेत, ऑक्सिजनचा तुटवडा आहे, हताश रुग्ण डॉक्टरांच्या प्रतीक्षेत मृत्युमुखी पडत आहेत. मृतांची प्रत्यक्षातील संख्या सरकारी आकड्यांपेक्षा खूप जास्त आहे. जगातील जवळपास निम्मे रुग्ण भारतात आढळत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
जे बोलघेवडे लोक सातत्याने केंद्रावर बोलतात त्यांना इतकंच सांगू इच्छितो की.... काय म्हणाले फडणवीस
एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून दुसरीकडे मुंबईतील नवीन रुग्णांचा आकडा सातत्याने कमी होताना दिसत आहे. दुसरी चांगली बातमी ही की, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Weather Report | पुढील 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता
एकीकडे उन्हाच्या झळा वाढत असताना आगामी चार दिवस म्हणजेच 29 एप्रिलपर्यंत मध्य भारतासह महाराष्ट्रात मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. आगामी 5 दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोविशिल्डचे दीड लाख डोस उपलब्ध झाले | मुंबईत उद्यापासून सर्व लसीकरण केंद्रे सुरु - महानगरपालिका
राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्ण वाढीचे रोज नवे विक्रम नोंदवले जात आहे. असे असताना कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात यावा यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकार 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोठा निर्णय | राज्यात 18 ते 45 वयोगटातील नागरिकांना दिली जाणार मोफत लस
राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्ण वाढीचे रोज नवे विक्रम नोंदवले जात आहे. असे असताना कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात यावा यासाठी राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा केली आहे. राज्य सरकार 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करणार आहे. राज्यातील वाढता कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारकडून 1 मेपर्यंत कडक लॉकडाऊन लागू केले आहे. दरम्यान सरकारकडून कठोर निर्बंधही लादले जात आहेत. यासोबतच लसीकरण मोहिमेवरही ठाकरे सरकारने लक्ष केंदीत केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मतदारसंघातील कोरोना रुग्णांचे हाल बघवले नाही | बाळासाहेबांच्या शिवसैनिक आमदाराने ९० लाखाची एफडी मोडली आणि...
कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेमुळे देशात नवीन रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात 3 लाख 48 हजार 979 रुग्ण आढळून आले आहे. हा आकडा कोरोना महामारी सुरु झाल्यापासूनचा सर्वात मोठा आकडा असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, देशात सक्रीय रुग्णांचा आकडादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु, यामध्ये दिलासा देणारी बातमी म्हणजे सक्रीय रुग्णांसोबत कोरोनापासून मुक्त होणार्यांचे प्रमाणदेखील वाढतच आहे. विशेष म्हणजे सक्रीय रुग्णांमधील 2 लाख 15 हजार 803 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. देशात गेल्या 100 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मोहीम सुरु असून येत्या 1 मेपासून 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग म्हणालेले वाझेला सांगितले पण त्याने ते ऐकले नाही, जर अपराधच घडला नाही तर धाडी कसल्या? - काँग्रेस
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर सीबीआयने टाकलेल्या छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या कारवाईवरून मोदी सरकारवर संशय व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टाने केवळ प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मग गुन्हा आणि धाडी का टाकल्या असा भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सॅनिटायझरने हात धुवून कोरोना गेला नाही, एकदा भाजप पासून हात धुवून बघा - काँग्रेस
देशात कोरोना संक्रमित लोकांची संख्या पहिल्यांदा दोन लाखांपेक्षा जास्त नोंदवण्यात आली. त्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची मोकळीक आणि हलगर्जीपणामुळे दुसरी लाट ही अनियंत्रित झाली आहे. सरकार गर्दीच्या कार्यक्रमांवर बंधणे घालण्यात अपयशी ठरली. लस खरेदी करणे आणि व्हायरसच्या रिसर्चसाठी पैसे देण्याचे निर्णय उशीरा आले.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस सध्या मुख्यमंत्रीपदासाठी उतावीळ झाल्याने ते चुकीची पावलं टाकत आहेत - माजी पोलीस आयुक्त
राज्यात एकीकडे कोरोनाने धुमाकूळ घातला आहे तर दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले आहेत. राज्यातील या सर्व विषयांवर पण प्रामुख्याने कोरोना संकटात विरोधी पक्षाने घातलेल्या गोंधळवाल मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चांगलीच कानउघाडणी केली आहे. देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री होते. मात्र सध्या मुख्यमंत्रीपदासाठी ते उतावीळ झाले असून, त्यांच्याकडून चुकीची पावलं टाकली जात आहेत. माजी मुख्यमंत्री, आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कार्यकाळात गृहमंत्री म्हणून लागू केलेल्या कायद्याचा भंग करू नये, असं ज्युलिओ रिबेरो म्हणालेत. रिबेरो यांनी ‘ द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लेख लिहिला आहे. यामध्ये त्यांनी कायदा दाखवत त्यांना सुनावले आहे.
4 वर्षांपूर्वी