महत्वाच्या बातम्या
-
देशात व राज्यात परिस्थिती काय? इथे लोकांना काय करावं हे सुचत नाही अन चंद्रकांतदादांना सुचली कविता
देशात कोरोना रुग्ण बरे होणाच्या वेगामध्ये एका दिवसाच्या आत 111.20% ची वाढ झाली आहे. शुक्रवारी 24 तासांच्या आत विक्रमी 2 लाख 20 हजार 382 लोक रिकव्हर झाले आहेत. आतापर्यंत जगात एका दिवसाच्या आत बरे होणाऱ्या रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी गुरुवारी एका दिवसात विक्रमी 1 लाख 98 हजार 180 लोक बरे झाले. बुधवारी 192 लाख लोक रिकव्हर झाले होते. मात्र चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचे नवीन रुग्ण आढळण्याची संख्या सातत्याने वाढत आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचे छापे
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि त्यांच्या इतर मालमत्तांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोप प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | अखेर पहिली ऑक्सिजन एक्सप्रेस महाराष्ट्रात दाखल
विशाखापट्टणम येथून ऑक्सिजनचे ७ टँकर भरून निघालेली रेल्वेची पहिली ऑक्सिजन एक्प्रेस अखेर काल (२३ एप्रिल) रात्री ८ वाजता महाराष्ट्रातील नागपूर स्थानकात दाखल झाली आहे. १९ एप्रिलला कळंबोली येथून ही ऑक्सिजन एक्प्रेस विशाखापट्टणम येथे रवाना झाली होती.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या जीवनरक्षक औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांनो, जरा या चोराकडून शिका - जयंत पाटील
बुधवारी रात्री 12 वाजेच्या सुमारास शासकीय रुग्णालयातून कोरोना लसीचे अनेक डोस चोरी झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त जितेंद्र खटकर यांनी दिली. परंतु, गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास चोर सिव्हील लाईन पोलीस ठाण्याबाहेर असलेल्या चहाच्या दुकानाच्या वयोवृद्ध मालकाकडे गेला आणि त्याच्याकडे एक पिशवी दिली. त्याने त्या चहावाल्याला सांगितले की, हे एका पोलिसांचे जेवण आहे. बॅग ताब्यात देवून चोर लगेच तेथून गायब झाला.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र कडक निर्बंध | दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात जाण्यासाठी कसा मिळवाल ई-पास? - स्टेप बाय स्टेप
राज्यात करोनाच्या गंभीर होत असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कठोर निर्बंधांची घोषणा केली आहे. यामध्ये जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा आणि आंतरराज्य असा प्रवास करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अशा प्रकारच्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच फक्त प्रवासाची मुभा देण्यात आली असून अशा प्रवासासाठी पास काढण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासाठी पोलीस विभागाकडून संकेतस्थळाची लिंक देण्यात आली असून त्या लिंकवरून संबंधितांनी पाससाठी अर्ज करण्याचं आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
रोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी दररोज बिनबुडाचे आरोप करतात - उपमुख्यमंत्री
अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी हे पद सोडावं, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती. कोरोनाच्या संकटकाळात अजित पवार उपलब्ध नाहीत. ते सध्या आहेत तरी कुठे, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता.
4 वर्षांपूर्वी -
वसईतील कोव्हीड सेंटरमध्ये सेंट्रलाइझ्ड एसीचा स्फोट | 13 रुग्णांचा मृत्यू - आ. हितेंद्र ठाकूर
पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये एका कोरोना सेंटरला आग लागल्याने 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या कोरोना कंट्रोल रूमने याची पुष्टी लेली आहे. इतर रुग्णांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. या कोव्हीड सेंटरमध्ये एकूण 90 रुग्णांवर उपचार सुरु होते. आगीची ही घटना शुक्रवारी पहाटे 3 वाजताच घडली असून सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
आम्हाला काय दोष-शिविगाळ करायची ती करा, पण सत्ता गेल्याची सजा निष्पाप जनतेला देऊ नका - काँग्रेस
देशभरामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडली आहे. असं असतानाच दिल्ली उच्च न्यायालयानेही बुधवारी केंद्र सरकारला चांगलंच फेलावर घेत, “भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, असं उद्वेगाने सुनावलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राला छत्तीसगड'मधून येणारा ऑक्सिजनचा पुरवठा 110MT वरून 60MT केला - काँग्रेसचा आरोप
देशभरामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडली आहे. असं असतानाच दिल्ली उच्च न्यायालयानेही बुधवारी केंद्र सरकारला चांगलंच फेलावर घेत, “भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या”, असं उद्वेगाने सुनावलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानांनी आरोग्य सेवांचा तुटवडा होणार नाही असं म्हटलेलं पण लस, रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा तुडवडा होतोय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही राज्याला ऑक्सिजन आणि रेमडेसिविर इंजेक्शन्स कमी पडून दिली जाणार नाहीत, असे म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या मनात कोणत्याही राज्याविषयी आकस नाही. पण भाजपमधील काही राजकीय शुक्राचार्य महाराष्ट्रापर्यंत मदत पोहोचवण्यात अडथळे निर्माण करत आहेत, असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
जनतेसाठी राज्य सरकार केंद्र सरकारच्या पाया पडायलाही तयार | पण लोकांना ऑक्सिजन उपलब्ध करून द्या - आरोग्यमंत्री
देशात बुधवारी ३.१४ लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. १५ महिन्यांच्या कोरोना काळात एखाद्या देशात एक दिवसात आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या सर्वात मोठी आहे. एवढेच नव्हे, बुधवारी देशात २,१०१ रुग्णांचा मृत्यू झाला. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असली तरी अमेरिकेच्या तुलनेत ती निम्मी आहे. देशात नव्या रुग्णांची संख्या १ वरून ३ लाख होण्यासाठी फक्त १५ दिवस लागले. या काळात महाराष्ट्रासह इतर राज्यांतही संसर्ग वेगाने वाढला. ६ एप्रिलला देशात १ लाख रुग्ण आढळले तेव्हा त्यात महाराष्ट्रातील ४८% रुग्ण होते.
4 वर्षांपूर्वी -
हिंदू-मुस्लिम नव्हे माणुसकी | 22 लाखांची SUV विकून मुंबईकरांसाठी 'ऑक्सिजन मॅन' झालाय शहनवाज शेख
देशात बुधवारी ३.१४ लाख नवे कोरोना रुग्ण आढळले. १५ महिन्यांच्या कोरोना काळात एखाद्या देशात एक दिवसात आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत ही संख्या सर्वात मोठी आहे. एवढेच नव्हे, बुधवारी देशात २,१०१ रुग्णांचा मृत्यू झाला. ही देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी संख्या असली तरी अमेरिकेच्या तुलनेत ती निम्मी आहे. देशात नव्या रुग्णांची संख्या १ वरून ३ लाख होण्यासाठी फक्त १५ दिवस लागले. या काळात महाराष्ट्रासह इतर राज्यांतही संसर्ग वेगाने वाढला. ६ एप्रिलला देशात १ लाख रुग्ण आढळले तेव्हा त्यात महाराष्ट्रातील ४८% रुग्ण होते.
4 वर्षांपूर्वी -
नाशिक | झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाक्या बसविण्याचा ठेका भाजपच्या सरकारने दिल्याचं स्पष्ट
नाशिक महानगरपालिकेच्या कोरोना रुग्णालयात काल ऑक्सिजन गळती झाल्याने अनेक रुग्णांचा जीव गेला आहे . या घटनेमुळे झाकीर हुसैन रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 22 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण गंभीर आहेत. सुरुवातीला 11 जणांच्या मृत्यूचे वृत्त आले होते, अवघ्या काही मिनिटांत मृतांचा आकडा दुपटीने वाढला. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात 13 केएल क्षमतेचा ऑक्सिजन टँक लावण्यात आला होता. हाच टँक बुधवारी लीक झाला. हा टँक लिक होऊन अर्धा तास ऑक्सिजन पुरवठा बंद होता. पण, कुटुंबियांचा आरोप आहे की, हा पुरवठा दोन तास बंद होता.
4 वर्षांपूर्वी -
Maharashtra Lockdown | लग्न समारंभासाठी नवी नियमावली
राज्यात कोरोना रूग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने लॉकडाऊन जारी करणार असल्याचे संकेत काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीनंतर मंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर काल (२१ एप्रिल) सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात कडक निर्बंधांची नियमावली जारी | आज रात्री ८ पासून लागू होणार नियम
राज्यात कोरोना रूग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने लॉकडाऊन जारी करणार असल्याचे संकेत काल झालेल्या मंत्री मंडळाच्या बैठकीनंतर मंत्र्यांनी दिले होते. त्यानंतर काल (२१ एप्रिल) सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाशिक दुर्घटना अतिशय वेदनादायी, पण बेपर्वाई करणाऱ्यांना कडक शासन व्हायलाच हवं - राज ठाकरे
नाशिकमधील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाल्याने 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एकीकडे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे, तर दुसरीकडे ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाल्याची घटना घडली.
4 वर्षांपूर्वी -
नाशिक दुर्घटना | मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त | मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर
नाशिकमध्ये महानगर पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने सर्वत्र हाहाकर माजला आहे. दुरुस्तीच्या कामांमुळे अर्धा तास रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. याच अर्ध्या तासात तब्बल 22 जणांचा जीव एका झटक्यात गेला. यापैकी काही अनेक रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत होते. तर काही रुग्णांमध्ये सुधारणा होत होत्या. काहींनी आपल्या नातेवाइकाला घरी घेऊन जाण्याची तयारी देखील केली होती. पण, अर्ध्या तासाने होत्याचे नव्हते केले.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या दत्तक नाशिकमधील आरोग्यव्यवस्थेची पोलखोल | २०१७ मध्ये नाशिककरांना दिली होती मोठी वचनं
नाशिकमध्ये महानगर पालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने सर्वत्र हाहाकर माजला आहे. दुरुस्तीच्या कामांमुळे अर्धा तास रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा खंडित झाला. याच अर्ध्या तासात तब्बल 22 जणांचा जीव एका झटक्यात गेला. यापैकी काही अनेक रुग्ण अतिशय गंभीर अवस्थेत होते. तर काही रुग्णांमध्ये सुधारणा होत होत्या. काहींनी आपल्या नातेवाइकाला घरी घेऊन जाण्याची तयारी देखील केली होती. पण, अर्ध्या तासाने होत्याचे नव्हते केले.
4 वर्षांपूर्वी -
ऑक्सिजनच्या गळतीने २२ रुग्णांचा मृत्यू | पण भाजप नेत्यांना नाशिक महापालिकेत आपली सत्ता असल्याचाच विसर
राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना झाली आहे. या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 22 पेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडून गळती थांबवण्याचे काम सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेत ढिसाळ कारभार | ऑक्सिजन गळतीने २२ रुग्णांचा तडफडून मृत्यू
राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना झाली आहे. या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 11 पेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडून गळती थांबवण्याचे काम सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी