महत्वाच्या बातम्या
-
मुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत निर्णय घेणार हे जाहीर होताच अचानक मोदींनी जनतेला संबोधित केलं? - सविस्तर वृत्त
काेरोनावर मात करताना अर्थव्यवस्था ढासळू नये म्हणून केंद्र ३० एप्रिलनंतर मोठे निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. प. बंगाल विधानसभा व उप्र पंचायत निवडणुका २९ रोजी संपत आहेत. यानंतर तत्काळ निर्णय लागू होऊ शकतात. गेल्या लॉकडाऊनचा अनुभव पाहता यासाठी नवीन मॉडेल तयार केले जात आहे. ४० कोटी लोकांना लसीचे कवच देऊन वाहतुकीचे निर्णय मंत्रालये घेतील. २९ एप्रिलपासूनच याची अंमलबजावणी होऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
रुग्णांच्या जीवन मरणाशी संबंधित रेमडेसिवीरचा भाजप नगरसेवकाकडून काळाबाजार आणि मतदार जोडणीसाठी वापर
भाजपचे जळगाव-अमळनेरचे माजी आमदार व हिरा ग्रुपचे मालक शिरीष चौधरी व त्यांचे भाऊ या दोघांनी मिळून नंदुरबारच्या हिरा एक्झिक्युटिव्ह हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा जमा करून ठेवला. ८ आणि १२ एप्रिल रोजी त्यांनी नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यात रांगा लावून इंजेक्शन्सचा काळाबाजार केला.
4 वर्षांपूर्वी -
राज्याला आजपासून प्रतिदिन ६५ हजार रेमडेसिविर कुप्या मिळणार | अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांची माहिती
मागील आठवडाभर राज्याला केवळ ३५ हजार रेमडेसिविरच्या कुप्या मिळत होत्या. मात्र सात कंपन्यांच्या बॅच येण्यास प्रारंभ झाला असून राज्याला दैनंदिन ६५ हजार रेमडेसिविर कुप्या बुधवार, दि. २१ एप्रिलनंतर प्राप्त होतील. त्यामुळे रेमडेसिविरचा राज्यातील तुटवडा संपुष्टात येईल, अशी ग्वाही राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी मंगळवारी पत्रकारांना दिली.
4 वर्षांपूर्वी -
Corona Pandemic | केंद्राचाही सतर्कतेचा इशारा | मुख्यमंत्री उद्या संपूर्ण लॉकडाऊन घोषणा करणार
महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा पुर्ण लॉकडाऊन लागणार असल्याचे संकेत ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी दिले आहेत. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनीही आज किंवा उद्या महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लागणार असल्याचे सुतोवाच केले आहे. आज ( २० एप्रिल) राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली. यावेळी सर्व नेत्यांनी आपल्या जिल्ह्यातील स्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर मांडली. त्यामुळे लॉकडाऊन लावावा असाच सर्व मंत्र्यांचा आग्रह असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण | उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झालीय. अमित ठाकरे यांची कोरोना चाचणी केल्यानंतर, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. उपलब्ध माहितीनुसार त्यांच्यावर पुढील 14 दिवस उपचार करण्यात येणार आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे. अमित ठाकरे यांनी संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचाही सल्ला दिलाय.
4 वर्षांपूर्वी -
अपात्र असताना लसीकरण | तन्मय फडणवीस यांच्या दूरच्या काकूंची देखील प्रतिक्रिया आली.... काय म्हणाल्या?
तन्मय फडणवीस हे माजी मंत्री शोभा फडणवीस यांचे नातू, तर देवेंद्र फडणवीस यांचे चुलतबंधू अभिजीत फडणवीस यांचे सुपुत्र आहेत. तन्मय लस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यांनी तो काही वेळात डिलीटही केला. मात्र त्याआधी त्याचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले.
4 वर्षांपूर्वी -
महाविकासआघाडी सरकार त्यांच्या ओझ्यानेच कोसळेल, आम्हाला काहीही करावं लागणार नाही - अमित शहा
महाराष्ट्रातील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी स्थापीत केलेले महाविकासआघाडीचे सरकार लवकरच कोसळणार असा दावा राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून वारंवार केला जात आहे. यात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मोठे वक्तव्य केले आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत सगळ्यांनीच लवकरच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मला लोकांना घाबरावायचे नाही, मात्र इंग्लंडमधला दुसरा लॉकडाऊन 92 दिवस लांबला होता - डॉ. संजय ओक
राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे, मात्र तरीही कोरोना रुग्णांवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. गेल्या 24 तासांदरम्यान येथे 58,924 नवीन रुग्ण समोर आले आहेत. या दरम्यान 351 लोकांचा मृत्यू झाला आहे. ज्यानंतर आता मानले जात आहे की, दिल्लीच्या धर्तीवर मुंबईसह संपूर्ण राज्यात टोटल लॉकडाऊन लागू केले जाऊ शकते.
4 वर्षांपूर्वी -
तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक, त्याला कोणत्या निकषानुसार लस मिळाली याची मला कल्पना नाही - देवेंद्र फडणवीस
एकीकडे रेमडेसिविरच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापले असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. कालपर्यंत देशात ४५ वर्षांपक्षा अधिक वय असलेल्यांना कोरोना लस दिली जात होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी ‘कोरोना’ची लस घेतल्याचा फोटो वा यरल झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानांनीही लस घेण्याचे नियम पाळले, पण फडणवीस स्वतःच्या नियमांनुसार काम करतात - प्रियांका चतुर्वेदी
एकीकडे रेमडेसिविरच्या मुद्द्यावरून राज्यात राजकारण तापले असताना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने हल्लाबोल केला आहे. कालपर्यंत देशात ४५ वर्षांपक्षा अधिक वय असलेल्यांना कोरोना लस दिली जात होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे पुतणे तन्मय फडणवीस यांनी ‘कोरोना’ची लस घेतल्याचा फोटो वा यरल झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
रेमडेसिविर लोकांची गरज होती, मदतीसाठी केंद्राकडे न जाता फडणवीस पोलीस ठाण्यात गेले, ही शरमेची बाब
रेमडेसिविर इंजेक्शन्सचा वाद अजून पेटत आहे. यावर राज्याचे अन्न व औषध मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे प्रसार माध्यमांना माहिती देताना म्हणाले की, “भाजप नेते माझ्याकडे रेमडेसिविर उत्पादक ब्रुक कंपनीच्या मालकास १५ एप्रिल रोजी घेऊन आले. त्या वेळी कंपनीने निर्यात साठा विक्रीची राज्यात परवानगी देण्याची मागणी केली. रेमडेसिविर औषध राज्याला मिळेल या उदात्त भूमिकेतून माझ्या विभागाने १६ एप्रिल रोजी काही कंपन्यांना रेमडेसिविरचा निर्यात साठा राज्यात विक्री करण्यास संमती दिली होती. माझ्या विभागाने जेव्हा रेमडेसिविरची या कंपन्यांकडे मागणी नोंदवली, तेव्हा या कंपन्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस रेमडेसिवीर प्रमाणे लस जमा करुन अपात्र कुटुंबियांना देत आहेत | लोक मरत आहेत, तुमचं कुटुंब सुरक्षित - काँग्रेस
रेमडेसिविर इंजेक्शनच्या मुद्द्यावरुन रंगलेल्या राजकारणाला आता आणखीन धार चढण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकं रेमडेसिवीरसाठी वणवण भटकत आहेत | अन भाजपच्या नेत्याने रेमडेसिवीरचा साठा करणं हे मानवतेच्या विरोधात
राज्यात एका बाजूला कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवत असताना दुसऱ्या बाजूला राजकारण सुरू आहे. रेमडेसिविर इंजेक्शनवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात सुरू असलेला वाद दोन दिवसांपूर्वी थेट पोलीस ठाण्याक गेला. दमणस्थित ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रविण दरेकर यांनी रात्री पोलीस ठाण्यात धाव घेतली. भाजपचे नेते बराच वेळ पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.
4 वर्षांपूर्वी -
राजकीय पक्षाला रेमडेसिवीर मिळालीच कशी हा मूळ प्रश्न | चंद्रकांतदादा पाकिस्तान, चायना, देशाच्या घटनेवर बोलत बसले
आम्ही रेमडेसिवीर घेऊन काय पाकिस्तानला किंवा चायनाला देणार होतो का? आम्ही महाराष्ट्रालाच देणार होतो. मग रेमडेसिवीर घेतल्या तर चुकलं कुठं? असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा सवाल केला. विरोधी पक्षनेत्याला मुख्यमंत्र्यांसारखेच अधिकार असतात. ते माहिती घेऊ शकतात. घटनेतच तशी तरतूद आहे. त्यामुळे त्यांनी पोलिसांना जाब विचारला. कुणालाही उचलून आणायला काय महाराष्ट्रात बेबंदशाही आहे का? असा सवाल पाटील यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
रेमडेसिवीर खरेदीसाठी ४ कोटी ५० लाख कोणत्या खात्यातून दिले आणि GST? | फडणवीसांची चौकशीची करा - काँग्रेस
राज्यात एका बाजूला कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय सुविधांचा तुटवडा जाणवत असताना दुसऱ्या बाजूला राजकारण सुरू आहे. रेमडेसिविर इंजेक्शनवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षात सुरू असलेला वाद दोन दिवसांपूर्वी थेट पोलीस ठाण्याक गेला. दमणस्थित ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , प्रविण दरेकर यांनी रात्री पोलीस ठाण्यात धाव घेतली. भाजपचे नेते बराच वेळ पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. त्यांच्या या भूमिकेवर काँग्रेसनंदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
सराफ अमृतराव गुगलेच्या पुतण्या विरोधात जागा बळकावने, अवैद्य सावकारी असे गंभीर गुन्हे | दबावासाठी खोटे आरोप?
दरम्यान, बार्शी शहरचे पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांनी आपल्याकडे तब्बल 5 लाख रुपयांची मागणी केली. ते देण्यास नकार दिल्याने दुकान सील केल्याचा आरोप सराफ व्यापारी अमृतराव गुगळे यांनी केला आहे. हे सर्व हप्ते गृह मंत्रालयापर्यंत पोहोचवावे लागतात, असंही पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावींनी म्हटल्याचा आरोप सराफ व्यावसायिकाने केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
माझ्या माहितीप्रमाणे सामान्य माणसापेक्षा तळीरामांना कोरोना लवकर होतो | मला जनतेचे आशीर्वाद - फडणवीस
देशात आणि राज्यात सध्या कोरोनामुळे सामान्य लोकं धास्तावलेली आहे. कोरोनाचा कहर एवढा वाढला आहे की आरोग्य यंत्रणा देखील अपुरी पडत आहे. त्यात रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने रुग्ण आणि त्यांचेच कुटुंबीय देखील चिंतेत आहेत. त्यात भाजप केंद्राकडे मदत मागायची सोडून राज्य सरकार कसं अडचणीत येईल याचीच आखणी करताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे आमदार देखील संतापल्याचं पाहायला मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकांचा श्वास कोंडतोय अन दोन गुजराती नेत्यांची ऑक्सिजनवरून भिन्न विधानं | राज्याला बदनाम करणं हेच ध्येय?
आज दिवसभरात राज्यात ६८ हजार ६३१ करोनाबाधित वाढले असून, ५०३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ६० हजार ४७३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ६,७०,३८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आज राज्यात ५०३ रूग्णांचा मृत्यू तर ६८ हजार ६३१ करोनाबाधित वाढले
आज दिवसभरात राज्यात ६८ हजार ६३१ करोनाबाधित वाढले असून, ५०३ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.५८ टक्के एवढा आहे. राज्यात आजपर्यंत ६० हजार ४७३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर, राज्यात आज रोजी एकूण ६,७०,३८८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
4 वर्षांपूर्वी -
रेमडेसिवीर इंजेक्शन्स मुंबई महापालिकेच्या निवडणूक रणनीतीचा भाग होणार होती? | अनेक शंका बळावल्या - सविस्तर
ब्रुक फार्मा कंपनीचे संचालक मोहित जैन, अंशुल केजरीवाल आणि शिरीष केजरीवाल यांनी ५० हजार रेमडीसीवीर इंजेक्शनच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांची काही दिवसांपूर्वी भेटी घेतली होती. तसेच अधिक पुरवठा करण्यासंदर्भात चर्चा केली होती मात्र सदर चर्चा ही राज्य सरकारच्या मदतीची सांगून भाजप पक्षाकडे हा पुरवठा होणार होता अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. त्यासाठी कंपनीच्या प्रमुख वितरकाचा संपर्क क्रमांक आणि कोणाला द्यायचं हे देखील कंपनीच्या वितरकाला आदेश देण्यात आले होते असं वृत्त आहे. देवेंद्र फडणवीसांना मुंबईत भेटणारे कंपनीचे मालक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा आरोग्य मंत्र्यांना भेटले नाहीत.
4 वर्षांपूर्वी