महत्वाच्या बातम्या
-
मी सुद्धा विरोधी पक्षनेता होतो, पण फडणवीसांसारखा कुत्र्या-मांजराचा खेळ खेळलो नाही - खडसे
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या सर्वात जास्त सक्रीय रुग्ण आढळून येत आहे. नवीन सक्रीय रुग्ण येण्याच्या बाबतीत राज्य सध्या देशात पहिल्या नंबरवर आहे. महाराष्ट्र राज्यात जानेवारी ते मार्च महिन्यातील 361 सक्रीय रुग्णांचे सॅम्पल घेण्यात आले. दरम्यान, त्यामध्ये जीनोम सीक्वेंसिंग केले असता 220 नमुन्यात डबल म्यूटेशन व्हायरस आढळले होते. हे व्हायरस आता राज्यातील अमरावती, अकोला, पुणे, नागपूर, वर्धा, ठाणे, औरंगाबाद आदी जिल्हात आढळून आले आहे. त्यामुळे सरकार आणि प्रशासन शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
इंजेक्शनची साठेबाजी करणाऱ्या गुजराती व्यापाऱ्यांची चौकशी करताच इतकी तडफड हा कुठला महाराष्ट्रधर्म?
मुंबईमध्ये शनिवारी रात्री 12 वाजेच्या जवळपास कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनवर मोठा राजकीय गदारोळ पहालाय मिळाला. मुंबई पोलिसांनी एक ड्रग डिस्ट्रीब्यूशन कंपनीच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले होते. यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आपल्या काही समर्थकांसोबत विलेपार्ले पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. येथे जोन-8 च्या DCP मंजुनाथ शिंगेंच्या ऑफिसमध्ये दोन्ही नेत्यांचा पोलिस अधिकाऱ्यांसोबत वाद झाला.
4 वर्षांपूर्वी -
पोलिसांना कायदा शिकवणारे फडणवीस जमावबंदी असताना मोठा मॉब घेऊन पोलीस ठाण्यात | पहा व्हिडिओ-फोटो
मुंबईमध्ये शनिवारी रात्री 12 वाजेच्या जवळपास कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनवर मोठा राजकीय गदारोळ पहालाय मिळाला. मुंबई पोलिसांनी एक ड्रग डिस्ट्रीब्यूशन कंपनीच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेतले होते. यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आपल्या काही समर्थकांसोबत विलेपार्ले पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. येथे जोन-8 च्या DCP मंजुनाथ शिंगेंच्या ऑफिसमध्ये दोन्ही नेत्यांचा पोलिस अधिकाऱ्यांसोबत वाद झाला.
4 वर्षांपूर्वी -
राज्यावर कोरोना संकट | राष्ट्रवादीच्या आमदाराने उभारलं ११०० बेडचं कोविड सेंटर | १०० बेड्सना ऑक्सिजन सुविधा
राज्यात दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग अधिकच झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येते असून, रूग्ण मृत्यूमध्येही वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात १५ दिवसांसाठी लॉकडाउन देखील जाहीर करण्यात आलेला आहे. मात्र तरी देखील करोनाबाधितांची संख्या ही वाढल्याचे समोर येत आहे. आज दिवसभरात राज्यात ६३ हजार ७२९ करोनाबाधित वाढले असून, ३९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातीलर मृत्यू दर १.६१ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत ५९ हजार ५५१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
देशभरात रुग्णांना रेमडेसीवीर नाही, ऑक्सीजन नाही, अंत्यसंस्कारासाठी रांगा तरी मोदी निवडणुकीच्या प्रचारात
कोरोना महामारीच्या संकटाची चाहूल लागताच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारला धोक्याची जाणीव करून दिली होती. महामारीच्या या वर्षभरात सातत्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत सकारात्मक सूचना केल्या परंतु सत्तेच्या अहंकाराने आपल्याच मस्तीत दंग असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे नेते, राहुल गांधी यांना गांभीर्याने घेत नाही असे म्हणत त्यांची खिल्ली उडवण्याचा पोरकटपणा करत राहिले.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाची तिसरी लाट कधीही उसळेल | उद्धव ठाकरेंचं उद्योगांना नियोजनपूर्वक सज्ज राहण्याचं आवाहन
कोविडचा झपाट्याने वाढता प्रादुर्भाव पाहता सध्याच्या परिस्थितीत ऑक्सिजनची नितांत गरज आहे, याशिवाय उद्योगांनी औषधे, बेड्स सुविधा वाढविणे, चाचणी केंद्रे, लसीकरणाला वेग देणे अशी या लढाईत शक्य होईल तशी सर्व मदत राज्य सरकारला करावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उद्योगांना केले. कोविडची तिसरी लाट आल्यास उद्योग- व्यवसायांचे नुकसान होऊ नये आणि अर्थचक्राला देखील झळ बसू नये म्हणून उद्योगांनी आत्तापासूनच कोविड सुसंगत कार्यपद्धतीचे नियोजन करून तशा सुविधा उभाराव्यात व कार्यप्रणाली अवलंबवावी असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले . यावर प्रतिसाद देतांना कोविडविरुद्धच्या लढाईत संपूर्ण उद्योग विश्व आपल्याबरोबर आहे असा एकमुखाने विश्वास राज्यातील प्रमुख उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांना दिला.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी ऑक्सिजन-रेमडेसिवीर संदर्भात मोदींना कॉल केला | पण ते प्रचारात आहेत असं उत्तर मिळालं
महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती रोज चिंताजनक होत चालली आहे. वाढत्या कोरोनामुळे राज्यात ऑक्सिजन, रेमेडेसिविर, लस सगळ्याच गोष्टींचा आता तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या २४ तासांत ३ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन असं वृत्त होतं. महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक आणि ऑक्सिजन तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला १२०० ते १५०० मेट्रीक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली होती असं सांगण्यात आलं.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, केंद्राची कंपन्यांना धमकी, नवाब मलिक यांचा गंभीर आरोप
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केद्र सरकारवर गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्राला रेमडेसिवीर विकू नका, नाही तर कारवाई केली जाईल, अशी धमकी केंद्राने औषध विक्रेत्या कंपन्याना दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मलिक यांच्या आरोपामुळे एकच खळबळ उडाली असून त्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्यात ऑक्सिजन तुटवडा | मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना ३ वेळा फोन
महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती रोज चिंताजनक होत चालली आहे. वाढत्या कोरोनामुळे राज्यात ऑक्सिजन, रेमेडेसिविर, लस सगळ्याच गोष्टींचा आता तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमिवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या २४ तासांत ३ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा उद्रेक आणि ऑक्सिजन तुटवड्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळेच महाराष्ट्राला १२०० ते १५०० मेट्रीक टन ऑक्सिजन मिळावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांकडे केली होती.
4 वर्षांपूर्वी -
राज ठाकरेंच्या पत्रानंतरच हाफकिनला परवानगी मिळाली, असे म्हणणे बालिशपणाचे होईल - महापौर
राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर आहे. दरम्यान राज्यात लसीच्या डोसचा तुटवडा निर्माण झाला. यानंतर केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. यापार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लसीकरण मोहिम पुर्ववत व्हावी यासाठी केंद्र सरकारने मुंबईतील हाफकिन संस्थेला लस निर्मितीची परवानगी दिली. मात्र, आता त्यावरुन आता शिवसेना आणि मनसेमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
डॉक्टरांनी रेमडिसिवीर इंजेक्शन लिहून दिलंय, पण ते मिळत नाही, आता काय करावे? | डॉ. अमोल कोल्हे सांगतात...
महाराष्ट्रातील कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पर्यायी आरोग्य सेवा अपूरी पडताना दिसत आहे. या कोरोनाबाधित रुग्णांना उपचारादरम्यान दिलं जाणारं रेमडेसिवीर हे इंजेक्शन मिळवताना रुग्णांच्या नातेवाईकांचा जीव मुठीत आला आहे.अशातच राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी रेमडेसिवीरला पर्यायी कोणतं औषध आहे, याबाबत नागरिकांना माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
बेळगाव | जे महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आले त्यांनी स्वतःला महाराष्ट्र द्रोही सिद्ध केलंय - शुभम शेळके
हा लढा बेळगाव विरुद्ध कर्नाटक नसून महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आहे. जे महाराष्ट्रातून आमच्या विरोधात प्रचाराला आले त्यांनी स्वतःला महाराष्ट्र द्रोही सिद्ध केलं आहे, अशा शब्दात बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी महाराष्ट्राचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. शेळकेंनी मतदानाचा हक्क बजावला.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | काही व्हॉट्सअप फॉरवर्ड्स खरोखरच फॉरवर्ड करण्याच्या योग्यतेचे असतात
देशभरात मेडिकल ऑक्सीजनचे संकट वाढत आहे आणि परिणामी इस्पितळांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. वेळेवर ऑक्सीजन मिळत नसल्याने अनेक कोरोना रुग्णांचे प्राण जात आहेत. आता केंद्र सरकार निवडणुकीच्या प्रचारातून सामान्य लोकांसाठी थोडा वेळ काढताना दिसत आहेत. केंद्र सरकारने 50 हजार मॅट्रीक टन मेडिकल ऑक्सीजनची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंढरपूर-मंगळवेढा | पोटनिवडणूकीच्या मतदानाला सुरुवात
मागील अनेक दिवसांपासून ज्या निवडणूकीची जय्यत तयारी, सभा सुरू होत्या तो दिवस आज (१७ एप्रिल) आला आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू झाले आहे. या निवडणूकीत राष्ट्रवादीकडून दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली असून भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
दुसरी लाट भयानक | लोकांना गांभीर्य कळेना | राज्य कडकडीत लॉकडाऊनच्या दिशेने
मुख्यमंत्र्यांनी राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी त्याला सहकार्य करावे. मागील लॉकडाऊनमध्ये नागरिकांना बऱ्याच अडचणी सहन कराव्या लागल्या. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढतच आहे. निर्बंध लावूनही काही जागी गर्दी दिसून येत आहे. आता नागरिकांनी निर्बंधांचे पालन केले नाही तर राज्यात पूर्वीप्रमाणे कडक लॉकडाऊन लागू करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिला. दरम्यान, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मागच्या वर्षीची टाळेबंदी आणि सध्याची संचारबंदी यात फरक असून आणखी कठोर निर्बंधांची गरज व्यक्त केली.
4 वर्षांपूर्वी -
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी
दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. अशाकाळात मजुर, कष्टकरी, निराधार, बेघर, गरीबांसाठी राज्यसरकारची शिवभोजन थाळी योजना आधार देणारी ठरत असल्याचे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. दरम्यान गुरुवारी (१४ एप्रिल) पहिल्याच दिवशी तब्बल ९६ हजार ३५२ शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले तर आज दुपारपर्यंत ९८ हजार ९८५ थाळ्यांचे मोफत वितरण करण्यात आले असल्याची माहितीही छगन भुजबळ यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
१९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे
राज्यात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. परिणामी करोनाबाधितांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील रेमडेसिवीरचा साठा वाढण्यासंदर्भात एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर अन्न व प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस
देशासाठी सर्वात वाईट बातमी आहे. कारण कोरोना व्हायरसमुळे परिस्थिती सातत्याने बिघडत असलेली पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांच्या आत देशात विक्रमी 2 लाख 16 हजार 642 लोक संक्रमित आढळले आहेत. गेल्या वर्षी संक्रमणाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एका दिवसात समोर आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांचा हा सर्वात मोठा आकडा आहे. या दरम्यान 1 लाख 17 हजार 825 लोक बरेही झाले आहेत. तर 1182 रुग्णांनी जीव गमावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
भाजप मागील पाच वर्षे महाराष्ट्रात सत्तेत होती, त्यावेळीही देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले शिवाय आता एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे त्यामुळे मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांनी इथे येऊन केले असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
बेळगाव प्रकरणी फडणवीसांच्या पाठिंब्याची गरज होती | पण त्यांनी वेगळी भूमिका घेतली - राऊत
राज्यात एकीकडे कोरोना रूग्ण संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. पंढरपूर मंगळवेढा निवडणूकीची एकीकडे तयारी सुरू आहे तर दुसरीकडे बेळगाव लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत शुभम शेळके या उमेदवाराच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये गेले होते. यावेळी त्यांनी त्यांच्या दौऱ्यावर आणि भाजपलाही सुनावले आहे.
4 वर्षांपूर्वी