महत्वाच्या बातम्या
-
हाफकिनला लस उत्पादनाची परवानगी | राज ठाकरेंकडून मोदी सरकारचे आभार
केंद्र सरकारने हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी दिली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. हाफकिन इन्स्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी मिळाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. केंद्र सरकारकडून असंच सहकार्य मिळाल्यास आपण एकत्रितपणे या संकटावर मात करु, असे राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपचा आमदार फुटला अन् एखाद्या मतदारसंघात पोटनिवडणुक लागली तर आश्चर्य वाटू नये
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार ऐन रंगात आला होता. भाजप आणि राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी या निवडणुकीसाठी मतदारसंघात प्रचारसभांचा धडाका लावला होता. भारतीय जनता पक्षाचे चे सरकार येईल असं खोटं देवेंद्र फडणवीस वारंवार बोलत असतात. त्यामुळे चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांना त्रास नको म्हणून आम्ही गप्प आहोत. अन्यथा भाजपचा आमदार फुटला आणि आणखी एखाद्या मतदारसंघात पोटनिवडणुक लागली तर आश्चर्य वाटून घेऊ नये असा सूचक इशारा आज (१४ एप्रिल) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
हाफकीनला लस निर्मितीसाठी मान्यता | मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश | राज्याच्या लोकसंख्येइतकी निर्मिती क्षमता
भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ लस बनवण्यास केंद्र सरकारने राज्याच्या हाफकिन संस्थेस मान्यता दिली आहे. केंद्र शासनाने ही परवानगी दिल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर लस उत्पादन सुरू होऊ शकते, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने ही लस बनवण्यास केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट | महाराष्ट्रात परतणाऱ्यांचा शोध सुरू
हरिद्वारमधील कुंभमेळ्यामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचं चित्र समोर आलंय. कुंभमेळ्यात 10 ते 14 एप्रिलदरम्यान 1700 हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झालीय. जगातील सर्वात मोठा धार्मिक मेळावा कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची भीती आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी मेळाव्यात पाच दिवसांत 2,36,751 जणांच्या कोविड चाचण्या केल्या, त्यापैकी 1701 जणांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत.
4 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनचं लोकांना गांभीर्य नाही | सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
महाराष्ट्रात 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून पुढचे 15 दिवस म्हणजेच 1 मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात काय सुरु राहील आणि काय बंद राहील, असे अनेक प्रश्न सामान्यांना पडले आहेत. मात्र प्रतिदिन हजारो लोकं कोरोनाने मृत्युमुखी आणि लाखो लोकं कोरोनाबाधित होतं असताना देखील जनतेला गांभीर्य नसल्याचं पहिल्या दिवशी स्पष्ट झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
2019 मध्ये प्रचारजीवी पंतप्रधानांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना भारतात आणले तेव्हाच कोरोनाचा प्रसार झाला
लहानपणी आई आम्हाला सांगायची की घरात भांडी वाजवली तर दारिदय्र येतं. पण पंतप्रधान मोदी यांनी संपूर्ण देशालाच ताट वाजवायला लावली, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (१४ एप्रिल) केली. चीनमधील कोरोना भारतात कसा आला याची चर्चा झाली पाहिजे. 2019 मध्ये आपल्या प्रचारजीवी पंतप्रधानांनी चीनच्या राष्ट्राध्यक्षांना भारतात आणले तेव्हाच कोरोनाचा प्रसार झाला, असा दावा यावेळी नाना पटोले यांनी केला.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा | मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र
राज्यात तसेच संपूर्ण देशात कोरोना संसर्ग वाढलाआहे. सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. रुग्ण वाढल्यामुळे राज्यातल ऑक्सीजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर हवाईमार्गे ऑक्सीजन वाहतूक करण्याविषयी तसेच कोव्हिड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याची मागणी घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. या पत्रातून ठाकरे यांनी गरीब आणि दुर्बल व्यक्तींना टाळेबंदीच्या काळात राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून सानुग्रह अर्थसहाय्य करण्यास मान्यता मिळावी याबाबत अशी मागणीदेखील मोदी यांना केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
खासगी वाहनाने राज्यांतर्गत प्रवास करता येईल का? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरं
महाराष्ट्रातील दररोज वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा मोठा असल्याने राज्य सरकारची चिंता चांगलीच वाढली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१४ एप्रिल) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज ५८ हजार ९५२ नव्या कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच गेल्या २४ तासांत नवीन ३९ हजार ६२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
मोदींच्या खोट्या १५ लाखांपेक्षा...संकटकाळात प्रत्यक्ष मिळणारे १५०० रुपये लाखमोलांचे - भाई जगताप
महाराष्ट्रातील दररोज वाढणारा कोरोनाबाधितांचा आकडा मोठा असल्याने राज्य सरकारची चिंता चांगलीच वाढली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (१४ एप्रिल) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात आज ५८ हजार ९५२ नव्या कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे. तर याच गेल्या २४ तासांत नवीन ३९ हजार ६२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रकांत पाटील म्हणजे मोदी लाटेत लॉटरी लागलेला माणूस - अजित पवार
राज्यात एकीकडे कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली असताना दुसरीकडे मात्र पंढरपूर मंगळवेढा निवडणूकीचा धुरळा उडाला आहे. १७ एप्रिलला पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक पार पडणार असून राष्ट्रवादी आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. चंद्रकांत पाटील आणि भाजपच्या नेत्यांना ग्रामीण भागाशी काहीही देणघेणं नाही.
4 वर्षांपूर्वी -
शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज | तब्येत उत्तम
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना आज ब्रीच कँडी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या काळात राजकारण करणाऱ्या प्रवृतींना त्यांची जागा दाखवायला हवी - अमोल कोल्हे
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा कलगीतुरा रंगताना दिसत आहे. “कोरोनाच्या संकट काळात राजकारण करणाऱ्या प्रवृत्तींना त्यांची जागा दाखवून देण्याची संधी आली आहे” अशा शब्दात राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जनतेला मतदानाचे आवाहन केले.
4 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडी सरकार पडणारा अजून जन्माला यायचा आहे | हे येरा गबाळ्याचे काम नाही - उपमुख्यमंत्री
राज्यात एकीकडे कोरोनाची स्थिती गंभीर होत चालली असताना दुसरीकडे मात्र पंढरपूर मंगळवेढा निवडणूकीचा धुरळा उडाला आहे. १७ एप्रिलला पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक पार पडणार असून राष्ट्रवादी आणि भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. या पंढरपूर पोटनिवडणुकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यातील आघाडी सरकार पाडणारा अजून जन्माला यायचा आहे. सरकार पाडणे कोणा येरा गबाळ्याचे काम नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पहिल्यांदाच थेट निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
.. तरीही गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद करा, मुख्यमंत्र्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर देखील लोकल ट्रेनमधल्या गर्दीमध्ये फारसा फरक दिसून येत नाही. स्थानकात प्रवेशासाठी कोणतेही निर्बंध लावले गेलेले नाहीत. आधीच्या लॉकडाऊन प्रमाणे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेटिंग दिसून आली नाही. तिकीट खिडक्यांवर देखील सर्वांना टिकीट दिली जात आहे. तसेच आरपीएफ आणि जीआरपी देखील प्रवाशांचे आय कार्ड किंवा क्यू आर कोड तपासताना आढळून आले नाहीत. याचे कारण म्हणजे राज्य सरकारकडून रेल्वेला कोणत्याही प्रकारचे आदेश अजूनही प्राप्त झालेले नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बी.ए, बीएस्सी व बीकॉमसह अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा २ मे पर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. तसेच इतर अभ्यासक्रमाची परीक्षाही २७ एप्रिलऐवजी ५ मे पासून सुरू होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
सुप्रिया सुळेंनी ‘ब्रीच कॅंडी’च्या गेटवरुन पंढरपूरची सभा गाजवली
एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सध्या मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात एडमिट आहेत. २ दिवसांपूर्वी त्यांच्यासह शस्त्रक्रिया झाल्याने सध्या ते रुग्णालयात आहेत. तर दुसरीकडे.पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक तोंडावर आली आहे. आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या रिक्त जागी त्यांच्या मुलाला म्हणजे भगीरथ भालके यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपशासित राज्यांमध्येही कोरोनाचे संकट भीषण | रोहित पवारांनी झापलं
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केलीय. यावेळी मुख्यमंत्र्यांनी हातावर पोट असलेले मजूर आणि छोट्या व्यवसायिकांसाठी आर्थिक पॅकेज देऊ केलंय. परंतु, हे पॅकेज म्हणजे तोंडाला पानं पुसण्याचं काम असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलीय.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाची भूमिका भगीरथ भालकेंच्या विरोधात नाही तर महाविकासआघाडी सरकार विरोधात - पडळकर
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत प्रचार शेवटच्या टप्यात आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार टीका होऊ लागली आहे. आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार आणि खालच्या भाषेत टीका केली. राज्यातील राष्ट्रवादीचे नेते बाजारबुणगे आहेत. आघाडी सरकार पांढऱ्या पायाचे असून बलात्कारी आहे, असा घणाघाती हल्लाच पडळकर आणि दरेकरांनी आज केला.
4 वर्षांपूर्वी -
Alert | रेमडेसिविर जीव वाचवणारं औषध नाही | फार फार तर काय होईल? - टास्क प्रमुखांची माहिती
राज्यात करोनाबाधितांची संख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्या संख्येने करोनाबाधिता आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूच्या संख्येतही भर पडतच आहे. आज तर करोनाबाधितांच्या संख्येने आजपर्यंतचा उच्चांक गाठल्याचं दिसून आलं. दिवसभरात राज्यात तब्बल ६० हजार २१२ करोनाबाधित वाढले असून, २८१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर १.६६ टक्के एवढा आहे.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र लॉकडाऊन | मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणा फसव्या आहेत - चंद्रकांत पाटील
राज्यात पंधरा दिवसांच्या संचारबंदीच्या नावाखाली प्रत्यक्षात लॉकडाऊन लागू करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गरीब गरजू वर्गाला मदत केल्याचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात अत्यंत तुटपुंजी तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशी तीव्र प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली.
4 वर्षांपूर्वी