महत्वाच्या बातम्या
-
सातारा | बावधनच्या बगाड यात्रेनंतर पोलिस आणि भाविकांसह ६१ जणांना कोरोना
कोरोनाच्या विस्फोटामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन होणार हे जवळपास निश्चित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गेल्या दोन दिवसांपासून मॅरेथॉन बैठका घेत आहेत. दोन दिवसापूर्वी त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं म्हटलं होतं. त्याशिवाय काल रविवार 11 एप्रिलला झालेल्या टास्कफोर्सच्या बैठकीत कडक लॉकडाऊनवर चर्चा झाली. त्यामुळे महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांचा लॉकडाऊन लागणार हे निश्चित आहे. दुसरीकडे मागील सोमवारपासून कडक निर्बंध लागू केल्यापासून पोलीस यंत्रणेवर मोठा ताण आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
लोकांचा जीव जात असताना उत्सव कशाला | भविष्यात परिस्थिती अधिक भयावह होईल - वडेट्टीवार
दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन असूनही राज्यात संक्रमितांची संख्या कमी झालेली नाही. याउलट कोरोना रुग्णांनी एक नवा विक्रम बनवला आहे. देशातील कोणत्याही राज्यांपेक्षा हा सर्वात मोठा आकडा आहे. रविवारी 63 हजार 294 नवीन केस समोर आले. दरम्यान 349 संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. worldometers नुसार नवीन रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. महाराष्ट्राने अमेरिका, फ्रान्स आणि ब्राझीलला मागे टाकले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंढरपूर | जनतेसाठी एक संधी आहे, लोकहितविरोधी सरकारविरोधात मतदान करा - फडणवीस
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव जरी वाढला असला तरी निवडणूकींचा धुरळा जोरदार उडत आहे. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक तोंडावर आली असून भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सभांचा सपाटा लावला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ आवडाडे यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सभा घेत धमुाकूळच घातला. त्यातही काल (११ एप्रिल) जयंत पाटील यांनी भर पावसात घेतलेली सभा तर जास्तच गाजली. त्यांच्या याच सभेवरुन भाजप नेते आता राष्ट्रवादीला लक्ष करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीसांची सूचना चांगली | पण व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेजसाठी केंद्राने सढळ मदत करावी - शिवसेना
राज्यात रविवारी ६३,२९४ नव्या कोरोनाबाधित आणि ३४९ मृत्यूची नोंद झाली. गेल्या २४ तासांत ३४,००८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या ५ लाख ६५,५८७ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांची एकूण संख्या ३४ लाख ७ हजार २४५ वर गेली आहे. २७,८२,१६१ रुग्ण बरे झाले असून रिकव्हरी रेट ८१.६५ आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदीचा लॉकडाउन मास्टरस्ट्रोक | आमचा लॉकडाउन अत्याचार? - अतुल लोंढे
राज्यात रविवारी ६३,२९४ नव्या कोरोनाबाधित आणि ३४९ मृत्यूची नोंद झाली. गेल्या २४ तासांत ३४,००८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. सध्या ५ लाख ६५,५८७ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांची एकूण संख्या ३४ लाख ७ हजार २४५ वर गेली आहे. २७,८२,१६१ रुग्ण बरे झाले असून रिकव्हरी रेट ८१.६५ आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंढरपूर पोटनिवडणूक | जयंत पाटील भर पावसात भिजले आणि पवारांच्या सातारच्या सभेची आठवण
पंढरपूर येथील भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे भरपावसात भिजले आणि सातारामधील शरद पवारसाहेबांच्या पावसातील त्या सभेची आठवण पंढरपूरकरांच्या डोळ्यासमोर तरळली.
4 वर्षांपूर्वी -
आरोग्यमंत्र्यांनी दिली लॉकडाऊनबाबत प्राथमिक माहिती | अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांकडे
राज्यात कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत चालली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन करणं हाच पर्याय असल्याचं काल सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात लॉकडाऊन हा कमीत कमी 15 दिवसांचा असेल. लॉकडाऊनची सर्वांच्या मनाची तयारी झाली आहे. अंतिम निर्णय दोन ते तीन दिवसात मुख्यमंत्री घेतील, असं टोपे यांनी सांगितलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
आंबे खाल्ल्यावर मुलं होतात असे बोलणाऱ्यांनी संकटाच्या काळात समाजाची दिशाभूल करु नये
कोरोना हा ‘त्या’ वृत्तीच्या लोकांना होतो, कोरोनाने मरणारे जगण्याच्या लायक नव्हते’, असे वादग्रस्त विधान करणारे शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी टीकास्त्र सोडले. सांगतील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ‘कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि समाज एकत्र येऊन प्रयत्न करत आहे, अशा परिस्थितीत दिशाभूल करणारी वक्तव्ये करणे योग्य नाही. आवश्यकता वाटल्यास वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल’, असा इशारा जयंत पाटलांनी संभाजी भिंडेचे नाव न घेताल दिला.
4 वर्षांपूर्वी -
देशात रेमडेसिविर इंजेक्शनसाठी लोकांची वणवण | पण गुजरातमध्ये भाजप कार्यालयात स्टॉक
महाराष्ट्रात वीकेंड लाॅकडाऊन सुरू हाेण्याबराेबरच सरकारने तीन दिवसांसाठी खासगी लसीकरण केंद्रे बंद केली आहेत. परंतु सरकारी केंद्रात लसीकरण सुरू राहील. मुंबईत शुक्रवारीही १२० पैकी ७५ लसीकरण केंद्रे बंद झाले. यामध्ये बहुतांश खासगी आहेत. राज्याला दर आठवड्याला ४० लाख डाेसची गरज आहे. केंद्राने १७ लाख डाेस पाठवले असून ते पुरेसे नाहीत, असे आरोग्यमंत्री राजेश टाेपे आधीच म्हणाले होते. तर आता रेमडेसिवीरचाही तुटवडा देशभर जाणवू लागला आहे.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंह अडचणीत | राज्य सरकारने माजी पोलिस आयुक्तांचा तपास IPS संजय पांडेंकडे सोपवला
राज्यात सचिन वाझे प्रकरणात नवीन लढाई सुरू झाली आहे. राज्य सरकारने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंहांना घेरण्याची तयारी केली आहे. सरकार परमबीर सिंहांची वेगळी चौकशी करत आहे. याची जबाबदारी परमबीर सिंहांचे कट्टर विरोधी सीनियर IPS संजय पांडेंना देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
उद्या मोदींनी देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यास त्यालाही फडणवीस विरोध करणार का?
महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्यास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने विरोध केला जात आहे. हा विरोध भारतीय जनता पक्षाच्या राजकीय भूमिकेमुळे असल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. परंतु, उद्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली तर तेव्हा देवेंद्र फडणवीस काय करणार? असा खोचक सवाल राऊतांनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंढरपूर पोटनिवडणूक | राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मनसेचा पाठिंबा | भाजपविरोधात प्रचारही करणार
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी 8 एप्रिलपासून दिवसभर सभांचा धडाका लावला होता. त्यानंतर रात्री पंढरपूरमध्ये काही राजकीय गोळाबेरीज करणाऱ्या भेटी घेतल्या होत्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य समन्वयक आणि शॅडो सहकार मंत्री दिलीप धोत्रे यांच्या निवासस्थानी जात अजित पवार यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. त्यावेळी मनसे तटस्थ असल्याने मनसेची ताकद आपल्या मागे वळवण्याची दुसरी खेळी अजित पवार यांनी केली होती.
4 वर्षांपूर्वी -
पुणे | PM केअर फंडातून मिळालेले 58 व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे, अधिकाऱ्याची तक्रार
पुण्यातील करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीस केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांची देखील उपस्थिती होती.
4 वर्षांपूर्वी -
मुबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे ते आजच्या सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. राज ठाकरे यांच्यावर कमरेजवळच्या स्नायूची शस्त्रक्रिया होत आहे, त्यासाठी ते मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या आजच्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे सहभागी झाले नाहीत.
4 वर्षांपूर्वी -
सर्वपक्षीय बैठक | निर्बंध असायला हवे पण उद्रेक लक्षात घ्या - फडणवीस
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर कडक निर्बंध लावले. तसंच विकेंड लॉकडाऊनचा निर्णयही घेण्यात आला आहे. पण विविध उपाययोजना करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येतेय. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा विचार मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारमधील अनेक मंत्री करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
सर्वपक्षीय बैठक | राज्यात लॉकडाऊनशिवाय आता पर्याय नाही - मुख्यमंत्री
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पातळीवर कडक निर्बंध लावले. तसंच विकेंड लॉकडाऊनचा निर्णयही घेण्यात आला आहे. पण विविध उपाययोजना करुनही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळत नसल्याचं पाहायला मिळतंय. अशावेळी सर्वपक्षीय बैठक घेण्यात येतेय. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा विचार मुख्यमंत्र्यांसह राज्य सरकारमधील अनेक मंत्री करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
महाभारत मालिकेतील इंद्रदेव आणि अभिनेते सतीश कौल यांचं कोरोनामुळे निधन
बीआर चोप्रा यांच्या अत्यंत लोकप्रिय ‘महाभारत’मध्ये इंद्र देवाची भूमिका साकारणारे हिंदी आणि पंजाबी अभिनेते सतीश कौल यांचे कोरोनामुळे निधन झाले. एका आठवड्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्हवर आल्यानंतर त्यांना लुधियाना येथील श्री रामा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ते 72 वर्षांचे होते.
4 वर्षांपूर्वी -
लोकांचा जिव महत्वाचा | पण भाजप नेत्यांकडून वातावरण तापवायला सुरुवात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, राज्य सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं. महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे सध्या वीकेंड लॉकडाऊन आणि निर्बंध असले तरीही वाढती रुग्णसंख्या आणि मृतसंख्या पाहता, महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लावला जाऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्र्यांचं सूचक विधान | संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच निर्णय होणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. महाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता, राज्य सरकार कठोर निर्णय घेऊ शकतं. महाराष्ट्रात 3 आठवड्यांचा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही तसेच संकेत दिले आहेत. त्यामुळे सध्या वीकेंड लॉकडाऊन आणि निर्बंध असले तरीही वाढती रुग्णसंख्या आणि मृतसंख्या पाहता, महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लावला जाऊ शकतो.
4 वर्षांपूर्वी -
खडसेंकडून महाजनांच जळगावातील साम्राज्य खालसा करण्याची तयारी | जिल्हा परिषदही धोक्यात?
काही दिवसांपूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने जळगाव महानगरपालिकेत भाजपाला धूळ चारत स्वतःचा महापौर बसवला. त्यानंतर गिरीश महाजन यांना जोरदार धक्का दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एकनाथ खडसे यांनी भाजपाला राम राम ठोकून राष्ट्र्वादीत प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी वेगाने हातपाय पसरत आहे.
4 वर्षांपूर्वी