महत्वाच्या बातम्या
-
तुम्ही महाराष्ट्रातील नेते, केंद्राबरोबर भांडू नका पण किमान मागणी करण्यासाठी तरी सामील व्हा - जयंत पाटील
भारतात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, देशात कोरोना लसीकरणाला वेग देण्यात आला आहे. पण आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात साडेपाच दिवस पुरेल इतकाच कोरोना लशीचा साठा शिल्लक असल्याचं म्हटलं आहे. असं असलं तरी पुढील आठवड्यात राज्यांमध्ये कोरोना लशीचे डोस पाठवले जाणार आहेत. अनेक राज्यांनी केंद्राकडे कोरोना लशीची मागणी केली आहे. सध्या देशात 45 वर्षांपुढील सर्वांना कोरोना लस देण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
लस पुरवठ्यात संतापजनक राजकारण | भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांना सर्वाधिक पुरवठा
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले-देशात लॉकडाऊनची गरज नाही, आरटीपीसीआर टेस्ट वाढवाकोरोना संसर्ग थोपवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. ७० टक्के चाचण्या आरटीपीसीआर व्हाव्यात, याचा पुनरुच्चार त्यांनी केला. मात्र, राज्ये रॅपिड अँटिजन चाचण्याच अधिक करत आहेत. अनेक राज्यांत हे प्रमाण ५०% हून अधिक आहे.
4 वर्षांपूर्वी -
रुग्णसंख्या वाढतेय म्हणजे ते राज्य खराब कामगिरी करतंय असं नाही | टेस्टिंग वाढल्याने ते होणारच - पंतप्रधान
कोरोना लसीकरणावरुन महाराष्ट्र आणि केंद्र सरकार पुन्हा आमने-सामने आलेले पाहायला मिळत आहेत. राज्यात कोरोना व्हॅक्सीनचा तुतवडा असून, पुढील दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा शिल्लक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली होती. त्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संवादानंतर राज्यातील सर्व भाजप नेते तोंडघशी पडल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
माझी कोणतीही चौकशी करायची ती करा | उपमुख्यमंत्र्यांचं खुलं आव्हान
सचिन वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव याप्रकरणी जोडले जात असल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वाझे प्रकरणी झालेले आऱोप फेटाळून लावत, या प्रकरणी माझी कोणतीही चौकशी करावी त्यास माझी तयारी आहे. असे खुले आव्हान विरोधकांना दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना वाढतोय | मुंबई लोकल सामान्यांसाठी पुन्हा थांबणार?
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काल अर्थात गुरुवारी तब्बल ६० हजारांच्या घरात नवे कोरोना रुग्ण आढळले. मुंबईत तर परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. एकट्या मुंबईत रोज १० हजारांच्या आसपास नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवर यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
लसीकरण | फडणवीस पुन्हा संभ्रम निर्माण करत आहेत | राजेश टोपे काय म्हणाले तेच कळलं नाही?
महाराष्ट्रात सध्या कोरोना लसीच्या मुद्द्यावरुन जोरदार राजकारण तापलं आहे. राज्यात कोरोना लसीचा तुटवडा असल्याचं आणि पुढील 2 ते 3 दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा सध्या शिल्लक असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यावर आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारला प्रत्युत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख आणि राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळली
परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर हायकोर्टाने आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होऊ घातलेली आपली चौकशी रोखावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती. मात्र, याप्रकरणात सीबीआय चौकशीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला. त्यामुळे आता अनिल देशमुख यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतत उरलेले नाही. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाविकासआघाडी सरकारसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना लसीच्या वाटपात गैरव्यवस्थापन | आरोग्यमंत्र्यांनी दिली गुजरात आणि महाराष्ट्रातील आकडेवारी
आज महाराष्ट्रात सातारा, सांगली, पनवेलला लसीकरण बंद पडलं आहे. बुलढाण्यात फक्त आजच्या दिवसाचा साठा आहे. आपण लसीकरण केंद्र देखील वाढवले आहेत. हर्ष वर्धन यांच्या बोलण्यावरून जाणवत नाहीये की त्यांना जाणीवपूर्वक विरोध करायचा आहे. पण देशभरात ५० टक्के रुग्ण असणाऱ्या राज्याला ७.५ लाख आणि इतरांना जास्त डोस का?”, असा सवाल टोपेंनी केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजकारणाचा कळस | कोरोना आपत्तीत चंद्रकांतदादांना राष्ट्रपती राजवटीची स्वप्नं | काय म्हणाले?
महाविकासआघाडी प्रत्येक समस्येसाठी केंद्र सरकारलाच जबाबदार धरणार असेल तर ते राज्य तरी का चालवत आहेत. त्यांनी राज्य हे केंद्राच्याच ताब्यात देऊन टाकावे, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. मी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असे म्हणत नाही. पण आता तुम्ही राष्ट्रपती राजवट लागू न करण्यासाठी काय शिल्लक ठेवले आहे, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला विचारला.
4 वर्षांपूर्वी -
पवार इन ऍक्शन | केंद्रीय आरोग्य मंत्र्यांशी फोनवर चर्चा | सहकार्याचं आश्वासन
कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. केंद्र सरकारही आपल्याला सहकार्य करत आहे. मी कालच केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. राज्यातील आरोग्य सुविधांच्या कमतरतेवर आम्ही चर्चा केली. यावेळी त्यांनी केंद्रीय आरोग्य खाते महाराष्ट्राच्या पाठिशी असल्याचे आश्वासन दिल्याचे शरद पवार यांनी सांगितले. महाराष्ट्राचे सामूहिक प्रयत्न आणि केंद्राची मदत या दोहोंच्या साहाय्याने आपण या संकटातून बाहेर पडू, असे शरद पवार यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती | राज्य सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करा | पवारांचं जनतेला आवाहन
देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना दिसत आहे. बुधवारी देशात विक्रमी 1 लाख 26 हजार 265 लोक संक्रमित आढळले. गेल्या वर्षी महामारी सुरू झाल्याच्या नंतरपासून आतापर्यंत पहिल्यांदाच एका दिवसात एवढे लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यापूर्वी 6 एप्रिलला एका दिवसात 1.15 लाख लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते.
4 वर्षांपूर्वी -
अँटिलिया प्रकरण | स्फोटके ठेवण्याच्या षडयंत्रात पैशासाठी मनसुखचाही हात | NIA'चा खुलासा
अँटिलिया प्रकरणावरुन अटकेत असलेला मुंबई पोलिसातील निलंबित अधिकारी सचिन वाझे संबंधित दररोज नवनवीन खुलासे समारे येत आहे. एनआयएच्या नवीन खुलासानुसार, सचिन वाझेच्या बँक खात्यात 1.5 कोटी रुपये असल्याचे आढळले आहे. एनआयए या संबंधी चौकशी करीत असून एवढे पैसे कोठून व कसे आले याचा तपास करणार आहे. त्यामुळे वाझेच्या कोठडीत वाढ होण्याची मागणीदेखील राष्ट्रीय तपास यंत्रना करत आहे. सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी न्यायालयात म्हटले की, वाझेनी स्वत:ला प्रामाणिक असल्याचा दावा केला होता. परंतु, एका सहाय्यक पोलिस निरिक्षकांकडे इतका पैसा मिळाल्यानंतर त्यांचा प्रामाणिकपणाचा दावा फेटाळण्यात काही गैर नाही.
4 वर्षांपूर्वी -
देशाच्या इतिहासात सर्वात गलीच्छ राजकारण सध्या महाराष्ट्रातील विरोधक करत आहेत - संजय राऊत
उद्योगपती अंबानी यांनी धमकावल्या प्रकरणी अटकेत असलेले सचिन वाझे यांच्या पत्रामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पत्रातून सचिन वाझे यांनी अनिल देशमुख तसंच शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यानंतर अनिल परब यांनी स्पष्टीकरण देत आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून राज्यात पत्र लिहिण्याचा नवा ट्रेंड आल्याचं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख आणि महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि अनिल देशमुख यांच्याकडून उच्च न्यायालयाच्या निर्णायाला आव्हाण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्र्यांवर महिना 100 कोटी वसूलीचे आरोप केले होते. याच पार्श्वभूमीवर त्यांची सीबीआय चौकशी व्हावी याकरीता उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
आंध्र प्रदेशसह ६ राज्यांनी लस पुरवठ्याबाबत भीती व्यक्त केली होती | पण द्वेष केवळ महाराष्ट्रावर?
राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. दरम्यान आता राज्यावर अजुन एक संकट आले आहे. राज्यामधील विविध लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा भासत आहे. जर महाराष्ट्रात योग्य वेळी लसींचा पुरवठा झाला नाही तर येत्या तीन दिवसात राज्यातील लसींचा साठा हा संपण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
ही केंद्राच्या नियोजनशून्य कारभाराचे खापर बिगर भाजपशासित राज्यांच्या माथी फोडायची सुरवात
राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. दरम्यान आता राज्यावर अजुन एक संकट आले आहे. राज्यामधील विविध लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा भासत आहे. जर महाराष्ट्रात योग्य वेळी लसींचा पुरवठा झाला नाही तर येत्या तीन दिवसात राज्यातील लसींचा साठा हा संपण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझे आज पत्र देणार आणि तिसरी विकेट काढणार हे भाजपला आधीच माहिती होतं - अनिल परब
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बचे पडसाद अद्याप शमलेले नाहीत. तोच सचिन वाझेंनेही एक लेटर बॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील अजून एका मंत्र्यावर गंभीर आरोप केला आहेत. नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी या पत्रात केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र सचिन वाझे यांनी लिहिलं आहे. ते पत्र आता NIA कोर्टाला दिलं जाणार आहे. अद्याप हे पत्र जमा करण्यात आलेलं नसल्याचं कळतंय.
4 वर्षांपूर्वी -
पत्राची सत्यता पडताळून मगच कारवाईचे कोर्टाचे आदेश | हुद्दा-पद नसतानाही स्वाक्षरीत API
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बचे पडसाद अद्याप शमलेले नाहीत. तोच सचिन वाझेंनेही एक लेटर बॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील अजून एका मंत्र्यावर गंभीर आरोप केला आहेत. नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी या पत्रात केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र सचिन वाझे यांनी लिहिलं आहे. ते पत्र आता NIA कोर्टाला दिलं जाणार आहे. अद्याप हे पत्र जमा करण्यात आलेलं नसल्याचं कळतंय.
4 वर्षांपूर्वी -
पवारांची मनधरणीसाठी देशमुखांनी मागितली होती २ कोटींची खंडणी | वाझेंच्या पत्रात दावा
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बचे पडसाद अद्याप शमलेले नाहीत. तोच सचिन वाझेंनेही एक लेटर बॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील अजून एका मंत्र्यावर गंभीर आरोप केला आहेत. नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी या पत्रात केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र सचिन वाझे यांनी लिहिलं आहे. ते पत्र आता NIA कोर्टाला दिलं जाणार आहे. अद्याप हे पत्र जमा करण्यात आलेलं नसल्याचं कळतंय.
4 वर्षांपूर्वी -
देशमुखांनी वाझेंना वसुलीचे आदेश दिले नसल्याचं उघड होतंय | अधिकाऱ्यांच्या कबुली जबाबात तफावत
अँटिलिया प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थे (NIA)चा तपास सुरू आहे. बुधवारी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची एनआयएकडून साडेतीन तास चौकशी झाली. या प्रकरणातील कोठडीत असलेले माजी API सचिन वाझेंनाही NIA च्या विशेष न्यायालयात सादर करण्यात आले. यावेळी NIA ने अजून तपास करण्याचे सांगून कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. ही मागणी न्यायालयाने मान्य केली आणि 9 एप्रिलपर्यंत वाझेंना NIA कस्टडीत पाठवण्यात आले. वाझेंसोबत मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेले माजी काँस्टेबल विनायक शिंदे आणि गोरेला आज स्पेशल कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्या दोघांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
4 वर्षांपूर्वी