महत्वाच्या बातम्या
-
आज मला पहिल्यांदाच माझं वय 45 वर्षे किंवा अधिक हवं होतं असं वाटतंय - अमृता फडणवीस
राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. देशभरातील सर्वात जास्त रुग्ण हे महाराष्ट्रात सापडत आहेत. दरम्यान आता राज्यावर अजुन एक संकट आले आहे. राज्यामधील विविध लसीकरण केंद्रांवर लसींचा तुटवडा भासत आहे. जर महाराष्ट्रात योग्य वेळी लसींचा पुरवठा झाला नाही तर येत्या तीन दिवसात राज्यातील लसींचा साठा हा संपण्याची भीती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
वाझेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी मला खोपच्यात घेऊन दम भरला होता, हेच बोलायचं बाकी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग सकाळीच एनआयए कार्यालयात दाखल झाले. अँटिलिया स्फोटक आणि मनसुख हिरेन संशयास्पद मृत्यू या दोन्ही प्रकरणांचा तपास करणारी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) परमबीर सिंग यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. सचिन वाझेंची नियुक्ती आणि इतर विषयांवर परमबीर सिंह यांना प्रश्न केले जाऊ शकतात.
4 वर्षांपूर्वी -
केंद्राकडून वेळेत लस पुरवठा न झाल्यास ३ दिवसांमध्ये लसीकरण बंद पडेल - आरोग्यमंत्री
महाराष्ट्राने लसीकरणाबाबतीत देशात आघाडी घेतली आहे. पण केंद्र सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या लशींचा पुरवठा कमी पडतोय, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. लशीच्या पुरवठ्या संदर्भात टोपे यांनी यावेळी केंद्रावर संताप देखील व्यक्त केला.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली वाझे काम करत होता | भाजपचा खोटेपणा उघडकीस येतोच - सचिन सावंत
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. सचिन वाझे यांची पुनर्नियुक्ती परमवीर सिंग यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्तांनी गृह खात्याला पाठवलेला अहवाल प्रसार माध्यमांच्या हाती लागला आहे.
4 वर्षांपूर्वी -
ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवून सहकार्य करावं - ऊर्जा मंत्री
राज्यात गेले अनेक महिने वाढीव वीज बिलाचा मुद्दा गाजत आहे. त्याबाबत उर्जामंत्री नितीन राऊत यांनी महत्वाची माहिती दिली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ग्राहकांनी स्वतः मीटर रीडिंग पाठवून तसंच वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्याचं आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. वीज ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याला प्राधान्य देण्याचे आदेशही यावेळी त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिले आहेत. मंत्रालय येथे वीज बिल व थकबाकी यासंदर्भात बैठक पार पडली.
4 वर्षांपूर्वी -
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुक प्रचार | भाजपचे प्रमुख नेते कोरोना पॉझिटिव्ह
राष्ट्रवादीचे नेते भारत भालके याच्या मृत्यूनंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. समाधान महादेव आवताडे यांना भारतीय जनता पक्षाकडून या मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अँटिलिया स्कॉर्पिओ प्रकरण | परमवीर सिंग एनआयए कार्यालयात दाखल
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेलं वाहन तसंच मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपास एनआयएकडून केला जात आहे. याचप्रकरणी परमबीर सिंह एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. एनआयएकडून त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे. उद्योगपती मुकेश अंबानी धमकी प्रकरणाशी संबंधित व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास केंद्रीय गृहमंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला होता. या प्रकरणाचा तपास राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) सुरू होता.
4 वर्षांपूर्वी -
८ रुग्णांना एकाच चितेवर अग्नी | परिस्थिती बिकट | विरोधकांकडून लॉकडाऊन शिथिल करण्यावरून राजकारण
सध्या राज्यात ५ दिवस कडक निर्बंध तर शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्याला कारण ठरलं आहे ते लोकं न समजून घेणारे गांभीर्य असं सांगितलं गेलं. मृतांचा आकडा वाढत असताना विरोध मात्र याचं भावनिक राजकारण करून राज्य सरकारला लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी दबाव वाढवत आहेत. एका बाजूला राज्य सरकारच्या निर्णयाला समर्थन देऊ असं म्हणणारे भाजप आणि मनसेचे पदाधिकारी आता निर्णय झाल्यानंतर पलटल्याचं चित्रं पाहायला मिळतंय. त्यामुळे सरकारला कोंडीत पकडण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु झाला आहे.
4 वर्षांपूर्वी -
BREAKING | परमवीर सिंगांच्या आदेशाने सचिन वाझेंकडे हायप्रोफाईल केसेस | अहवालात खुलासे
मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गृह खात्याला पाठवलेल्या अहवालात माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. सचिन वाझे यांची पुनर्नियुक्ती परमवीर सिंग यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत करण्यात आली होती. मुंबई पोलीस आयुक्तांनी गृह खात्याला पाठवलेला अहवाल प्रसार माध्यमांच्या हाती लागला आहे. TV 9 मराठीने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट मला करायची आहे | पवार ED ऑफिसवर धडकले तर राज इडीला घाबरले
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर लेखक घनश्याम पाटील यांनी त्यांच्या ब्लॉग मधून काही आरोप केले आहेत. ’जगाला हेवा वाटेल अशी सेटलमेंट मला करायची आहे’ अशा शीर्षका खाली त्यांनी एक ब्लॉग लिहला. या लिखाणामुळे सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून तीव्र स्वरुपाची नाराजी व्यक्त केली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख आणि येडियुरप्पा यांना वेगळा न्याय का? - शिवसेना
सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडमोडी आणि राजीनामा सत्रावरून शिवसेनेनं पुन्हा एकदा टीकेचा बाण सोडला आहे. राफेल व्यवहारात कोणताही भ्रष्टाचार किंवा दलाली प्रकरण घडले नसल्याचा निर्वाळा याआधी सर्वोच्च कोर्टाने दिला होता तो कोणाच्या सांगण्यावरून? राहुल गांधींनाच भारतीय जनता पक्षाने तेव्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. आता फ्रान्सच्या वृत्तपत्रांनीच राफेल घोटाळा उघड केला. त्यामुळे नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा कोणी द्यावा? की नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांवर आहे?, असं म्हणत शिवसेनेने यावर टीका केली.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे परिस्थिती गंभीर | राज्यातील ‘या’ निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य सरकराचा निर्णय
महाराष्ट्रात १६ मार्च २०२० रोजी मुंबईत कोरोनाचा पहिला बळी गेला. मार्च २०२० ते पाच एप्रिल २०२१ या काळात राज्यात कोरोनामुळे ५६,०३३ मृत्यू झाले आहेत. याच काळात राज्यातील १४ जिल्हे असे आहेत, जेथे कोरोनाने झालेल्या मृत्यूंची संख्या एक हजाराहून जास्त आहे. सर्वाधिक ११,८०० मृत्यू मुंबई जिल्ह्यात झाले आहेत. त्यापाठोपाठ पुणे जिल्ह्यात ८४४० कोरोना बळी असून ठाणे जिल्ह्यात ६१३६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला.
4 वर्षांपूर्वी -
वांद्रे पूर्व विधानसभा | जनसंपर्क तुटलेल्या तृप्ती सावंत भाजपच्या संपर्कात | आज प्रवेश झाला
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक तृप्ती सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वांद्रे पूर्व या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मतदारसंघात तृप्ती सावंत मागील काही महिन्यांपासून जनसंपर्काची बाहेर होत्या तसेच त्यांच्याभोवती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं वलय उरलं नसल्याने राजकीय प्रवास खडतर झाला होता. मात्र त्यांनीच आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
बाजू ऐकून न घेताच निर्णय दिला | देशमुखांची सुप्रीम कोर्टात 290 पानांची विशेष अनुमती याचिका
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी मुंबई हायकोर्टाने CBIने करावी असे आदेश दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. पण आता मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आज (६ एप्रिल) ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मिठी नदीतील वस्तू NIA'ने प्लांट केल्याचा वाझेंच्या वकिलाचा दावा | भाजप नेत्याच्या दाव्याने शंका वाढली?
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयात शनिवारी सचिन वाझे आणि NIAच्या वकिलांचा तोडीस तोड युक्तिवाद पाहायला मिळाला. ज्येष्ठ विधिज्ञ आबाद पोंडा हे सचिन वाझे यांची बाजू न्यायालयात मांडत आहेत. त्यांनी न्यायालयात केलेली एकूण मांडणी पाहता सचिन वाझे यांनी NIA समोर अद्याप कोणतीही कबुली दिलेली नाही. त्यामुळे सचिन वाझे पूर्णपणे चेकमेट झाल्याच्या NIAच्या हवाल्याने करण्यात येणाऱ्या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे, अशी शंका आता उपस्थित झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदींनी जाहीर केलेल्या लॉकडाऊन वेळी न पडलेले प्रश्न अनमोल अंबानींना राज्यातील निर्बंधांनंतर पडू लागले
कोरोना रुग्णांच्या वाढीवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्याक कडक निर्बंध आणले आहेत. पण, महाराष्ट्रातील याच लॉकडाउनमुळे देशाला 40 हजार कोटींचे नुकसान होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. याचा सर्वाधिक परिणाम ट्रेड, हॉटेल आणि ट्रांसपोर्ट सेक्टरवर पडेल. हा अंदाज केअर रेटिंग एजंसीने व्यक्त केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई हायकोर्टाच्या निकालाला राज्य सरकार सुप्रीम कोर्टात आव्हान देणार - गृहमंत्री
सध्याचा काळ अत्यंत अवघड आणि चॅलेंजिंग आहे. परंतु, गृहमंत्रीपदाची जबाबदारी मी पार पाडण्याचं काम करेन, असं सांगतानाच प्रशासकिय कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप करणार नाही, अशी ग्वाही राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख किंवा महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात गेल्यास मी विरोध करणार - जयश्री पाटील
अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर देशमुख तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. सीबीआय चौकशी टाळता यावी यासाठी त्यांनी दिल्लीत ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत रात्री नऊ ते दहा दरम्यान चर्चा केली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर या घडामोडी घडल्या.
4 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात कोरोना का वाढला? | राज ठाकरे यांनी सांगितली ही कारणं
महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत 47,288 नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून यामध्ये 155 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण येण्याच्या यादीमध्ये महाराष्ट्राने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. अमेरिकेत एका दिवसांत 50,329 नवे रुग्ण आढळले आहे. आकड्यांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात सर्वात वर असून जगातील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख हा महत्त्वाचा विषय नव्हता, महत्त्वाचा विषय तर ‘तो’ आहे
महाराष्ट्र राज्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत 47,288 नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळले असून यामध्ये 155 लोकांचा मृत्यू झाला आहे. नवे रुग्ण येण्याच्या यादीमध्ये महाराष्ट्राने अमेरिकेलाही मागे टाकले आहे. अमेरिकेत एका दिवसांत 50,329 नवे रुग्ण आढळले आहे. आकड्यांच्या बाबतीत महाराष्ट्र जगात सर्वात वर असून जगातील कोरोनाचा सर्वात मोठा हॉटस्पॉट बनला आहे.
4 वर्षांपूर्वी