महत्वाच्या बातम्या
-
भाजपची सत्ता असलेल्या नाशिक पालिकेत ऑक्सिजन बेड मिळेना | कोरोना रुग्णांवर ठिय्या आंदोलनाची वेळ
भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेत परिस्थिती गंभीर झाली आहे. मात्र महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे कोरोना रुग्णांना जीव देखील गमवावा लागू शकतो असे प्रकार घडत आहेत. तसाच एक भीषण प्रकार नाशिकमध्ये घडल्याचं पाहायला मिळतंय.
4 वर्षांपूर्वी -
स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक भूमिपूजन सोहळा संपन्न | सरकारमधील प्रमुख नेत्यांची उपस्थिती
बाळासाहेब ठाकरे यांच्या मुंबई येथील स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात दिग्गज नेत्यांनी उपस्थिती लावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर असे मोठे नेते या कर्यक्रमाला उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
भाजपाविरोधात रणनीती आखण्यासाठी ममतांच देशातील प्रमुख नेत्यांना पत्र
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये सोनिया गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे. ममता बॅनर्जी यांनी पत्रातून विधानसभा निवडणुकीचा हा टप्पा झाल्यानंतर भाजपाविरोधात रणनीती आखण्यासाठी बैठक करण्यासंबंधी सुचवलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुखांवरील आरोप | चौकशीसाठी गठीत करण्यात आलेली समिती म्हणजे निव्वळ धुळफेक - फडणवीस
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपासंदर्भात चौकशी करण्यासाठी नेमलेली न्यायालयीन समिती म्हणजे निव्वळ धुळफेक असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | नाशिक महानगर परिवहन महामंडळात 15 जागांसाठी भरती
एनएमपीएमएल भरती २०२१, नाशिक महानगर परिवर्तन महामंडळ लिमिटेडने भरती अधिसूचना जारी केली असून १५ विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र अर्जदार एनएमपीएमएल भरती २०२१ साठी ०९ एप्रिल २०२० रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वय मर्यादा, पात्रता आणि एनएमपीएमएल भरतीसाठी अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक माहिती खाली लेखात दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
Breaking | उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना झापलं | विचारले अनेक गंभीर प्रश्न
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावतीने अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे आहेत. परमबीर सिंग यांचे वकील विक्रम ननकानी बाजू मांडत आहेत. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर | विद्यमान नगरसेवक आणि माजी नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून इतर सर्वच पक्षातील नेतेमंडळी राष्ट्रवादी, शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. मागील काही दिवसांपासून माजी खासदार, आमदार आणि नगरसेवक राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
आज बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन | विरोधकांना निमंत्रण नाही
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन सोहळा आज (31 मार्च) पार पडणार आहे. आज संध्याकाळी 5 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. शिवाजी पार्क येथील महापौरांचे जुने निवासस्थान या स्मारकाची नियोजित जागा आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबतची माहिती दिली आहे
4 वर्षांपूर्वी -
गृहमंत्र्यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती | मुंबई हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्तींकडून चौकशी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी अखेर महाविकास आघाडी सरकारने चौकशी समितीची घोषणा केली आहे. ही समिती पुढील 6 महिन्यात अहवाल देणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबदमध्ये लाॅकडाऊनचा निर्णय मागे | मात्र रात्रीची संचारबंदी कायम
सामान्य नागरिकांमधून व्यक्त हाेणारा तीव्र राेष, आमदार-खासदार, व्यापाऱ्यांसह विविध संघटनांकडून हाेणाऱ्या विराेधापुढे झुकत अखेर जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून (३१ मार्च) औरंगाबादेत लागू हाेणारा कडक लाॅकडाऊनचा निर्णय मागे घेतला. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर केला. खासदार इम्तियाज जलील यांनी प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून बुधवारी काढण्यात येणारा माेर्चाही रद्द करण्यात आल्याची घाेषणा पत्रकारांशी बाेलताना केली.
4 वर्षांपूर्वी -
पंढरपूर | समाधान आवताडेंच्या चुलत भावाचं बंड तर नगराध्यक्षाचे पती देखील भाजप विरोधात
पंढरपूरच्या रिंगणात भारतीय जनता पक्षाने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसनं दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना मैदानात उतरवलं आहे. तर अन्य उमेदवार मिळून तब्बल 39 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अशा स्थितीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांना बंडाचा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या उमेदवारीला घरातूनच विरोध होत असल्याचं पाहायला मिळतंय. समाधान आवताडे यांचे चुलत भाऊ सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
गुप्त बैठकीच्या अफवा | भाजपनेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे - शिवसेना
देवेंद्र फडणवीसांचे राज्य महाराष्ट्रात असताना साम-दाम-दंड-भेद वापरुन सत्ता टिकवण्याची भाषा केली जात होती. हा साम-दाम-दंड-भेद इतरांच्या हातीही असू शकतो. तेव्हा अहमदाबादच्या गुप्त बैठकीची अफवा पसरवून गोंधळ घालणे हा त्याच भेद-नीतीचा प्रयोग आहे. अर्थात, त्यातून काय साध्य होणार? सध्या पवार थोडे आजारी आहेत. पवार लवकरच बरे होऊन कामास लागतील. भारतीय जनता पक्षानेही गुप्त आजारातून लवकरात लवकर बरे व्हावे! असा खोचक सल्ला शिवसेनेनं दिला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून अमित शाह आणि शरद पवारांच्या गुप्त बैठकीवर भाष्य करण्यात आले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवारांवर यशस्वी शस्त्रक्रिया | प्रकृती पूर्णपणे स्थिर | २-३ दिवसांत डिस्चार्जची शक्यता
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही.
4 वर्षांपूर्वी -
शस्त्रक्रियेपूर्वीच्या चाचण्यासांठी पवार रुग्णालयात दाखल | उद्या शस्त्रक्रिया होणार
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज (३० मार्च) मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल झाले आहेत. उद्या (३१ मार्च) त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहेत. त्याआधीच्या काही चाचण्यासांठी ते रुग्णालयात दाखल झाले आहेत. दरम्यान, काल त्यांना पोटात दुखू लागल्याने एडमिट केले होते. नंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र, आज पुन्हा ते रुग्णायलयात दाखल झाले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पंढरपूर-मंगळवेढा | पडळकरांनी आवताडेंना बारामतीतील निकालाची आठवण करून दिली?
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघांची निवडणुक १७ एप्रिलला होणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे सुपुत्र भगिरथ भालके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून माहिती दिली होती. सध्या भारत भालके यांच्या कुटुंबियांबद्दल मतदारसंघात भावनिक वातावरण असल्याने त्याचा फायदा भगिरथ भालके यांना होण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या दोन्ही बाजूंनी प्रचाराची तयारी सुरु झाली असून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरु आहेत.
4 वर्षांपूर्वी -
संबंधित जनहित याचिका केवळ चिप पब्लिसिटीसाठी | सुनावणीदरम्यान न्यायालयाची टिपणी
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरकारभाराविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पदरी निराशा पडली होती. सदर प्रकरणी तुम्ही मुंबई हायकोर्टात का गेला नाही, असा सवाल करतानाच आधी हायकोर्टात जा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने सिंग यांना दिला होता. त्यानंतर त्यांनी याचिका मागे घेत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
नांदेड हल्ला प्रकरण | 400 पेक्षा जास्त लोकांवर गुन्हा दाखल | कॉन्स्टेबलची प्रकृती चिंताजनक
होळीच्या मिरवणुकीवरुन नांदेडमध्ये जमावाने थेट पोलीस अधीक्षकांवर तलवारीने हल्ला केला. मात्र एसपी प्रमोद शेवाळे यांच्यावर झालेला हल्ला त्यांचा अंगरक्षक दिनेश पांडे यांनी आपल्या अंगावर घेतला. या हल्ल्यात दिनेश पांडे गंभीर जखमी असून रात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतात झालेल्या कोरोना लसीकरणापेक्षा अधिक लसी मोदी सरकारने निर्यात केल्या आहेत हे...
देशात कोरोनाची दुसरी लाट मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. यातच देशात गेल्या चोवीस तासात 56,119 नवीन संक्रमित रुग्ण आढळले आहे. हा आकडा सलग सहाव्या दिवसांपासून सतत वाढतच आहे. त्यामुळे गेल्या चोवीस तासात आढळलेल्या रुग्णांमध्ये 36,983 लोक बरे झाले असून यात 266 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच उपचार घेणाऱ्या लोकांमध्ये 18,883 आकड्यांनी वाढ झाली आहे. देशात सलग सहाव्या दिवसापासून सक्रीय रुग्णांचा आकडा 50 हजारांपेक्षा जास्त आहे. यात शुक्रवार, शनिवार आणि रविवार या तीन दिवसांचा आकडा 60 हजारांवर गेलेला आहे.
4 वर्षांपूर्वी -
बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यातील सुविधा मोदींसारख्या सैनिकांनाही मिळाव्यात - शिवसेना
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच केलेला बांगलादेश दौरा चांगलाच चर्चिला गेला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी आपण बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतल्याचा दावा केला आणि देशभरातून याबाबत उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या. मोदींचा हा दावा अवास्तव असल्याची टीका करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. त्यानंतर आता शिवसेनेनंही उपरोधिक शब्दांत पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
4 वर्षांपूर्वी -
एकाच व्यक्तीचे एकाच लॅबमध्ये दोन दिवसात दोन भिन्न रिपोर्ट | लॅब्स टेन्शन वाढवत आहेत?
एकाबाजूला मुंबईत सलग दुसऱ्या आठवड्यात बांद्रा पश्चिम कोरोनाचा सगळ्यात मोठा हॉटस्पॉट आहे. म्हणजेच कोरोनाच्या रुग्णवाढीचा येथे उद्रेक होत आहे. आणि त्या खालोखाल गोरेगाव, चेंबूर पश्चिम, अंधेरी पश्चिम, आणि अंधेरी पूर्व अशी ही 5 महत्वाची, अतिसंसर्गाची आणि पटापट रुग्णवाढीची ही ठिकाण आहेत. एका आठवड्यात जवळपास 1500 ते 2300 इतके रुग्ण या प्रभागात वाढले आहेत. याचाच अर्थ असा की, सगळ्यात जास्त लागण याचं पाच प्रभागात होते. त्यामुळे इथल्या नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे.
4 वर्षांपूर्वी