महत्वाच्या बातम्या
-
वैधानिक विकास महामंडळावरून अजितदादा-फडणवीस आमने-सामने
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. यात 8 मार्चला अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. शेतकरी आंदोलन, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण अशा विविध मुद्द्यांनी अधिवेशन वादळी ठरताना आहे.
4 वर्षांपूर्वी -
गदारोळ घालणाऱ्या प्रतिनिधीकडे पाहून फडणवीसांनी ए काय रे असा उल्लेख करताच अजून गदारोळ
महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. शेतकरी, मराठा आरक्षण, वाढीव वीज बिल, संजय राठोड यासारख्या अनेक मुद्द्यांनी अधिवेशन गाजण्याची शक्यता आहे. विरोधकांचे मुद्दे त्यांनी शांतपणे मांडावेत, गोंधळ करु नये. विरोधकांनी मांडलेल्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा होईल, गोंधळाने काहीही साध्य होणार नाही, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी घेतली आहे. दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका करत सभागृहातून बाहेर पडण्याचा इशारा दिला.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | पूजा नंतर पूजाच्या पालकांची कोणत्याही पुराव्याशिवाय बदनामी सुरु | हे षडयंत्र?
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरुन राज्यात वादंग उठलं आहे. या घटनेला आज 19 दिवस उलटून गेले आहेत. काल शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांनी या प्रकरणात राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला. या प्रकरणात आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. काल या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी आलेल्या पूजा चव्हाणच्या चुलत आजी शांताबाई राठोड यांचा गुन्हा काल पुण्यातील वानवडी पोलिसांनी दाखल करुन घेतला नाही. तक्रार दाखल करुन घेतलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
इंधन - गॅस दरवाढीचा निषेध | काँग्रेसचे आमदार सायकलवरून विधानभवनात
‘अक्कड बक्कड बंबे बो, 80, 90 पुरे 100’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असे फलक हातात घेऊन काँग्रेसने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. काँग्रेसच्या सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी आज सायकलवरून प्रवास करत विधान भवन गाठले. यावेळी काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | RBI मध्ये 870 पदांची भरती | शिक्षण १० वी | पगार 23,700
आरबीआय भरती २०२१. (आरबीआय) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि ८४१ अधिकारी अटेंडंट पोस्टसाठी अर्ज मागविले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार आरबीआय भरती 2021 साठी 15 मार्च 2021 पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि आरबीआय भरती 2021 वर अर्ज कसा द्यावा यासंबंधी अधिक तपशील खाली दिलेल्या लेखात सामायिक केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजीनामा दिला तर आहे, मात्र तो स्वीकारला आहे की नाही हे माहिती नाही
पहिल्याच दिवशी हे प्रकरण बाहेर आले होते, त्याच दिवशी राजीनामा दिला पाहिजे होता. संजय राठोड यांच्या विरोधामध्ये एवढे पुरावे असताना मंत्री म्हणून ते राहायला नको होते. राजीनामा दिला तर आहे मात्र तो स्वीकारला आहे की नाही हे माहिती नाही, तो स्वीकारणार आहेत की नाही हे देखील आम्हाला माहिती नाही, अशा शब्दांमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राजीनाम्याविषयी साशंकता व्यक्त केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
चौकशी होईपर्यंत मी मंत्रिपदापासून दूर राहायला हवे ही माझी भूमिका - संजय राठोड
पूजा चव्हाण प्रकरणात शिवसेनेचे आमदार आणि विद्यमान वनमंत्री संजय राठोड यांचे नाव जोडले गेल्यानंतर आज दुसऱ्यादा ते प्रसारमाध्यमांमोर आले. मुंबईतील वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते आपले म्हणणे मांडत होते.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संध्याकाळी 5.30 वाजता पत्रकार परिषद
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. चर्चगेटमधील छेडा सदन निवासस्थानाहून दुपारी अडीचच्या सुमारास संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर वर्षा बंगल्यावरील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
अखेर संजय राठोड यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत संजय राठोड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. चर्चगेटमधील छेडा सदन निवासस्थानाहून दुपारी अडीचच्या सुमारास संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले होते. त्यानंतर वर्षा बंगल्यावरील घडामोडींकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं.
4 वर्षांपूर्वी -
...तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सर्व सदस्य राजीनामे देतील - फडणवीस
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी शक्ती कायदा तयार केला जात आहे. पण राज्यातील मंत्रीच जर महिलांच्या अत्याचारात सहभागी असतील तर हा कायदा काय कामाचा?, असा सवाल करतानाच राठोडांनी राजीनामा दिला नाही तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सर्व सदस्य राजीनामे देतील, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
संजय राठोड सपत्निक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
विरोधकांकडून राजीनाम्यासाठी दबाव येत असल्याच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री संजय राठोड आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राठोड हे पत्नी आणि मेव्हण्यासह कॅबिनेट बैठकीपूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राठोड यांच्या बाबत कॅबिनेटपूर्वीच काही मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजधर्मावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांचं सूचक ट्विट
विरोधकांकडून राजीनाम्यासाठी दबाव येत असल्याच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री संजय राठोड आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राठोड हे पत्नी आणि मेव्हण्यासह कॅबिनेट बैठकीपूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे राठोड यांच्या बाबत कॅबिनेटपूर्वीच काही मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी महिला आक्रमक | पेट्रोल पंपावर मोदींच्या बॅनरखाली राज्यभर ‘चूल मांडा’ आंदोलन करणार
सामान्य जनतेच्या भावनांच्या उद्रेकाला वाट मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने मोदींची जाहिरात असलेल्या महाराष्ट्रातील प्रत्येक पेट्रोल पंपावर उद्या म्हणजेच रविवारी (२८ फेब्रुवारी) सकाळी ११ वाजता ‘चूल मांडा’ आंदोलन करण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज (२७ फेब्रुवारी) याबाबतची माहिती दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
VIDEO | 'कारभारी लयभारी' मालिकेतील अभिनेत्री गंगाला अज्ञातांकडून रस्त्यात मारहाण
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘कारभारी लयभारी’मधील अभिनेत्री गंगा हिला मुंबईतील रस्त्यावर काही लोकांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. स्वत: गंगाने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आपबिती कथन केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप खासदार उदयनराजे भोसले ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरे यांच्या भेटीला
भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले हे कृष्णकुंजवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. या भेटीचं नेमकं कारण समजू शकलं नाही. मात्र, मराठा आरक्षणा संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
फेक फोटो वरून आंदोलन | पण हा आहे भाजपचा फेक फोटो-व्हिडिओ शेअर करण्याचा इतिहास
सध्या चित्र वाघ यांचा एडिटेड फोटो शेअर करण्यावरून भाजपने थेट आंदोलन सुरु केले आहे. काही करून राज्यातील वातावरण केवळ पेटत ठेवायचं एवढाच काय तो उद्योग म्हणावा लागेल. त्याचे फोटो मुळात कोणी एडिट केले आणि शेअर केले ते अजूनही समोर आलेलं नाही. त्यामुळे ते आधी समोर येणं गरजेचं आहे. मात्र आज स्वतः देवेंद्र फडणवीस देखील ट्विटरवर या आदोलनाचे ट्विट करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
पूजा नावाच्या सज्ञान मुलीचं खाजगी आयुष्य तुम्ही वेशीवर टांगताय | माजी IPS अधिकाऱ्याचा संताप
चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये वन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरून ठाकरे सरकार आणि संजय राठोडांवर गंभीर आरोप केले. आज नाशकात तब्बल 1 तासांची पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सरकारवर आणि पोलिसांवर पूजा चव्हाण प्रकरणात प्रश्नांची सरबत्ती केली. या सगळ्यानंतर माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांनी चित्रा वाघ यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पवार भेटीबद्दल चित्रा वाघ यांनी अर्धसत्य मांडलं | हे आहे पूर्ण सत्य जे स्वतः पवारांनी सांगितलेलं
पूजा चव्हाण प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने 12 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आता चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे. यासोबतच आज पवार साहेबांची खूप आठवण येत असल्याचेही त्या म्हणाल्या.
4 वर्षांपूर्वी -
पवार आणि ती FIR कॉपी | चित्रा वाघ यांच्या त्या विधानातून ते भाजपचं षडयंत्र होतं असा अर्थ?
पूजा चव्हाण प्रकरणामध्ये वनमंत्री संजय राठोड यांच्या अटकेसाठी आक्रमक झालेल्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरुद्ध लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने 12 फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आता चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केले आहे. यासोबतच आज पवार साहेबांची खूप आठवण येत असल्याचेही त्या म्हणाल्या.
4 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते, राठोडांना फाडून खाल्लं असतं - चित्रा वाघ
साहेब हे सगळे एकजात सारखेच आहेत. आम्हाला फक्त तुमच्याकडून अपेक्षा आहे. तुमच्यावर कुणाचा दबाव तर नाही ना?, असं प्रश्न करत आम्ही तुम्हाला ओळखतो. तुमची वेगळी छबी आहे. तुमचं व्यक्तीमत्व सगळ्यांच्यापेक्षा वेगळं आहे. तुम्ही कारवाई कराल. या बलात्काऱ्याला हाकलून लावाल. याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल कराल. आता आम्हाला तुमच्याकडून अपेक्षा आहे”, अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
4 वर्षांपूर्वी