महत्वाच्या बातम्या
-
तडीपार गुंडाचा हातात कोयता घेऊन डान्स | पुण्यातील घटना
तडीपार गुंडाने हातात कोयता घेऊन डान्स केल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचे समोर आले आहे. तसेच शिवजयंतीच्या दिवशीची ही घटना असल्याची माहिती आहे. गुंड रोशन लोखंडे याने हातात कोयदा घेऊन दहशत निर्माण करत असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतरही शक्तिप्रदर्शन | पवार आणि मुख्यमंत्र्यांची भेट
पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणावरून अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड यांच्या अडचणींमध्ये आता आणखीनच वाढ होण्याची चिन्हं आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना नेते संजय राठोड यांच्यावर नाराज असल्याचे समजते आहे. काल शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
4 वर्षांपूर्वी -
मराठा तरुणांसाठी ‘सारथी’अंतर्गत मोफत कोर्सेस | अधिक माहितीसाठी वाचा
मराठा समाजातील युवक ‘जॉब स्किल रेडी’ व्हावेत या उद्देशाने ‘सारथी’मार्फत (छत्रपती शाहू महाराज संशोधन,प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे) विशेष कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्यात येत आहे. मराठा, कुणबी समाजाच्या तरुणांना याअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या विविध कोर्सेसचा लाभ घेता येणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
रामदेव बाबांच्या पतंजलीला राज्यात दणका | 'कोरोनिल'च्या विक्रीस महाराष्ट्रात बंदी
योग गुरु बाबा रामदेव यांनी 19 फेब्रुवारीला कोरोनाचे औषध ‘कोरोनिल’ लॉन्च केले होते. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन आणि नितिन गडकरी उपस्थित होते. हे औषध आता बाजारातही उपलब्ध झाले आहे. पण, महाराष्ट्रात या औषधाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पतंजलीला मोठा धक्का बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सांगली महापालिकेप्रमाणे राज्यात इतर ठिकाणीही भाजपाला धोबीपछाड देऊ - नाना पटोले
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्र विकास आघाडीने भारतीय जनता पक्षाकडून सत्ता खेचून आणली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय सुर्यवंशी महापौरपदी तर काँग्रेसचे उमेश पाटील हे उपमहापौरपदी निवडून आले असून राज्यातील इतर महापालिका, नगरपालिका तसेच जिल्हा परिषदांमध्येही भारतीय जनता पक्षाला असाच धोबीपछाड देऊ, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
जयंतरावांकडून भाजपचा टप्प्यात कार्यक्रम | सांगली महापालिकेत भाजपची सत्ता उलथवली
सांगली-मिरज-कुपवाड मनपावर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा झेंडा लागला असून राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी नवे महापौर झाले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे ते म्हणजे ‘टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच’ …आज त्याचाच प्रत्यय आला असून सांगली मनपावर राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीचा महापौर बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
मला वाटतं आपल्या शॅडो मंत्रिमंडळातील गृहमंत्र्यांकडून याची चौकशी करावी - रुपाली चाकणकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीबाबत शंका घेत जनतेला लॉकडाऊनची भीती दाखवू नका, असा इशारा राज्य सरकारला दिला. त्यावरुन राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मनसेची खिल्ली उडवली.
4 वर्षांपूर्वी -
हे घाणेरडे राजकारण सुरू आहे | त्या घटनेमुळे मला राँग बॉक्समध्ये उभे करू नका
चौकशीतून सत्य काय ते पुढे येईल. आज मला काहीही बोलायचे नाही. माझं काम पूर्वीप्रमाणेच सुरु राहील, असे वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यापासून गेले प्रदीर्घ काळ नॉट रिचेबल असलेले संजय राठोड आज पोहरादेवी येथे दाखल झाले. तेथे त्यांनी सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर राठोड यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जाहीर संवाद साधला.
4 वर्षांपूर्वी -
संजय राठोड यांनी मौन सोडलं | म्हणाले चौकशीतून सत्य समोर येईल...
चौकशीतून सत्य काय ते पुढे येईल. आज मला काहीही बोलायचे नाही. माझं काम पूर्वीप्रमाणेच सुरु राहील, असे वनमंत्री संजय राठोड यांनी म्हटले आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आल्यापासून गेले प्रदीर्घ काळ नॉट रिचेबल असलेले संजय राठोड आज पोहरादेवी येथे दाखल झाले. तेथे त्यांनी सेवालाल महाराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर राठोड यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून जाहीर संवाद साधला.
4 वर्षांपूर्वी -
पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्या नव्या फोटोने राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा
पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणावरून भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून, ठाकरे सरकासह विशेष करून शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर भारतीय जनता पक्षाकडून आरोप करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून राठोड गायब असून त्यांचा फोनही लागत नाहीये.
4 वर्षांपूर्वी -
दरेकरांच्या विधानाचा अर्थ चंद्रकांत पाटील, फडणवीसांना तरी समजला का? - शिवसेना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना करोना परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. नागरिकांकडून सूचनांचं पालन होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन करण्याचा इशारा दिला होता. त्यावर ‘सरकारने लोकांमध्ये दहशतीचे वातावर निर्माण करू नये. जुलमी राजवटीसारखी कृती करू नये,’ अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते दरेकर यांनी केली होती. दरेकरांच्या टीकेला प्रत्युत्तर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
संजय राठोडांसाठीचा ‘तो’ मेसेज होतोय व्हायरल | काय आहे मेसेजमध्ये?
पूजा चव्हाण कथित आत्महत्याप्रकरणावरून भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून, ठाकरे सरकासह विशेष करून शिवसेनेवर निशाणा साधला जात आहे. या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपाकडून आरोप करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून राठोड गायब असून त्यांचा फोनही लागत नाहीये.
4 वर्षांपूर्वी -
सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणाऱ्या मनसेला सार्वजनिक जबाबदारी समजणार नाही - राष्ट्रवादी
राज्यात १ मार्चपासून अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. परंतु, कोरोना रुग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, विधीमंडळातील अनेक नेत्यांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी एक व्हिडिओ ट्विट करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सुनावले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कृपया कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नका | उपमुख्यमंत्र्यांची जनतेला विनंती
कोरोना पाठोपाठ राज्यावर लॉकडाऊनचं संकट गडद होताना दिसत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आल्यानं लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, पुढील ८ दिवसांत रुग्णसंख्या आणि करोना वाढला तर लॉकडाउनचा निर्णय घेण्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राला कळकळीचं आवाहन केलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज भेटीनंतर मावळवासियांचा टोलमाफीचा प्रश्न निकाली | सर्वपक्षीय नेत्यांकडून आभार व्यक्त
जुन्या मुंबई-पुणे हायवेवरील सोमाटणे टोलनाका बंद करण्यात यावा, अशी मागणी तेथील नागरीकांच्या वतीनं करण्यात आली होती. गेली 15 वर्ष हा टोलनाका बंद व्हावा म्हणून स्थानिक मागणी करत आहेत. परंतु हे कंत्राट अकरा वर्षासाठी असल्याने ते मागे घेता येणार नाही, असं सरकारनं स्पष्ट केलं होतं. याच विषयावरुन पुण्यातील काही संघटना आणि राजकीय पक्षाचे प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंज येथे गेले होते.
4 वर्षांपूर्वी -
शिवप्रतिष्ठानमध्ये फुट | संभाजी भिडे गूरूजींच्या निकटवर्तीयाने केली नव्या संघटनेची स्थापना
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष संभाजी भिडे गुरूजी यांचे विश्वासू नितीन चौगूले यांची काही दिवसांपुर्वी हकालपट्टी करण्यात आली होती. वर्षभरापासून त्यांच्या विरोधात तक्रारी येत असल्याने स्वत: भिडे गुरूजींनी कारवाई केली होती. नितीन चौगुले यांनी सांगलीत मेळावा घेत नव्या संघटनेची स्थापना केली आहे. त्यांच्या नव्या संघटनेचे नाव ‘श्री शिवप्रतिष्ठान युवा हिन्दुस्थान’ असं आहे. सामाजिक कार्य करून संपुर्ण राज्यभर संघटनेचा विस्तार करणार असल्याचं नितीन चौगुले यांनी यावेळी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
वाहने रस्त्यावर सोडून एक दिवस लोकांना घरी जावे लागेल | मग बसा बोंबलत - शिवसेना
पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मागील काही आठवड्यांपासून इंधन दर वेगानं वाढले असून, काही ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण असल्याचं चित्र आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून मोदी सरकार घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीबाबत मनसेला शंका | हा सरकारचा नियोजनबद्ध कार्यक्रम - मनसे
राज्यातील वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक नियमांचं पालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केले.
4 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव | शरद पवार यांचे 1 मार्चपर्यंत सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द
राज्यातील वाढता करोना संसर्ग रोखण्यासाठी सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम आणि आंदोलनांवर सोमवारपासून काही दिवस बंदी घालण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक नियमांचं पालन करतात की नाही, हे तपासून लॉकडाउन लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केले.
4 वर्षांपूर्वी -
छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह | राष्ट्रवादी आमदाराच्या लग्नात पवारांसह हजेरी
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. छगन भुजबळ यांनी स्वत: ट्विट करुन याची माहिती दिली आहे. दरम्यान, काल शरद पवार यांच्यासोबत भुजबळांनी लग्नाला हजेरी लावली होती.राष्ट्रवादीच्या देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांचा लग्नसोहळा काल नाशिकमध्ये पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर भुजबळ यांनी हजेरी लावली होती.
4 वर्षांपूर्वी