महत्वाच्या बातम्या
-
संजय राठोड यांनी राजीनामा पाठविल्याचं वृत्त मातोश्रीवरून फेटाळले
आज मातोश्रीवर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान राबवून घरोघरी शिवसेना पोहोचविण्याबाबत बैठक पार पडली. तसेच पदाधिकाऱ्यांची गाव पातळीवरील रखडलेली पक्षीय स्तरावरील कामं याबाबत देखील माहिती घेण्यात आली. मात्र, वनमंत्री संजय राठोड यांच्या संदर्भात कोणतीही बैठक किंवा चर्चा झाली नसल्याचं वृत्त आहे. हाती आलेल्या वृत्तानूसार, संजय राठोड यांच्या राजीनामा देण्याबाबतचे सर्व वृत्त मातोश्रीवरील वरिष्ठांनी फेटाळून लावले आहे.
4 वर्षांपूर्वी -
कुख्यात गुंडाची तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत मिरवणुक | सोबत ३०० गाड्यांचा ताफा
कूविख्यात गजानन मारणे याची 2 खुनातून निर्देश मुक्तता झाल्यानंतर त्याची काल तळोजा कारागृहातून सुटका झाली. यानंतर महाराष्ट्राचा ‘किंग’ असे स्टेटस टाकत चाहत्यांनी त्याची महामार्गावरून जंगी मिरवणूक काढली. पुण्यात त्याने ‘रॉयल इंट्री’ तर केलीच पण त्याच्या या गाड्यांचा ताफा पाहून चांगलीच खळबळ उडाली होती. एकीकडे ‘मोहोळ’ने जेलबाहेर पडल्यानंतर शहरात एका कार्यक्रमाला आणि इतर ठिकाणी हजेरी लावत ताकत दाखवली आणि दुसरीकडे गजानन मारणे याने इंट्रीच रॉयल केल्याने पोलिसांच्या डोकेदुखी वाढली होती.
4 वर्षांपूर्वी -
संजय राठोड प्रकरणावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. दरम्यान, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा विषय सरकारचा असून याबाबत सरकारी पातळीवर निर्णय होईल, असे राऊत यांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीची आ. शिवेंद्रराजेंना थेट ऑफर
साताऱ्यात सध्या नगरपालिका निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादीकडून पॅनेल उभं करण्यात आलं असून दीपक पवार या निवडणुकीचं नेतृत्व करतील असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं आहे. यामुळे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष वाढण्याची चिन्हं आहेत. परंतु यावेळी राष्ट्रवादीकडून शिवेंद्रराजे भोसले यांना जाहीर ऑफर देण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
राजकारणी आणि सोशल मीडियावरील न्यायाधीश लोकांनो थोबाड बंद करावे - रुपाली पाटील
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
4 वर्षांपूर्वी -
Breaking | अखेर संजय राठोडांनी मातोश्रीवर राजीनामा पाठवला
पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूजा चव्हाणची हत्या नाही | तर पूर्णपणे आत्महत्या आहे - धनंजय मुंडे
मागील काही दिवसांपासून टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नवनवे खुलासे समोर येत असून, पोलिसांना अनेक महत्त्वाचे धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे.या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांचं नाव गोवण्यात आल्यानं अनेक राजकीय पडसादही उमटत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती जाहीर | जाहिरात प्रसिद्ध
आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मोठी घोषणा केली आहे. 28 फेब्रुवारीला परीक्षा घेऊन आरोग्य विभागात 50 टक्के जागा भरणार आहोत. मार्च महिन्यात ही भरती प्रक्रिया होईल, अशी घोषणा आरोग्यमंत्र्यांनी सोमवारी औरंगाबादेत केली आहे. आरोग्य विभागात एकूण 17 हजार जागा रिक्त आहेत. त्यापैकी साडे आठ हजार जागा भरल्या जाणार आहे. तर साडे आठ हजारांपैकी सुरुवातीला 5 हजार जागांसाठी ही भरती होणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
4 वर्षांपूर्वी -
भारतरत्नांची नव्हे | भाजप IT सेलची चौकशी होणार | IT सेलच्या प्रमुखाचंही नाव समोर - गृहमंत्री
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी ट्विट केले होते. या ट्विटनंतर लता मंगेशकर यांच्यासह सचिन तेंडूलकर, कंगना राणावत, रोहित शर्मा, विराट कोहली अशा अनेक सेलिब्रिटींनी एकामागोमाग एक ट्विट करून त्यांना विरोध केला.
4 वर्षांपूर्वी -
सांगलीत राजकीय भूकंप होणार? | चंद्रकांतदादांवर नाराज भाजप खासदार जयंतरावांच्या कार्यक्रमात
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पक्षीय कार्यक्रमानिमित्त सांगलीत होते, सदर बैठकीला भाजपचे खासदार असूनही संजयकाका पाटील या कार्यक्रमात गैरहजर होते. दुसरीकडे आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे यांच्यासह अनेक पदाधिकारी बैठकीत उपस्थित होते, परंतु खासदारांच्या गैरहजेरीने अनेकांच्या मनात शंका उपस्थित झाल्याचं पाहायला मिळालं. परंतु बैठक संपतेवेळी खासदार संजयकाका पाटील बैठकीच्या ठिकाणी आले, तेव्हा चंद्रकांत पाटील हे पदाधिकारी बदलासाठी अध्यक्षांच्या बंगल्यावर गेले होते, खासदार पाटील प्रदेशाध्यक्षांना भेटण्यासाठी आत चर्चेसाठी गेले पण अवघ्या दोन-तीन मिनिटांच बाहेर आले. मात्र संजयकाकांच्या चेहऱ्यावर राग स्पष्टपणे जाणवत होता.
4 वर्षांपूर्वी -
पूजा आणि अरूण वर्गमित्र होते | पण क्लिपमधील आवाज अरूणचा नाही | ग्रामस्थांचा दावा
परळी येथील मूळ रहिवासी युवती पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात अनेक उलट-सुलट चर्चा, आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. या प्रकरणात सुरुवातीपासूनच वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आता पुढे येत असून विरोधक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. दरम्यान, हे प्रकरण लक्षपूर्वक पाहिले तर यात आतापर्यंत बरीच गुंतागुंतीची माहिती आणि खुलाशे समोर येत असल्याने हे प्रकरण नेमके काय ?हे स्पष्ट होत नाहीये. त्यानंतर तिचे कुटुंबीय पुढे येऊ लागल्याने वास्तव समोर येण्यास सुरुवात झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
अजित पवारांच्या इलेक्टिव्ह मेरिट शब्दप्रयोगाने पुणे भाजपला धडकी | लोटसच्या ऑपरेशनची तयारी?
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असलेल्यांना वाजत पक्षात घेणार असल्याचे वक्तव्य केले होते. पवार यांच्या भूमिकेमुळे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या गोटात मात्र पुन्हा एकदा कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी १९ नगरसेवकांवर ‘वॉच’ ठेवत असल्याची चर्चा सुरु झाली होती. त्यातच महापौर, स्थायी समिती अध्यक्ष यांसह महत्त्वाच्या पदांवरील पदाधिकारी न बदलण्याच्या पक्षाच्या निर्णयामुळे काही ज्येष्ठ नगरसेवक नाराज आहेत. त्यामुळे येत्या पालिका निवडणुकीत दगाफटका होऊ नये याकरिता भारतीय जनता पक्ष अधिक सतर्क झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली | पोलीस जबाबात माहिती
पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, या प्रकरणी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप होत असल्याने सर्वच राजकीय पक्ष मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय महिला आयोगाने पुणे पोलिसांकडून चौकशीचा अहवाल मागवला आहे. यावर पुणे पोलिसांनी “पूजा चव्हाण प्रकरण तडीस लागेपर्यंत तपास करणार असे सांगतानाच कायदेशीर अडचणींमुळे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही”, असे स्पष्टीकरण दिले आहे.
4 वर्षांपूर्वी -
बंजारा समाज संजय राठोड यांच्या पाठीशी | विरोधकांनाही समाजाची बदनामी थांबविण्याचा इशारा
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांचं लक्ष्य ठरलेले बंजारा समाजाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना विरोधकांनी लक्ष केलं आहे. पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीने पुण्यात आत्महत्या केली असं सांगून याला जातीय वळण देखील देण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
तिच्या अंगावर पोल्ट्री फार्मचं कर्ज | २५ लाखाच्या नुकसानामुळे ती त्रस्त होती - वडिलांची प्रतिक्रिया
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात विरोधकांचं लक्ष्य ठरलेले बंजारा समाजाचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना विरोधकांनी लक्ष केलं आहे. पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीने पुण्यात आत्महत्या केली असं सांगून याला जातीय वळण देखील देण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये लोटसचं ऑपरेशन | भाजपच्या महिला कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
आगामी नाशिक महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतराचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्ष महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिवबंधन हाती बांधले. भाजपच्या तब्बल 50 महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
4 वर्षांपूर्वी -
अयोध्या राम मंदिर निर्माण | निधी संकलन करण्यासाठी RSS पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांनी भेट घेतली. राज ठाकरेंच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी ही भेट झाली. अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणासाठी निधी संकलन करण्यासाठी ही भेट घेण्यात आली. यावेळी राज ठाकरेंनी आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलं.
4 वर्षांपूर्वी -
खडसेंकडून लोटसचं ऑपरेशन | तब्बल ३१ आजी-माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
काही दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षाला जबर दणका दिला आहे. भुसावळमधील तब्बल ३१ आजी-माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे ऐन महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाला धक्का बसला आहे.
4 वर्षांपूर्वी -
परळीत राहून २ वर्षे भाजपमध्ये काम | पण त्यानंतर राजकीय कलाटणी...
मागील २-३ दिवसांपासुन राज्याच्या राजकारणात पुजा चव्हाण या तरुणीने केलेल्या आत्म्हत्येवरून राजकरण तापलं आहे… याचं कारण असं की यात शिवसेना मंत्री संजय राठोड यांचं नाव येत आहे… तसेच काही ऑडियो क्लिप देखील वायरल झाल्या आहेत…या सगळ्यात भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे… आणि सरकारनं लवकरात लवकर या विषयावर करवाई करावी अशी मागणी केली आहे. पुण्याच्या वानवडी येथील पूजा चव्हाण नावाच्या २२ वर्षीय तरुणीनं आत्महत्या केली. पण तिच्या आत्महत्येला आता राजकीय वळण मिळालंय. तिच्याबाबत आता अनेक खुलासे समोर येऊ लागलेत. ती नेमकी पुण्यात का आली होती?
4 वर्षांपूर्वी -
ऊर्जामंत्री प्यायला पाणी द्या | वीज पुरवठा खंडीत केल्याने स्वाभिमानीचं अनोखं आंदोलन
हिंगोली जिल्हयातील ताकतोडा येथे गुरांच्या गळ्यात ‘ऊर्जामंत्री प्यायला पाणी द्या’ चे फलक लाऊन स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी ता. 13 अनोखे आंदोलन केले. यावेळी कृषीपंपाचा वीज पुरवठा खंडीत करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी