महत्वाच्या बातम्या
-
शरद पवारांच्या खांद्यावरून खाली उतरा | भाजप आ. पडळकरांची रोहित पवारांवर जहरी टीका
‘पंतप्रधान नरेंद मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोशल मीडियावरून टीकाकारणारे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना उंची वाढल्यासारखे वाटते. परंतु, शरद पवार यांच्या खांद्यावर बसून ते स्वतःची उंची मोजतात. तुम्ही शरद पवार यांच्या खांद्यावरून उतरा म्हणजे तुम्हाला कळेल तुम्ही किती खुजे आहे हे कळेल’ अशा शब्दांत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षे वेळी सर्व्हर डाउन नव्हे | तो नियोजनबद्ध सायबर हल्ला
शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा 17 ऑक्टोबरपासून होत असून एकूण 50 हजार 417 विद्यार्थी ऑनलाईन तर 23 हजार 594 विद्यार्थी ऑफलाईन पध्दतीने परीक्षा देणार आहेत, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
5 वर्षांपूर्वी -
MPSC परीक्षा पुढे ढकलली | राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर ठाकरे सरकारनं MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. MPSC च्या परीक्षेची पुढची तारीख लवकरच जाहीर करू, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजा समाजाचा नव्हे तर रयतेचा असतो, मग तलवार कुणाविरुद्ध उपसणार? - वडेट्टीवार
मराठा आरक्षणावरुन राज्यात वातावरण चांगलचं तापलं आहे. MPSC परीक्षा तात्काळ रद्द करावी, असी मागणी मराठा संघटनाकडूव करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी आजपासून मराठा क्रांती ठोक मोर्चा काढण्यात येत आहे. या तिसऱ्या पर्वाला तुळजापुरातून सुरुवात झाली. यावेळी संयम कधी सोडायचा माहित आहे, पण गरज पडेल तेव्हा तलवारी काढू, असा इशारा भाजपाचे राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला. खासदार संभाजीराजे यांच्या या वक्तव्याला मंत्री विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
MPSC विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये | संभाजी ब्रिगेड परीक्षा केंद्रांना संरक्षण देईल - प्रवीण गायकवाड
सरकारला वेठीस धरण्यासाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी दिली आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान वेळापत्रकानुसारच परीक्षा घ्यावी अशी मागणी करत संभाजी ब्रिगेड परीक्षा केंद्रांना संरक्षण देईल अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय विंग मराठी बोलतात का? - रामदास आठवले
मराठी बोलण्यासर नका देत 75 वर्षीय महिलेला दुकानाबाहेर काढणाऱ्या सराफ दुकानदाराने अखेर माफी मागून आंदोलन मागे घेण्याची विनंती शोभा देशपांडे यांना केली. मराठीचा आग्रह धरत आंदोलन केलेल्या शोभा देशपांडे यांचे वृत्त मीडिया आणि सोशल मीडियात झळकताच, मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच, या महिलेशी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोनवरुन संवाद साधला आहे. मात्र, केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंनी या महिलेच्या व शिवसेनेच्या भूमिकेला आपला विरोध दर्शवला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आम्हाला गृहित धरू नका, वेळ आल्यास तलवारही काढेन | खा. संभाजीराजेंचा इशारा
आम्हाला गृहित धरू नका आणि कायदा हातात घेण्याची वेळ येऊ देऊ नका. वेळ आली तर मराठा आरक्षणासाठी तलवारही काढू असं वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केलं आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसऱ्या पर्वाला तुळजापूर येथून सुरूवात झाली. या मोर्चात खासदार संभाजीराजे आणि खासदार ओमराजे निंबाळकर सहभागी झाले होते. अशोक चव्हाण यांच्या घरासमोर येत्या 15 तारखेला आंदोलन करणार असल्याची घोषणाही यावेळी संभाजीराजे यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
छत्रपतींना बिनडोक म्हणणे योग्य नाही | आठवलेंचं प्रकाश आंबेडकरांना प्रतिउत्तर
महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह करणे संविधानविरोधी असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. रामदास आठवलेंच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कुलाबा येथील ‘महावीर ज्वेलर्स’ या दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार देऊन अरेरावी केल्याने मराठी लेखिका शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेर २० तास ठिय्या आंदोलन केले. यानंतर आंदोलनस्थळी मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दुकानदाराला मनसे स्टाईल दणका दिला.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह संविधानविरोधी....रामदास आठवले | वाद पेटणार?
महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह करणे संविधानविरोधी असल्याचे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. रामदास आठवलेंच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
MPSC परीक्षा घेण्याचं घातकी धाडस राज्य सरकारने करु नये | उदयनराजेंचा इशारा
राज्यात मराठा आरक्षणाचा निर्णय होत नाही तोपर्यंत MPSC ची परीक्षा घेण्याचं घातकी धाडस राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने करु नये असा इशारा भाजपाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चासह अनेक विद्यार्थी संघटनांनी केली आहे. त्या संदर्भात एक फेसबूक पोस्ट लिहून राजेंनी हा इशारा दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
फेक TRP | वाद दोन वृत्तवाहिन्यांमधील | भाजपाची प्रवक्तेगिरी अर्नब गोस्वामीसाठी
अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’(टेलिव्हीजन रेटिंग पॉइंट) वाढवणाऱ्या वाहिन्यांचं बिंग फोडल्याचा दावा गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. हा आर्थिक घोटाळा असून त्यात ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आदी वाहिन्यांचा सहभाग पुढे आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
FIR मध्ये इंडिया टुडेचा उल्लेख | आरोपींनी विशेषत: Republic TV वाहिनीचं नाव घेतलं
अधिकाधिक जाहिराती पदरी पाडून घेण्यासाठी कृत्रिमरीत्या ‘टीआरपी’(टेलिव्हीजन रेटिंग पॉइंट) वाढवणाऱ्या वाहिन्यांचं बिंग फोडल्याचा दावा गुरुवारी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला. हा आर्थिक घोटाळा असून त्यात ‘रिपब्लिक’ या वृत्तवाहिनीसह ‘फक्त मराठी’, ‘बॉक्स सिनेमा’ आदी वाहिन्यांचा सहभाग पुढे आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
एकनाथ खडसेंच्या वृत्तानंतर भाजपकडून पुन्हा सत्तांतराच्या पुड्या?
महाराष्ट्रातील सध्याचे सरकार कोण चालवतेय, कुठून चालतंय हे काहीही कळत नाही. हे सरकार घरी पाठविण्यासाठी निशाणा साधण्याची वेळ आली असून सत्तेतील सध्याचे तिन्ही पक्ष विरोधी पक्षात दिसतील आणि भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असे भाकित भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी वर्तविले. महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यसमितीच्या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते.
5 वर्षांपूर्वी -
आरेची जागा राखीव वन घोषित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस राज्य सरकारची मंजुरी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार आरे दुग्ध वसाहत (दुग्धव्यवसाय विकास विभाग) च्या ताब्यातील 288.43 हेक्टर व वन विभागाच्या ताब्यातील 40.46 हेक्टर जमीन अशी एकूण 328.90 हेक्टर जमीन ही भारतीय वन अधिनियम 1927 चे कलम 4 अन्वये राखीव वन घोषित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस आज मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - तर ‘हा’ अभिनेता आहे | लयभारी कारभारी मालिका
अडीच ते तीन महिन्यांच्या मोठ्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाले आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर अनेक मालिका, चित्रपट यांचं पुन्हा एकदा नव्यानं चित्रीकरण सुरु झालं आहे. त्यामुळे सध्या नव्या, फ्रेश एपिसोडसह अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
एक राजा बिनडोक तर दुसऱ्या राजांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर अधिकभर - प्रकाश आंबेडकर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काढण्यात येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा जाहीर केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात याची घोषणा केली. ही घोषणा करतानाच प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर टीका केली. उदयनराजे यांचा नामोल्लेख टाळत “एक राजा बिनडोक आहे,” असं आंबेडकर म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
अजित पवारांना मोठा दिलासा | राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी क्लीन चीट
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चीट मिळली आहे. मुंबई पोलिसांकडून सत्र न्यायालयात आज क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | MPSC परीक्षांबाबत मुख्यमंत्री आज अंतिम निर्णय घेणार
मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असताना MPSC परीक्षा घेऊन नयेत अशी मराठा संघटनांची मागणी आहे (MPSC Prelim Exam 2020). या संदर्भात गुरूवारी (8 ऑक्टोबर) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक आहे. त्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता असल्याची माहिती शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली आहे. मेटे यांनी रात्री उशीरा मंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या प्रश्नावर सगळ्यांच्या भावना तीव्र असून त्या समजूनच निर्णय झाला पाहिजे असं आमचं मत असल्याचंही मेटे यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
अमर, अकबर, अँथनीच रॉर्बट शेठला पराभूत करतील | काँग्रेसचा टोला
“आम्हाला महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात कोणताही रस नाही. राज्यातील हे अमर, अकबर आणि अँथनीचं सरकार एकमेकांच्या पायात पाय घालूनच पडेल”, अशी टीका भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली होती. यावरून आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर खास गाण्यातून टीका केली आहे. “होनी को अनहोनी कर दे, अनहोनी को होनी,, एक जगह जब जमा हो तीनो अमर, अकबर, अँथनी,” म्हणत दानवेंना अनिल देशमुखांनी टोला लगावला.
5 वर्षांपूर्वी -
MPSC परीक्षा घेतल्यास वाईट परीणाम भोगावे लागतील | परीक्षा केंद्रं बंद पाडू
आज नवी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या मराठा आरक्षण परिषदेमध्ये मराठा आरक्षणावरून संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका मांडली. तसेच मराठा आरक्षणाच्याबाबत राज्य सरकारने मराठा समाजाला फसवले असून, सरकारच्या हाती असलेल्या गोष्टीही राज्य सरकार करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच एमपीएससी परीक्षेबाबत राज्य सरकारने मराठा समाजाचं ऐकलं नाही तर मराठा समाज एमपीएससी केंद्र बंद पाडेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला.
5 वर्षांपूर्वी