महत्वाच्या बातम्या
-
धनगर समाजाचा प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित | अन्यथा चौकाचौकात नरेंद्र मोदींचे पुतळे जाळू
यातच काही दिवसांपूर्वी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाला एसटीचा दाखला द्यावा यासाठी ढोल बजाओ, सरकार जगाओ हे आंदोलन केले, त्यांनी धनगर एसटी आरक्षण द्या अशी मागणी केली. मात्र धनगर समाजाचा प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित आहे, धनगर समाजाचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनुसुचित जमातीत केला आहे. मात्र गेल्या ७० वर्षापासून अनुसुचित जमातीत असून आरक्षणाची अंमलबजावणी झाली नाही, त्यामुळे आता केंद्र सरकारने धनगर समाजाच्या सहनशीलतेचा अंत बघू नये असं धनगर समाजाचे नेते अँड दिलीप एडतकर यांनी सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पदवी परीक्षांना स्थगितीची विनंती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
‘मुंबई विद्यापीठाच्या १२ जून २०१९च्या परिपत्रकाप्रमाणे अंतिम परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केल्यापासून प्रत्यक्ष परीक्षा सुरू होईपर्यंत किमान एक महिन्याचा कालावधी विद्यार्थ्यांना देणे आवश्यक आहे. मात्र, यंदा विद्यापीठाने करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे ठरवले असले तरी विद्यार्थ्यांना तयारीसाठी पुरेसा कालावधी दिलेला नाही’, असे कारण देत १ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या परीक्षेला स्थगिती देण्याची विनंती दोन विद्यार्थ्यांनी याचिकेद्वारे केली होती. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी ती विनंती फेटाळून लावली.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेसोबत सरकार बनवण्याचे कारणच नाही | मुलाखतीपूर्वी फडणवीसांच्या राऊतांना अटी
शनिवारची संध्याकाळ महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळासाठी खळबळ उडवून देणारी ठरली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे नेते व मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यात अचानक झालेल्या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या. दोन्ही नेत्यांच्या भेटीनं वेगवेगळ्या चर्चांचे पेव फुटले आहेत. संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या भेटीवर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. या भेटीत त्यांनी संजय राऊत यांना घातलेल्या अटींचाही उल्लेख केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सामान्यांची लूट आणि मंत्र्यांशी सेटलमेंट? राज्यातील १५ मंत्र्यांना ५ महिने वीजबिलंच नाही
लॉकडाऊन काळात सर्वसामान्यांची जिथे हजारो रुपयांच्या वीजबिलामुळे दमछाक होत होती, तेथे राज्यातील 15 मंत्र्यांना गेल्या 4 ते 5 महिन्यांची वीजबिलं दिली गेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, कठोर नियमांना तयार राहा - मुख्यमंत्री
रात्री दहानंतर व्यवहार बंद करणे, कार्यक्रमांवर आणि गर्दी रोखण्यासाठीचे उपाय योजण्याचे काम चालू आहे, त्यामुळे पुढचे सहा महिने ही बंधने राहतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच जगभर कोरोना विषाणू प्रादुर्भावाची दुसरी लाट येईल, असे म्हटले जात आहे. आर्थिक चक्र फिरवण्यासाठी तरुण पिढी बाहेर पडू लागली आहे. ती कामावर जात आहे. पण त्यांच्यामुळे घरच्या ज्येष्ठांपर्यंत विषाणू पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच आता आपल्याला जनजागृतीवर मोठा भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी वेळप्रसंगी कठोर नियम करावे लागतील तर ते करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
5 वर्षांपूर्वी -
MHT-CET 2020 | पीसीबी ग्रुपचे Admit Card प्रसिद्ध
MHT-CET Admit Card 2020, महाराष्ट्र राज्याच्या सीईटी कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या कॉमन अॅडमिशन टेस्ट अर्थात MHT-CET 2020 परीक्षेचे Admit Card सीईटी सेलने आज, शनिवार २६ सप्टेंबर पासून उपलब्ध केले आहेत. विद्यार्थ्यांना mhtcet2020.mahaonline.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे अॅडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील. ते कसे डाऊनलोड करायचे याबाबतचा सविस्तर तपशील आम्ही या वृत्तात पुढे देत आहोत.
5 वर्षांपूर्वी -
भाजपची नवी केंद्रीय टीम | पण खा. पुनम महाजन यांना वगळलं
भाजपने आपल्या नवीन केंद्रीय टीमची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील नेत्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी भाजपच्या केंद्रीय अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. यात पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर यांना संधी देण्यात आली आहे. तर खासदार पुनम महाजन यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी तेजस्वी सू्र्या यांच्यावर युवा मोर्चाची जबाबदारी देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपची नवी केंद्रीय टीम | पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी
भाजपने आपल्या नवीन केंद्रीय टीमची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील नेत्यांना संधी देण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी भाजपच्या केंद्रीय अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. यात पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया रहाटकर यांना संधी देण्यात आली आहे. तर खासदार पुनम महाजन यांना वगळण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी तेजस्वी सू्र्या यांच्यावर युवा मोर्चाची जबाबदारी देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
Maratha Reservation | साताऱ्यात खा. उदयनराजे, शिवेंद्रराजे आणि विनायक मेटे यांच्यात चर्चा
मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेण्यासाठी पुण्यात ३ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या विचारमंथन बैठकीला छत्रपती उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थित राहावे या साठी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी साताऱ्यात येऊन दोन्ही राजांना निमंत्रण दिले. दोघांनीही मेटे यांचे निमंत्रण स्विकारले असल्याने उदयनराजे, शिवेंद्रराजे, मेटे यांची वज्रमूठ तयार झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात सुट्या सिगारेट आणि विडी विक्रीवर बंदी
राज्यात सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. आरोग्य विभागाने यासंदर्भातील आदेश लागू केले आहेत. त्यानुसार सिगारेट आणि विडीच्या सुट्या विक्रीवर तात्काळ बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता टपरी किंवा अन्य कोणत्याही दुकानात विडी किंवा सिगारेट सुटी विकता येणार नाही. विडी आणि सिगारेटचे संपूर्ण पाकिट विकणे बंधनकारक राहणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात केंद्राच्या कृषी व कामगार विधेयकाची अंमलबजावणी नाही | उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
नव्या कृषी विधेयकावरुन आज शेतकरी संघटनांनी देशव्यापी बंद पुकारला आहे. विविध शेतकरी संघटनांनी अखिल किसान संघर्ष समन्वय समिती, अखिल भारतीय शेतकरी संघटना, भारतीय किसान संघटना, अखिल भारतीय किसान महासंघ या देशभरातील संघटनांनी नव्या कृषी विधेयकावर राग व्यक्त करीत आंदोलन पुकारले आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेकडून मित्रपक्ष राष्ट्रवादीसाठी नमती भूमिका | राष्ट्रवादीला मोठ्या भावाचा मान
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. त्यानंतर आता स्थानिक निवडणुकीत वाद होऊ नये म्हणून नमती भूमिका घेत एकमेकांना मदत करत भाजपला बाजूला सारत आहे. अहमदनगर महापालिका निवडणुकीतही शिवसेनेकडे संख्याबळ असूनही राष्ट्रवादीला मोठ्या भावाचा मान दिला.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | खा. संभाजी राजे यांच्या ३ पत्रांना पंतप्रधानांकडून अद्याप उत्तर नाही
सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. त्यातच मराठा नेत्यांनी १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. कोल्हापुरात पार पडलेल्या मराठा समाज गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. मागण्या मान्य झाल्यास महाराष्ट्र बंद मागे घेऊ, पण समाधानी प्रतिसाद मिळाला नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाज १० ऑक्टोबरला रस्त्यावर येईल असं सांगण्यात आलं आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
नाणारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या मावस भावाला भूखंडाचे श्रीखंड | निलेश राणेंचा खळबळजनक दावा
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नातेवाईक निशाण देशमुख यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या बाधित भागात 1400 एकर जमीन विकत घेतली”, असा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. निशाण देशमुख हे उद्धव ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत, असा दावा निलेश राणे यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात दिवसभरात कोरोनाचे २१ हजार नवीन रुग्ण | ४७९ रुग्णांचा मृत्यू
राज्यात बुधवारी 21 हजार करोनाचे नवीन रुग्ण आढळून आलेत तर 479 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 12 लाख 63 हजार झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 19 हजार 476 रुग्ण बरे होऊन घरी गेले. गेल्या काही दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नव्या रुग्णांपेक्षा जास्त होती. त्यात आता खंड पडला आहे. आत्तापर्यंत 9 लाख 56 हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 72 हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची घोषणा
सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्यानंतर राज्यात मराठा आरक्षणाची मागणी जोर धरु लागली आहे. त्यातच मराठा नेत्यांनी १० ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. कोल्हापुरात पार पडलेल्या मराठा समाज गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. मागण्या मान्य झाल्यास महाराष्ट्र बंद मागे घेऊ, पण समाधानी प्रतिसाद मिळाला नाही तर महाराष्ट्रातील मराठा समाज १० ऑक्टोबरला रस्त्यावर येईल असं सांगण्यात आलं आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अध्यक्ष सुरेश पाटील यांनी ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण | कोरोनाची सौम्य लक्षणं
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. या धोकादायक व्हायरसची झळ सर्व सामान्य जनतेसह सेलिब्रिटींना देखील बसली आहे. आतापर्यंत अनेक कलाकारांनी कोरोना व्हायरसवर मात केली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता ५६ लाखांच्याही पार गेला आहे. तर आता ‘अग्गंबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कंगना स्वतः ड्रगिस्ट असल्याचं बोलत असेल तर तिची चौकशी झाली पाहिजे - भाजप
सारा अली खान, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर आणि दीपिका पदुकोण पाठोपाठ आणखी एका अभिनेत्रीचं एनसीबीच्या रडारवर नावं आली आहेत. या अभिनेत्रीचं वय जवळपास ४० वर्षे असून या अभिनेत्रीने मोठा हिट सिनेमा दिला आहे. ही अभिनेत्री २००५, २००६ च्या काळातील आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठा गोलमेज परिषदे | आरक्षणावरील स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाच्या विकासासाठी आठ सूत्री कार्यक्रम जाहीर केला आहे. तरी त्यावर मराठा समाजाचं समाधान झालेलं दिसत नाही. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारचीच असल्याचा ठराव मराठा समाजाच्या गोलमेज परिषदेत आज (23 सप्टेंबर) मंजूर करण्यात आला. या परिषदेत एकूण 15 ठराव मंजूर करण्यात आले असून हे सर्व ठराव राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास फोडाफोडी | नागपुरात अस्तित्व निर्माणासाठी शिवसेनेकडून मित्रपक्ष काँग्रेसला सुरुंग
काही दिवसांपूर्वी महाविकासआघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेत एकमेकांचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते फोडाफोडीवरून मोठं वादळ निर्माण झालं होतं. कारण सत्तेत एकत्र असूनदेखील शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.
5 वर्षांपूर्वी