महत्वाच्या बातम्या
-
मराठा आरक्षणावर सरकारने काही केलं तर ठीक | अन्यथा राजीनामा आणि राजकारणाला रामराम
सर्व समाजांबद्दल मला आदर आहे, प्रत्येकाला त्याचा हक्क मिळाला पाहिजे, न्यायालयानेही सर्व लोकांना समान अधिकार द्यावेत न्याय मिळाला नाही तर उद्रेक होणं स्वाभाविक आहे. मराठा आरक्षणावर सरकारने काही केलं तर ठीक, नाहीतर राजकारणाला रामराम करणार, राजीनामा देऊन टाकणार, हे मी मनापासून सांगतोय असं उदयनराजे म्हणाले. एबीपी माझाच्या मुलाखतीत ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
कंगनाला भेट घ्यायला वेळ | मग कांदा उत्पादकांनाही वेळ द्या | शेतकऱ्यांची मागणी
केंद्र सरकारने कांद्यावर अन्यायकारक निर्यातबंदी लादून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जाण्यास भाग पाडले आहे. मोदी सरकार समाज माध्यमाचा मोठय़ा प्रमाणात आधार घेऊन देशभरातील शेतकरी, शेती विकासाचे स्वप्न दाखवून सत्तेत आले. परंतु, सरकारची प्रत्यक्ष कृती मात्र शेतकरी विरोधी राहिल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर, निर्यातबंदी विरोधात शनिवारपासून शेतकरी समाज माध्यमांवर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोठी जवाबदारी | सारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचा कारभार अखेर उपमुख्यमंत्र्यांकडे
राज्य सरकारने आज जीआर जारी करत सारथी संस्थेसह मराठा समाजाच्या योजना राबवण्याची जबाबदारी अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे वर्ग केली आहे. सारथी संस्था आणि मराठा समाजाशी संबंधित योजनांची जबाबदारी काँग्रेसचे मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या बहुजन कल्याण विभागाकडे होती. मात्र ओबीसी समाजाचे असलेले विजय वड्डेटीवार मराठा समाजाला न्याय देत नसल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत होता. या आरोपांनी व्यथित झालेल्या वड्डेटीवार यांनी सारथीची जबाबदारी अजित पवारांनी स्वीकारावी अशी त्यांना विनंती केली होती.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंचा कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता | खा. नारायण राणेंचा प्रहार
मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे राज्यभर वातावरण तापलं आहे. अशात विरोधकांनीही ठाकरे सरकारवर टीकास्त्र डागलं आहे. यातच आता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उदासीनतेमुळे मराठा समाजाला आरक्षणाला मुकावे लागले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कधीच मराठा आरक्षणाला पाठिंबा नव्हता. मी शिवसैनिक आहे त्यामुळे मला माहित आहे.’ अशा शब्दात नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी जागा राखीव ठेवण्याबाबत सरकारचा विचार
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती दिल्याने संतप्त भावना येत असताना राज्यात मेगा पोलीस भरतीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र या पोलीस भरतीत मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षणाचा फायदा होणार नसल्याने अनेक मराठा नेत्यांनी भरती करु नये अशी आग्रही भूमिका घेतली. खासदार संभाजीराजेंनी राज्य सरकारवर टीका करत मराठा समाजात आक्रोश होईल असा इशारा दिला होता.
5 वर्षांपूर्वी -
गेल्या २४ तासात २३,३६५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | तर ४७४ रुग्णांचा मृत्यू
आज दिवसभरात १७ हजार ५५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात असून आतापर्यंत ७ लाख ९२ हजार ८३२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट ७०.७१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर मृत्यूदर २.७५ टक्के इतका आहे. आतापर्यंत ५५ लाख ६ हजार २७६ चाचण्या करण्यात आल्या असून यामधील ११ लाख २१ हजार २२१ रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
MPSC Exam | सरकारकडून उमेदवारांसाठी नियमावली प्रसिद्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने आयोजित परीक्षांकरिता कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सूचना तसेच उपाययोजना सांगण्यात आल्या आहेत. यासंबंधी आयोगाकडून परिपत्रक काढण्यात आले असून, उमेदवारांना या सूचनांचे पालन करणे आवश्यक असणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी | एकूण ७४ पॅकेज
बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या योजनेबद्दल माहिती दिली आहे. या योजनेसाठी १२५ कोटी रुपये लागणार आहेत. रस्त्यावर होणाऱ्या अपघातात तातडीने उपचार व्हावेत यासाठी ही योजना असल्याचं राजेश टोपे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
Sarkari Naukri | महाराष्ट्र पोलीस भरती २०२० जाहीर | एकूण जागा १२ हजार ५३८
राज्य मंत्रिमंडळानं आज महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात साडे बारा हजार पदांसाठी पोलीस भरती होणार आहे. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस भरती होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. पोलीस भरती ही शहरी आणि ग्रामीण तरुण, तरुणींसाठी मोठी संधी असेल. त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल, अशी माहिती कॅबिनेटच्या बैठकीनंतर देशमुख यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास परिस्थिती अधिक चिघळेल | संभाजीराजेंचा इशारा
मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर समाजामध्ये अस्वस्थतेचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे समाजातील संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. जिल्हास्तरावर सकल मराठा समाजाच्या बैठका होत आहेत. आणि आंदोलनाची दिशा ठरत आहे. परंतु पोलीस प्रशासनाने काही आंदोलकांना नोटीस बजावने सुरू केले आहे असं सांगत खासदार छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवार यांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी | खा. संभाजीराजेंची मागणी
सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणला स्थगिती दिली आहे. त्यावरून मराठा बांधव नाराज झाले असून त पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी मंगळवारी दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी जवळपास 5 ते 6 फार्म्युले सुचवल्याची माहिती खासदार संभाजीराजे यांनी दिली आहे. शरद पवार यांनी मराठा आरक्षणामध्ये मध्यस्थी करावी, असा आग्रही खासदार संभाजीराजे यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजप खा. उन्मेष पाटील यांचं माजी सैनिकाला मारहाण प्रकरण | सरकारचे चौकशीचे आदेश
निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्यावर शिवसेनेने केलेल्या हल्ल्यानंतर, आता राज्यातील वातावरण आणखीनच तापू लागले आहे. एका कार्टूनच्या मुद्द्यावरून शिवसैनिकांनी माजी नौदल अधिकाऱ्यावर हल्ला केला होता. मात्र, आता याच मुद्द्यावर अडचण वाढत असल्याचे पाहून शिवसेनेने २०१६’चा मुद्दा उकरून काढला आहे. यात भाजप खासदार उन्मेष पाटील यांनी माजी सैनिकावर हल्ला केला होता. यासंदर्भात आता राज्यातील शिवसेना अथवा ठाकरे सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सत्ता हातातून गेल्यामुळे तुम्ही इतका तमाशा करत आहात | राऊतांचा भाजपाला टोला
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हा विषय आमच्यासाठी संपला आहे. आम्ही त्यावर बोलणं बंद केलं आहे. ज्याला जे करायचं आहे, त्याने ते करावं, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. नुकतंच कंगना रनौत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात भेट घेतली. कंगनाच्या वांद्र्यातील कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली. साधारण 40 मिनिटे दोघांची चर्चा झाली. त्यावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राच्या बदनामीचा कट सहन करणार नाही - मुख्यमंत्री
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादूर्भाव झपाट्याने वाढत आहे. येणाऱ्या काळात तो आणखी वाढण्याची शक्यता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केली. पुनश्च हरीओम अर्थात मिशन बिगिन अगेनला पुन्हा सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. त्यासाठी त्यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम राबवण्याबाबत सांगितलं. १५ सप्टेंबरपासून १० ऑक्टोबरपर्यंत ही मोहिम राबवली जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
दिवसभरात २४, ८८६ नव्या कोरोना रुग्णांची वाढ | ३९३ रुग्णांचा मृत्यू
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांनी तब्बल 10 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. शुक्रवारी राज्यात एका दिवसात 24 हजार 886 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात 393 जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवकालीन गडकिल्यांची दुरावस्था | आ. राजू पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले व शिवकालीन इतिहासाचे जिवंत साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांची झालेली दुरावस्था पाहून उद्विग्न झालेले मनसेचे आमदार राजू पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. ‘अरबी समुद्रात शिवस्मारक उभं राहील तेव्हा राहील, पण शिवरायांची जी खरी स्मारकं आहेत ती आपण जपली नाहीत तर हा महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही,’ अशी भावना पाटील यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढा | अन्यथा परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर भाजपने राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनीही सरकारवर घणाघाती टीका करत इशारा दिला आहे. ‘मी सरकारला जाहीर आवाहन करतो. सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा आरक्षण अबाधित ठेवावं. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे. कारण मराठा समाज आता एकटा नाही एवढच सांगतो,’ असा आक्रमक इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र सरकारला कोरोनाशी नाही कंगनाशी लढायचं आहे | फडणवीसांचा टोला
महाराष्ट्र सरकारला आता असं वाटतंय की करोनाशी लढाई संपली आहे आणि आता कंगनाशी लढायचं आहे असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. कंगनासोबत लढण्यासाठी वापरत आहेत त्यातील ५० टक्के क्षमता जरी करोनाशी लढण्यासाठी वापरली तर लोकांचे जीव वाचतील असंही ते म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मी घरची धुणी रस्त्यावर धूत नाही, फडणवीस संतापले | वाद पेटणार
भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे गेल्या काही दिवसांपासून विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. आरोप करताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा ड्राय क्लिनर असा उल्लेखही केला होता. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं असून माझ्यामध्ये खूप संयम असून, मी घरची धुणी रस्त्यावर कधीच धुत नाही असं म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंनी सलग ५ मिनिटं मराठा आरक्षणावर बोलून दाखवावं | चंद्रकांत पाटलांचं टीकास्त्र
मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थगित केल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण विषयावर सलग 5 मिनिटं बोलून दाखवावं अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्य सरकार चालवण्याबाबत गंभीर नाहीत असंही यावेळी पाटील म्हणाले. खरंतर मराठा आरक्षण प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय दिल्यानंतर एकच संतापाची लाट उसळली आहे. याचे पडसाद आता राज्यभर उमटायला सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षणाचा वाद आता पुन्हा पेटला आहे.
5 वर्षांपूर्वी