महत्वाच्या बातम्या
-
तर तिन्ही पक्ष एक उमेदवार देतील | त्या आमदाराला राजकारणातून बाद केले जाईल
राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडणार अशी अफवा भाजपवाले सतत पसरवत असतात. परंतू, महाविकासआघाडी सरकार पूर्णपणे स्थिर आहे. राज्यातील सरकार पडेल असे सांगणे हा केवळ भाजपचा स्वत:ला चर्चत ठेवण्याचा प्रयत्न आहे असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
लवकरच 'नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान' पुस्तक लिहिणार | अनेक गोष्टी उघड करणार
विधानसभा निवडणुकीपासून राज्यातील भाजपाच्या नेतृत्वावर नाराज असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “आमचा मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का?,” असा सवाल खडसे यांनी केला असून, लवकरच ‘नानाजी फडणवीसाचं बारभाई कारस्थान’ पुस्तक लिहिणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध खालच्या पातळीवरील हॅशटॅग अभियान | ट्विटरवर टॉप ट्रेन्ड
कंगना रानौतचे उद्धव ठाकरे यांच्यावरील व्यक्तिगत हल्ले सुरूच आहेत. ट्विटवरून ती उद्धव ठाकरेंची व्यक्तिगत पातळीवर बदनामी कशी करता येईल याचीच काळजी घेताना दिसत आहे. त्यात तिला समाज माध्यमांवर भाजप समर्थकांची मोठ्या प्रमाणावर साथ मिळाल्याने ती दर काही मिनिटांनी विवादित ट्विट करत आहे. थेट स्वर्गीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या आडून तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विखारी शब्दात लक्ष केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणावरून आता मूक मोर्चे नाही | संघर्ष अटळ | आ. नितेश राणे आक्रमक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा या शासकीय निवासस्थानी काल बैठक पार पडली. दोघांमध्ये सुमारे पाऊण तास झाली बैठक झाली. मराठा आरक्षणासंदर्भात आलेल्या निर्णयावर चर्चा झाली.
5 वर्षांपूर्वी -
गेल्या २४ तासांत ५३३ पोलिसांना कोरोनाची लागण | ३ पोलिसांचा मृत्यू
कोरोनामुळे देशावर मोठं संकट ओढावलं आहे. देशात महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा कहर मोठ्या प्रमाणात आहे. यामध्येही मुंबई, पुणेसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त आहे. पण आता ग्रामीण महाराष्ट्रातही कोरोना डोकं वर काढत असल्याचं समोर येत आहे. सांगली, नागपूर आणि मराठवाड्यातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं दिसंत. त्यामुळे राज्यासाठी ही चिंतेची बाब आहे.
5 वर्षांपूर्वी -
MHT - CET २०२० | परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर
एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेच्या सुधारित तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर परीक्षांचं सविस्तर वेळापत्रक आणि प्रवेशपत्र सेलच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण सुनावणी घटनापीठाकडे वर्ग | वैद्यकीय प्रवेश-भरतीत तूर्त आरक्षण नाही
मराठा आरक्षण प्रकरणात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने अंतरिम आदेश दिला आहे. त्यानुसार वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्यात आलं आहे. पदव्युत्तर आरक्षण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे यावर निर्णय घेता येणार नाही, पण वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमामध्ये मराठा आरक्षणाचा लाभ देता येणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
एक महाराष्ट्र एक मेरिट पद्धत लागू | वैद्यकीय प्रवेशात ७०-३० कोटा रद्द
वैद्यकीय प्रवेशात ७०-३० कोटा आज रद्द करण्यात आला आहे. यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. २०१५ पासून हा कोटा रद्द करण्याची मागणी होत होती. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सभागृहात याबाबत घोषणा केली आहे. ७०-३० कोटा पद्धतीमुळे गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहतात, त्यामुळे राज्य सरकारने ही पद्धत रद्द केल्याचं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कंगनावर देशद्रोहाचा खटला दाखल करा | शिवसेना आयटी सेलकडून तक्रार
बॉलिवुड अभिनेत्री कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यामध्ये आता रोजच शाब्दिक चकमक उडताना दिसत आहे. दरम्यान मुंबई शहराची तुलना पाकिस्तान व्याप्त कश्मीर सोबत केल्यानंतर ट्वीटरवर सेना कार्यकर्ते आणि कंगनामध्ये कलगीतुरा चांगला रंगला आहे. या प्रकरणामध्ये आता शिवसेना आय टी सेल कडून ठाण्याच्या श्रीनगर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली आहे. यामध्ये कंगना च्या मुंबईला POK सोबत तुलना करण्यावरून देशद्रोहाचा आरोप लावत FIR दाखल करण्याबाबत सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त नॉटी आहेत | राऊतांना सणसणीत टोला
मुंबई पोलिसांवर अभिनेत्री कंगना रणौतने केलेल्या वक्तव्यावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगनाला हरामखोर हा शब्द वापरला होता. त्याचं स्पष्टीकरण त्यांनी सोमवारी दिलं. अभिनेत्री कंगना रणौत म्हणजे नॉटी गर्ल आहे असं म्हणत त्यांनी हरामखोर या शब्दाचा अर्थही उलगडून सांगितला आहे. त्यांच्या या स्पष्टिकरणावर अमृता फडणवीस यांनी राऊतांचं नाव न घेता निशाणा साधला आहेत. आम्ही विचार केला त्यापेक्षाही जास्त खट्ट्याळ आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
MPSC Exam | अखेर सुधारित वेळापत्रक जाहीर
कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती मुख्य सचिवांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर दिली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले होते.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधील १२० आरोग्य कर्मचारी राजीनामा देण्याच्या तयारीत
पुण्यातील जम्बो कोव्हीड सेंटर मधील १२० कर्मचाऱ्यांचा राजीनामा दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामध्ये ४० डॉक्टर स्टाफ, ८० नर्सिंग स्टाफचा समावेश आहे. राजीनाम्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
5 वर्षांपूर्वी -
खडसेंवर भाजपमध्ये खरंच अन्याय झाला | त्यांनी शिवसेनेत यावं - अब्दुल सत्तार
भाजपा ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना शिवसेनात येण्याची खुली ऑफर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी भाजपावर टीका केली शिवाय खडसे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. यावेळी बोलताना सत्तार यांनी खडसेंना बाहुबलीची उपमा दिली.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी अजितदादांसोबत ३ दिवस सरकार चालविले | त्यामुळे ते त्यांना लक्ष करणार नाहीत
मुख्यमंत्रीपदाचा दावेदार म्हणून माझे नाव समोर आल्याने मला संपविण्याचा प्रयत्न केला. हॅकर मनिष भंगाळे याला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रात्री दीड वाजता कशासाठी भेटले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यासोबतच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत तीन दिवस सरकार चालविले आहे. त्यामुळे नैतिकता घालविल्याने ते त्यांच्यावर टिका करूच शकत नसल्याची तोफ त्यांनी यावेळी डागली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता | त्याची संख्या कमी आहे हे खरे आहे - उपमुख्यमंत्री
राज्यातील काही भागात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर मिळत नाहीत. त्याची संख्या कमी आहे हे खरे आहे. परंतू, येत्या काही काळात राज्यातील ऑक्सिजन सिलिंडरचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्याती नागरिकांनीही स्वत:च्या आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. आवश्यकता भासल्यास कोरोना व्हायरस चाचणी करुन घेतली पाहिजे. मास्क, सॅनिटायझर वापरायला हवे, असे अवाहनही अजित पवार यांनी केले आहे. कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता अजित पवार यांनी पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
नागरिकांनी मास्क वापरणं सक्तीचं | पुणेकरांनी नियमांचं पालन करावं - प्रकाश जावडेकर
पुण्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून कोरोनाबाधितांची संख्या 1 लाखांवर गेली आहे. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी बैठक घेण्यात आली. केंद्र सरकार पुणेकरांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. तसंच पुण्यातील कोरोना संदर्भात 3 बैठका झाल्या असून यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, पालकमंत्री अजित पवार, शरद पवार, दिलीप वळसे-पाटील तसंच संबंधित अनेक अधिकारी उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
Vastu Shastra | जीवनात सकारात्मक बदल | घराच्या मुख्य दरवाजा वर करा हे बदल
प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात यशस्वी व्हायचे असते. यशस्वी होण्यासाठी माणूस हरतऱ्हेने प्रयत्न करत असतो. त्याच्या यशाची सुरूवात घरातून होते. त्यामुळे घरातील वस्तू या नेहमी वास्तुशास्त्रानुसार योग्य ठिकाणी ठेवणे महत्त्वाचे असते.
5 वर्षांपूर्वी -
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात अंतिम वर्षाची परीक्षा | घरी बसून परीक्षा देण्यास मंजुरी
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर महाराष्ट्रात आता विद्यापीठीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा कधी होणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. ही उत्सुकता कायम असतानाच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज (गुरुवार, 3 सप्टेंबर 2020) महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुंचा अहवाल प्राप्त होताच त्यावर विचार केला जाईल. आणि पुढील निर्णय घेतला जाईल, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. कोरना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना कोणताही धोका होऊ नये यासाठी शासन, प्रशासन सावध भुमिका घेताना दिसत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात १७ हजार ४३३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद | २९२ रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात आज आणखी १७ हजार ४३३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर, २९२ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८ लाखांच्या वर गेली आहे. यापैंकी २५ हजार १९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ५ लाख ९८ हजार ४९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होऊ लागल्याने सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. तसेच कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस - शरद पवार सुद्धा राज्यभर फिरत आहेत | मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडायला वेळ नाही
प्रवीण दरेकर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, काही अपवाध वगळता उद्धव ठाकरे घराबाहेर पडले आहे. त्यामुळे सर्वाधिक काळ घरात राहणारे उद्धव ठाकरे राज्याच्या इतिहासातील पहिलेच मुख्यमंत्री असतील, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. तसेच माझ्यासह माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे देखील राज्यभर फिरत आहे. मात्र उद्धव ठाकरे यांना घराबाहेर पडायला वेळ नाही, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी