महत्वाच्या बातम्या
-
सिंधुदूर्ग शिरोडा-वेळागर येथील जमीन हस्तांतरण | MTDC आणि हॉटेल ताजमध्ये सामंजस्य करार
कोरोना व्हायरसमुळे व्यवसाय व उद्योग बंद असल्यामुळे महाराष्ट्र राज्यावरील आर्थिक भार अधिक वाढला आहे. अशात महाराष्ट्र सरकारच्या “मिशन बिगिन अगेन” ला चालना देणारी बातमी गुरुवारी समोर आली आहे. ताज ग्रुप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात गुरुवारी 125 कोटींच्या गुंतवणूकीचा सामंजस्य करार झाल्याची माहिती पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज १४,८८८ रुग्णांची वाढ | तर २९५ कोरोना रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज कोरोनाचे १४,८८८ नवे रुग्ण वाढले आहेत. तर २९५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज ७,६३७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ५,२२,४२७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
JEE, NEET परीक्षा पुढे ढकलण्याची धनंजय मुंडेंची मागणी | मुख्यमंत्र्यांना पत्र
कोरोना महामारीचे संकट व विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेत जेईई, नीट परीक्षा केंद्र सरकारने काही महिने पुढे ढकलावी. यासाठी राज्य सरकारच्या वतीने केंद्राकडे आग्रही मागणी करावी तसेच येत्या 20 सप्टेंबर रोजी होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा (एमपीएससी) पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीकडून गळचेपी | शिवसेना खा. संजय जाधव यांचा राजीनामा | नार्वेकरांची शिष्टाई
राज्यात महाविकास आघाडीचं तीन पक्षांचं सरकार आहे. मात्र या तीनही पक्षांमध्ये राष्ट्रवादीचाच सर्वात जास्त दबदबा असल्याची कायम चर्चा असते. शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या राजीनाम्यामुळे त्याची चर्चा आता जोरात सुरु झालीय.जाधव यांच्या परभणी मतदार संघात येणाऱ्या जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचं अशासकीय मंडळ असावं असा प्रयत्न जाधव करत होते. 8 ते 10 महिने प्रयत्न केली मात्र शिवसेनेचं नाही तर राष्ट्रवादीचं प्रशासकीय मंडळ नियुक्त केलं गेलं.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज १०,४२५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | ३२९ रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज १२ हजार ३०० रुग्ण बरे झाले तर १० हजार ४२५ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढून ते ७३.१४ टक्के झाले. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख १४ हजार ७९० रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ६५ हजार ९२१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
ई-पास सुरु राहणार की बंद करणार | राज्य सरकारची भूमिका स्पष्ट
राज्यात करोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत ई-पास बंद केला तर करोनाचा प्रसार वेगाने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात आणखी काही काळ तरी ई-पास सुरू ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे सध्या तरी ई-पास बंद करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही, असं राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. ते नागपुरात बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
निसर्ग वादळची नुकसान भरपाई अजून पूर्ण मिळाली नाही | आता महाड इमारतीच्या मदतीची घोषणा
रायगड जिल्ह्यातील महाड शहरात झालेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. पीएमओकडून ट्विट करुन दुर्घटनेत जखमी झालेल्यांसाठी प्रार्थना केली आहे. महाडमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी अतिशय दु:ख आहे. स्थानिक अधिकारी आणि एनडीआरएफच्या पथकाकडून या दुर्घटनेठिकाणी बचावकार्य सुरु आहे. यासाठी सर्व शक्य ती मदत केली जाणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिक्षण सर्वांना समान मिळायला हवं | ऑनलाईन शिक्षणाने शैक्षणिक विषमता निर्माण होण्याची शक्यता राहते
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं लक्षात येताच साधारण पाच महिन्यांपूर्वी प्रशासनाकडून काही महत्त्वाची पावलं उचलली जाऊ लागली. दैनंदिन जीवनावर याचे थेट परिणाम पाहायला मिळाले. त्यातच शिक्षण व्यवस्थेवरही या परिस्थितीमुळं काही मोठे परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. यंदाचं शैक्षणिक वर्ष सुरु झालेलं असूनही कोरोनाचं संकट टळल्यामुळं शाळा काही अद्यापही सुरू झालेल्या नाहीत. पण, येत्या काळात हे चित्र बदलण्याची शक्यता आहे.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण
नागपूर महानगरपालिकेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या संसर्गावर मात करण्यासाठी आणि या विषाणूचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करणाऱ्या आणि शासकीय यंत्रणेचा कारभार मोठ्या जबाबदारीनं सांभाळणाऱ्या पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द मुंढे यांनीच ट्विट करत याबाबतची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात तब्बल १४,२१९ रुग्णांची कोरोनावर यशस्वी मात
आज राज्यात तब्बल १४ हजार २१९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. एकाच दिवसात इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे झाल्याने थोडा दिलासा मिळत आहे. नवीन रुग्णांच्या तुलनेने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई बाहेरील क्षेत्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते | तयारीत रहावे लागेल - मुख्यमंत्री
जूनपासून मिशन बिगेन अगेन सुरु झाले आहे. त्यानूसार इतर सर्वांनी जगभरात ज्या काही गोष्टी घाईगडबडीत केल्या असतील त्या गोष्टी महाराष्ट्र करणार नाही. आपण ज्या ज्या गोष्टी सुरु केल्या आहेत, त्या पुन्हा बंद होणार नाहीत याची दक्षता घेऊन आपण या गोष्टी सुरु केल्या आहेत. शहरी भाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, त्या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी उघडायला परवानगी दिली आहे. पण, ज्या गोष्टी सध्या उघडता येणो शक्य नाही, किंवा त्या उघडण्याची खात्री होत नाही, तोर्पयत त्या सुरु केल्या जाणार नसल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
महाडमध्ये ५ मजली ईमारत कोसळली | शेकडो लोकं ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
महाड शहरात पाच मजली ईमारत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. काजलपूरा भागात असलेल्या तारीक गार्डन असं या ईमारतीचे नाव आहे. ५० हून अधिक माणसे ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत १० लोकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. १० वर्ष जुनी ही इमारती असल्याची माहिती मिळत आहे. ईमारत कशामुळे कोसळली याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळे राष्ट्रवादीच्या नेत्याच्या कुटुंबातील ३ सदस्यांचा एका महिन्यात मृत्यू
जगभर थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव भिवंडीतही वाढला आहे. सध्या रुग्ण बरे होण्याचा वेग वाढला असला तरी कोरोनाने भिवंडीतील वडूनवघर येथील चौघुले परिवारावर घाला घातला आहे. एका महिन्याच्या आत परिवारातील तीन सदस्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी यांनी निर्णय घेतला तर महाविकास आघाडीतून बाहेर पडू | विजय वडेट्टीवार
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी अपेक्षेप्रमाणे पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या बैठकीच्या सुरुवातीलाच सोनिया गांधी यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी म्हटले की, पक्षाध्यक्षपदाच्या स्थित्यंतरासाठी प्रक्रिया सुरु करावी. जेणेकरून मला अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त होता येईल, असे सोनिया गांधी यांनी म्हटल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात काँग्रेसमधला वाद पेटला | पृथ्वीराज, वासनिक, देवरांना लाज वाटली पाहिजे
काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षातला वाद पेटला आहे. काँग्रेस नेते आणि महाविकासआघाडीतील मंत्री सुनिल केदार यांनी पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्यावर उघडपणे टीका केली आहे. काँग्रेसमध्ये दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत बदल झाले पाहिजेत, अशी मागणी करणारं पत्र काँग्रेसच्या २३ नेत्यांनी लिहिल्याचं समोर आलं. या २३ नेत्यांमध्ये महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्या नावाचा समावेश असल्याचं वृत्त आहे, यानंतर सुनिल केदार यांनी या तिन्ही नेत्यांवर बोचरी टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
दाऊदला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा | रोहित पवारांची मोदींकडे मागणी
कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा, अशी विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करुन ही मागणी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील कृषी खाते झोपले की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे - राज्यमंत्री बच्चू कडू
राज्यातील शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या समस्यांच्या मुद्द्यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महाविकासआघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. राज्यातील कृषी खाते झोपले की काय अशी स्थिती निर्माण झाली झाल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले. ते शनिवारी चांदूर बाजार तालुक्यातील शेतीची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी कृषी खात्याला खडे बोल सुनावले.
5 वर्षांपूर्वी -
सामान वाहतूक आणि नागरिकांच्या प्रवासाला ई-पासची गरज नाही | केंद्राचे राज्यांना निर्देश
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये टप्प्याटप्प्याने शिथिलता आणली जात आहे. त्याचाच भाग म्हणून आता केंद्र सरकारने देशभरात कुठेही सामान आणि प्रवाशी वाहतुकीसाठी ई पासची गरज लागणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. याबाबतच केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना निर्देश जारी केले आहेत. तसेच या नियमावलीची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊसाचा अंदाज | मुंबईत ऑरेंज अलर्ट
मागील काही दिवसांपासून पावसानं मुंबईसह जवळच्या जिल्ह्यांमध्ये मुक्काम ठोकला असून, संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान, गणरायाच्या आगमनाचे वेध लागलेले असताना एक दिवस आधीच अर्थात शुक्रवारपासून मुंबईत पावसानं जोर धरला आहे. मुंबई जोरदार पाऊस सुरू असून, हवामान विभागानं २५ ऑगस्टपर्यंतचा अंदाज जाहीर केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
Ganeshotsav 2020: सुखकर्ता दु:खहर्ता..! लाडक्या बाप्पाचं घरोघरी मोठ्या उत्साहात आगमन
१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पाचं घरोघरी मोठ्या उत्साहात आगमन झालं आहे. अर्थातच शनिवारपासून गणेशोत्सवाच्या Ganeshotsav 2020 मंगलपर्वाची सुरुवात झाली आहे. यंदाच्या वर्षी परंपरागत गणेशोत्सवाचं चित्र काहीसं पालटलेलं आहे. अर्थातच याला कारण ठरत आहे ती म्हणजे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळं उदभवलेली आव्हानाची परिस्थिती.
5 वर्षांपूर्वी