महत्वाच्या बातम्या
-
शरद पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी कोरोनाचा शिरकाव, ४ कर्मचारी पॉझिटिव्ह
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीय. बारामतीतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज ही संख्या ४७३ झाली आहे. ५००च्या जवळपास पोहोचली आहे. पवारांच्या घरी काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे शेतात, बागेत काम करणारे कर्मचारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनकाळात अचानक पोटदुखीची तक्रार जाणवू लागली | जाणून घ्या कारणं
कोरोना व्हायरसच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी देशभरात गेल्या काही महिन्यांपासून लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. या कालावधीत नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मात्र शारीरीक हालचालींची कमतरता, बैठी जीवनशैली यामुळे नागरिकांना छातीत जळजळ, ओटी पोटात दुखणे, मळमळणे गिळण्यास अडचणी, पोट खराब होणे आदी लक्षणांसह असलेल्या गॅस्ट्रोएफॅगेअल रिफ्लक्स सारख्या म्हणजेच पोटदुखीच्या आजारात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. लॉकडाऊन कालावधीमध्ये या आजाराच्या रुग्णांमध्ये ७० टक्क्यांनी वाढ झाली असून हे रुग्ण २५ ते ५० वर्ष वयोगटातील आहेत, अशी माहिती अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल मुंबईचे लॅप्रोस्कोपिक जीआय सर्जन डॉ. इरबाज रियाझ मोमीन यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्याबाबतीत महाराष्ट्राने देशात दिशादर्शक काम केले आहे - आरोग्यमंत्री
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यात निर्माण झालेली परिस्थिती लवकरच नियंत्रणात येईल, असे वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. ते शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले की, सध्याच्या घडीला पुण्यात कोरोना रुग्णांसाठी बेडची अडचण नाही. परंतु, आम्ही ऑक्सिजन आणि आयसीयू बेडस वाढवण्यावर भर देत असल्याचे टोपे यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात गेल्या २४ तासात १४, ४९२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण | ३२६ रुग्णांचा मृत्यू
देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच आहे. मागील २४ तासांमध्ये राज्यात १४ हजार ४९२ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून ३२६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, १२ हजार २४३ जणांनी कोरोना वर मात केली आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या ६ लाख ४३ हजार २८९ वर पोहचली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुणे पीएमपीएमएल’ची सेवा ३ सप्टेंबर पासून सुरू होणार | महापौरांची माहिती
कोरोना विषाणूंची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता, मागील पाच महिन्यांपासून पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा म्हणजे पीएमपीएमएल बंद ठेवण्यात आली होती. आता पुणे शहरात पीएमपीएमएल ३ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज (गुरुवार) दिली.
5 वर्षांपूर्वी -
शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्या वेळी भाजपाला पाझर फुटला नाही | अनिल गोटे
सुशांत सिंह राजपूत याच्या हत्येची अथवा आत्महत्येच्या घटनेने भाजप नेत्यांना झोप येत नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वच भाजप नेते रात्रंदिवस सुशांत सिंहच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून अस्वस्थ झाले आहेत, अशी सहृदयता अनन्यसाधारण आहे. सुशांत सिंह बिहार राज्यातील निवासी आहे. त्यांच्या पालकांनी त्याला राज्यातील भाजप नेत्यांच्या विश्वासावरच मुंबईत पाठवले होते. आपल्या पालकत्वाच्या कर्तव्यात कसूर होता कामा नये यासाठी सुरू असलेली घालमेल अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शांत व्हायला हरकत नाही, अशी खोचक टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य पोलीस भरती | उर्दूत ट्विट | मलिक यांना रस फक्त अल्पसंख्यांच्या ट्रेनिंगमध्ये?
राज्यात पोलीस दलात दोन-चार हजार नव्हे तर १२ हजार ५३८ पदे भरण्यात येणार आहेत. सप्टेंबरपर्यंत ही पदे भरण्यात यावीत, असे आदेशच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले होते. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारच्या काळातील तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द
नांदेडमधील गुरुद्वारा प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सुप्रीम कोर्टाने दणका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम ठेवला आहे.
5 वर्षांपूर्वी -
बिहार निवडणुकीसाठी महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं उदात्त कार्य...
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले. याआधी मुंबई पोलीस हा तपास करत असताना भाजपकडून मुंबई पोलीस, महाराष्ट्र सरकार टीका सुरु होती. त्यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका करत खडेबोल सुनावले आहेत. महाराष्ट्र पोलिसांचं नाव देशात कमी करण्याचं ‘उदात्त’ कार्य केल्याबद्दल भाजपाच्या नेत्यांना ‘साष्टांग दंडवत’ असं म्हणत त्यांनी ‘अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही.’ अशा शब्दात टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात कोरोनाचे १३,१६५ नवे रुग्ण | ३४६ जणांचा मृत्यू
राज्यामध्ये एका दिवसात कोरोनाचे १३,१६५ रुग्ण वाढले आहेत, तर ३४६ जणांचा मृत्यू झाला आहे. आजच्या दिवसात कोरोनाचे ९,०११ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातला बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४,४६,८८१ एवढी झाली आहे. राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर ७१.०९ टक्के एवढा झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लालपरीच्या जिल्हाबाह्य वाहतुकीला राज्य सरकारची परवानगी
दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून मिशन बिगेन अगेन ६ अंतर्गत एक परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार राज्यातील बससेवा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यांतर्गत धावणारी बस आता जिल्ह्याच्या बाहेरही धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण इतर खासगी वाहनांना प्रवासासाठी ई-पास बंधनकारक असणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आयुषभर एका कुटुंबाने वाटेल त्याची वाट लावली, बदनामी केली | नियती कोणाला सोडत नाही
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला.
5 वर्षांपूर्वी -
या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज - फडणवीस
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यास सुप्रीम कोर्टाने सकारात्मक निकाल दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणावरुन विरोधकांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल हा न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवणारा आहे असं मत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत तपास प्रकरणी ठाकरे सरकारला धक्का | पार्थ म्हणाले सत्यमेव जयते!
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाने सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश मुंबई पोलिसांना दिला आहे. पाटणामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर आज सुप्रीम कोर्टाने निकाल दिला.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण | अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ | मुख्यमंत्र्यांचा निर्णय
मराठा आरक्षण मुद्द्यावरुन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना उपसमितीवरुन हटवण्याची मागणी विरोधकांकडून होतेय. दरम्यान अशोक चव्हाण नाराज असल्याच्या देखील चर्चा होत्या. पण याच पार्श्वभुमीवर त्यांच्या जबाबदारीत वाढ करण्यात आलीय. मराठा आरक्षणाबरोबर मराठा समाजातील इतर प्रश्न हाताळण्याची जबाबदारी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीकडे मिळाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात ११ हजार ११९ नव्या कोरोना रुग्णांची नोंद | ४२२ रुग्णांचा मृत्यू
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांनाच आज उच्चांकी ४२४ रुग्णांचा मृत्यू झालाय. आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. मंगळवारी राज्यात ११ हजार ११९ नवे रुग्ण आढळले. तर ९ हजार ३५६ रुग्णांना घरी सोडण्यात आलं. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही ६ लाख १५ हजार एवढी झाली आहे. तर राज्यात सध्या १ लाख ५६ हजार लोक उपचार घेत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
नागपूरात दोन मुलांसह पती-पत्नीची आत्महत्या
नागपूरात दोन मुलांसह पती-पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पती धीरज राणे,पत्नी सुषमा राणे 11 वर्षीय मुलगा ध्रुव आणि 5 वर्षाची मुलगी वण्या अशी मयतांची नावे आहे. पत्नीने गळफास घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुप्रीम कोर्टाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भातील निकाल ३० सप्टेंबरपर्यंत राखून ठेवला
महाराष्ट्रात अंतिम वर्ष विद्यार्थ्यांच्या परीक्षांवरून सुरू झालेला तिढा थेट असून संपला नाही आहे. विद्यापीठाला युजीसीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भातील निर्देशांविरोधात याचिकेवरील निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला. हा निकाल 30 सप्टेंबरपर्यंत राखून ठेवण्यात आला आहे. आगामी तीन दिवसात सर्व याचिकाकर्त्यांना आपले म्हणणे लेखी स्वरूपात सुप्रीम कोर्टात मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ईश्वर हा सर्वत्र आहे | त्यामुळे धार्मिक स्थळांबाबत थोडी सबुरी बाळगू - आरोग्यमंत्री
राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे धार्मिक स्थळं बंद आहेत. पण राज्य अनलॉकच्या टप्प्यात असताना मंदिरं का उघडण्यात आली नाही? असा सवाल थेट मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थितीत केला. त्यानंतर आता मशिदी पुन्हा उघडण्याच्या मागणीसाठी पालकमंत्री अस्लम शेख हे पुढे आहेत. मुंबईतील धार्मिक स्थळं पुन्हा सुरू करण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करीत असून लवकरच याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर अभ्यासू आणि कार्यश्रम डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती
पुण्याच्या जिल्हाधिकारी पदावर डॉ. राजेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात प्रतिनियुक्ती झाल्यावर पुण्याचे जिल्हाधिकारी पद रिक्त होते. त्यामुळे आता पुण्याच्या जिल्हाधिकारीपदाची जबाबदारी राजेश देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी