महत्वाच्या बातम्या
-
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एका युवा मंत्र्याचा दबाव - आ. अतुल भातखळकर
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शुक्रवारी एक व्हिडीओ ट्विट केला. त्यात त्यांनी म्हटलं की,”अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात राज्यातील एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत. CBI ने तात्काळ हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांना केली आहे. ”राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता पार्थ अजित पवार यांनीही अशीच मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास योग्य रितीनं करत नसल्याची शंका राज्यातील जनतेमध्ये निर्माण होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रुग्णांच्या मदतीला धावणाऱ्या अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस
यापूर्वी मोदींच्या कारभारावर हिटलरशाहीचा आरोप करणाऱ्या ठाकरेंचा कारभार सुद्धा त्याच हिटलरशाहीच्या दिशेने जाताना दिसत आहे. कारण कोरोना आपत्तीत सुद्धा प्रशासनातील उन्मत्त अधिकाऱ्यांच्या कामचुकारपणाकडे काणाडोळा करत सामान्य रुग्णांचे प्रश्न मांडणाऱ्या विरोधकांना तडीपारीची नोटीस पाठविण्याचं शौर्य ठाकरे सरकार दाखवत आहे असंच म्हणावं लागेल.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकारने २ महिने पगारच दिला नाही, उपासमारीला कंटाळून ST कर्मचाऱ्याची आत्महत्या
कोरोनाच्या काळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटीच्या साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली असल्याचे बातमी समोर आली होती. मात्र, यावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी खुलासा केला आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचं त्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
लिव्ह-इन रिलेशनशीपमधील महाविकास आघाडी सरकार ५ वर्षे टिकेल असं वाटत नाही - फडणवीस
“लॉकडाउन की, अनलॉक यामध्ये आता पडता येणार नाही. आता अनलॉकचं करावं लागेल. कोरोनाशी लढाई लढताना अर्थतंत्र पूर्वपदावर आणण्याचा विचार करावाच लागेल. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याच्या दृष्टीने योजना तयार केली पाहिजे. पण सरकारचा तसा विचार दिसत नाही”अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे सरकारवर टीक केली. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
धाडसी निर्णय घेतले पाहिजेत, पण सरकारची तशी तयारी दिसत नाही - देवेंद्र फडणवीस
“लॉकडाउन की, अनलॉक यामध्ये आता पडता येणार नाही. आता अनलॉकचं करावं लागेल. कोरोनाशी लढाई लढताना अर्थतंत्र पूर्वपदावर आणण्याचा विचार करावाच लागेल. अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्याच्या दृष्टीने योजना तयार केली पाहिजे. पण सरकारचा तसा विचार दिसत नाही”अशा शब्दात राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ठाकरे सरकारवर टीक केली. एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज ११ हजार १४७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर २६६ रुग्णांचा मृत्यू
१ ऑगस्टपासून राज्यात पुनःश्च हरिओमची घोषणा केली असतानाच आज महाराष्ट्रातून धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार एकाच दिवसात ११,१४७ एवढ्या उच्चांकी कोरोनारुग्णांचं निदान झालं. गेले काही दिवस दहा हजारांच्या आसपास नव्या कोरोनारुग्ण सापडत आहेत. त्यात सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यातून आहे. पुण्यात गेल्या २४ तासांत ५२ रुग्णांचा मृत्यू नोंदवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौऱ्यावर असतानाच ही भीषण आकडेवारी आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यात अडथळे, मुस्लिम धर्मियांचा आंदोलनाचा इशारा
मुस्लिम धर्मियांकडून बकरी ईद हा सण १ ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. या निमित्ताने बकऱ्यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. मात्र, करोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदा बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. याच वेळी महापालिकांनी काही नियमावली जाहीर केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनामुळं राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर - मुख्यमंत्री
कोरोनामुळे देशाच्या अर्थकारणावर विपरित परिणाम झाला आहे. राज्यावर देखील याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील सर्वच महापालिकांची आर्थिक स्थिती गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार केंद्राकडे निधीची मागणी करीत आहे. तसेच राज्य सरकारमार्फत जेवढी शक्य आहे तेवढी मदत आम्ही देत आहोत, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील बैठकीत शहरातील लोकप्रतिनिधींना दिले.
5 वर्षांपूर्वी -
खुल्या प्रवर्गातील १० टक्के आरक्षण मराठा समाजाला लागू नाही, राज्य शासनाचे आदेश
राज्यातील शासकीय नोकर्या आणि शिक्षणात खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी लागू झालेले दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला घेता येणार नाही, असा आदेश राज्य सरकारकडून जारी करण्यात आला आहे. मात्र, केंद्र शासनाच्या सेवांमधील प्रवेशासाठी मात्र मराठा समाजाला आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा लाभ घेता येईल. याचा अर्थ बहुसंख्येने असलेल्या मराठा समाजाबरोबरच उर्वरीत खुल्या प्रवर्गातील महाराष्ट्रातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या मंडळींनाही स्वतंत्र आरक्षणाचा लाभ होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात कोविड केअर सेंटर उभारण्यासाठी लवासा ताब्यात घ्या - खा. गिरीश बापट
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना प्रादुर्भावाचे मुख्य केंद्र असलेल्या पुणेकरांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे जिल्ह्यात बुधवारी प्रथमच कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक भरली. काल पुणे जिल्ह्यातील कोरोनावर यशस्वीपणे मात केलेल्या एकूण ३,३७६ रुग्णांना घरी सोडण्यात आले. पुण्यात एकाच दिवसात इतक्या मोठ्याप्रमाणावर कोरोना रुग्ण बरे होण्याची ही पहिलीच घटना आहे. पुण्याच्यादृष्टीने ही अत्यंत दिलासादायक बाब मानली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
९० टक्के मिळवून देखील पसंतीच्या कॉलेजसहित अकरावी प्रवेशात अडचणी - सविस्तर वृत्त
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी एसएससी बोर्डाच्या परीक्षांचा निकाल उशिरानं जाहीर करण्यात आला. दरम्यान राज्याचा निकाल ९५.३० टक्के लागल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. “करोनाच्या प्रादुर्भावामुळे निकालाला उशिर झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि इतर सर्वांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं. सर्वांनी लॉकडाउनच्या काळात अहोरात्र मेहनत केली म्हणून आज निकाल आम्हाला सादर करता येत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
किमान मला एकट्याला तरी महाविकास आघाडीत घ्या म्हणत तेच शिवसेनेत प्रवेश करतील
काल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी, शिवसेनेला पुन्हा मैत्रीची हाक देत, “राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही”, असे वक्तव्य केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळीचे वातावरण निर्माण झाले होते.
5 वर्षांपूर्वी -
दहावीचा निकाल जाहीर, राज्यात एकूण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, औरंगाबाद, अमरावती, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, नाशिक व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा (SSC Result 2020) निकाल जाहीर झाला आहे. साधारण राज्यातील 17 लाख विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते.
5 वर्षांपूर्वी -
मागील २४ तासात ७ हजार ७१७ कोरोना रुग्णांची नोंद, तर २८२ रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात १० हजार ३३३ रुग्णांना मागील २४ तासांमध्ये डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत २ लाख ३२ हजार २७७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या १ लाख ४४ हजार ६९४ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर मागील २४ तासांमध्ये ७ हजार ७१७ रुग्णांना करोनाची बाधा झाली आहे. महाराष्ट्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा आता ५९.३४ टक्के इतका झाला आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये २८२ करोना रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यू दर ३.६२ टक्के झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राम मंदिराच्या ई-भूमिपूजनाबाबत MIM आणि मुख्यमंत्र्यांचं मत एकसारखंच - फडणवीस
सोलापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपुजनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला होता. काही लोकांना असं वाटतंय की, राम मंदिर बांधून देशातून कोरोना दूर होईल, अशा शब्दात पवारांनी नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता निशाणा साधला होता.
5 वर्षांपूर्वी -
पण मुख्यमंत्र्यांनी थोडं फिरलंही पाहिजे, शरद पवारांचा सूर बदलला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीनंतर भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवर बसून सर्व कारभार हाताळणे, कसे गरजेचे आहे, हे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. सध्या राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसरे राज्यभर फिरत आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाने परिस्थिती गंभीर असल्याने राम मंदिराच्या भूमिपूजनाला निमंत्रण आलं तरी जाणार नाही
अयोध्येतील प्रभू राम मंदिराच्या भूमीपूजनावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत भिन्न मते आहेत, राम मंदिराच्या भूमिपूजनाबाबत शरद पवारांनी विधान केले होते. कोरोनाविरुद्ध कसं लढता येईल, यावर आम्ही विचार करतोय. पण, काही लोकांना वाटतंय की मंदिर उभारल्यानं कोरोना जाईल. त्यामागे काही कारण असू शकतं. मात्र, सध्या कोरोनावर लक्ष द्यायला हवं असं शरद पवार म्हणाले होते, या विधानावरुन अनेक वादंग झाला होता.
5 वर्षांपूर्वी -
होय, महाविकास आघाडीतील काही नेते अस्वस्थ आहेत, पवारांच्या विधानाने खळबळ
शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास राज्याच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार आहे, पण निवडणुका वेगळ्या लढू अशी भूमिका भाजपकडून जाहीर करण्यात आली, मात्र या विधानानंतर आता राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापणार असल्याचं चिन्हं दिसत आहेत. सरकार महाविकास आघाडीचं असलं तरी स्टेअरिंग माझ्या हातात आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत म्हटलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजितदादांनी स्टेअरिंग पकडलेला फोटो पोस्ट करत उद्धव ठाकरे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. दरम्यान, आता खुद्ध राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘महाविकास आघाडी सरकारचा रिमोट माझ्याकडे नाही, काही नेते अस्वस्थ आहे’ असं म्हणून गुगली टाकली आहे. तसंच, उद्धव ठाकरे यांच्या कारभारावरही नाराजी व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
...तर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना बाहेर पडू देणार नाही
उद्धव ठाकरे हे मराठा समाजाचा राजकारणासाठी वापर करताय. काही मराठा समाजातील लोक दलाली करताय त्यांचाही लवकर बंदोबस्त करू’ असे नानासाहेब जावळे पाटील यांनी म्हटले. पुण्यात मराठा आरक्षण संदर्भात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आंदोलनतील ४२ आत्महत्याग्रस्त कुटुंबांचा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी त्वरित मार्गी लावावा अन्यथा वर्षा बंगल्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. ९ ऑगस्ट पर्यंत आमचा निर्णय घेतला नाही तर सत्तेतील एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरू देणार नसल्याचेही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
ती मुलाखत बघून शिवसैनिकांनी दारे-खिडक्या बंद करून डोकी भिंतीवर आपटली असतील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीनंतर भाजपच्या गोटातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात न जाता मातोश्रीवर बसून सर्व कारभार हाताळणे, कसे गरजेचे आहे, हे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना चिमटा काढला. सध्या राज्यात दोन मुख्यमंत्री आहेत. एक मातोश्रीवर बसून काम करत आहेत आणि दुसरे राज्यभर फिरत आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. ते रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
5 वर्षांपूर्वी