महत्वाच्या बातम्या
-
पवारांच्या राम जन्मभूमी उद्घाटनासंदर्भातील वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आंदोलन
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशात सध्या राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला होता.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सरकार विरोधात मराठा क्रांती मोर्चाकडून 'आत्मबलिदान' आंदोलनाची घोषणा
मराठा क्रांती मोर्चातर्फे आता ‘आत्मबलिदान’ आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. कायगाव टोका येथे उद्या (23 जुलै) आंदोलन करण्यावर मराठा कार्यकर्ते ठाम असल्याची माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक रमेश केरे पाटील यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
नालासोपारा स्थानकात ट्रॅकवर उतरून प्रवाशांचा हंगामा, लोकलमधून प्रवासाची मागणी
आम्हाला लोकलमधून प्रवास करू द्या’, अशी मागणी करत आज नालासोपारा रेल्वे स्थानकात सर्वसामान्य प्रवाशांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी प्रवाशांचा संताप अनावर झाल्याचे दिसून आले. प्रवाशांनी ट्रॅकवर उतरून मोठा हंगामा केला होता. दरम्यान, या गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर: PPE किट घालून तुकाराम मुंडेंनी थेट कोरोना रुग्णांशी संवाद साधला
कोरोना महामारीवरील उपाययोजना ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असून ती लोकांना विश्वासात घेऊनच करावी लागणार आहे. टाळेबंदी हा त्यावर पर्याय असू शकत नाही. जिल्ह्य़ात आता टाळेबंदी लावल्यास शेतीच्या हंगामावर परिणाम होऊ शकतो, असे नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले. रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेने तसे संकेतही दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
व्यक्ती एकंच, सरकारी लॅबच्या कोविड रिपोर्टमध्ये पॉझिटिव्ह, खाजगी लॅबचा रिपोर्ट निगेटिव्ह
मुंबई महानगर क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णसंख्येत कल्याण-डोंबिवली महापालिका दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली असून, गेल्या काही दिवसांपासून येथे दररोज ४५० ते ५५० बाधित आढळून येत आहेत. शहरातील एकूण रुग्णांचा आकडा १७ हजारांच्या पुढे गेल्याने गेल्या १७ दिवसांपासून शहरात लागू असलेली टाळेबंदी फसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यभर दूध दरवाढीवरुन आंदोलक रस्त्यावर, हजारो लिटर दूध रस्त्यांवर ओतले
राज्यात दूध दरवाढीवरुन आंदोलन थेट रस्त्यावर आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील नांदनी इथे कालभैरवनाथ मूर्तीला दुधाचा अभिषेक घालून दूध आंदोलन सुरु करण्यात आले. तर दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने अहमदनगर जिल्ह्यातील अकोलमधील नवलेवाडी येथे दगडाला दुधाचा अभिषेक करुन सरकारचा निषेध करण्यात आला. तर सांगलीत महामार्गावर दूध ओतून सकाळी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
एक शरद सर्व गारद मुलाखतीनंतर उद्धव ठाकरे यांची 'दिल की बात'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिलकी बात राजकारण ढवळून काढेल. कोरोनापासून राम मंदिरापर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दणक्यात बोलले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घणाघाती मुलाखत सामनासाठी घेतली आहे. सगळ्याच प्रश्नांना दिलखुलास उत्तरं मिळाली आहे. ही मुलाखत २५ आणि २६ जुलै अशी दोन भागांमध्ये पाहता येणार आहे अशी फेसबुक पोस्ट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज ८२४० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ
राज्यात आज ८२४० कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता ३१८६९५ अशी झाली आहे. आज नवीन ५४६० कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १७५०२९ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १३१३३४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती - अनिल परब
कोरोनाच्या काळात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर एसटीच्या साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा आली असल्याचे बातमी समोर आली होती. मात्र, यावर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी खुलासा केला आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याचं त्यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
पवारांकडून हिंदुंच्या श्रद्धेचा अपमान, हिंदुत्ववादी ठाकरे गप्प का? - विनायक मेटे
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशात सध्या राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला होता.
5 वर्षांपूर्वी -
कल्याण डोंबिवलीत महाराष्ट्र सैनिकांकडून घरोघरी जाऊन स्क्रिनिंग आणि ऑक्सिजन लेवल तपासणी
मुंबई महानगर क्षेत्रामध्ये कोरोना रुग्णसंख्येत कल्याण-डोंबिवली महापालिका दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली असून, गेल्या काही दिवसांपासून येथे दररोज ४५० ते ५५० बाधित आढळून येत आहेत. शहरातील एकूण रुग्णांचा आकडा १७ हजारांच्या पुढे गेल्याने गेल्या १७ दिवसांपासून शहरात लागू असलेली टाळेबंदी फसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पिंपरीत तीन सख्या भावांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू
पुण्यात १४ जूनपासून सतत लॉकडाऊन सुरू आहे. सर्वात कडक लॉकडाऊन लागू करूनही पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होण्याची चिन्हे नाहीत. उलट लॉकडाऊनच्याच काळात कोरोनाग्रस्तांची संख्या बेसुमार वाढत आहे. पुण्यात काल दिवसभरात २,४५९ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल ६१ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. कालची रुग्ण संख्या आणि मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ही आतापर्यंतची सर्वाधिक मोठी संख्या आहे. पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ही ५०,००० पेक्षा जास्त झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात
महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून दुधाचे भाव १६ ते १८ रुपयांपर्यंत घसरले आहेत. या पार्श्वभूमीवर दूध दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. यात अनेक शेतकरी संघटना आणि पक्षांनी सहभाग नोंदवला आहे. आंदोलनकर्त्यांनी दुधाला प्रतिलिटर 30 रुपये दर देण्याची मागणी केली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी दगडाला दुधाचा अभिषेक घालून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला.
5 वर्षांपूर्वी -
बापरे! आज ९५१८ नवे कोरोना रुग्ण, २५८ रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज ३९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६२ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ६९ हजार ५६९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९५१८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २८ हजार ७३० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस नागपूरला गेले तरी सुनील केदार, यशोमती ठाकूर यांना भेटायला गेल्याच सांगतील
महाविकास आघाडीतील पक्षांना सध्या सरकार पडण्याची भीती वाटत आहे. या भीतीने सध्या त्यांना झोप लागत नाही. त्यासाठी सरकारमधील घटकांनी झोपेच्या गोळ्या घ्याव्यात, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला लगावला. तसेच तुम्ही सरकार चालवा, आम्ही ते पाडण्यासाठी प्रयत्न करणार नाही, असेही पाटील यांनी म्हटले. ते रविवारी कोल्हापूर येथील पत्रकारपरिषदेत बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, मग उद्धव ठाकरे पंढरपुरला तरी कशाला गेले? - दरेकर
अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशात सध्या राम मंदिर बांधून कोरोना जाणार आहे का, असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित केला. शरद पवार हे आज सोलापूर दौऱ्यावर होते.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र पोलिस दलात २४ तासांत १३३ जणांना कोरोना, दोघांचा मृत्यू
महाराष्ट्रात शनिवारी ८ हजार ३४८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर १४४ कोरोनाबळींचा नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख ९३७ इतकी झाली असून आतापर्यंत ११ हजार ५९६ जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. दरम्यान, राज्यात काल ५ हजार ३०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत राज्यात १ लाख ६५ हजार ६६३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जुन्ररमधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दिनेश दुबे यांचं कोरोनामुळे निधन
पुण्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाबाधितांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्याचसोबत पुण्यात अनेक लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जुन्नरमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक दिनेश दुबे (58) यांनाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचे खाजगी रुग्णालयात निधन झाले. दिनेश दुबे यांच्या निधनाने जुन्नर शहर व परिसरात मोठी शोककळा पसरली आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात तब्बल ८३४८ नव्या रुग्णांची भर, तर १४४ रुग्णांचा मृत्यू
आज राज्यात तब्बल ८३४८ नव्या रुग्णांची भर पडली. तर १४४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ३,००,९३७’वर गेली आहे. तर एकूण मृत्यू ११५९६ एवढे झाले आहेत. तर मुंबईत आज ११८६ नवे रुग्ण आढळले तर ६५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतल्या रुग्णांची संख्या १,००,३५० एवढी झाली. तर आत्तापर्यंत ५६५० जणांचा मृत्यू झाला.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आजपर्यंत एकूण १० हजारांहून अधिक बालकांना कोरोनाचा संसर्ग
कोरोना व्हायरसची दहशत राज्यात कायम आहे. कोरोनारुग्णांच्या संख्येने राज्यात ३ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. एकट्या मुंबईतच १ लाखांवर रुग्ण आतापर्यंत सापडले आहेत. कोरोनाचा मृत्यूदर दिवसेंदिवस खाली येत असला, तरी या रोगाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे धोका कायम आहे.
5 वर्षांपूर्वी