महत्वाच्या बातम्या
-
चिंताजनक! राज्यात आज ८६४१ कोरोना रुग्णांची नोंद
राज्यात आज नव्या ८ हजार ६४१ नव्या रुग्णांची वाढ झाली असून २६६ मृतांची नोंद झाली आहे. त्यामुळे २ लाख ८४ हजार २८१ एकूण रुग्णांची संख्या झाली आहे. गेल्या चोवीस तासांत २६६ रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाल्याने राज्यात ३.९४ टक्के मृत्यूदर असल्याचं सांगण्यात येतय. तर आज ५५२७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ५८ हजार १४० वर पोहोचली आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्रात १ लाख १४ हजार ६४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
5 वर्षांपूर्वी -
बारावी निकाल: रिचेकिंग करायचं आहे? उत्तरपत्रिकेची प्रत हवी? - ही आहे प्रक्रिया
बारावीचा (HSC Result) निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. यंदा निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९३.८८ टक्के असून मुलांचा निकाल ८८.०४ टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. गेल्या वर्षी १२ वी चा निकाल ८५.८८ % लागला होता.
5 वर्षांपूर्वी -
बारावीच्या निकालात कोकण अव्वल, एकूण निकालात मुलींची यंदाही बाजी
बारावीचा (HSC Result) निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल ९०.६६ टक्के लागला आहे. यंदा निकाल ४.७८ टक्क्यांनी वाढला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९३.८८ टक्के असून मुलांचा निकाल ८८.०४ टक्के आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे. गेल्या वर्षी १२ वी चा निकाल ८५.८८ % लागला होता.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीत महाजॉब्स योजनेवरून पुन्हा ठिणगी...काँग्रेसकडून प्रश्न
महाविकासआघाडीत पुन्हा एकदा काँग्रेसने नाराज आहे. काँग्रेसला सरकारमध्ये महत्त्व नाही हे पुन्हा पुन्हा काँग्रेसकडून अधोरेखित केलं जातं आहे. काही दिवसांपूर्वीच महाजॉब्स ही योजना सुरु झाली. पण या योजनेच्या जाहिरातीत मुख्यमंत्री आणि संबंधित खात्याच्या मंत्र्यांचे फोटो आहेत. खात्याचे कॅबिनेटमंत्री आणि राज्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आहेत. यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो आहेत. पण काँग्रेसच्या नेत्याचा फोटो नाही. यावरुन काँग्रेसला सरकारमध्ये महत्त्व नाही हे पुन्हा पुन्हा काँग्रेसकडून अधोरेखित केलं जातं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाणे पालिका: मनसेचे संदीप पाचंगे यांच्या पाठपुराव्याने रुग्णांना PPE किट निम्या दरात
ठाणे जिल्ह्यात मंगळवारी करोनाचे १ हजार ५०३ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकुण संख्या ५८ हजार ५०७ इतकी झाली आहे. तर, मंगळवारी दिवसभरात जिल्ह्यात ३५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची एकुण संख्या १ हजार ६८९ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात व्हेंटिलेटर अभावी निवृत्त शास्त्रज्ञाचा COVID-19ने मृत्यू
पुण्यात कोरोना रुग्णांची सतत वाढ होत आहे. त्यामुळे आरोग्यव्यवस्था डळमळीत झाली आहे. याचाच फटका आज पुण्यातील एका शास्त्रज्ञाला बसला असून व्हेंटिलेटरअभावी त्यांचा मृत्यू झाला आहे. डॉ.पी.लक्ष्मी नरसिंहन (६१) असे त्यांचे नाव आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज ७ हजार ९७५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद
राज्यातील करोनाचं थैमान अजूनही थांबलेलं नाही. मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रसार वाढत असल्याचं दिसून येत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील करोना बाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर केली. राज्यात आज ७ हजार ९७५ बाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णसंख्या २ लाख ७५ हजार ६४० इतकी झाली आहे. आज नवीन ३ हजार ६०६ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ११वी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
CBSE बोर्डानं आज बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर आता आज दहावीचेही निकाल जाहीर केले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर CBSE बोर्डानं आज अखेर निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी आपले निकाल CBSEच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in वर पाहू शकतात.
5 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षणावर २७ जुलैपासून नियमित सुनावणी - सर्वोच्च न्यायालय
अनेक महिन्यांपासून कोर्टात रखडलेल्या मराठा आरक्षणाचा अंतिम निर्णयावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाबाबत आतापर्यंत 3 ते 4 वेळा अंतरिम निर्णयावर दिलासा देण्यात आला आहे, त्यात अजून किती बदल करायचा, अशी विचारणा कोर्टाने केली आहे. त्यामुळे 27 जुलैपासून दररोज सुनावणी घेण्याचा कोर्टाने निर्णय दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
धारावी पॅटर्न राबवा ही सूचना आ. राजू पाटील यांनी १० एप्रिलला दिली होती, सरकारला जुलैमध्ये जाग
कोरोनाला रोखण्यात यशस्वी ठरलेल्या धारावीची दस्तुरखुद्द जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेऊन शाबासकी दिल्यानंतर आता धारावीचा हा पॅटर्न कल्याण-डोंबिवली महापालिकाही राबवणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनीच ही माहिती दिली आहे. धारावी पॅटर्नने हाताबाहेर गेलेला कोरोना महापालिका रोखणार आहे. त्यासाठी कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भागात घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाची तपासणी केली जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ७४१ नव्या कोरोना रूग्णांची नोंद
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून राज्यात गेल्या २४ तासांत ६ हजार ७४१ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात २३१ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. यामुळे राज्यात आतापर्यंत एकूण २ लाख ६७ हजार ६६५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच आज दिवसभरात ४ हजार ५०० कोरोना रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आजपर्यंत एकूण १ लाख ४९ हजार ७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
वसई-विरार महापालिका आयुक्तांवर अविनाश जाधव का संतापले? सविस्तर वृत्त
वसई विरार महापालिकेला तीन महिन्यांनी पूर्ण वेळ आयुक्त मिळाले होते. धुळ्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी असलेल्या डी. गंगाथरन यांची एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला वसई-विरार महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली हप्ते. मार्च महिन्यात धुळे जिल्ह्यातील निवडणुकीमुळे गंगाथरन यांच्या नियुक्तीला स्थगिती मिळाली होती.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात आमदार फुटणार नाही, फुटलाच तर ३ पक्षांच्याविरुद्ध निवडूनच येणार नाही - जयंत पाटील
राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही पायलट यांना हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी गोविंद सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अखेर सरकारला जाग, गुणपत्रिकेवर प्रमोटेड कोविड-१९ चा शिक्का नसेल याची हमी
कोविड-१९मुळे ज्यांच्या परीक्षा घेतलेल्या नाहीत अशांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का मारण्याचा अजब प्रकार कृषी विद्यापाठांत दिसून आला. यानंतर विद्यार्थी आणि पालक यांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, राज्य सरकारकडून असे काहीही आदेश देण्यात आलेले नाहीत. याबाबत चौकशी करुन कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
पडळकर पुन्हा वादात, गोपाळ गणेश आगरकर जयंतीनिमित्ताने चक्क लोकमान्य टिळकांचा फोटो
काही दिवसांपूर्वीच गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर एकच वाद उफाळून आला होता. त्यानंतर सत्ताधाऱ्यांसहित भाजप नेत्यांनी सुद्धा पडळकरांना सुनावले होते.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना ग्रॅज्युएट शिक्काबाबतची आशिष शेलार यांची भीती अखेर खरी ठरली, कृषी विद्यापीठाकडून सुरुवात
कोरोना ग्रॅज्युएट आम्हाला ‘कोरोना ग्रॅज्युएट’ तर संबोधले जाणार नाही ना? अशी शंका विद्यार्थ्यांच्या मनात असल्याच्या भावना भाजपचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पत्राद्वारे कळवल्या होत्या. “कोरोना ग्रॅज्युएट अशा नव्या बिरुदावलीने तर आम्हाला ओळखले जाणार नाही ना? एटीकेटी असलेल्या 40% विद्यार्थ्यांना नापास करणार का?” अशा भावना विद्यार्थ्यांच्या मनात असल्याचं शेलार म्हणाले होते.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात दिवसभरात ६४९७ नवे कोरोना रुग्ण, १९३ रुग्णांचा मृत्यू
राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज राज्यात दिवसभरात 6497 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील आतापर्यंतचा कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 60 हजार 924 इतका झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ALERT - प्लाझ्मा थेरेपीसंदर्भात सामान्यांची फसवणूक, गृहमंत्र्यांनी दिला इशारा
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी प्लाझ्मा थेरपी उपयुक्त ठरत आहे, परंतु या संदर्भातही फसवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यापासून सावध रहावे, असे आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी सवलतीच्या दरात बस उपलब्ध करा - आ. राजू पाटील
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चारकमान्यांना कोकणात जाण्यासाठी वाहतूक सुविधा अद्यापही उपलब्ध नाही. चाकरमन्यांनी कोकणात कसं जावं हा प्रश्न उभा ठाकला आहे. तसेच, गणेशोत्सवात कोकणबंदी होण्याची भितीही व्यक्त करण्यात येतेय. त्यामुळे या मुद्द्यावरूनही राजकारणही तापलं आहे. या प्रश्नात आता मनसेने उडी घेतली असून गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी सरकारनं सवलतीच्या दरात बस उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा १० दिवसांचा लॉकडाउन
कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता या विषाणूच्या वाढच्या संसर्गावर आळा घालण्यासाठी म्हणून रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा ल़ॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात १५ जुलैच्या मध्यरात्रीपासून २४ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम राहणार आहे.
5 वर्षांपूर्वी