महत्वाच्या बातम्या
-
यूजीसीविरोधात विद्यार्थ्यांचं ई-मेल आंदोलन, तर परीक्षा न घेण्याचा निर्णयावर राज्य सरकार ठाम
महाराष्ट्रात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. त्यामुळे राज्यात विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा न घेण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. पण, यूजीसीने अंतिम वर्षाची सप्टेंबरमध्ये परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. बीडमध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांनी समोर येऊन उघडपणे यूजीसीच्या निर्णयाविरोधात अनोखे आंदोलन केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
एकत्र लढूनही तुमच्या ९८ जागा आल्या आणि भाजपच्या एकट्याच्याच १०५ - चंद्रकांत पाटील
संजय राऊत यांनी घेतलेल्या शरद पवारांच्या मुलाखतीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी या मुलाखतीवर टीका केली असून महाविकासआघाडीला आव्हान देखील दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
RSS'मुळे धारावी कोरोनामुक्त मग नागपुरात संघाचं मुख्यालय तरी कोरोनाचा कहर कसा? - राजू शेट्टी
धारावीतील कोरोनामुक्तीचे श्रेय आरएसएसला देण्यात येत असल्याने राजू शेट्टी यांनी महत्त्वाचा सवाल उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, जर संघाने धारावी कोरोनामुक्त केली असा दावा केला जात असेल, तर संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा? तिथला कोरोना अटोक्यात का नाही.’ ते कोल्हापुरात बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज ७८२७ नव्या रुग्णांची नोंद तर ३३४० रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. चिंतेची बाब म्हणजे राज्यात आज ऍक्टिव्ह रुग्णांच्या संख्येने १ लाखांचा ट्प्पा पार केला. आज नवे ७८२७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्याची एकूण संख्या २५४४२७ एवढी झाली आहे. तर ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १ लाख ३ हजार ५१६ एवढी झाली आहे. आज ३३४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण मृत्यूची संख्या १०२८९ एवढी झाली आहे. मुंबईत १२४३ नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे मुंबईतल्या एकूण रुग्णांची संख्या ९२९८८ एवढी झालीय. तर ४४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या ५२८८ एवढी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
एका मुलाखतीनंतर खळबळ उडणार होती...झाली का मुलाखत ती? निलेश राणे
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी घेतलेली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत मालिका प्रसारित झाल्या. मात्र त्याआधी संजय राऊत यांनी या बहुचर्चित मुलाखतीचा दुसरा प्रोमो शेअर केले होते. यामध्ये संजय राऊतांचे रोखठोक प्रश्न आणि शरद पवारांची दिलखुलास उत्तरे पाहायला मिळणार असल्याचं म्हटलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली, विक्रम कुमार नवे आयुक्त
महाविकासआघाडी सरकारकडून शनिवारी राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या IAS बदल्या करण्यात आल्या. यामध्ये पुणे महानगरपालिकेचे विद्यमान आयुक्त शेखर गायकवाड यांचा समावेश आहे. पुण्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशामुळे शेखर गायकवाड यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. तर पीएमआरडीएच्या विक्रम कुमार यांच्याकडे आता पुण्याचा कारभार सोपवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात कोरोनाचे तब्बल ८,१६९ रुग्ण वाढले, तर २२३ रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात आजही कोरोनाच्या रुग्णांमध्ये सर्वाधिक वाढ पाहायला मिळाली आहे. एका दिवसात कोरोनाचे तब्बल ८,१६९ रुग्ण वाढले आहेत, तर २२३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यामध्ये कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा २,४६,६०० एवढा आहे. यातले ९९,२०२ रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत, तर १,३६९८५ जणांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ५५.५५ टक्के एवढं झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
३ टक्के प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांसाठी ९७ टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? - गिरीश बापट
पुण्यातील वाढती करोनाबाधितांची संख्या पाहून शहरात आणि पिंपरीमध्ये सोमवारपासून कडक लॉकडाउन घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या या निर्णयाला मात्र भाजपा खासदार गिरीश बापट यांच्याकडून विरोध दर्शवण्यात आला आहे. “मास्क लावला नाही, शारीरिक अंतर पाळले नाही तर कडक कारवाई करा; पण ३ टक्के प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांसाठी ९७ टक्के पुणेकरांना वेठीस का धरता? आम्ही सहकार्य करू, पण लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या असं म्हणत बापट यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजप आणि व्यापारी महासंघाचा पुण्यातील लॉकडाउनला तीव्र विरोध
पिंपरी-चिंचडवड आणि पुणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलावर होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्याबाबत काय करता येईल, याबाबत पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले. यानंतर प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला. आता पुण्यामध्ये घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनला येथील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांची विचारधारा, कामाची पद्धत भाजपच्या विचाराशी सुसंगत नव्हती - शरद पवार
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तसेच, अनेक अफवांवरही स्पष्टीकरण दिलं आहे. त्यापैकी म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या मतभेदाबद्दल शरद पवारांनी रोखठोख भूमिका मांडली.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या १०५ आकड्यातुन शिवसेना वजा केली तर त्यांचे ४०-५० आमदार असते - शरद पवार
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत घेतली. या मुलाखतीत शरद पवारांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तसेच, अनेक अफवांवरही स्पष्टीकरण दिलं आहे. त्यापैकी म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या मतभेदाबद्दल शरद पवारांनी रोखठोख भूमिका मांडली.
5 वर्षांपूर्वी -
चाकरमानी कोकणात ज्या ठिकाणावरून येणार, त्याच ठिकाणी स्वस्त दरात कोविड चाचणी करावी
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. कोरोना संसर्गामुळे या चाकरमान्यांपुढे यंदा मोठे विघ्न आले आहे. गणपतीला गावी जायला मिळणार की नाही, असा प्रश्न सर्वांच्याच मनात होता. त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीत उत्तर काल मिळालं.
5 वर्षांपूर्वी -
२४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे तब्बल ७८६२ रुग्ण
महाराष्ट्रामध्ये मागच्या २४ तासात कोरोना रुग्णांच्या संख्येत सगळ्यात मोठी वाढ पाहायला मिळाली. मागच्या २४ तासांमध्ये राज्यात कोरोनाचे तब्बल ७८६२ रुग्ण वाढले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या २,३८,४६१ एवढी झाली आहे. कोरोनाच्या या एकूण रुग्णांपैकी ९५,६४७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, तर १,३२,६२५ जणांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज दिवसभरात ५,३६६ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्यामुळे घरी सोडण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्यासह कुटुंबातील ७ जणांना कोरोनाची लागण
राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. भिवंडी लोकसभेचे भाजप खासदार कपिल पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. कपिल पाटील यांना सौम्य लक्षणं असल्याने त्यांना घरातच क्वारंटाईन करण्यात आलं आहे. दरम्यान त्यांच्या कुटुंबातील तब्बल ७ सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाचा फैलाव थांबेना, ठाण्यातही लॉकडाऊन वाढवला
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ३० हजार ५९९वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. काल दिवसभरात राज्यात तब्बल ६ हजार ८७५ नव्या कोरोबाधितांची नोंद झाली, तर २१९ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या ९ हजार ६६७ इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांना बंदी घातल्यास आंदोलन करु - खा. नारायण राणे
गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. कोरोना संसर्गामुळे या चाकरमान्यांपुढे यंदा मोठे विघ्न आले आहे. गणपतीला गावी जायला मिळणार की नाही, असा प्रश्न सर्वांच्याच मनात आहे. त्यावर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीत उत्तर मिळाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
परिस्थिती चिंताजनक झाल्याने संपूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन घोषित
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ३० हजार ५९९वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. काल दिवसभरात राज्यात तब्बल ६ हजार ८७५ नव्या कोरोबाधितांची नोंद झाली, तर २१९ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या ९ हजार ६६७ इतकी झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अभिमान आहे मी राज ठाकरे यांचा नगरसेवक आहे, आम्ही कोणाच्या पाया पडत नाही - वसंत मोरे
पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. ४ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पाचही नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. याआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत २० मिनिटं चर्चा केली होती.
5 वर्षांपूर्वी -
माजी आमदार विजय औटी यांची शिवसेनेतून हकालपट्टी करा, उद्धव ठाकरेंना पत्र
पारनेर नगरपंचायतीमधील शिवसेनेच्या पाचही नगरसेवकांची घरवापसी झाली आहे. ४ जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पाचही नगरसेवक शिवसेनेत परतले आहेत. पाचही नगरसेवकांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. याआधी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासह या पाचही नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत 20 मिनिटं चर्चा केली होती.
5 वर्षांपूर्वी -
निगेटीव्ह रुग्णावर कोरोनाचे उपचार, ३ लाख फक्त महागड्या इंजेक्शनवर खर्च
कोरोनाचे धोका दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये ६ हजार ८७५ कोरोना रुग्ण समोर आले आहेत. तर २१९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात एकूण रुग्णांची संख्या २ लाख ३० हजार ५९९ वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यात रुग्ण बरं होण्याचं प्रमाण ५५ टक्के आहे. राज्यात करोना मृत्यु प्रमाण ४.१९ टक्के आहे तर एकूण केलेल्या चाचण्यात पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या १८.८६ टक्के इतकी आहे.
5 वर्षांपूर्वी