महत्वाच्या बातम्या
-
अभिनेत्री प्रिया बेर्डे आज सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
चित्रपट निर्मात्या अभिनेत्री आणि दिग्दर्शक प्रिया लक्ष्मीकांत बेर्डे या 7 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात मार्केट यार्डातील ‘निसर्ग’ येथील पक्षाच्या कार्यालयात हा प्रवेश होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातलं सरकार बदलल्याशिवाय कोरोना मृत्यू थांबणार नाहीत - नारायण राणे
महाराष्ट्रात ६ हजार २३४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासात १९८ मृत्यू करोनामुळे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या या संख्येमुळे महाराष्ट्रातील करोना एकूण करोना रुग्णांची संख्या १ लाख ९२ हजार ९९० इतकी झाली आहे. ज्यापैकी १ लाख ४ हजार ६८७ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात ८ हजार ३७६ रुग्णांचा मृत्यू करोनाची बाधा झाल्यामुळे झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
लोकांच्या तीव्र विरोधानंतर अखेर २ किमीची अट राज्य सरकारकडून रद्द
कोरोना विषाणूचा झपाट्याने शहरात फैलाव होत आहे. त्यामुळे कंटेन्मेंट झोन असलेल्या ठिकाणी कडक लॉकडाऊन करण्याची मुभा देण्यात आली होती. दोन किमी परिसरात नागरिकांनी खेरदी करावी, अशी अट लागू करण्यात आली होती. मात्र, विरोधानंतर घरापासून दोन किलोमीटर परिसरातच प्रवासमुभा देण्याबाबत फेरविचार करुन लागू करण्यात आलेली अट रद्द करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांचं कोरोनामुळे निधन
माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. दत्ता साने यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. पहाटे 5 वाजताच्या सुमारास चिंचवड इथल्या खासगी रुग्णालयात निधन झालं आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
आज महाराष्ट्रात ६३६४ नवे रूग्ण आढळले, १९८ रुग्णांचा मृत्यू
मागच्या २४ तासांत राज्यात कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सर्वात मोठा आकडा म्हणजे आज राज्यात ६३६४ नवे रूग्ण आढळले आहेत. राज्यात आज १९८ कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर आज राज्यात ३५१५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनमध्ये मराठी गृहिणींनी सुरु केला ढोकला उद्योग, मिळतंय यश, त्यांना प्रोत्साहित करा
ग्रामीण भागात रोजगाराच्या कमी संधी यातून बहुतांश महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे दुसरे कुठले काम सुरू करायचे म्हटले तरी या पर्यायाचा फारसा विचार करता येत नाही. शिवाय मुलांच्या जबाबदारीचा गाडा या महिला एकट्याने रेटत असतात. ग्रामीण भागात ९०% महिलांचे रोजीरोटी कमावण्याचे माध्यम हे शेतमजुरी, घरगुती गोळ्या-चॉकलेटचे दुकान, भाजीपाला विक्री, बिगारी काम किंवा मनरेगा रोजगार हमी योजनेत जर कधी काम मिळाले तर हे असते.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कोरोना झपाट्याने वाढत असताना परप्रांतीय मजुर मोठ्या संख्येने परतू लागले
लॉकडाऊनच्या काळात आपल्या राज्याकडे परतलेल्या मजुरांनी पुन्हा महाराष्ट्रात यायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाल्यानंतर अनेक उद्योग व्यवसाय सुरू झाले आहे. त्यामुळे बिहार, उत्तर प्रदेशातील परप्रांतीय मजुरांनी पुन्हा रोजगाराच्या निमित्ताने महाराष्ट्रात कूच केली आहे. त्यामुळे अनेक विशेष गाड्यांचे बुकींग काही दिवसांपासून फूल झाले आहे. यामध्ये मुंबई, पुण्यात परतणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रनामा इफेक्ट: कोरोनाने मृत्यू झालेल्या पोलिसांच्या वारसांना भरपाई धनादेश वितरणाचे आदेश
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होतं आहे. त्यात मुंबईतील मोठी लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या शहरांसहित ठाणे, कल्याण डोंबिवली, पुण्यासहीत कोरोनाचं थैमान सुरु आहे. त्यात जीवावर उदार होऊन पूर्ण क्षमतेने रस्त्यावर कर्तव्य निभावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण झाली असून अनेकांचे जीव कोरोनामुळे गेले आहेत. मात्र राज्य सरकारने यावर मोठ्या आर्थिक मदतीची घोषणा देखील केली होती, जी फसवी असल्याची भावना पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात निर्माण झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
भाजपची कार्यकारिणी जाहीर, पंकजा मुंडे केंद्रात, खडसे-तावडे फक्त विशेष निमंत्रित
भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची आज घोषणा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली. दर तीन वर्षानी स्थानिक पातळी ते राष्ट्रीय पातळीवर संघटनात्मक बदल होतात त्यानुसार नव्या नियुक्त्या जाहीर होत असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांमध्ये पक्षात अनेक नेते नाराज होते. त्यामुळे ही कार्यकारिणी कशी असेल याविषयी सगळ्यांनाच उत्सुकता होती.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना समूह संसर्गाबाबत मंत्र्यांमध्ये गोंधळ, एक म्हणाल्या आहे, दुसरे म्हणतात नाही
राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १ लाखाच्या पार झाली असून जुलैच्या सुरूवातीलाच एकाच दिवशी ८ हजार १८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे आता बरे झालेल्यांची संख्या १ लाख १ हजार १७२ झाली आहे. आज सर्वाधिक बरे झालेले रुग्ण मुंबई मंडळातील असून ७ हजार ३३ रुग्णांना घरी सोडण्यात आले, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात रुग्ण संख्येने ओलांडला नवा उच्चांक, २४ तासांत ६३३० नवे रुग्ण
राज्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येने नवा उच्चांक निर्माण केला आहे. आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडत गेल्या 24 तासांत तब्बल 6330 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 186626 झाली आहे. तर फक्त मुंबईत 80,699 रुग्ण झाले आहेत. तर आत्तापर्यंत 4689 जणांचा मृत्यू झाला आहे. आज मुंबईत 1554 नवे रुग्ण आढळून आलेत. तर आज 8 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कल्याण डोंबिवलीत आज ५६० नवे रुग्ण, रुग्णांची रुग्णवाहिकेतून गुरांप्रमाणे वाहतूक
कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा कहर सुरुच आहे. आजची रुग्णसंख्या ५६० झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेने ही माहिती दिली आहे. सध्याच्या घडीला कल्याण डोंबिवलीत उपचार घेत असलेल्यांची संख्या ४ हजार २६८ आहे. आत्तापर्यंत ३०९० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात आत्तापर्यंत १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सत्तेची हाव इतकी होती की या खुर्चीला किती काटे आहेत ते आत्ता त्यांना जाणवतंय
तुमच्यात मतभेद आहे हे आम्ही बोलायचं नाही का? चौथीची मुलगीही सांगेल यांचं काही खरं नाही.. करोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे फक्त दोन तास मागितले असते तर त्यांनी दोन तासांमध्ये कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो आहे. असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा या शब्दांमध्ये टीकास्त्र सोडलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
बरोबर आहे! अधिकारी सरकार चालवतायत अन मुख्यमंत्री ७ तास गाडी चालवतात
आषाढी एकादशी बुधवारी (१ जुलै) साजरी करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सपत्नीक उपस्थित होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मु्ंबईतून स्वतः गाडी चालवत पंढरपूरात दाखल झाले. त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेही उपस्थित होते. ७ ते ८ तास गाडी चालवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे रात्री साडेआठच्या सुमारास पंढरपूरात दाखल झाले. त्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा पार पडली.
5 वर्षांपूर्वी -
लॉक-अनलॉक'मुळे महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज
महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये लॉकडाऊन वाढवल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा अंतर्गत धुसफूस आणि नाराजीनाट्य सुरू झालं आहे. अद्याप महाविकास आघाडीचा कुठलाही नेता अधिकृतपणे या विषयी बोललेला नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काँग्रेसच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनीसुद्धा त्यांच्यात सूर मिसळल्याची सूत्रांची माहिती आहे.
5 वर्षांपूर्वी -
पंतप्रधान निधीला मदत करण्याचे आवाहन करणाऱ्या महाराष्ट्रद्रोहींना बोलण्याचा अधिकार नाही
कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम महसूलावर झाला असून सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे कसे, असा प्रश्न सरकारला पडला आहे. यामुळे खासगी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी कर्मचाऱ्यांचेही पगार लटकण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर सरकारला कर्ज काढून पगार वाटप करावे लागेल, अशी चिंता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरे सरकार आर्थिक संकटात, कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावं लागेल
कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम महसूलावर झाला असून सरकारी तिजोरीत खडखडाट आहे. परिणामी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे कसे, असा प्रश्न सरकारला पडला आहे. यामुळे खासगी कर्मचाऱ्यांप्रमाणेच सरकारी कर्मचाऱ्यांचेही पगार लटकण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती अशीच राहीली तर सरकारला कर्ज काढून पगार वाटप करावे लागेल, अशी चिंता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना नियंत्रण उपाय, मुंबईच्या धर्तीवर राज्यातील सर्व जिल्ह्यात टास्कफोर्स नियुक्त होणार
महाराष्ट्रात कोरोनाने अक्षरश: थैमान घातले आहे. काल एका दिवसात राज्यात कोरोनाच्या तब्बल 5 हजार 537 नव्या रुग्णांची भर पडली, तर 198 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 80 हजार 298 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 8 हजार 053वर पोहोचला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मागच्या २४ तासात राज्यात कोरोनाचे ५,५३७ नवे रुग्ण, १९८ रुग्णांचा मृत्यू
रुग्णसंख्येच्या बाबतीत राज्यासाठी कालचा दिवस काहीसा दिलासादायक ठरल्यानंतर आज पुन्हा चिंता वाढवली आहे. एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वर गेला आहे. राज्यात पाच हजारांहून अधिक रुग्णांची नव्यानं भर पडली. त्यामुळे एकूण आकडा १ लाख ८० हजार २९८ इतका झाला आहे. तर दिवसभरात २ हजार २४३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
रुग्णांची लूट थांबविण्यासाठी सरकार खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घेणार
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचा तक्रारी येत होत्या. केवळ रुग्णालयात नेण्यासाठी वाहन उपलब्ध नसल्याने कित्येक तास रुग्णांना ताटकळत राहावं लागत होतं. आता यावर उपाय म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने सगळ्या खासगी रुग्णवाहिका ताब्यात घ्यायचा निर्णय घेतला आहे. आता रुग्णवाहिकांचा दर सरकार ठरवणार आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आदेश (GR) काढण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी