महत्वाच्या बातम्या
-
उद्धव ठाकरेंकडे आम्ही उद्याचे देशाचे पंतप्रधान म्हणून पाहतोय - खा. संजय राऊत
शिवसेनेचा आज ५४वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी अफाट उत्साहात आणि थाटात साजरा होणारा हा वर्धापन दिन आज कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
शिवसैनिकाला पंतप्रधान बनवण्याचे माझे स्वप्न आहे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
शिवसेनेचा आज ५४वा वर्धापन दिन आहे. दरवर्षी अफाट उत्साहात आणि थाटात साजरा होणारा हा वर्धापन दिन आज कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज दुपारी साडेबारा वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिवसेना नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आणि अन्य पदाधिकाऱ्यांसह शिवसैनिकांशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
मी विचारधारा बदललेली नाही आणि मी डगमगणार नाही - मुख्यमंत्री
मी विचारधारा बदललेली नाही. मुख्यमंत्री झाल्यापासून आपल्यात थोडा संपर्क कमी झाला आहे. पण अंतर कमी झालेले नाही. आता गाव तिथं शाखा व घर तिथं शिवसैनिक कार्यक्रम राबवायचा आहे. स्वत:ची काळजी घेवून लोकांची मदत करा, किती संकटे आली तरी मी डगमगणार नाही. माझे स्वप्न नाही पंतप्रधान बनण्याचे,परंतु शिवसैनिकाला पंतप्रधान बनवण्याचे स्वप्न आहे असे सांगत मास्क तोंडावर आला असला तरी आपला आवाज कुणी दाबू शकत नाही.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउनमुळे ९ चिनी अधिकारी पुण्यात अडकले, त्यातील एक कोरोना पॉझिटिव्ह
महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतेय. काल (गुरुवारी) एका दिवसात राज्यात कोरोनाच्या 3 हजार 752 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 100 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 लाख 20 हजार 504वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 5 हजार 751 इतका झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: परिस्थितीला कंटाळून एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येने पुणे जिल्हा हादरला आहे. आपल्या दोन चिमुरड्यांना गळफास दिल्यानंतर दाम्पत्याने स्वतःचं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना सुखसागर नगर परिसरात घडली आहे. अतुल दत्ता शिंदे (वय 33), जया अतुल शिंदे (वय 32), ऋग्वेद अतुल शिंदे (वय 6) आणि अंतरा अतुल शिंदे (वय 3) अशी आत्महत्या केलेल्या सदस्यांची नावे आहेत.
5 वर्षांपूर्वी -
स्वाभिमानीमध्ये अंतर्गत वाद वाढल्याने राजू शेट्टींची विधानपरिषद आमदारकीतून माघार?
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी हे राष्ट्रवादीकडून विधानपरिषद आमदार होण्याची शक्यता आहे. राजू शेट्टी यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत जाऊन भेट घेतल्यानंतर तर या चर्चेनं अधिकच वेग पकडला आहे. मात्र अशातच आता ही आमदाराकीची चर्चा राजू शेट्टी यांच्यासाठी नवी डोकेदुखी ठरणार की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण स्वाभिमानीचे दोन मोठे नेते या मुद्द्यावरून नाराज झाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात आज ३३०७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या आकडेवारीने ६० हजारांचा टप्पा पार केला आहे. मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढून आता २९ दिवसांवर पोहचला आहे. तर रुग्ण वाढीचा सरासरी दर आणखी कमी होऊन आता 2.43 टक्क्यांवर आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना रिपोर्ट रुग्णांना मिळणार नाही, आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं कारण...
कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूच्या संख्येत अचानक वाढ झाली. तब्बल १३२८ मृत्यूंची नव्याने नोंद झाली. त्यात गेल्या २४ तासांत नोंदल्या गेलेल्या ८१ कोरोनाबाधितांची भर पडली. त्यामुळे कोरोना मृत्यूंचा आकडा एकदम १४०९ ने वाढला आहे. त्यामुळे राज्यात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. तर जन्म आणि मृत्यू नोंदविण्याचे जे निकष आहेत त्यानुसारच नोंदणी करण्यात येत असल्याचं राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
MPSC स्थगित परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
कोरोना विषाणु संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
फेरपडताळणी: कोविड मृत्यूंची संख्या १३२८ ने वाढली, फडणवीस सरकारवर बरसले
कोरोनामुळे राज्यात नेमके किती मृत्यू झाले आहेत याची संख्या दडवण्यात येत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला होता. यासंबंधी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रही लिहिलं होतं. त्यानंतर २४ तासांच्या आत ठाकरे सरकारने फेरपडताळणी करत COVID-19 च्या मृत्यूंची वस्तुस्थिती सांगणारे आकडे जाहीर केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
व्यवस्थित माहिती मिळवून अग्रलेख लिखाण असावं - बाळासाहेब थोरात
‘खाट कितीही कुरकुरली तरी कुणी चिंता करु नये’, अशा शब्दात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर निशाणा साधण्यात आला आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही आघाडीसोबत आहोत. उद्धव ठाकरेंसमोर भूमिका मांडू. आमचे मुद्दे जनतेच्या हिताचे आहेत’, असे त्यांनी म्हटले.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर कोकण रेल्वेचे ५२ कर्मचारी क्वारंटाईन
मागील २४ तासांत राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात २७८६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर १७८ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. यामध्ये मुंबईतील ५८ जणांचा समावेश आहे. त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी बिकट झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील, असे नेत नाहीत - सामना
राजकारण हे सत्तेसाठीच असते. सत्ता कोणाला नको असते? मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेसाठी काहीही करतील, असे नेत नाहीत. सगळ्यांच्या गळ्यात मंत्रिपदाचे हार पडले आहेत. त्यात शिवसेनेचा त्यागही मोलाचा आहे, हे विसरता येणार नाही. खाट कितीही कुरकुरली तरी कोणी चिंता करु नये, असे शिवसेनेने म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीत काँग्रेसच्या कुरघोड्या सुरु, अंतर्गत वाद वाढले
सत्ताधारी महाविकास आघाडीतील तिसरा वाटेकरी असलेल्या काँग्रेसने प्रथमच आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. गेले दोन दिवस काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठका सुरू असून आज माध्यमांकडे प्रतिक्रिया देताना महसूलमंत्री व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या नाराजीला तोंड फोडले.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्राचा नकाशा उलटा करून दाखवला, याला म्हणतात महाराष्ट्रद्रोह - भाजपची टीका
एकीकडे कोरोनाशी लढत असताना महाराष्ट्राने उद्योग उभारणीत दमदार पाऊल टाकून, तब्बल १६ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार सोमवारी केले. उद्योग स्थापण्यात कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात एकाच दिवशी ५०७१ रुग्णांना घरी सोडण्यात आले - आरोग्यमंत्री
राज्यात पंधरा दिवसांच्या अंतराने दुसऱ्यांदा विक्रमी संख्येत कोरोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज राज्यभरात ५ हजार ७१ रुग्णांना दवाखान्यातून सोडण्यात आले असून मुंबई मंडळात सर्वाधिक ४२४२ एवढे रुग्ण एकाच दिवशी घरी सोडण्यात आले. आतापर्यंत ५६ हजार ४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत कोरोनामुळे झालेले ९५० मृत्यू दडवून का ठेवले; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
आयसीएमआरच्या दिशानिर्देशांचे पालन न करता मुंबईतील ९५० हून अधिक करोना मृत्यू का दडविण्यात आले ? इतके अक्षम्य दुर्लक्ष का ? आणि असे करणार्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार ? असे सवाल माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना यासंबंधी पत्र लिहिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
१५ जून २०२० पासून ऑनलाइन माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये १५ जून २०२० पासून ऑनलाइन तसंच डिजिटल माध्यमातून शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यास मान्यता दिली आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसंच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना डॅशबोर्ड लाँच | बेड्स संख्या | कोविड टेस्ट लॅब्स | कंटेनमेंट झोन | हेल्पलाइन्स | Install App
देशात अनलॉकनंतर कोरोनाचा संसर्ग अजून वाढताना दिसत असून, तज्ज्ञांच्या मते आगामी काळात त्याची अनेकांना लागण होण्याची शक्यता अभ्यासातून पुढे आली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात असून, नव्या रुग्णांची संख्या देखील वेगाने वाढत आहे. मात्र अशा परिस्थिती राज्य सरकारने तयार ठेवलेल्या आयसोलेशन सेंटर तसेच कोरोना केअर सेंटर, ICMR’ने मान्यता दिलेल्या राज्यभरातील कोविड १९ टेस्ट लॅब्सची माहिती तसेच सामान्य नागरिकांपासून ते पोलिस कर्मचाऱ्यांना या परिस्थितीत गरजेची असलेली माहिती देणारा एकमेव डॅशबोर्ड महाराष्ट्रनामा न्यूजने लाँच केला आहे.
5 वर्षांपूर्वी