महत्वाच्या बातम्या
-
महाविकास आघाडीत मतभेद; काँग्रेसचे नेते दोन दिवसांत उद्धव ठाकरेंना भेटणार
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे आज शनिवारी एक दिवसाच्या कोकण दौऱ्यावर जात आहेत. सकाळी ८.३० वाजता महसूलमंत्री हे शासकीय निवासस्थान रॉयलस्टोन येथून मोटारीने निघून ९.०० वाजता भाऊचा धक्का येथे पोहोचतील त्यानंतर रोरो बोटीने मांडवा जेट्टी येथे जातील तेथून मोटारीने अलिबाग तालुक्यातील नागांव व चौल गावाला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करतील त्यानंतर काशीद व नंतर मुरुड येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात आज ३४२७ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ - आरोग्य मंत्री
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असून आज सलग तिसऱ्या दिवशी राज्यात ३ हजाराहून जास्त कोरोना रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात राज्यात ३ हजार ४२७ नवे रुग्ण सापडले असून आता एकूण रुग्णसंख्या १ लाख ४ हजार ५६८ झाली आहे. यापैकी ५१ हजार ३७९ रुग्ण अॅक्टिव्ह असून ४९ हजार ३४६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
वादळग्रस्त कोकणी माणसाचे प्रश्न घेऊन फडणवीस मुख्यमंत्र्यांना भेटले
नुकसानग्रस्तांना तातडीने रोख रक्कम म्हणून मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षतेने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर फडणवीस यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सादर केलं. यावेळी फडणवीस यांच्यासोबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार देखील उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना टेस्ट अवघ्या २२०० रुपयांत, राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार खासगी लॅब्सना कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त २२०० रुपयेच आकारता येतील. यापूर्वी कोरोनाच्या टेस्टसाठी साधारण ४४०० रुपये आकारले जात होते. खासगी लॅब्समध्ये यावर इतर कर लागून कोरोना टेस्टची किंमत बरीच जास्त होती.
5 वर्षांपूर्वी -
गेल्या ४८ तासांत राज्यात १२९ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह
मागील ४८ तासांत राज्यातील १२९ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण संख्या ३ हजार ३८८ वर गेली आहे. तसंच आतापर्यंत ३६ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर १ हजार ९४५ पोलिसांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. महाराष्ट्र पोलिसांकडून ही माहिती मिळाल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात ३४९३ नवे कोरोनाबाधित, १२७ मृत्यू, एकूण रुग्ण आकडा १ लाखाच्या पार
राज्याला कोरोना व्हायरसचे हादरे सुरुच आहेत. आजही राज्यात ३४९३ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे राज्याचा एकूण आकडा १ लाख १ हजार १४१ वर गेला आहे. तर राज्यात गेल्या २४ तासांमध्ये १२७ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या ३७१७ वर गेली आहे. आजही मुंबईत सगळ्यात जास्त ९० जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात १७१८ रुग्ण बरे झाले. तर राज्यात एकूण ४७७९६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ४७.३ एवढं असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
येणाऱ्या काळात आपल्याला कोरोनासोबतच जगायचं आहे - आरोग्य मंत्री
कोरोनाची लक्षणं दिसली नाहीत तर कुणाचीही चाचणी करण्याची गरज नाही असं महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. येणाऱ्या काळात आपल्याला कोरोनासोबतच जगायचं आहे. त्यामुळे आपली काळजी आपण घेऊनच आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. मंत्रिमंडळ बैठक, वर्धापन दिन कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जातं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण
राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. धनंजय मुंडे यांचे दोन स्वीय सहाय्यक आणि गाडी चालकाला देखील कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्री मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत धनंजय मुंडे सहभागी झाले होते. या अगोदर सोमवारी मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचे उदघाटन देखील केले होते.
5 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! राज्यात ३६०७ नवे रुग्ण, तर १५२ रुग्णांचा मृत्यू
राज्यात लॉकडाऊन नंतर रुग्णांच्या संख्येत धक्कादायक वाढ होत आहे. आज राज्यात ३६०७ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ९७ हजार ६४८ म्हणजेच लाखाच्या जवळ गेली आहे. तर आज १५२ नव्या मृत्युची नोंद करण्यात आली. त्यामुळे मृत्यूचा आकडा ३५९० वर गेला आहे. आज १५६१ रुग्णांना सुट्टी देण्यात आली. आत्तापर्यंत राज्यात ४६०७८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज झालेली रुग्णांची वाढ ही आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त वाढ आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोकणाला मागच्या ९ दिवसांत कोणतीही मदत मिळालेली नाही - फडणवीस
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. यावेळी ते म्हणाले की, एनडीआरएफसोबतच राज्यानेही नुकसानग्रस्तांना मदत करणं गरजेचं आहे. एनडीआरएफ प्रत्येक आपत्तीत मदत करतं. मात्र यावेळेस राज्यानेही मदत करायला हवी. केंद्र सरकारकडून नंतर मदत होईलच, पण आता राज्याने मदत करायला हवी, असं ते म्हणाले. तसेच, राज्याने केलेला खर्च केंद्र सरकारच देतं, असंही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात कोरोनाची सौम्य किंवा अतिसौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर घरीच उपचार
मुंबईपाठोपाठ पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढतेय. कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोनाबाधितांवर आता रुग्णालयाऐवजी घरीच उपचार केले जाणार आहेत. पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी याबाबतची माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई, पुण्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात अति मुसळधार पावसाचा अंदाज
मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर मान्सून (Monsoon 2020) महाराष्ट्रात दाखल झाला आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या भागांमध्ये मान्सून सक्रिय झाल्याचं वृत्त वेधशाळेकडून देण्यात आलं आहे. मान्सूनने कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात प्रगती केल्याचं चित्र आहे.
5 वर्षांपूर्वी -
आर्थिक संकटाशी लढतानाच आपण मोडून पडू की काय, याचीच अधिक भीती - आ. रोहित पवार
अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली आहे. लॉकडाऊन शिथिल केल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेऊन घरा बाहेर पडायला हवं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे केलं आहे. यावेळी त्यांनी अर्थव्यवस्थेवरही भाष्य केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारकीचा प्रस्ताव
एकीकडे राज्यात कोरोनाचं संकट आ वासून उभं असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी मात्र वेगाने घडत आहेत. ६ जून रोजी विधानपरिषदेतल्या राज्यपाल नियुक्त १२ जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागांवर नव्या सदस्यांच्या नियुक्तीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या तिनही पक्षांमध्ये या जागांसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मी अनेकदा बारामतीत गेलो, मला तिथेही समुद्र दिसला नाही – फडणवीस
निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आजपासून दोन दिवस कोकणचा दौऱ्यावर आहेत. या दोन दिवसांत रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत विविध ठिकाणी ते भेटी देऊन नुकसानीची पाहणी करतील.
5 वर्षांपूर्वी -
पालघर लिंचिंग चौकशी प्रकरणी सुप्रीम कोर्टाची केंद्र आणि महाराष्ट्र सरकारला नोटीस
महाराष्ट्रातील पालघर येथे दोन साधूंच्या हत्येच्या चौकशीची मागणी करण्याता आली आहे. साधुंच्या हत्या प्रकरणी सीबीआय किंवा एनआयएमार्फत ही चौकशी करण्यात यावी यासाठी याचिका करण्यात आली आहे. या याचिकेनंतर आज सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि महाराष्ट्र सरकारसह अन्य पक्षांना नोटीस बजावली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९४ हजार ४१ वर
महाराष्ट्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९४०४१ पर्यंत वाढली आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात ३४३८ नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. महाराष्ट्रातील कोरोना येथे गेल्या २४ तासांत १४९ मृत्यू झाले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना येथे मृतांचा आकडा आता ३४३८ आहे. महाराष्ट्रात बुधावाारी १८७९ रूग्णांना बरे झाल्यानंतर सुट्टी देण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
...त्यामुळे फडणवीसांच्या ज्ञानात भर पडेल', शरद पवारांचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या कोकणाच्या दौऱ्यावर आहेत. निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शरद पवार कोकणात आले आहेत. दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसदेखील कोकणाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. फडणवीसांच्या या प्रस्तावित कोकण दौऱ्यावर पवारांनी निशाणा साधला.
5 वर्षांपूर्वी -
....अन्यथा पुन्हा लॉकडाउन करावा लागू शकतो, मुख्यमंत्र्यांचा इशारा
राज्य सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत लॉकडाउन शिथील करण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने दुकानं, गार्डन यांच्यासाठी वेळेची मर्यादा देत सुरु करण्याची परवानगी दिली असून खासगी कार्यालयांनाही ठराविक मनुष्यबळासोबत काम करण्यास संमती दिली आहे. त्यामुळे ३० जून नंतर लॉकडाउन पूर्णपणे उठवला जाणार का ? असा प्रश्न विचारला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
महाराष्ट्र…कोरोना रुग्ण…बेड्स…राज्य सरकारचं वास्तव उघड
5 वर्षांपूर्वी