महत्वाच्या बातम्या
-
राज्यात २९३३ नवे कोरोना रुग्ण, तर १२३ रुग्णांचा मृत्यू
राज्यात आज १३५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ३३ हजार ६८१ जण पूर्णपणे बरे झालेले आहेत. तसंच आज नव्या २९३३ रुग्णांची भर पडली व १२३ जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ७७ हजार ७९३ इतकी झाली आहे. तर सध्या ४१ हजार ३९३ एक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
प्रतिदिन १०,००० कोरोना चाचण्यांची क्षमता, मग फक्त ३५००-४००० चाचण्या का? फडणवीस
कोरोनाच्या चाचण्या मुंबईत कमी होत असून त्या वाढल्या पाहिजेत. राज्यात मृत्यूसंख्येत सातत्याने होत असलेली वाढ तसेच मृत्यू प्रमाणपत्रात नैसर्गिक अथवा अन्य कारण नमूद करून अंत्यविधीसाठी मृतदेह दिले जात असल्याने धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे चाचण्यांचा वेगवाढवला तरच आपली कोरोनाच्या वादळापासून सुटका होईल, असे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोनाबाधित रुग्णाला एकच दिवस क्वारंटाइन ठेवलं; जमावाची मुख्याधिकाऱ्यावर चप्पलफेक
मुरगूड शहरात काल बुधवारी सापडलेला पहिला कोरोना बाधित २० वर्षीय रुग्ण हा प्रशासनाने कागदोपत्री संस्थात्मक क्वारंटाईन दाखवला आहे. पण प्रत्यक्षात हा रुग्ण केवळ एकच दिवस कन्या विद्यामंदिर या शाळेमध्ये क्वारंटाईन असल्याचे पुरावे देत नागरिकांनी आज नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांना पालिकेत जाऊन घेराव घातला.
5 वर्षांपूर्वी -
कोकणात चक्रीवादळाने आंबा, फणस, सुपारीच्या झाडांचं प्रचंड नुकसान
निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा रायगड जिल्ह्याला बसला आहे. घरांचे खूप नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील नुकसानाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. त्यानंतर त्यांनी विशेष आर्थिक पॅकेजची मागणी केली आहे. रायगड जिल्ह्यात झालेले नुकसान पाहता आपण भरपाई म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे या पॅकेजची मागणी करणार आहोत, असे स्पष्ट केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत १,२७६, पुण्यात ३४० नवे रुग्ण, रुग्णवाढीचा दर ४.१५ टक्क्यांवर
एक चांगली बातमी. राज्यात कोरोनाचा प्रसार होण्याचा दर काहीसा मंदावला आहे. देशात सर्वाधिक रूग्ण राज्यात असल्यामुळे कोरोनाचा प्रसार राज्यात कमी होणं गरजेचं होतं. गेल्या ७ दिवसांत राज्याचा सीडीजीआर म्हणजे रग्णवाढीची आकडेवारी ४.१५ टक्के होती. तर देशाचा सीडीजीआर ४.७४ टक्के होता. रूग्णसंख्या दुप्पट होण्याची आकडेवारीही १७.३५ दिवसांवर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
चक्रीवादळ रोखण्यात राज्य सरकार अपयशी, भाजपचे शिष्टमंडळ राष्ट्रपती भवनात, काँग्रेसचा टोला
अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्रासमोर नवं संकट उभं राहिलं होतं. दुपारी १:३० वाजता चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीवरून जमिनीवर पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर अलिबाग मार्गे हे वादळ मुंबईत दाखल होणार होतं. त्यापूर्वीच वादळानं दिशा बदलली असून, चक्रीवादळ पनवेल, कर्जत खोपोली, नाशिक या मार्गे पुढे जाणार आहे. पुणे वेधशाळेचे प्रमुख हवामान संशोधक डॉ. अनुपम कश्यपी यांच्या हवाल्यानं स्कायमेटनं हे वृत्त दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाशिकमध्ये वादळाने पोल्ट्री फार्मचे प्रचंड नुकसान, कोंबड्या उघड्यावर
निसर्ग चक्रिवादळामुळे राज्यातील विविध ठीकाणी अनेक नुकसान झाले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडण्याचे तसेच विजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडले. यात ४ जण जखमी झाले आहेत. या पार्श्र्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे सुरू झाले असून नुकसानीबाबत २ दिवसात भरपाई रक्कम शासकीय नियमांप्रमाणे दिली जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
वंचित पक्षातील माजी आमदार बळीराम शिरस्कर व हरिदास भदेंचा राष्ट्रवादीत प्रवेश
महाराष्ट्र किनारपट्टीला ‘निसर्ग’ चक्रीवादळाचा धोका असतानाच राजकीय वादळही पाहायला मिळाले. ‘वंचित बहुजन आघाडी’चे माजी आमदार बळीराम शिरस्कर आणि हरिदास भदे यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला.
5 वर्षांपूर्वी -
निसर्ग चक्रीवादळ: कार्यकर्त्यांना प्रशासनासोबत मदतीला उभे रहावे, पवारांच आवाहन
‘निसर्ग’ चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला असून प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उभे रहावे, असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
हिंदुस्थान युनिलीवर'कडून सरकारला २८, ८०० टेस्टिंग किट, व्हेंटिलेटर्स, PPE किटस
कोरोनाचा कहर संपूर्ण जगभरात सुरूच असून एकूण 213 देशांना मोठा फटका बसला आहे.जगभरातील जवळपास 75 टक्के कोरोनाग्रस्त फक्त 13 देशांमध्ये आहेत. या देशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या 48 लाखांवर पोहोचली.
5 वर्षांपूर्वी -
चक्रीवादळ: रायगड प्रशासनाने तब्बल १३,५४१ लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं
सकाळी दहा वाजल्यापासून जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वारे वाहण्यास सुरुवात झाली. नंतर पावसाचा जोरही वाढला. यानंतर किनारपट्टीवरील भागातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. मुरुड येथे तहसिल कार्यालयावर, अलिबाग येथे नियोजन भवना शेजारी महाकाय वृक्ष उन्मळून पडले. मरुड, श्रीवर्धन मध्येही पडझडीच्या घटना घडल्या.
5 वर्षांपूर्वी -
रत्नागिरी- भगवती बंदरात जोरदार लाटांमुळे जहाज भरकटले
निसर्ग’ चक्रीवादळ आज कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे. या वादळापूर्वी कोकण, मुंबईसह अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज रत्नागिरीतील मिऱ्या समुद्रावर फेसाळलेल्या लाटांमध्ये जहाज भरकटले होते. जहाजाला मिरकरवाडा बंदरात नेण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्याने खवळलेल्या समुद्राशी जहाजाची झुंज सुरू होती.
5 वर्षांपूर्वी -
चक्रीवादळाचा मुंबई, ठाणे आणि रायगडला तडाखा बसणार; हवामान विभागाचा अंदाज
कोरोना या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करत असतानाच एका नैसर्गिक संकटानं महाराष्ट्राच्या दारावर थाप मारली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची भीती व्यक्त करण्यात आहे.
5 वर्षांपूर्वी -
‘निसर्ग’ चक्रीवादळ ताशी ११० कि.मी वेगाने दुपारी एक नंतर अलिबागला धडकणार
कोरोना या संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करत असतानाच एका नैसर्गिक संकटानं महाराष्ट्राच्या दारावर थाप मारली आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे मंगळवारी दुपारी चक्रीवादळात रुपांतर झाले. त्याचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, दुपारी ते दमण आणि हरिहरेश्वरच्या दरम्यान अलिबागजवळ धडकण्याची भीती व्यक्त करण्यात आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात कोरोनाचे नवे २३६१ रुग्ण, तर ७६ रुग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात करोनाचे २३६१ रुग्ण आढळले आहेत. तर ७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ७० हजार १३ इतकी झाली आहे.२४ तासात ७७९ करोना रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत ३० हजार १०८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सीबीएसई, आयसीएसई शाळांत यंदापासूनच मराठी अनिवार्य : राज्य सरकारचा आदेश
महाविकास आघाडीने सरकारने सीबीएसई, आयसीएसई, केंब्रिज यासह अन्य आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळांच्या सर्व माध्यमांच्या शाळांत मराठी भाषा हा विषय सक्तीचा करणारा आदेश आज लागू केला. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी तो जाहीर केला. राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये मराठी हा विषय अध्ययन अध्यापनामध्ये सक्तीचा करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाणे मनपाकडून गृहसंकुलांतील विक्री झालेल्या घरांचा ताबा घेण्याचा प्रयत्न; लोकांमध्ये संताप
जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी सर्वाधिक ४८६ इतके नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांचा आकडा आठ हजार २६७ एवढा झाला आहे. जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी १६ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा हा २५६ इतका झाला आहे. रविवारी ठाणे महानगरपालिका हद्दीत सर्वात जास्त १३१ रुग्ण सापडले.
5 वर्षांपूर्वी -
सावधान! राज्याच्या काही भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता
मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढला होता, त्यामुळे नागरिक उकाड्याने प्रचंड हैराण झाले होते. मात्र काल मध्यरात्री मुंबईत कोसळलेल्या पहिल्या पावसाच्या सरींनी हवेत गारवा निर्माण झाल्याने मुंबईकर सुखावले आहेत. परंतु भारतीय हवामान खात्याने पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३ जून आणि ४ जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्याकडून या भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
परीक्षांसंदर्भात मुख्यमंत्र्यांचे कुलगुरूंना महत्त्वाचे निर्देश
एकाही विद्यार्थ्याला विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही. याची काळजी घेऊन विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. त्यासाठी नेमकी परीक्षा पद्धती आणि वेळापत्रक निश्चित करून विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील चिंता संपविली पाहिजे. त्यादृष्टीने विविध पर्याय पडताळून पाहण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
5 वर्षांपूर्वी -
आपत्तीमुळे शिवसेना शाखांचे दवाखाने होणार; उद्धव ठाकरे लवकरच आदेश देणार
महाराष्ट्रात गेल्या २४ तासात ८ हजार ३८१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही संख्या गेल्या अनेक दिवसांमधली विक्रमी संख्या आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ३३ हजार १२४ ऍक्टिव्ह रुग्ण आहे. तर २६ हजार ९९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. या ३३ हजारांमध्येही एक जमेची बाजू ही आहे की ८३ रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणं नाहीत.
5 वर्षांपूर्वी