महत्वाच्या बातम्या
-
राज्यात एका दिवसात ११४ पोलिस कोरोना पॉझिटिव्ह
राज्यात एका दिवसात ११४ पोलिस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर एका पोलीसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांच्या संख्या दोन हजार ३२५वर पोहोचली असून आतापर्यंत २६ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुणे: ६ महिने वेतन न मिळाल्याने रुग्णालयाबाहेर कर्मचाऱ्यांचं आंदोलन
पुण्यात गेल्या १५-२० दिवसांपूर्वी शहरी भागापुरता मयार्दीत असलेला कोरोना विषविषाणुचा संसर्ग आता ग्रामीण भागातील खेड्या-पाड्यांपर्यंत जाऊन पोहचला आहे. शुक्रवार (दि.२९) रोजी पुणे जिल्ह्यात एकाच दिवसांत ३०२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची वाढ झाली. यामध्ये पहिल्यांदाच ग्रामीण भागात एका दिवसांत २५ नवीन कोरोना बाधितांची वाढ झाली असून, यात एकट्या आंबेगाव तालुक्यात १५ नवीन रुग्ण सापडल्याने परिसरात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
माझे वडील IAS अधिकारी होते, तुम्ही चौथी पास आहात, दानवेंची लायकी काढली
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर आता हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्यावरच गंभीर आरोप केला आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मला मारलं किंवा मी आत्महत्या केली, तर तुम्ही वाचणार नाही - हर्षवर्धन जाधव
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर आता हर्षवर्धन जाधव यांनी आपले सासरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्यावरच गंभीर आरोप केला आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी एक व्हिडिओ युट्युबवर अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव यांनी कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आणला आहे.
5 वर्षांपूर्वी -
आज राज्यात २६८२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर ११६ मृत्यू
महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये २६८२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ११६ मृत्यू झाले आहेत. तर गेल्या चोवीस तासांमध्ये ८ हजार ३८१ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासात आलेल्या संख्येनंतर आता महाराष्ट्रातील करोना रुग्णांची ६२ हजार २२८ इतकी झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात २६ हजार ९९७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आज पुणे शहारात २४२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, १० रुग्णांचा मृत्यू
राज्यात अधिकच वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही प्रमुख शहरं करोनाबाधितांच्या संख्येत सर्वात पुढे दिसत आहेत. आज दिवसभरात पुणे शहारात २४२ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले तर दहा जणांचा करोनाने बळी घेतला.
5 वर्षांपूर्वी -
यंदाचा पालखी सोहळा पायी होणार नाही, पण इतर ३ पर्याय दिले
कोरोना व्हायरसच्या संकटामुळे इतिहासात पहिल्यांदाच देहू आणि आळंदीचा पायी पालखी सोहळा रद्द करण्यात आला आहे. आषाढी वारी बद्दल निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये पुण्याच्या काऊन्सिल हॉलमध्ये बैठक झाली. या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन: महाराष्ट्रातून गुजरातला जाणारा २४ टन तांदूळ पकडला
कोरोना संकटात लढण्यासाठी उद्भवलेल्या परिस्थितीमुळे देशभर लॉकडाऊन सुरू आहे. या लॉकडाऊनच्या काळात गोरगरीबांना अन्नधान्य पुरवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून मोफत अन्न धान्य दिलं जातंय. मात्र रेशनवर या अन्नधान्याचा काळाबाजार होताना दिसतोय. असाच एक काळाबाजार करण्यासाठी निघालेला एक ट्रक पोलिसांनी जामखेड तालुक्यात पकडला. या ट्रकमध्ये तब्बल २४ टन तांदूळ सापडला आहे. हा ट्रक गुजरातला जात होता.
5 वर्षांपूर्वी -
उपमुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा; राज्य सरकार लवकरच देणार पॅकेज
लॉकडाऊन यापुढे आणखी वाढवायचा का, बाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. औंध रावेत उड्डाणपूलचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.
5 वर्षांपूर्वी -
धक्कादायक! पुण्यात डेअरी मालक व ११ कर्मचाऱ्यांना कोरोना, ग्राहकांचा शोध सुरू
पुणे शहरात मागील काही दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याच दरम्यान हडपसर भागातील प्रसिद्ध डेअरी मालकासह ११ कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही, जितेंद्र आव्हाडांनी भाजपला सुनावले
स्थलांतरीत मजुरांच्या रेल्वे प्रवासाच्या तिकिटीप्रकरणी सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आरोपप्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. मात्र स्थलांतरीत मजुरांच्या प्रवासासाठी राज्यांनीच खर्च केल्याचं खुद्द केंद्राचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनीच सर्वोच्च न्यायालयाला सांगतिलं आहे. आणि तुषार मेहता यांच्या या युक्तीवादाचा हवाला देत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही महाराष्ट्र भाजपवर जोरदार टीका केलीय.
5 वर्षांपूर्वी -
आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना TV आणि रेडिओवरून शिक्षणाचे धडे
कोरोना चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. संसर्गजन्य आजार असल्यामुळे गर्दी टाळण्याचं आवाहन करण्यात येतंय. मात्र लॉकडाऊन शिथिल केला तर संसर्गाची भिती अधिक आहे, आणि लॉकडाऊन असाच जारी केला तर संपूर्ण जनजीवन विस्कळीत होणार आहे. यात शाळेतील विद्यार्थ्यांचेही नुकसान होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
मागील २४ तासांत १८१ पोलिस कोरोनाबाधित; तर ३ पोलिसांचा मृत्यू
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. अशात आपल्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस अधिकारीही कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल १८१ पोलीस करोनाबाधित झाले आहेत. तर ३ पोलिसांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत २ हजार २११ पोलीस करोनाबाधित झाले आहेत तर यात २४९ पोलीस अधिकारी आणि १ हजार ९६२ पोलीस कर्मचारी करोना संक्रमित आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सद्याच्या स्थितीत तरी शाळा लगेच सुरु करणं अत्यंत अवघड - मुख्यमंत्री
देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची ही महाराष्ट्रात आहे आणि विशेष म्हणजे त्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यात मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्ये राज्यातील शाळा बंद असून त्या पुन्हा सुरु होणार की नाही ? याबाबत पालकांच्या अनेक संभ्रम आहे. याबाबत स्पष्ट करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाळा लगेच पुन्हा सुरु करणं सध्यातरी अवघड दिसत असल्याचं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील सुमारे ५ IAS, IPS अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण
राज्यातील काही मंत्र्यांना, पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचं ताजं असताना आता प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. राज्यातील सुमारे ५ आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली, या अधिकाऱ्यांवर सध्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोरोना संकट काळात पोलीस, डॉक्टर्स याप्रमाणे प्रशासकीय अधिकारीही जीव धोक्यात घालून काम करत आहे.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असल्याने प्रशासनाची चिंता वाढली
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात नव्याने ७५ रुग्ण सापडल्याने बाधितांचा आकडा सात हजाराच्या घरात पोहोचण्यास मदत झाली आहे. तर मृतांची एकूण संख्या ३०० वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राहुल गांधी आणि आदित्य ठाकरेंचा फोनवरून संवाद; सेना-काँग्रेस जवळीक वाढली
राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीमधील पक्ष विशेषतः काँग्रेस नाराज असल्याने सारे काही आलबेल नसल्याची चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यात बुधवारी फोनवरून चर्चा झाली. त्यामुळे महाविकास आघाडीतील तणाव निवळला असल्याचे समजते. तर मुख्यमंत्र्यांपाठोपाठ राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशीही फोनवरून संवाद साधला. यावेळी राहुल गांधी यांनी महाराष्ट्र सरकारच्या कामाचे कौतुक केले.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील युवकांवर फडणवीसांचा अविश्वास..मग केंद्राच्या स्किल इंडीयातून काय साधलं? - जयंत पाटील
मुंबईत १० हजार वेगळे बेड्स उपलब्ध होतील. रुग्णांची संख्या वाढली तर तशी व्यवस्था सज्ज आहे. महाराष्ट्राच्या प्रश्नांविषयी चिंता व्यक्त करताना राज्य सरकारने केलेल्या कामावर केवळ टीका करण्याचे काम फडणवीसांनी केले. सर्व मजुर बाहेर गेले आहेत आणि आपल्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होईल. महाराष्ट्रातील तरुणांमध्ये हे स्किल नाही असे फडणवीस म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
दहावीचा रद्द झालेल्या भूगोल पेपरचे गुण कसे देणार? बोर्डाकडून स्पष्टीकरण
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता दहावीचा भुगोलाचा पेपर रद्द करण्यात आला होता. पण दहावीचा निकाल लावताना रद्द झालेल्या भुगोलाच्या पेपरचे गुण कसे देणार असा प्रश्न पालकांना पडला होता. त्यावर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयाचे सरासरी गुण देण्यात येणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रातील संकटाच्या काळात काँग्रेस प्रत्येक निर्णयात सरकारसोबत; राहुल गांधीची ग्वाही
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी