महत्वाच्या बातम्या
-
राज्याला आज नाटकाची नाही तर सहकार्याची गरज - आ. रोहित पवार
कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात उद्धव ठाकरे सरकारला अपयश आल्याचा आरोप करत भाजपने आज राज्यभरात आंदोलन केलं. भाजप नेत्यांनी केलेल्या आरोपांना शिवसेनेनं उपरोधिक शब्दांत उत्तर दिलं आहे. देवेंद्र भौ, आमचं चुकलंच, असं म्हणत शिवसेनेनं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांना उत्तर दिलं.
5 वर्षांपूर्वी -
खासगी इस्पितळातील लूटमार थांबणार, खासगी इस्पितळांतील ८०% खाटांचा ताबा सरकारकडे
कोरोनाच्या साथीमुळं राज्यातील आरोग्यसेवेची बिकट झालेली परिस्थिती व खासगी रुग्णालयांकडून पुरेसं सहकार्य मिळत नसल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या सर्व खासगी रुग्णालयांतील ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त व राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबत कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीत सुद्धा भाजपकडून आंदोलनासाठी लहान मुलांचा वापर, निष्काळजीपणाचा कहर
देशातील २० टक्के करोना रुग्ण महाराष्ट्रात असून राज्य सरकारची निष्क्रियता सातत्याने पहायला मिळत असल्याची टीका माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य सरकार आणि त्यांचे मंत्री आभासी जगात जगत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. सोशल मीडियावर पेड गँग तयार करुन आणि काही लोकांना आपला प्रवक्ता करुन आपण लढाई जिंकू असं सरकारला वाटत आहे असंही ते म्हणाले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोविड १९ डॅशबोर्ड मान्यतेसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्री, गृहमंत्र्यांना महाराष्ट्रनामाची विनंती
केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण जगभरात कोरोना आपत्तीने थैमान घातलं आहे. देशाचा विचार करता सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या असून त्यात दिवसेंदिवस वाढ होतं आहे. मात्र सध्याच्या घडीला सर्वात मोठी अडचण म्हणजे सामान्य माणसाला राज्यभरात किती आयसोलेशन सेंटर्स आहेत, बेड्सची संख्या किती, किती बेड्स व्यापलेले आणि किती शिल्लक, कोरोना केअर सेंटरचा पत्ता, फॅसिलिटी कोड कोणता, ऑक्सिजन आणि वेल्टीलिटर उपलब्धता, कोरोना टेस्ट लॅब, संबंधित लॅब मध्ये कोणत्या प्रकारची टेस्ट ICMR ने मान्य केली आहे, याबाबद्दल एका क्लिकवर कोणतीही माहिती सामान्य लोकांना आज प्राप्त होतं नाही.
5 वर्षांपूर्वी -
दुःखद बातमी! कोरोनामुळे एकाच दिवशी पोलिस दलातील ३ अधिकाऱ्यांचा मृत्यू
सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशभरात राज्याचा कोरोनाच्या रुग्णसंख्येत पहिला क्रमांक आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राज्यापेक्षा महाराष्ट्रात तिप्पट रुग्ण आहेत. तरीही रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढत आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणता येईल. बुधवारी संध्याकाळी राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीत राज्यात दिवसभरात ६५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात आज २२५० नवे रुग्ण; कोरोना रुग्णांचा आकडा ३९,२९७ वर
सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. देशभरात राज्याचा कोरोनाच्या रुग्णसंख्येत पहिला क्रमांक आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या राज्यापेक्षा महाराष्ट्रात तिप्पट रुग्ण आहेत. तरीही रुग्ण बरं होण्याचं प्रमाण वाढत आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणता येईल. बुधवारी संध्याकाळी राज्याच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीत राज्यात दिवसभरात ६५ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.
5 वर्षांपूर्वी -
राज्यासाठी आपण काय करतो, याचं आत्मपरीक्षण केल्यास ते हितावह ठरेल; फडणवीसांना टोला
महाराष्ट्रापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. तर दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. ‘शरद पवार यांचं पत्र पंतप्रधान मोदींसाठी नेहमीच मार्गदर्शक ठरत असतं. त्यामुळे साहेबांच्या पत्राची चिंता न करता राज्यासाठी आपण काय करतो,याचं आत्मपरीक्षण केलं तर ते राज्यासाठी नक्कीच हितावह ठरेल’ अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
बीडच्या कंटेन्मेंट झोनमध्ये भाजप आमदाराचा लोकांशी संवाद; गुन्हा दाखल
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे बीडमध्येही कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. शहरात तणावपूर्ण वातावरण असताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी कंटेन्मेंट झोनमध्ये प्रवेश केला होता. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारकडून नवीन नियमावली; मॉल्स, दुकानं, मैदानं, रिक्षा-टॅक्सीबाबत हे नियम
देशातील कोरोनाबाधित रुग्णाने लाखाची संख्या ओलांडली आहे. आरोग्य मंत्र्यालयाने सकाळी दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या एक लाख एक हजार १३९ झाली आहे. मागील २४ तासांत ४९७० नवीन करोनाग्रस्त आढळले तर १३४ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठ दिवसातील कोरोनाग्रस्त विदेशातून आलेले किंवा मुंबईसारख्या मोठ्या शहरातून गाव-खेड्यात पोहलले रूग्ण आहेत. स्थलांतरामुळे शहरातील कोरोना गाव खेड्यात पोहचल्याचे चित्र आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना संकट: महाराष्ट्र बचाओ आंदोलनाआडून मुख्यमंत्र्यांना घेरण्याची भाजपची तयारी
राज्यातील महाविकास आघाडीला जागे करून कोरोना रोखण्यासाठी काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टी मंगळवारपासून राज्यभर ‘महाराष्ट्र बचाओ आंदोलन करणार आहे, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रकांतदादा पाटील आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पक्ष पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात केंद्रीय पोलीस दलाच्या १० तुकड्या दाखल
महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे सीआरपीएफ आणि केंद्र सरकारच्या अखात्यारीतील इतर अर्धसैनिकी दलाच्या २० तुकड्या मागविल्या होत्या. त्यापैकी ५ तुकड्या दिल्लीहून निघाल्या आहेत. आज रात्री त्या मुंबईत येऊन पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सीआरपीएफच्या ३ तुकड्या आणि सीआयएसएफ २ तुकड्यांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
सामान्य लोकांना इस्पितळ व बेड्स'बाबतीत काहीच माहिती मिळत नाही - फडणवीस
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरली आहे. मुंबईच्या धारावीत कोरोनाचा अक्षरश: कहर सुरू असून याठिकाणी दररोज ५० ते १०० नवीन रुग्ण आढळत आहेत. मागील २४ तासांत धारावीत कोरोनाचे ४४ नवे रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकट्या धारावीची कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२०० च्या वर पोहोचली असून आतापर्यंत सुमारे ६० जणांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात लॉकडाउन ४ दरम्यान काय सुरु राहणार आणि काय बंद...सविस्तर
राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मात्र याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली असून ३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे. राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यात एकमत झालं होतं.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील लॉकडाऊन ३१ मे पर्यंत वाढला
राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मात्र याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली असून ३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवार साहेबांच्या त्या पत्रात साखर उद्योगासह कुक्कुटपालन व इतर उद्योगांचाही उल्लेख
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी साखर उद्योगांसाठी पाऊल उचलले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी काही शिफारशी आणि मागण्या केल्या होत्या. याबाबत त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहलेल्या पत्रातील काही तपशीलवार मुद्दे शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेअर केले होते.
5 वर्षांपूर्वी -
मे अखेरपर्यंत पुण्यात ५ हजारांपर्यंत कोरोना रुग्णसंख्या असेल - महापालिका आयुक्त
कोरोना रुग्णांचा आकडा दिवसा गणिक वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने भविष्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढण्याचा धोका लक्षात घेऊन कोविड रुग्णांलयाची उभारणी करण्यावर भर दिली आहे. तसेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पावसाळ्यात जूनमध्ये रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविली आहे.
5 वर्षांपूर्वी -
भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळण्यासाठी राज्य सरकार कामगार ब्यूरोची स्थापना करणार
कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील लाखो मजूर आपापल्या राज्यात परतले आहेत. त्यामुळे भूमीपुत्रांना महाराष्ट्रात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. या संधी मिळवून देण्यासाठी राज्य सरकार कामगार ब्यूरोची स्थापना करणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
एकही मत ज्याच्या नावावर मिळाल्याची नोंद नाही ते मुख्यमंत्री झाले - निलेश राणे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह इतर आठही उमेदवार विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आले आहेत. सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आल्याची माहिती आज, गुरुवारी अधिकाऱ्यांनी दिली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज दुपारी तीन वाजेपर्यंत होती. त्यानंतर अधिकृत निकालाची घोषणा करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
भाजपमध्ये उद्रेक होणार? माजी मंत्री राम शिंदेंचा थेट चंद्रकांत पाटलांना लगावला टोला
भाजपमधील अंतर्गतवाद आता चव्हाट्यावर येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपच्या नेत्यांवर जाहीर टीका केली. त्यानंतर प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खडसे यांनी जोरदार उत्तर दिले. पक्षाने एकाच घरात किती जणांना उमेदवारी द्यायची, असा सवालही उपस्थित केला. त्याचवेळी चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे यांनीही उमेदवारी देण्यात आलेली नाही, असे सांगितले. त्यांनीही दु:ख व्यक्त केल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर आता आयुर्वेदिक उपचार केले जाणार
महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २५ हजार ९२२ पर्यंत वाढली आहे. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्याही ९७५ वर गेली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळतो आहे. दुसरीकडे गुजरातमधील संसर्गही चिंतेचा विषय आहे. येथे ८ हजार ९०३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी राज्यात ५३७ जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी