महत्वाच्या बातम्या
-
भाजपाची धडपड व्यर्थ, दोन दिवसांत विधान परिषद निवडणूक जाहीर होणार
राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात कितीही मतभेद असले तरी येथील राजकीय पेच सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एकमत झाले आहे. त्यानुसार विधान परिषदेच्या ९ जागांची निवडणूक घेण्याबाबत निवडणूक आयोगाला विनंती करण्यात आली असून केंद्रातूनच सूत्र हलल्याने येत्या दोन दिवसांत या जागांसाठी निवडणूक जाहीर होणार असल्याचे कळते. सुरक्षित वावर आणि इतर सर्व नियम पाळून २० ते २२ मे पूर्वी या निवडणुका पार पडतील आणि राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीचा अस्थिर खेळ थांबेल असं म्हटलं जातं.
5 वर्षांपूर्वी -
प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा...आज त्या घटनेला ६० वर्षे पूर्ण झाली
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा साठावा वर्धापनदिन अर्थात ‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र दिन’ आज साधेपणानेच साजरा होत आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० रोजी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला होता. या घटनेला आज ६० वर्षे पूर्ण झाली.
5 वर्षांपूर्वी -
विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांचे निवडणूक आयोगाला पत्र
महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुका लवकर जाहीर करा या आशयाचं एक पत्र महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहिलं आहे. “केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या ९ रिक्त जागांसाठीच्या निवडणुका लवकरात लवकर जाहीर कराव्यात” अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे. करोनाच्या संकटामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याची तारीख काय असेल ते जाहीर करण्यात आलेलं नाही. आता लवकरात लवकर या निवडणुकांची तारीख जाहीर करा असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
मालेगावात आतापर्यंत ४२ पोलिसांना कोरोना, तर सोलापुरात एकाच दिवशी २१ रुग्ण
कोरोनाचं ‘हॉटस्पॉट’ असलेल्या मालेगावात बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असतानाच, आता करोनाविरोधी लढणाऱ्या योद्ध्यांनाही या विषाणूच्या साखळीनं घट्ट विळखा घातला आहे. मालेगावात आतापर्यंत ४२ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
उद्याचा महाराष्ट्र दिनी इतिहासाचं स्मरण करून कामाला लागू - शरद पवार
‘कोरोनाच्या रूपानं आज राज्यावर संकट आलंय. मात्र, संकटांवर धैर्यानं मात करण्याचा महाराष्ट्राचा इतिहास आहे. उद्याचा महाराष्ट्र दिन साजरा करताना या इतिहासाचं स्मरण करून कामाला लागू या. यश नक्कीच मिळेल,’ असा जबरदस्त आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केला.
5 वर्षांपूर्वी -
संकट आहे, पण त्यावर मात करण्याचा आपला इतिहास; नक्कीच जिंकू: शरद पवार
लॉकडाउनमुळे उद्योग, व्यापार, व्यवहार पूर्णपणे ठप्प असून याचा विपरित परिणाम महाराष्ट्राच्या अर्थकारणावर होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्य़क्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. शरद पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी आर्थिक संकट उभं राहणार असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित चर्चा करुन मार्ग काढला पाहिजे असं आवाहनही केलं. सोबतच मुंबई, पुण्यात महापालिका आणि शासकीय यंत्रणेने मोठ्या प्रमाणात कार्यक्रम हाती घेतला असल्याने संख्या वाढत असल्याचं सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
राज्यात कोरोनाचे ५९७ नवे रुग्ण, २४ तासात ३२ मृत्यू, आकडा ९,९०० च्याही पुढे
राज्यात नव्याने आढळलेल्या ५९७ नव्या रुग्णांसह कोरोनाग्रस्तांचा आकडा ९ हजार ९१५ वर पोहचला आहे. मागील २४ तासांत ३१ नव्या रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. यात मुंबईतील २६ रुग्णांसह पुण्यातील ३, सोलापूर आणि औरंगाबादमधील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. राज्यातील मृत्यांचा आकडा हा ४३२ इतका झालाय. राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत चढ-उतार पाहायला मिळत आहे. दिवसागणिक मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळत असून त्यापाठोपाठ पुणे आणि नागपूरमधील मालेगावातही रुग्णांचा आकडा वाढतानाचे चित्र आहे.
5 वर्षांपूर्वी -
पोलिसांची पूर्वतयारी, रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगची रणनिती सुरु
लॉकडाउनमुळे विविध राज्यांमध्ये गेले ३६ दिवस अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या घरी जाण्याची मुभा देणारा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार आता या अडकलेल्या नागरिकांना आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे. या नागरिकांची पाठवणी करणे, तसेच त्याना राज्यात प्रवेश देण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना नोडल प्राधिकरणाची स्थापना करावी अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
खुशखबर!! शाळांच्या परीक्षा रद्द झाल्या, पण विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळणार
पहिली ते नववी आणि अकरावीच्या गुणपत्रिका देण्याच्या सर्व शाळांना सूचना सरकारकडून देण्यात येणार आहे. शिक्षण विभाग लवकरच याबाबत सूचना जारी करणार आहे. लॉकडाऊनमुळे पहिली ते नववी आणि अकरावीची परीक्षाच झालेली नाही. मात्र या वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मागील परीक्षांचे मूल्यमापन करून गुण दिले जाणार आहेत. त्यामुळे शाळांनी या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका तयार कराव्यात आणि त्या ऑनलाईन वितरित कराव्यात अशा सूचना लवकरच शाळांना दिल्या जाणार आहेत. या गुणपत्रिकांवरुन पुढच्या वर्गात प्रवेश घेता येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना योद्धांवरील हल्ले खपवून घेणार नाही: गृहमंत्री अनिल देशमुख
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आणीबाणीच्या विधानाचा गृह मंत्री अनिल देशमुख यांनी खरपूस समाचार घेतला आहे. राज्याचं पाच वर्षं नेतृत्व केलेल्या व्यक्तीने अशा पद्धतीनेटीका करणे अयोग्य असून, आपत्तीच्या वेळी राजकारण करणे योग्य नसल्याचे अनिल देशमुख म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे यांची कोरोनावर मात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी करोनावर मात केली आहे. करोनाची लागण झाल्याने आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नी सोनल परांजपे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मंगळवारी रात्री आनंद परांजपे आणि त्यांच्या पत्नी सोनल परांजपे यांना होरायझन रुग्णालयामधून डिस्चार्ज देण्यात आला. आनंद परांजपे एका नेत्याच्या संपर्कात आल्याने करोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
शुभ वार्ता! पुणे विभागातील २३० कोरोना बाधित रुग्ण बरे
मुंबईपाठोपाठ पुणे जिल्हाही कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. पुण्यात गेल्या आठवड्यात कोरोनाबाघितांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. रुग्णसंख्या ६०६ वरुन थेट १३१९ वर पोहोचली आहे. म्हणजेच पुणे जिल्ह्यात दिवसाला सरासरी १०० रुग्ण आढळून येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
समस्त पृथ्वीवरच नैसर्गिक रोगराईचं संकट, भेंडवळचं भाकित
इतर देशांपेक्षा भारतातील कोरोनाव्हायरस घातक नाही, असं तज्ज्ञांनी म्हटलं होतं. मात्र काही राज्यांमधील कोरोनाव्हायरसची परिस्थिती पाहता या राज्यांमध्ये कोरोनाव्हायरसचा घातक स्ट्रेन सक्रिय झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. यामध्ये गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना लढ्यात पोलिसांचं बलिदान; त्या पोलीस कुटुंबीयांना ५० लाख तर वारसाला सरकारी नोकरी
कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेले हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर आणि संदीप सुर्वे यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपये आणि त्यांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केले. मात्र, सरकार या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी ठामपणे उभे राहील, असे आश्वासन देशमुख यांनी दिले.
5 वर्षांपूर्वी -
मॅट्रिमोनी वेबसाईटवर स्थळ केव्हा नाकारलं किंवा स्वीकारलं जातं?...ही आहेत कारणं
आज देशभरात एकूण पुरुष आणि स्त्रियांमधील प्रमाण अत्यंत वाईट आहे. त्यामुळे लग्नाच्या विचारात असणाऱ्यांना लग्न जुळवताना अत्यंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अगदी त्यात खूप शिक्षण आणि पगार असणाऱ्या वधू-वरांची देखील तीच अवस्था असल्याचं पाहायला मिळतं. मात्र देशभरातील मँट्रिमोनी साईट्स म्हणजे ऑनलाईन वधू-वर नोंदणीची सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या संशोधनात अजून काही गोष्टी समोर आल्या आहेत, ज्यामुळे वधू किंवा वराने जरी एखाद्याला इंटरेस्ट पाठवले तरी त्यावर प्रतिक्रिया (होकार-नकार) येत नाहीत, अथवा नकारच अधिक येतात.
5 वर्षांपूर्वी -
संकटाच्या काळातही काही जणांकडून राजकारण, मुख्यमंत्र्यांची टीका
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. लॉकडाऊनच्या काळात सहकार्याबद्दल सर्वधर्मियांनांचे आभार मानले आहेत. आपले सण आपापल्या घरात राहूनच साजरे करा. आता रमजानचा महिना आहे. घरात राहूनच नमाज पडा अशी विनंती व्यक्त केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मुस्लिम बांधवांना आवाहन केलं आहे. सण बाजूला ठेवून देशाला प्राधान्य दिलं जातंय हे समाधानकारक आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील, हे वैभल्यग्रस्त विरोधी पक्षाने लक्षात ठेवावे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नामनियुक्त विधान परिषद सदस्यतेबाबत राज्यपालांना जो निर्णय घ्यायचा आहे तो घेऊ द्या. पण घटना आणि कायद्याची चौकट कोणालाच मोडता येणार नाही. राजभवनाच्या भिंतीवर कितीही डोके फोडले तरी २७ मे नंतरही सरकार हेच राहील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच राहतील. हे वैभल्यग्रस्त विरोधी पक्षाने लक्षात ठेवावे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला खडसावले आहे. शिवसेनेचे मुखपत्र सामनातील रोखठोक या लेखातून त्यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा पेशंट कार्यकर्ता रात्री R R हॉस्पिटलला येतो त्यानंतर कट शिजतो - सविस्तर
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कल्याण-डोंबिवलीत २३ एप्रिलपर्यंतच्या आकेडवारीनुसार करोनाचे १२४ रुग्ण असून तीन मृत्यू झाले आहेत. मात्र सध्या राजकीय दृष्ट्या मनसेचे आमदार यांना मिळत असलेली प्रसिद्धी विरोधकांना पाहावत नसल्याची चर्चा रंगली आहे. रुग्णालय आणि महापालिकेत झालेल्या सामंजस्य करारानुसार (MoU) महापालिकेने ही सुविधा BAJ Symbiotic Pvt Ltd. कडून भाडेतत्वावर घेतली आहे. जोपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवलं जात नाही तोपर्यंत हा करार वैध असणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाशिक: भीषण आगीमुळ लॉकडाउनदरम्यान अनेक कुटुंब बेघर
नाशिकच्या भीमवाडी झोपटपट्टीला आज सकाळी अचानक भीषण आग लागली असून या आगीत २५ ते ३० झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आग लागल्यानंतर एकामागोमाग एक सात गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. त्यामुळे एकच हाहाकार उडाला. आग आणि धुराचे लोळ पसरल्याने येथील रहिवाश्यांमध्ये एकच धावपळ उडाली. तब्बल दीड तासांपासून ही आग विझवण्याचे काम सुरू असून आग लवकर आटोक्यात येत नसल्याने येथील संतप्त रहिवाश्यांनी दोन अग्निशमन दलाच्या जवानांवर दगडफेक केल्याचे वृत्त आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई-पुण्यात १८ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो - आरोग्यमंत्री
सध्या देशात लॉकडाउनचा दुसरा टप्पा सुरु आहे. हा लॉकडाउन येत्या तीन मे रोजी संपणार आहे. पण मुंबई आणि पुणे या दोन शहरात लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. मुंबई, पुण्यामध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे या दोन शहरात १८ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी लाइव्ह मिंटशी बोलताना ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी