महत्वाच्या बातम्या
-
लढाई संपवायची आहे; लपून बसू नका, स्वत:हून पुढं या - उपमुख्यमंत्री अजित पवार
कोरोनाविरुद्धच्या लढ्यातील महत्त्वाचा, निर्णायक टप्पा सुरु झाला असून ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत किंवा कोरोनाच्या दृष्टीने संशयित आहे, त्यांनी आतातरी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधावा. कोरोनाविरुद्धचा लढा लवकर संपला पाहिजे, त्यासाठी संशयितांनी पुढे यावे. अन्य नागरिकांनी घरातच थांबून सहकार्य करावे, संशयित व्यक्तींची माहिती शासकीय यंत्रणेला त्वरित कळवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पिंपरी-चिंचवडमध्ये ४२ डॉक्टर्स आणि ५० कर्मचारी क्वारंटाइन
पिंपरी-चिंचवड शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून यामुळे ४३ डॉक्टर आणि ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. ३१ मार्चला अपघातग्रस्त व्यक्तीच्या पोटाची शस्त्रक्रिया खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरने केली होती. त्यानंतर त्या रुग्णाला ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळली. तातडीने त्याचा चाचणी अहवाल पाठवण्यात आला तेव्हा तो करोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक बाब समोर आली.
5 वर्षांपूर्वी -
मुंबईत एकाच दिवशी १०३ पॉझिटिव्ह रुग्ण वाढले, राज्याचा आकडा ७४८ वर
कोरोना विषाणूचा विळखा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. मुंबईसाठी तर धोक्याची घंटा वाजत आहे. आजच्या एकाच दिवशी मुंबईत तब्बल १०३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्राचा आकडा ७४८ वर पोहोचला आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आले आहेत. तर राज्यात सर्वाधिक रुग्ण हे एकट्या मुंबईत आहेत. महाराष्ट्रात मुंबईसह एकूण ११३ रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ५६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
दुहीचा आणि अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही: मुख्यमंत्री
राज्यात कोरोनाचा फैलाव सातत्याने वाढत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ५३७ वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा ही चिंताजनक बाब आहे. राज्यामध्ये रात्रभरात ४७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
काळजी घ्या! राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ५३७ वर पोहोचली
राज्यात कोरोनाचा फैलाव सातत्याने वाढत आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ५३७ वर पोहोचली आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा वाढता आकडा ही चिंताजनक बाब आहे. राज्यामध्ये रात्रभरात ४७ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच; राज ठाकरे मरकजच्या लोकांवर संतापले
करोनामुळे ओढवलेल्या संकटाच्या काळात पोलीस, नर्स आणि डॉक्टर जीव धोक्यात घालून अहोरात्र काम करत आहेत. त्यांच्यावर हात उगारलाच कसा जाऊ शकतो?, असा सवाल करतानाच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या पोलीस आणि डॉक्टरांसह कोणत्याही कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांना फोडून काढा, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
5 वर्षांपूर्वी -
CISF'च्या ६ जवानांचे कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह
खारघर येथे नियुक्त असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) आणखी ६ जवानांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी गुरुवारी ही माहिती दिली. याआधी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ५ जवानांना कोरोनाची लागण झाली होती.
5 वर्षांपूर्वी -
...तर पोलिसांच्या कुटुंबियांना मिळणार ५० लाख रुपये सानुग्रह अनुदान - उपमुख्यमंत्री
मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत होत चालली आहे. मुंबईतील मोठी लोकसंख्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या धारावीमध्ये कोरोनाचा तिसरा रुग्ण आढळला आहे. धारावीतील एका डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धारावीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. त्यात काही पोलिसांना आणि त्यांच्या कुटुंबियांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. मात्र राज्य सरकारने यावर काही तरतुदी देखील करण्यास सुरुवात केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांकडून इस्पितळांबाबत संवाद; तर मोदी थाळी-टाळी आणि आता दिवा-बत्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली त्यावेळी त्यांनी २९ मार्च रोजी संध्याकाळी ५ वाजता लोकांना थाळी, टाळी आणि घंटानाद करुन आरोग्य कर्मचारी जे कोरोनाच्या संकटात जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा करत आहे त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी असं आवाहन केलं होतं तेव्हा मोदींच्या आवाहनाला लोकांनी प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. परंतु त्यावेळी काही लोकांनी घराबाहेर पडून, रस्त्यावर एकत्र जमून थाळीनाद, रॅली काढून सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांना हरताळ फासला. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे लॉकडाऊन उद्देशावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता याबाबत खबरदारी घेतल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता रविवारी पुन्हा दिवा-बत्ती आणि मोबाईल फ्लॅशचा मार्केटिंग कार्यक्रम आखला आहे.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचा आकडा ४१६'वर पोहोचला
राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वेगानं वाढत आहे. आज दिवसभरात राज्यात ८१ नव्या करोनाच्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळं करोना रुग्णांचा आकडा ४१६वर गेला आहे. एकट्या मुंबईत आज दिवसभरात ५७ रुग्णांना करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तर आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील ३० शासकीय 'कोविड-१९ रुग्णालय' म्हणून घोषीत
कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील ३० शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषित केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून २ हजार ३०५ खाटा करोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जिल्हा नियोजन निधीतून ५० लाख उपलब्ध; आ. राजू पाटील कल्याण-डोंबिवलीसाठी तत्पर
कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात असलेल्या कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने ५० लाखांचा निधी मंजूर करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी जिल्हा नियोजन अधिकारी (ठाणे) यांच्याकडे केली होती. कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असताना कल्याण डोंबिवली परिसरात रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय यंत्रसामुग्री आणि साहित्यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली होती.
5 वर्षांपूर्वी -
डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा आकडा १९ वर
मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या उपनगरातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे. डोंबिवली आणि कल्याण परिसरात आज आणखी ५ नवे रुग्ण आढळून आले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ५ नविन रूग्ण आढळून आले आहे. यामुळे महापालिका क्षेत्रातील कोरोनाबाधित रूग्णसंख्या आता १९ वर पोहोचली आहे. नवीन रूग्णांपैकी ४ रूग्ण हे डोंबिवली पूर्व भागातील असून ०१ रूग्ण कल्याण पुर्व भागातील आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील १९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. अशातच संकटात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्याला सरकारकडून दिलासा मिळाला आहे. राज्यातील जवळपास १९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवारांनी बुधवारी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात ट्विट करत ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
इटली, अमेरिका, स्पेनमध्ये करोनामुळे अनेकांचा मृत्यू; शहाणे व्हा, बेजबाबदारपणे वागू नका
इटली, अमेरिका, स्पेनमध्ये करोनामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तेथील करोना बळींपासून धडा घ्या. आता तरी शहाणे व्हा. बेजबाबदारपणे वागू नका आणि घरात बसून सरकारला सहकार्य करा, असं आवाहन करतानाच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात काही लोक बेजबाबदारपणे वागत आहेत. त्यामुळे करोनाविरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा खपवून घेतला जाणार नाही. बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
शहरात चिकन-भाजीपाला महाग, पण शेतकऱ्यांना पैसा मिळतोय कुठे: आ. रोहित पवार
कोरोनाच्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून अनेकांना पुन्हा कर्जबाजारी होण्याची वेळ निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून नुकसान भरपाईची मागणी होत आहे. गत काही दिवसापासून जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. अवकाळी पावसाने अनेक तालुक्यात रबी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. सण २०१९-२० या खरीप हंगामात देखील सततच्या पावसाने शेतीपिकाचे अतोनात नुकसान झाले होते. त्यामुळे मोठ्या हिंमतीने शेतकऱ्यांनी रबी हंगामात उसणवार करून पिकांची पेरणी केली. मात्र काढणीला आलेल्या विविध ठिकाणची अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत आणि त्यात कोरोनाची आपत्ती असा संकटात शेतकरी अडकला आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुस्लिम धार्मिक कार्यक्रमात उपस्थिती लावलेले पुण्यातील ६० लोक विलगीकरणात
निजामुद्दीनमधील तबलिग जमात मरकजच्या मौलानावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सरकारच्या आदेशांचं उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारने जमावबंदीचे आदेश देऊनही आणि सोशल डिस्टन्सिंगच्या सूचना असतानाही त्या न पाळल्याचा मौलानांवर आरोप आहे.
5 वर्षांपूर्वी -
ती व्यक्ती COVID १९ पॉझिटिव्ह तरी अजून घरीच; आ. राजू पाटील यांचा सतर्कतेचा इशारा
दरम्यान, राज्यात करोनाबाधीत रुग्णांची संख्या आज २३० वर पोहचली असून यातील १२२ रुग्ण मुंबई आणि ठाणे परिसरातील असल्याने या दोन्ही महानगरांमध्ये अधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मुंबई, ठाण्यानंतर पुण्यात करोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. पुण्यात आतापर्यंत करोनाचे ४६ रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर सांगलीत करोनाचे २५, नागपूरमध्ये १७, अहमदनगरमध्ये ५, रत्नागिरीत १, औरंगाबादमध्ये १, यवतमाळमध्ये ३, साताऱ्यात १, सिंधुदुर्गात १, कोल्हापुरात २, जळगावात १, बुलडाण्यात ३ करोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
खाजगी कर्मचाऱ्यांना घरबसल्या पूर्ण पगार द्या; अन रस्त्यावर जीव धोक्यात तरी पगार कपात?
‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करुन त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्वतःच्या जीव धोक्यात घालणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा व पोलिसांचा पगार का कापता?
‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात ६० टक्के कपात करुन त्यांना ४० टक्के वेतन देण्यात येणार आहे.
5 वर्षांपूर्वी