महत्वाच्या बातम्या
-
पुण्यात कोरोनाचा पहिला बळी; ५२ वर्षीय व्यक्तीचा उपचारा दरम्यान मृत्यू
पुण्यामध्ये कोरोना विषाणूने पहिला बळी घेतला आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान ५२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. २२ मार्च रोजी या व्यक्तीला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मृत्यू झालेल्या रुग्णांला मधूमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यात या रुग्णाला कोरोनाची लागण झाली होती. सोमवारी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला, पुण्याच्या महपौर मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
....अन्यथा पुढच्या पिढीलाही याची मोठी किंमत मोजावी लागेल; पवारांचा इशारा
राज्यातील आणि देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा फेसबुक लाईव्ह द्वारे लोकांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी लोकांना घरातच राहण्याचं आणि कोरोनाबाबत योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. तसंच यावेळी शरद पवार यांनी लोकांनी विचारलेल्या प्रश्नांनाही उत्तर दिली.
5 वर्षांपूर्वी -
परराज्यातील गरजू कामगारांसाठी राज्यात २६२ मदतकेंद्र सुरु; राहण्याची-जेवणाची सोय
केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारे आणि केंद्र शासित प्रदेशाच्या प्रशासनाला लॉकडाऊनदरम्यान प्रवासी कामगारांना रोखण्यासाठी प्रभावीपद्धतीने राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा सील करण्यास सांगितले आहे. मुख्य सचिव आणि पोलिस महासंचालकांबरोबर झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सदरम्यान कॅबिनेट सचिव राजीव गोबा आणि केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी शहरांत आणि राज्यमार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यास सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
नगरमध्ये आणखी दोघांना करोनाची लागण; संपर्कातील ९ जण सुद्धा ताब्यात
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे हे रुग्ण ठणठणीतही होत असल्याचेही दिसत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले राज्यातील ३४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये मुंबईतील १४ रुग्ण, पुण्यातील १५, नागपूरमधील १, औरंगाबाद १, यवतमाळमधील ३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९६ वर गेली आहे.
5 वर्षांपूर्वी -
केडीएमसी हद्दीत कोरोना टेस्टींग लॅब आवश्यक; आ. राजू पाटील यांची मुख्यमंत्र्यांना विनंती
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असली तरी दुसरीकडे हे रुग्ण ठणठणीतही होत असल्याचेही दिसत आहे. कोरोना विषाणूची लागण झालेले राज्यातील ३४ रुग्ण बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यामध्ये मुंबईतील १४ रुग्ण, पुण्यातील १५, नागपूरमधील १, औरंगाबाद १, यवतमाळमधील ३ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १९६ वर गेली आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील ३४ रुग्णांनी कोरोनाविरुद्ध लढा जिंकला; इस्पितळातून डिस्चार्ज
राज्य सरकार, आरोग्य यंत्रणा आणि स्थानिक प्रशासन करोनाशी यशस्वी लढा देत आहेत. राज्यात आतापर्यंत १९६ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील ३४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्यात मुंबईतील १४, तर पुण्यातील १५ जणांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादी, काँग्रेसचे लोक मला साथ देत आहेत; राजही मला फोन करून सूचना देतो
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, परराज्यातील कामगारांनी स्थलांतर करु नये. वर्दळ थांबवावी. नागरिकांनीही घराबाहेर पडू नये. पोलिस त्यांना सहकार्य करतील. त्यांना गांभीर्याने वागले नाही तर सरकारला कठोर पावले उचलावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्ती: कामगारांनी स्थलांतर थांबवावं, राज्य सरकार त्यांची सोय करेलः मुख्यमंत्री
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, परराज्यातील कामगारांनी स्थलांतर करु नये. वर्दळ थांबवावी. नागरिकांनीही घराबाहेर पडू नये. पोलिस त्यांना सहकार्य करतील. त्यांना गांभीर्याने वागले नाही तर सरकारला कठोर पावले उचलावी लागतील, असा इशाराही त्यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मानाचा मुजरा करतो..पोलिसांचे काम देखील डॉक्टरांइतकेच
करोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढतच असून आतापर्यंत राज्यातील रुग्णांच आकडा १८६ वर गेला आहे. तर, आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या भीतीनं संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू असतानाही वाढता जाणारा रुग्णांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. करोनाशी दोन हात करण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेसचे लोक तर माझ्यासोबत आहेतच शिवाय विरोधी पक्षही मला साथ देतो आहे. राजही मला फोन करतो आहे. सूचना देतो आहे. सर्वांनी एकजूट होऊन काम केलं पाहिजे आणि करोनाशी लढा दिला पाहिजे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राशी संवाद साधला.
5 वर्षांपूर्वी -
सरकारच्या आवाहनानंतर मनसेकडून सोशल डिस्टन्स राखत मोठं रक्तदान शिबीर
‘राज्यात सध्या सात ते आठ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे. येणाऱ्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज लागू शकते. त्यामुळं रक्तदात्यांनी पुढं यावं आणि प्रशासनानंही रक्तदान शिबिरासाठी पूर्ण सहकार्य करावं,’ असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं होतं. त्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. फक्त रक्तदान करताना गर्दी करु नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा, असे आवाहन देखील त्यांनी केले होते.
5 वर्षांपूर्वी -
नातवासाठी रक्त शोधत भटकणाऱ्या आजोबाला पोलिसांनी पकडले; पण त्यांनीच रक्त मिळवून दिले
महाराष्ट्रात संचारबंदी लागू झाल्यापासून मुंबई पोलिसांनी शहरात कडक कारवाई सुरू केली आहे. २० ते २६ मार्चपर्यंत संपूर्ण शहरात अटक केलेल्यांची संख्या २८९वर पोहोचली आहे. २२ आरोपी अद्याप हाती न लागल्याने पोलिसांचा तपास सुरू आहे. तर आतापर्यंत जामीन मिळालेल्यांची संख्या १७६ आहे. या धावपळीत एका करोना संशयितास ताब्यात घेऊन तातडीने रुग्णालयात रवाना करण्याचे कामही पोलिसांनी केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १५३ वर; २८ नव्या रुग्णांची नोंद
महाराष्ट्रात आज दिवसभरा करोनाचे २८ नवे रुग्ण आढळले असून राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १५३ झाली आहे. दुसरीकडे आतापर्यंत २४ करोनाबाधीत रुग्ण उपचारांती बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, करोनामुळे राज्यात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
सांगलीत तब्बल १२ जणांना कोरोनाची लागण; परीसरातील सर्व सिमा सील
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. राज्यात आज एकूण १७ नवीन रुग्ण आढळले आहे. सांगलीमध्ये आज नवे १२ रुग्ण आढळले आहे. तर नागपूरमध्ये ५ रुग्ण आढळले असून राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्याही तब्बल १४७ वर पोहोचली आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना व्यतिरिक्तही अनेक आजार आहेत याचा डॉक्टरांना विसर..घाबरून स्थानिक क्लीनिक्स बंद
कोरोनामुळे देशभरात भीतीचं वातावरण असताना या आजाराला घाबरून आपल्या क्लिनिकवर गर्दी होऊ नये म्हणून स्थानिक डॉक्टर्स त्यांचे दवाखाने बंद ठेवून आहेत. मात्र त्यामुळे इतर रोजचे आजार आणि त्यांच्या निदानासाठी जायचं तरी कुठे असा प्रश्न सामन्यांना पडला आहे. राज्यातील करोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढतच असून आज त्यात पाच जणांची भर पडली आहे. करोना रुग्णांचा आकडा आता १३५ झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. तसंच, खासगी डॉक्टरांनी आपल्या क्लिनिक सुरू ठेवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
5 वर्षांपूर्वी -
राज्य सरकारकडून भारतीय लष्कराला वैद्यकीय मदतीसंदर्भात लेखी पत्रं
कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर देखील मैदानात उतरले आहे. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी लष्कराने ‘ऑपरेशन नमस्ते’ लॉन्च केल असून सरकारला मदत करणे ही आमची प्राथमिकता असल्याचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
पिंपरी-चिंचवडमधील ३ करोनामुक्त झालेल्या व्यक्तींना डिस्चार्ज; स्टाफकडून टाळ्या
पिंपरी-चिंचवडमधील तीन करोनामुक्त झालेल्या व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. परंतु, त्यांना आणखी दोन आठवडे होम क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगितले आहे अशी माहिती डॉ. विनायक पाटील यांनी दिली आहे. गेल्या १४ दिवसांपासून पाटील हे त्यांच्यावर उपचार करत होते. आज तिघांना रुग्णवाहिकेतून घरी सोडण्यात आले असून त्यापूर्वी तिघांचे आणि डॉ. विनायक पाटील यांचे पोलीस, आरोग्य कर्मचारी आणि इतर स्टाफने टाळ्या वाजवून उत्साह वाढवला.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होणार: शरद पवार
देश आणि राज्यावर आलेलं करोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे. केवळ माणसांवरच नाहीतर पशू-पक्ष्यांवरही त्याचा परिणाम होणार आहे, असं सांगतानाच करोनामुळे देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होणार असून प्रत्येकाचं आर्थिक गणितही बिघडणार आहे. या संकटाचा अर्थव्यवस्थेवर वर्षे-दीड वर्षे परिणाम राहील, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
डोंबिवली: तो तरुण कोरोना पॉझिटिव्ह असून हळदी व लग्नाला गेला...नंतर मेसेंजरवर मित्रांना
महाराष्ट्रात कोरोना रुग्णावर मेडिकल एज्युकेशन अँन्ड ड्रग्स विभागाने अभ्यास केला. त्यांच्या अहवालानुसार यात १२२ रुग्णांचा समाविष्ट करण्यात आला आहे. यामधील ३३ रुग्णांचे वय ३१ ते ४० वयोगटातील आहे. तर २१-३० आणि ४१-५० वयोगटातील रुग्णांची संख्या प्रत्येकी २४ इतकी आहे. तर ५१ ते ८० वयोगटातील संख्या ३१ आणि १ ते २० वयोगटातील संख्या १० आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज यांचं विधान सत्य ठरलं; पोलिसांच्या छाप्यात मशिदीतून ११ तुर्कस्तानी मौलवी ताब्यात
एकाबाजूला देशात कोरोना आपत्तीने धुमाकूळ घातलेला असताना आणि पोलीस यंत्रणा देखील त्यात व्यस्त असताना राज्यातील इतर काही घटना पोलीस व्यवस्थेचा ताण वाढविण्यास कारणीभूत ठरू शकतात. सध्या राज्यातील प्रत्येक कोपऱ्यात पोलीस रस्त्यावर पहारा देत असून, लॉकडाउन असल्याने लोकांच्या संबंधित घटनांकडे देखील लक्ष ठेवून आहेत.
5 वर्षांपूर्वी -
ज्यांच्यासाठी थाळ्या-घंटानाद केला; त्यांच्यावरच फिल्मी देशभक्तांकडून घर खाली करण्यासाठी दबाव
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा धोका वाढतोच आहे. दिवसभरात दुसऱ्या मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्णांची संख्याही वाढून १२५ झाली आहे. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात दाखल असलेल्या ६३ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यापूर्वी नवी मुंबईत एकीचा मृत्यू झाल्यामुळे कोरोना मृत्यूंची संख्या राज्यात ५ झाली आहे. सकाळी वाशीमध्ये एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान राज्यात सर्वाधिक चिंताजनक स्थिती असताना डॉक्टर्स, नर्सेस आणि पोलीस यंत्रणा अत्यंत महत्वाची भूमिका बजावत आहेत.
5 वर्षांपूर्वी