महत्वाच्या बातम्या
-
इंदुरीकर महाराजांच्या समर्थनात अकोले बंदची हाक
प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात गर्भलिंग चाचणीसंदर्भात वक्तव्याबाबात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींकडून टीकेची झोड उडाली होती.
5 वर्षांपूर्वी -
अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न न सुटल्यास मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडू: भारत सोन्नर
येत्या अधिवेशनात धनगर आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर थेट मुख्यमंत्र्याच्या घरासह इतर मंत्र्यांच्या घरात मेंढरं सोडू, असा इशारा यशवंत सेनेचे संस्थापक अध्यक्ष भारत सोन्नर यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा धनगर आरक्षणाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे. तसेच 26 फेब्रुवारीला धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी ‘सूंबरान’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही भारत सोन्नर यांनी दिली आहे. आज बीड येथे राज्य स्तरीय धनगर समाजाच्या कोअर कमेटीची बैठक झाली. या बैठकीनंतर भारत सोन्नर यांनी माध्यमांना आंदोलनाविषयी माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
वयाच्या या टप्प्यात व्हिजन सांगणं योग्य नाही, आता तरुणांना व्हिजन द्यायचं: शरद पवार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारण आणि समाजकारणातल्या नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदम्यानही त्यांनी सक्रिय निवडणुका आता लढणार नाही असं वक्तव्य केलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी आपल्या बदलत्या आणि नव्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले, वयाच्या या टप्प्यावर व्हिजन सांगणं योग्य नाही. तर आता तरुणांना व्हिजन द्यायचं आणि ते काय करतात ते बघायचं. त्यांच्या कामात फार काही हस्तक्षेप करायचा नाही. कारण न विचारता सतत सांगत गेलं की मान राहात नाही असंही त्यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता आमच्यात रमले आहेत: शरद पवार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करून दिलं. सरकारचं काम व्यवस्थित सुरू आहे. सर्व नीट चालू आहे. त्यामुळे आता मी लांब झालो. या सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही, असं सांगतानाच करतानाच काही मदत लागली, माझी गरज पडली तर उभं राह्यचं. यापेक्षा सरकारशी काहीही संबंध ठेवायचा नाही, असा निर्णय मी घेतला आहे, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
मनसेच्या औरंगाबाद जिल्हाध्यक्षाची हकालपट्टी; राज ठाकरेंची कारवाई
‘आपल्याच पक्षात काही लोक गद्दार आहेत. मीडियामध्ये चुकीच्या बातम्या देतात. या गद्दारांची नावं मला कळली असून त्यांची मी पक्षातून हकालपट्टी करणार आहे,’ असं म्हणत औरंगाबाद दौऱ्यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कारवाईचे संकेत दिले होते. त्यानंतर आता पक्ष विरोधी कारवाई केल्याने मनसे पदाधिकारी गौतम अमराव यांची जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तसंच त्यांचं प्राथमिक सदस्यत्वही काढून घेण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
पक्षाला बदनाम कराल तर गाठ माझ्याशी; सुप्रिया सुळे कार्यकर्त्यांवर संतापल्या
पैठणमधील कार्यकर्ता मेळाव्यात घोषणाबाजी करत गोंधळ घालणाऱ्या राडेबाज कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलीच दमबाजी केली आहे. ‘माझ्या बापाने रक्त आटवून पक्ष उभा केला आहे. पक्षाला बदनाम कराल तर गाठ माझ्याशी आहे,’ अशा शब्दात सुळे यांनी या गोंधळी कार्यकर्त्यांना दम भरल्याचं सूत्रांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
'जलयुक्त शिवार' फक्त नाव गोंडस होतं; जयंत पाटलांचं वक्तव्य; योजनेची चौकशी होणार?
फडणवीस सरकारच्या काळातील वृक्ष लागवडीपाठोपाठ जलयुक्त शिवार योजनेचीही चौकशी करण्यात येणार असल्याचे संकेत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले आहेत. जलयुक्त शिवार योजनेत भ्रष्टाचार झाल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच या योजनेत जी कामे झाली ती चौकशीस पात्र असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे.
5 वर्षांपूर्वी -
नागपूर: मशिदीवरील भोंगे बंद करा; सेनेची 'तात्पुरती' भूमिका...मनसेची कायमची आहे
परीक्षेच्या काळात मिशिदीवरचे लाऊड स्पिकर बंद ठेवण्यात अशी मागणी शिवसेनेच्या युवा नेत्याने केलीय. नागपूर जिल्ह्याचे युवा सेनाप्रमुख विक्रम राठोड यांनी ही मागणी केलीय. त्यासाठी त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख आणि जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलंय. त्यात ही मागणी करण्यात आलीय. परीक्षेचा हा काळ विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो. त्यांच्या भविष्यासाठी हे महत्त्वाचे दिवस असल्यामुळे हा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी त्यांनी केलीय.
5 वर्षांपूर्वी -
तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करा आणि मशीद बांधा, मुनगंटीवारांचं पवारांना प्रतिउत्तर
भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अयोध्येतील राम मंदिर ट्रस्टवरुन केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. “आयुष्यभर शरद पवारांनी मतांचे तुष्टीकरण केलं. खुर्चीसाठी पार्टी फोडली. तुम्ही तुमच्या पक्षातर्फे ट्रस्ट करा आणि मशीद बांधा. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ट्रस्ट स्थापन होतोय. मग आरोपांचे कारण काय?” असा सवाल मुनगंटीवारांनी पवारांना विचारला.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांना नागपूर न्यायालयाकडून १५ हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या न्यायालयाने जामीन मंजूर केलाय. निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा त्यांच्यावर आरोप होता. फडणवीस हे आज न्यायालयात उपस्थित झाला. १५००० रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलाय. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. नागपुरातील २ गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा फडणवीसांवर आरोप आहे. यातील एक मानहानीचा खटला आणि दुसरा फसवणुकीचा खटला आहे. सत्र न्यायालयाने याबाबत फडणवीसांना समन्स बजावला होता. त्यामुळे ते कोर्टात हजर होते.
5 वर्षांपूर्वी -
देवदर्शनावरुन परतताना स्कॉर्पिओ गाडीची ट्रकला धडक, ६ जणांचा मृत्यू
गाडी वेगावर नियंत्रण ठेवा नाहीतर जीवाशी मुकाल अशा कितीही सुचना दिल्या तरी गाड्यांचा वेग काही कमी होत नाही. चंद्रपूरमध्ये भरधाव वेगात असणाऱ्या एका कारला भीषण अपघाता झाला आहे. या अपघातामध्ये तब्बल ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. चंद्रपूरमधील मूल तालुक्यातील केसलाघाट इथे हा भीषण अपघात झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
विखे पाटलांचं नवं संपर्क कार्यालय; ना भाजपचा झेंडा ना नेते
विरोधीपक्ष नेतेपद सोडून सत्ताधाऱ्यांच्या गोटात सहभागी झालेले राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा एकदा ‘यू टर्न’ मारण्याच्या तयारीत दिसत आहेत. विखे पाटील आता भारतीय जनता पक्षाची साथ सोडून सत्ताधारी महाविकास आघाडीतील एखाद्या पक्षात प्रवेश करणार की काय, अशा चर्चा रंगल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांच्या काळातील ३३ कोटी वृक्षांच्या लागवडीची चौकशी; माजी वनमंत्री काय म्हणाले?
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात ५० कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या संपूर्ण अभियानाची चौकशी केली जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाचे लोक जसे मुद्दाम एखादं वाक्य बोलतात तसं इंदुरीकर महाराज बोलत नाहीत: रोहित पवार
भारतीय जनता पक्षाचे लोक जसं मुद्दाम एखादं वाक्य बोलतात तसं इंदुरीकर महाराज बोलत नाहीत अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. इंदुरीकर महाराज हे त्यांच्या एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी इंदुरीकर महाराजांनी मंगळवारी माफी मागितली आहे. त्यामुळे फार खोलात जाण्याची गरज नाही असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. इंदुरीकर महाराजांनी ते वक्तव्य केलं त्यामागे त्यांचा काय हेतू होता? हे तपासलं पाहिजे असंही रोहित पवार यांनी स्पष्ट केलं. उस्मानाबद येथे ते बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
अजितदादा, आपण आधीच एकत्र यायला हवं होतं - उद्धव ठाकरे
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी किल्ल्यावर आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादा, आपण आधीच एकत्र यायला हवं होतं, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी शिवभक्तांशी संवाद साधताना बोलून दाखवली. ‘मी आणि अजितदादा कार्यक्रम पाहात होतो. त्यावेळी एक कार्यकर्ता मला वळून वळून सांगत होता, दादांना सांभाळा. त्यावर मी आता उत्तर देतो. अहो अजितदादा, आपण एवढी मधली वर्षे उगाच घालवली. उगाचच इतकी वर्षे वेगळं राहिलो. आपण आधीच एकत्र यायला हवं होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री शिवनेरीवर भाषण देताना गर्दीतुन एकजण ओरडला ते शिवस्मारकाचं बघा जरा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शिवनेरी किल्ल्यावर आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर उपस्थित शिवप्रेमींना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. अजितदादा, आपण आधीच एकत्र यायला हवं होतं, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी शिवभक्तांशी संवाद साधताना बोलून दाखवली. ‘मी आणि अजितदादा कार्यक्रम पाहात होतो. त्यावेळी एक कार्यकर्ता मला वळून वळून सांगत होता, दादांना सांभाळा. त्यावर मी आता उत्तर देतो. अहो अजितदादा, आपण एवढी मधली वर्षे उगाच घालवली. उगाचच इतकी वर्षे वेगळं राहिलो. आपण आधीच एकत्र यायला हवं होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस सरकारच्या ‘त्या करोडो वृक्ष लागवडीचे’ महाविकास आघाडीकडून चौकशीचे आदेश
फडणवीस सरकारच्या कार्यकाळात झालेल्या वृक्ष लागवडीची चौकशी करण्याचे आदेश ठाकरे सरकारनं दिले आहेत. फडणवीस सरकारच्या काळात ५० कोटी वृक्ष लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या संपूर्ण अभियानाची चौकशी केली जाणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबाद: महाविकास आघाडी, त्यात भाजपचे तनवाणी-बारवाल गट सेनेत; मूळ शिवसैनिकांना गृहीत?
काही महिन्यांवर आलेली औरंगाबाद महापालिकेची निवडणूक शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत महाविकास आघाडीच्या छताखाली एकत्र लढविणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. स्वतः शिवसेनेचे विधानपरिषदचे आमदार अंबादास दानवे यांनी ही माहिती दिली होती. तसेच त्याच अनुषंगाने बैठेका देखील सुरु झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
जाणता राजा! आज युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९०'वी जयंती
जाणता राजा, रयतेचा राजा म्हणून जगभरात दरारा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची १९ फेब्रुवारी रोजी (तारखेप्रमाणे) जयंती साजरी केली जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, स्वभावातील सहिष्णुता, दूरदृष्टी, करारीपणा व धाडसी वृत्ती अशी काही वैशिष्ट्ये शिवाजी महाराजांची सांगता येतील. शिवाजी महाराजांच्या अनेकविध गोष्टी आजही समाजाला प्रेरणा देतात.
5 वर्षांपूर्वी -
इंदोरीकर महाराजांकडून तमाम महिलावर्गाची दिलगिरी व्यक्त
प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी गर्भलिंग चाचणीसंदर्भात गर्भलिंग चाचणीसंदर्भात वक्तव्याबाबात एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर माफी मागितली आहे. ‘सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते’ असं वादग्रस्त वक्तव्य किर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यासंदर्भात सोशल मीडियावर टीकेची झोड उडाली होती.
5 वर्षांपूर्वी