महत्वाच्या बातम्या
-
ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा असताना सुद्धा तृप्ती देसाई नगरला? स्टंट असल्याचा समर्थकांचा आरोप
स्त्रीसंग समतिथीला केला तर मुलगा आणि विषमतिथीला केला तर मुलगी होते, असे वक्तव्य केल्याने इंदोरीकर महाराज सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कीर्तनातून वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बेस्ट ऑफ लक: आजपासून बारावीची परीक्षा
राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी बारावीची परीक्षा आजपासून (१८ फेब्रुवारी) सुरु होत आहे. राज्यातील एकूण ३०३६ परीक्षा केंद्रांवर १८ फेब्रुवारी ते १८ मार्च असा एक महिना बारावीची परीक्षा होणार आहे. राज्यभरातून १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे ५ लाख ८५ हजार ७३६ विद्यार्थी, कला शाखेचे ४ लाख ७५ हजार ७८४ विद्यार्थी तर व्यावसायिक अभ्यासक्रमचे ५७ हजार ३७३ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
२ तासांच्या भाषणात एखादा शब्द चुकीचा जाऊ शकतो: मंत्री बच्चू कडू
‘सम तिथीला स्त्रीसंग केल्यास मुलगा व विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते,’ असं वक्तव्य एका कीर्तनात केल्यानं वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे. यासंबंधी त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक आणि पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO- प्रतिभाताई पवार यांचे जुने निवृत्त पोलीस अंगरक्षक संकटात; मदतीसाठी मनसेकडे विनंती
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत मनसेच्या महामोर्चावर भाष्य करताना राज ठाकरे यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं विधान केलं होतं. मात्र निकाट्याच एका विषयावरून असच म्हणावं लागेल की सामान्य मराठी माणसं संकटाच्या काळात राज ठाकरे आणि त्यांच्या महाराष्ट्र सैनिकांनाच गांभीर्याने घेतात. अगदी ती सामान्य माणसं काही काळासाठी का होईना पवार कुटुंबियांच्या सहवासात वावरलेली का असेना.
5 वर्षांपूर्वी -
MESTA'चा खाजगी कार्यक्रम मनसेच्या माथी मारून चुकीची वृत्त प्रसिद्ध: सविस्तर वृत्त
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर असून नियोजित कार्यक्रम योग्य प्रकारे सुरु असताना हा दौरा फसलेला आहे हे दाखविण्यासाठी अनेक चुकीची वृत्त प्रसिद्ध होतं असल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेने देखील यामागील राजकीय कनेक्शन शोधणं गरजेचं आहे. हिंदुत्वाला जवळ केल्यानंतर सर्वाधिक पदाधिकारी औरंगाबादमधून मनसेत सामील झाल्याचं पाहायला मिळालं. औरंगाबादमध्ये पायाभूत सुविधांचे विषय महत्वाचे असले तरी हिंदुत्व देखील तितकंच महत्वाचं आहे.
5 वर्षांपूर्वी -
..तर भविष्यात शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी करून काँग्रेसला वेगळं करतील? सविस्तर वृत्त
आजच्या महाविकास आघाडीच्या खेळात शिवसेनेला राष्ट्रवादी त्यातुलनेत पूरक असली तरी भविष्यात थेट काँग्रेसला बाजूला सारून शिवसेना-राष्ट्रवादी इतर छोटे पक्ष ज्यामध्ये समाजवादी पक्ष तसेच आंबेडकरी विचारांचे गट एकत्र येतील अशी शक्यता अनेक राजकीय विश्लेषक आजही व्यक्त करतात. शिवसेनेला विधानसभेत मिळालेली एकूण मतं ही १ कोटी २५ लाखाच्या घरात आहेत तर राष्ट्रवादीला मिळालेल्या एकूण मतांची आकडेवारी ही ९२,१६,९११ असून मतांची टक्केवारी १६.७१ इतकी आहे. तर दुसरीकडे शिवसेनेला मिळालेल्या एकूण मतांची आकडेवारी ही ९०,४९,७८९ असून मतांची टक्केवारी १६.४१ इतकी आहे.
5 वर्षांपूर्वी -
ज्यांच्या विरुद्ध २५ वर्ष संघर्ष केला त्यांनी एका बैठकीत विश्वास दाखवला: उद्धव ठाकरे
सिंचन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जैन इरिगेशन कंपनीच्या वतीने आयोजित पद्मश्री आप्पासाहेब पवार कृषी उच्च तंत्र पुरस्कार सोहळा शनिवारी दुपारी जैन हिल्सवर पार पडला. या सोहळ्यात मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार, कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री दादा भुसे, जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते.
5 वर्षांपूर्वी -
'ऑपरेशन लोटस' काय तुम्हालाच लोटलं ना लोकांनी; मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला
पवार-ठाकरे यांच्यामध्ये शेतकरी आहे आणि शेतकरी हा आमच्या सरकारचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत कोणतंही अंतर नाही, असे नमूद करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘आमचं बरं चाललंय’ असाच संदेश आज दिला.
5 वर्षांपूर्वी -
संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
आपल्याच पक्षात काही लोक गद्दार आहेत. मीडियामध्ये चुकीच्या बातम्या देतात. या गद्दारांची नावं मला कळली असून त्यांची मी पक्षातून हकालपट्टी करणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले आहे. सध्या राज ठाकरे आणि मनसे पक्षाच्या उभारणीसाठी मैदानात उतरले आहेत. औरंगाबादच्या दौऱ्यावेळी राज ठाकरे कार्यकर्त्यांशी बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबादचा विकास करुन दाखवा, मी नामांतरासाठी साथ देईन: खा. इम्तियाज जलील
मागील ३ दशकं शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न प्रलंबित आहे तसेच विकासाची पूर्ण बोंब असल्याचं पाहायला मिळत. यावरून एमआयएम’ने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. इम्तियाज जलील म्हणाले, ” इथल्या कट्टर शिवसैनिकांना विचारा की त्यांना औरंगाबादचं नाव बदलायचं आहे की विकास करायचा आहे? संभाजी महाराजांचं नाव औरंगाबादला देण्याच्या गोष्टी करणाऱ्या शिवसेना आणि मनसेने चार वर्षात शहराचा विकास करुन दाखवावा. तुम्ही कचरामुक्त शहर करुन दाखवा, विकास घडवून दाखवा. तसंच केल्यास मी स्वतः तुम्हाला नामांतरासाठी साथ देईन असं खासदार इम्तियाझ जलील म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
तर राज ठाकरे हिंदुत्वासोबत नाशिक महापालिकेप्रमाणे विकासाचा पॅटर्न औरंगाबाद'मध्ये राबवतील
मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. सध्या मनसेने हिंदुत्वाची कास धरली असली तरी राज ठाकरे हे एक विकासाचं व्हिजन असणारे राजकीय नेते असं आजही राज्यातील लोकांचं मत आहे. औरंगाबादमध्ये ते हिंदुत्वासोबत विकासाला देखील मोठ्या प्रमाणावर प्राधान्य देतील अशीच शक्यता आहे. कारण हिंदुत्व पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना पक्षासोबत बांधून ठेवेल तर विकासाचा प्रचार मतदाराला मनसेकडे आकर्षित करेल, अशी योजना असावी असं प्राथमिक स्तरावर दिसतं.
5 वर्षांपूर्वी -
महिलांचा अपमान झाला आता इंदुरीकर महाराजांकडून शिक्षकांची खिल्ली
अहमदनगरचे प्रसिद्ध किर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांची आता शिक्षकांची खिल्ली उडवणारी क्लिप व्हायरल झाली आहे. यामध्ये शिक्षक वर्गात येऊन वेळ कसा वाया घालवतात? हे सांगत त्यांनी शिक्षकांवर टीका केली आहे. त्यामुळे आता शिक्षक संघटना इंदुरीकर महाराजांवर नाराज झाल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मुलींना नव्हे तर मुलांना शपथ द्यायला पाहिजे: पंकजा मुंडे
प्रियकर-प्रेयसी आपल्या मनातील प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी ज्या दिवसाची निवड करतात त्या ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या दिवशी अमरावतीच्या एका महाविद्यालयात अनोखे चित्र पाहायला मिळाले. चांदुर येथील महिला आणि कला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जागतिक प्रेमदिनी प्रेम, प्रेम विवाह किंवा हुंडा घेऊन लग्न न करण्याचा अनोखा निर्धार केला. विद्यार्थींना देण्यात आलेल्या या शपथीवर माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
घरभर चिठ्ठ्या वाटणाऱ्या राष्ट्रीय नेत्याबद्दल मी काय बोलणार? : शरद पवार
“राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर आपल्याला PHD करायची इच्छा आहे” अशी उपरोधिक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. शरद पवार यांनी ५० वर्ष राजकारण केलं. तरीही राष्ट्रवादीचे दहाच्यावर खासदार निवडून आलेले नाहीत. शरद पवार यांची दिल्ली निकालांवरील प्रतिक्रिया फारशी गंभीरतेने घ्यायची गरज नाही. शरद पवारांचे कधीच दहा पेक्षा जास्त खासदार निवडून आलेले नसतानाही शरद पवार राजकारणाच्या केंद्रबिंदूत कसे काय राहतात? शरद पवार एकाच वेळी सोनिया गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत एकत्रित कसे संवाद साधू शकतात? आपलं म्हणणं कसं पटवून देऊ शकतात? हे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून मला शरद पवारांवर पीएचडी करायची आहे”, अशी उपरोधिक टीका चंद्रकांत पाटलांनी केलीये.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांनी सर्व कागदपत्रं मागवल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी विरोध करणार नाही: चंद्रकांत खैरे
औरंगाबादच्या दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामकरण विषयाला देखील हात घातला. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? असं म्हणत राज ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी बोलताना राज ठाकरे यांना शिवसेनेनवर अप्रत्यक्षपणे टीका केली. औरंगाबादचं नामाकरण करणे हा शिवसेनेचा अजेंडा होता? तुम्हीही तोच अजेंडा घेत आहात का? त्यावर बोलताना ते म्हणाले की, औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत असं राज ठाकरे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
संभाजीनगर नावाने मनसे आता बोलत आहे, त्यांची धरसोडवृत्ती सर्वांना माहिती: चंद्रकांत खैरे
औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. कित्येक दशकांपासून प्रलंबित असलेलं औरंगाबादचं नामांतर अखेर प्रत्यक्षात येणार आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी यासंदर्भात माहिती दिली. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व कागदपत्रं मागवून घेतली आहेत. औरंगाबादच्या जनतेला थोड्याच दिवसात सुखद धक्का देणार असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादकरांना लवकरच सरप्राईज देतील: चंद्रकांत खैरे
औरंगाबादच्या दौऱ्यावर आलेल्या राज ठाकरे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी औरंगाबादच्या नामकरण विषयाला देखील हात घातला. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ‘औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? असं म्हणत राज ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. राज ठाकरे सध्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी बोलताना राज ठाकरे यांना शिवसेनेनवर अप्रत्यक्षपणे टीका केली. औरंगाबादचं नामाकरण करणे हा शिवसेनेचा अजेंडा होता? तुम्हीही तोच अजेंडा घेत आहात का? त्यावर बोलताना ते म्हणाले की, औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? चांगले बदल झाले पाहिजेत. अनेकजण आपली भूमिका बदलून सत्तेत गेले आहेत असं राज ठाकरे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
आज आवडत्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करत असाल तर लक्षात ठेवा...गॅसचा दर रु. ९१०
प्रेमाचा उत्सव मानला जाणारा व्हॅलेंटाइन डे आज उत्साहात साजरा केला जात आहे. महाविद्यालयातील युवकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा असतो. युवक-युवती आपापल्या जोडीदाराचा शोध या दिवशी घेत असतात. प्रेम सागरात जोडीदार यथेच्छ सैर करत असतात. अनेकांना हा दिवस का साजरा केला जातो, याची माहिती नसते. तर अनेक जण हा दिवस साजरा करणे म्हणजे पाश्चात्यांचे अंधानुकरण करणे आहे, असे मानतात.
5 वर्षांपूर्वी -
मशिदीवरील भोंगे बंद करण्याची मनसेची जुनीच मागणी: राज ठाकरे
‘हिंदू जननायक’ ही उपाधी आमच्या पक्षाकडून आलेली नाही. ती एका वृत्तवाहिनीनं दिली आहे. हवं असल्यास त्यांना विचारा,’ असं सांगतानाच, ‘मला हिंदू जननायक म्हणू नका,’ असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केलं. मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात झेंड्याचा रंग बदलल्यानंतर आणि हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबईत बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोर्चा काढला. त्यानंतर सध्या ते मराठवाडा दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद इथं आज त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवरील प्रश्नांना उत्तरं दिली.
5 वर्षांपूर्वी -
औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? - राज ठाकरे
‘हिंदू जननायक’ ही उपाधी आमच्या पक्षाकडून आलेली नाही. ती एका वृत्तवाहिनीनं दिली आहे. हवं असल्यास त्यांना विचारा,’ असं सांगतानाच, ‘मला हिंदू जननायक म्हणू नका,’ असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केलं. मनसेच्या पहिल्या राज्यव्यापी अधिवेशनात झेंड्याचा रंग बदलल्यानंतर आणि हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे स्वीकारल्यानंतर राज ठाकरे यांनी मुंबईत बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध मोर्चा काढला. त्यानंतर सध्या ते मराठवाडा दौऱ्यावर आहेत. औरंगाबाद इथं आज त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारल्या. यावेळी राज ठाकरे यांनी विविध विषयांवरील प्रश्नांना उत्तरं दिली.
5 वर्षांपूर्वी