महत्वाच्या बातम्या
-
राम कदम यांच्या नंतर बबनराव लोणीकरांकडून महिला वर्गाचा अपमान
माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते बबनराव लोणीकर महिला तहसीलदारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शेतकरी मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी वेळ पडला तर हिरॉइन आणू आणि हिरॉइन न मिळाल्यास आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच, असे विधान लोणीकर यांनी केले. दरम्यान, लोणीकर यांनी केलेल्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
आदिवासीच्या झोपडीतील जेवणात कोंबडीचा रस्सा, भाकरी, बिसलेरी पाणी..वाह! : सोमैया
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार नुकतंच शहापूरच्या दौऱ्यावर गेले होते. शहापुरमधील दौऱ्याचापाडा येथे एका भुमीपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडदेखील उपस्थित होते. शरद पवार यांनी कार्यक्रम आटोपल्यानंतर तेथील आदिवासी पाड्यातील एका झोपडीत जेवणाचा आस्वाद घेतला. जितेंद्र आव्हाड यांनी झोपडीत जेवतानाचा फोटो शेअर केला असून या नेत्याला काय म्हणावे…अशी भावना व्यक्त केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवभोजन थाळीमुळे तिजोरीवर भार वाढला; त्यामुळे १ रुपयात आरोग्य तपासणीला ग्रहण
गरीब आणि गरजूंना फक्त १० रुपयांत जेवणाची थाळी देणाऱ्या ‘शिवभोजन’ योजनेची २६ जानेवारीपासून राज्यभरात अंमलबजावणी झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेचा आज आढावा घेतला होता आणि त्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीचे निर्देश दिले होते.
5 वर्षांपूर्वी -
आनंदराज आंबेडकरांनंतर अण्णाराव पाटील यांनी देखील वंचित आघाडी सोडली?
आनंदराज यांच्यानंतर लातूरचे अण्णाराव पाटील हेही प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर नसल्याचे समोर आले आहे. अण्णाराव पाटील हे महाराष्ट्र विकास आघाडी पक्षाचे अध्यक्ष आहेत. मात्र लोकसभा- विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी वंचित आघाडीचा प्रवाह बळकट करण्याचा निर्णय घेतला. अण्णाराव पाटील यांनी भटके विमुक्त, ओबीसी समाज प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आणण्यासाठी आपली ताकद वापरली. अण्णाराव यांच्याकडे ‘वंचित’च्या पार्लमेंटरी बोर्डाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली नागपूर ते कोल्हापूर अशी सत्तासंपादन यात्रा काढण्यात आली होती. प्रकाश आंबेडकर हे मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही भुमिका घेवून पाटील राज्यभर फिरले होते. मात्र निवडणूक झाल्यापासून ते आंबेडकरांपासून अंतर ठेवून आहेत.
5 वर्षांपूर्वी -
इंदिरा गांधींकडूनही लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्नः जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड यांनी देशातील सद्य:स्थितीला ‘हिटलरशाही’ संबोधत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. हा संदर्भ देताना आव्हाड यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. आव्हाड म्हणाले की, “इंदिरा गांधींनीदेखील लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा अहमदाबादेतून पहिला उठाव झाला आणि विद्यार्थ्यांच्या चळवळीतूनच जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व उदयाला आले. अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन देशाला दुसरे स्वातंत्र्य मिळवून देईल”.
5 वर्षांपूर्वी -
सरपंचाची थेट निवड रद्द, तत्कालीन भाजप सरकारच्या निर्णयाला केराची टोपली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आजच्या राज्य मंत्रिमंडळ कॅबिनेट बैठकीत महत्त्वाचे ४ निर्णय घेण्यात आले आहेत. यात सरपंचाची निवड, पुणे येथे अध्यापकांसाठी कंपनी कायद्यान्वये प्रशिक्षण संस्था, पीएचडीधारक अधिव्याख्यात्यांची वेतनवाढ आणि तंत्रशास्त्र विद्यापीठातील शिक्षकांची सुधारित वेतनश्रेणी या विषयांचा समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
सत्ता होती तेव्हा गोट्या खेळत होता का? इम्तियाज जलील यांचा पंकजा मुंडेंना टोला
पक्षांतर्गत निर्माण झालेली खदखद आणि ‘माधव’ सूत्राच्या भोवती फिरणारी राजकीय अपरिहार्यता यातून सोमवारी औरंगाबाद येथे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलनास जलसमस्यांचे आवरण देण्यात भाजपच्या नेत्यांना यश आल्याचे दिसून आले. हे उपोषण गोपीनाथ प्रतिष्ठानच्यावतीने घेण्याचे पूर्वी पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी पक्षाच्यावतीने हे उपोषण असल्याचे सांगितले आणि सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पक्षाचे सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर आदींनी उपोषणात सहभाग नोंदविला.
5 वर्षांपूर्वी -
चोरांच्या टोळीत बसलाय की काय...म्हणून बुट हातात घेऊन भाषण? - रुपाली चाकणकर
पक्षांतर्गत निर्माण झालेली खदखद आणि ‘माधव’ सूत्राच्या भोवती फिरणारी राजकीय अपरिहार्यता यातून सोमवारी औरंगाबाद येथे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण आंदोलनास जलसमस्यांचे आवरण देण्यात भाजपच्या नेत्यांना यश आल्याचे दिसून आले. हे उपोषण गोपीनाथ प्रतिष्ठानच्यावतीने घेण्याचे पूर्वी पंकजा मुंडे यांनी जाहीर केले होते. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी पक्षाच्यावतीने हे उपोषण असल्याचे सांगितले आणि सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पक्षाचे सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर आदींनी उपोषणात सहभाग नोंदविला.
5 वर्षांपूर्वी -
केंद्राला सहकार्य न केल्यास घटनात्मक पेच निर्माण होईल; मुनगंटीवार यांचा इशारा
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास संस्था अर्थात NIA कडे सोपवण्यात आला आहे. NIA ची टीम पुणे पोलीस मुख्यालयात दाखल झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी विशेष चौकशी पथकामार्फत (SIT) या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली होती. ज्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. मात्र २५ जानेवारीला हे प्रकरण केंद्रीय गृहमंत्रलायने एनआयएकडे सोपवले.
5 वर्षांपूर्वी -
न्यायाधीश लोया मृत्यू चौकशी संबंधित महत्वाच्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच गरज भासल्यास आणि पुरावे समोर आल्यास न्यायाधीश लोया मृत्यू प्रकरणाची पुन्हा चौकशी केली जाऊ शकते असं म्हटलं होतं. त्यानंतर जज लोया यांच्या मृत्यूनंतर लोयांच्या कुटुंबाशी संपर्क साधण्याची जबाबदारी देण्यात आलेल्या आणि या प्रकरणाशी संबंधित न्यायालयीन महत्वाची कागदपत्रं हाताळणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याच्या देखील हृदयविकाराच्या झटक्याने मृत्य झाल्याचं वृत्त नॅशनल हेराल्ड’ने दिलं आहे. १३ जानेवारी रोजी उस्मानाबादमध्ये त्यांचे निधन झाले. रवींद्र भारत थोरात हे मृत्यूच्या वेळी उस्मानाबाद युनिट अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) मध्ये कार्यरत होते.
5 वर्षांपूर्वी -
मागच्या काळात सुद्धा फोन टॅपिंगचे प्रकार घडले, ती एक रणनीती असते: मंत्री गुलाबराव पाटील
भाजप सत्तेत असताना विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, खा. संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेत्यांचे फोन टॅप करण्याचे व त्यांचे व्हॉट्सअॅप मेसेज वाचणारे तंत्र इस्रायलवरून मागवण्यात आले. त्यासाठी एका आयपीएस अधिकाऱ्यास काही वेळा इस्रायलला पाठवण्यात आले, अशी माहिती आल्याने याची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
आरपीआय बंद'मध्ये सहभागी न झाल्यानेच 'वंचित'चा बंद अपयशी : रामदास आठवले
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज राज्यभरात बंद ची हाक देण्यात आली होती. जालन्यातील मामा चौकात वंचीत बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत सीएए, एनआरसी विरोधात जोरदार घोषणा बाजी करत मुख्य बाजार पेठ बंद करण्याच्या प्रयत्न केला. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. हा बंद मागे घेतल्याची घोषणा प्रकाश आंबेडकरांनी केली. बंद शांततेतच पार पाडायचा होता असे यावेळी आंबेडकर म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
भीमा-कोरेगाव - माजी गृहराज्य मंत्र्यांनी पवारांचा दावा फेटाळला; सेना-राष्ट्रवादीत एकवाक्यता नाही
भीमा कोरेगाववरुन महाविकास आघाडीतले दोन पक्ष आमनेसामने आलेले पाहायला मिळत आहेत. भीमा कोरेगाव प्रकरण तत्कालीन सरकारनं पोलिसांच्या मदतीनं घडवलेलं षडयंत्र असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी केला. या प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी करण्याची मागणीदेखील त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली. मात्र या प्रकरणातले पुरावे पोलिसांनी खातरजमा करुनच दाखल केलेले असून ते न्यायालयानंदेखील मान्य केलेले आहेत, अशी भूमिका तत्कालीन गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी मांडली आहे. त्यामुळे भीमा कोरेगाववरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन सत्ताधारी पक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेना धर्मनिरपेक्ष झाल्याने मनसेने हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला: खा. इम्तियाज जलील
“इतके दिवस झाले तुम्ही राजकारणात आहेत, आजपर्यंत मशिदीवरील भोंग्याचा तुमच्या कानाला त्रास झाला नाही का?” असा सवाल एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना विचारला आहे. “धर्म प्रत्येकाने आपल्या घरात ठेवावेत. त्यासाठी मशिदींवर लागलेले भोंगे काढावेत. आमची आरती त्रास देत नाही, नमाज का त्रास देतोय?” असा सवाल राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनात उपस्थित केला होता. तसंच राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या सुधारित नागरिकत्व कायद्याला पाठिंबा देत, सीएएच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्याची घोषणा केली.
5 वर्षांपूर्वी -
शांततेच्या मार्गाने बंद करण्याचं प्रकाश आंबेडकर यांचं जाहीर आवाहन
वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून यावेळी काही ठिकाणी हिंसाचार करण्यात आला. सीएए, एनआरसी आणि खासगीकरण यांचा विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आजचा महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
कोरेगाव-भीमा दंगलीमागे फडणवीस सरकारचं षडयंत्र, पवारांच्या आरोपाने शिवसेना पेचात
कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणीही पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे. पवारांच्या या गंभीर आरोपामुळे सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे.
5 वर्षांपूर्वी -
CAA - NRC विरोधात वंचित'कडून आज महाराष्ट्र बंद; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं आज राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. CAA आणि NRC विरोधात तसंच, देशातील ढासळत्या अर्थव्यवस्थेविरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्याचं आवाहन भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. यासोबतच शाळा आणि महाविद्यालयांनीही बंदला पाठिंबा द्यावा असं आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. महाराष्ट्र बंदमध्ये ५०हून अधिक संघटना सहभागी होणार असल्याची माहिती आहे. प्रत्यक्षात आज या बंदला आज कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वंचित बहुजन आघाडीनं पुकरालेल्या बंदमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजप नको पण शिवसेना चालेले हा मुस्लिमांचा आग्रह; पवारांच्या विधानाने सेनेची अडचण
आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीही त्याला पुष्टी देणारे विधान केले आहे. शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीला कोणत्याही अल्पसंख्याक सदस्याचा आक्षेप नाही तर काहीही करून महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवायला हवे, असेच अल्पसंख्यकांच्या प्रतिनिधींचे म्हणणे होते, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
5 वर्षांपूर्वी -
महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्ष टिकेल: भाजप नेते एकनाथ खडसे
सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाचे विचार सोडून शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर सरकार टिकवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. यामुळे सरकार ५ वर्षे टिकू शकणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
केवळ मुस्लिमांच्या आग्रहामुळे काॅंग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत: अशोक चव्हाण
शिवसेना काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत महाविकास आघाडी’करून सत्तेत आली खरी, मात्र त्यानंतर काँग्रेस नेत्यांच्या विधानाने अधिकच राजकीय पेचात सापडत आहे असंच म्हणावं लागेल. अगदी काँग्रेसमध्ये सर्वजण शांत झाले की खासदार संजय राऊत कोणत्या ना कोणत्या तरी विधानाने शिवसेनेची अडचण वाढवताना दिसत आहे.
5 वर्षांपूर्वी