महत्वाच्या बातम्या
-
मुलाचं नाव शिवाजी ठेवलं तर एनओसी साताऱ्यातून मागवायची का? : जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी वादग्रस्त पुस्तकावरुन शिवसेनेवर तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर हल्ला चढवला. जाणते राजे फक्त शिवाजी महाराजच आहेत, अन्य कोणी नाही, असं म्हणत उदयनराजेंनी शरद पवारांवर निशाणा साधला. या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उदयनराजेंवर पलटवार केला.
5 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराज राहू देत, आधी आजोबांचा विचार तरी अमलात आणा: उदयनराजे
भारतीय जनता पक्षाचे नेते जय गवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता. आता भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करताना लेखकाने पुस्तक मागे घेतलं असल्याचं म्हटलं आहे. गोयल यांनी ते वैयक्तिक लिहिले असून पक्षाचा त्या पुस्तकाशी काहीही संबंध नाही असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागत हे पुस्तक मागे घेतल्याचं जावडेकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा: उदयनराजे भोसले
यावेळी उदयनराजेंनी शिवसेनेवर जोरदार टीकेची झोड उठवली. स्वार्थासाठी शिवरायांच्या नावाचा वापर का करता असा संतप्त सवाल उदयन राजेंनी विचारला. तसेच महाराजांच्या नावाने शिवसेनेची स्थापना करताना वंशजांना विचारले होते का? अशी विचारणा करत उदयनराजेंनी ठाकरे कुटुंबीयांवर टीका केली. तसेच शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
मोदींची महाराजांशी तुलना!...बुद्धी गहाण ठेवली आहे का काय? उदयनराजेंचा संताप
भाजपचे नेते जय गवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून वाद निर्माण झाला होता. आता भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करताना लेखकाने पुस्तक मागे घेतलं असल्याचं म्हटलं आहे. गोयल यांनी ते वैयक्तिक लिहिले असून पक्षाचा त्या पुस्तकाशी काहीही संबंध नाही असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं. पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांनी माफी मागत हे पुस्तक मागे घेतल्याचं जावडेकर म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
शरद पवारांना जाणता राजा म्हटलेलं कसं चालतं ? सुधीर मुनगंटीवार
‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून राजकीय वातावरण तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यानं भारतीय जनता पक्षाला टीकेला सामोरं जावं लागत आहे. त्याचवेळी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि राज्यातील माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यावर स्पष्टीकरण देत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली जाणता राजा ही उपाधी शरद पवार यांनाही दिली जाते. पवारांच्या कार्यकाळात अनेक कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्यामुळं त्यांना जाणता राजा ही उपाधी लागू होते का? असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.
5 वर्षांपूर्वी -
महाराजांचे वंशज सुद्धा मराठीच असल्याचा गोयल यांना विसर; काय म्हटलं मराठी बाबत?
दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे नेते जयभगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले आहे. भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भारतीय जनता पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.
5 वर्षांपूर्वी -
सरकार'कडे पैसा नाही, मी पीपीपी आणि बीओटी तत्वावर कामे केली: गडकरी
सरकार कोणत्याही पक्षाचे असू द्या, सगळ्या गोष्टीचे सोंग करता येते, मात्र पैशाचे सोंग करता येत नाही. सरकारजवळ पैसेच नाहीत, अशी कबुली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी औरंगाबादेत दिली. मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इडस्ट्रीज ऍण्ड ऍग्रीकल्चर (मसिआ)तर्फे ९ ते १२ जानेवारी दरम्यान ऍडव्हॉन्टेज महाराष्ट्र एक्स्पो घेण्यात आला. याचा रविवारी समारोप झाला. यावेळी मार्गदर्शन करताना नितीन गडकरी बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
छत्रपतींच्या आशीर्वादाने राज्यात शिरकाव करत भाजपने मोदीं'चाच 'राजकीय' राज्याभिषेक केला?
दिल्लीतील भाजपचे नेते जयभगवान गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणारे ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले आहे. भाजपाच्या दिल्लीतील कार्यालयात धार्मिक, सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत हे पुस्तक प्रकाशीत करण्यात आले.
5 वर्षांपूर्वी -
त्या पुस्तकावरून छत्रपती उदयराजे भोसले, शिवेंद्रराजे आणि राज्य भाजप शांत?
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ या पुस्तक प्रकाशनाचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात उमटायला सुरुवात झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत आणि राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्यात यावरून ट्विटर वॉर पाहायला मिळाले आहे. भारतीय जनता पक्षात शिरलेल्या छत्रपतीच्या वंशजांना ही तुलना मान्य आहे का?, असा सवाल करणाऱ्या संजय राऊत यांना छत्रपती संभाजी राजे यांनी तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
जगाच्या अंतापर्यंत दुसरे छत्रपती शिवाजी महाराज होणे नाही: मंत्री जितेंद्र आव्हाड
‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ पुस्तकाचं भाजपकडून दिल्लीत प्रकाशन करण्यात आलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी, प्रभारी श्याम जाजू, माजी खासदार महेश गिरी या नेत्यांच्या उपस्थितीत हे प्रकाशन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणारं हे पुस्तक दिल्ली भाजपच्या पक्ष कार्यालयात प्रकाशित झालं आहे. मात्र, या पुस्तकामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण शिवाजी महाराजांची तुलना मोदींशी करणं अनेकांना पटणारं नाही.
5 वर्षांपूर्वी -
पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्या अजित पवारांवर आधी कारवाई करा: जयसिंह मोहिते पाटील
जिल्हा परिषदेतील मोहिते पाटील गटाच्या ६ सदस्यांवर कारवाई केल्यानंतर विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीला खरमरीत उत्तर दिलं आहे. ‘रात्रीच्या अंधारात भारतीय जनता पक्षासोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांच्यावरही राष्ट्रवादीने कारवाई करावी,’ असं खुलं आव्हान मोहिते पाटलांनी दिलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
संत साहित्यावरील परिसंवादाला विरोध; तिघे पोलिसांच्या ताब्यात
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आजच्या दुसऱ्या दिवशी वादाचे गालबोट लागले. संत साहित्य आणि बुवाबाजी या विषयावरील परिसंवादात हा वाद उफाळून आला. संमेलनाच्या मुख्य व्यासपीठावर शनिवारी (ता. ११) सायंकाळी पाचच्या सुमारास ‘संत साहित्याचे सामाजिक दृष्टीने पुरेसे आकलन न झाल्यामुळे समाजात बुवाबाजीचे प्रस्थ’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.
5 वर्षांपूर्वी -
सुजाण माणसे कशाला हिटलरच्या मागे जातील? अरुणा ढेरेंचं मत
‘जर एखाद्याने वेगळी भूमिका घेतली की लगेच त्याने एका विचारधारेचा झेंडा हातात घेतलाय, असं होत नाही. देश कुठल्याही प्रकारच्या हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर आहे, असं मला वाटत नाही. सर्वजण सुजाण नागरिक आहेत,’ असं मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मावळत्या अध्यक्ष अरुणा ढेरे यांनी व्यक्त केलं आहे. शुक्रवारी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी JNU मधल्या हिंसाचारावर बोट ठेवत देश हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर उभा आहे असं वक्तव्य केलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
खुशखबर! पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी आणि त्यानंतर लेखी परीक्षा: सरकारचा निर्णय
अनेक त्रुटी असल्याने महापोर्टल विरोधात राज्यभर आंदोलन पेटली होती. कारण विद्यार्थ्यांना याविषयी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता, तसेच या ऑनलाईन प्रक्रियेत अनेक त्रुटी असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. त्यात अनेक निवेदनं आणि आंदोलनं करून देखील फडणवीस सरकारने याची दखल घेतली नव्हती.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी चांगला ज्योतिष शोधावा; महसूलमंत्री थोरात यांचा सणसणीत टोला
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी युतीच्या कमीत कमी २२० जागा निवडून येणार आणि त्यानंतर विरोधीपक्ष नेता करता येईल एवढ्या जागा देखील विरोधकांना मिळणार नसल्याचा छातीठोक दावा केला होता.
5 वर्षांपूर्वी -
जर मनसेला संघांचे हिंदूत्व मान्य असेल तर ते भाजपा'सोबत येतील: मा. गो. वैद्य
राज्यातील राजकारणात नवी समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे. मंगळवारी म्हणजे ७ जानेवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर भारतीय जनता पक्ष-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी मोठे विधान केले आहे. “जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संघांचे हिंदूत्व मान्य असेल. तर ते भारतीय जनता पक्षासोबत येतील,” अशी प्रतिक्रिया मा. गो. वैद्य यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे: फ्रान्सिस दिब्रेटो
“मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरे हे मराठी भाषेचा आग्रह धरणारे आहेत. त्यांना सांगा हे आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करा. अन्यथा ही मंडळी तुमचं ऐकणार नाहीत.” असंही संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रेटो यांनी स्पष्ट केलं.
5 वर्षांपूर्वी -
देशात विद्यार्थ्यांची डोकी फुटत असतील तर शांत बसणार नाही: फ्रान्सिस दिब्रेटो
देशातील ढासळत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीविरोधात मराठी साहित्यिकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून शुक्रवारी एल्गार पुकारला. धर्मांध वातावरण, वाढती असहिष्णुता, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच, गोहत्येच्या संशयावरून अल्पसंख्याकांचे घेतले जाणारे सामूहिक बळी (मॉब लिंचिंग), विरोधी मत मांडणाऱ्यांना देशद्रोही ठरवणे आणि जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना झालेली अमानुष मारहाण या सर्व प्रकारांविरोधात सारस्वतांनी ताशेरे ओढून देशातील परिस्थितीवर हल्ला चढवला. ‘देशाला वेठीस धरले जात आहे,’ अशी सडकून टीका साहित्यिकांनी केली.
5 वर्षांपूर्वी -
सातारा: महाराष्ट्राचे सुपुत्र BSF जवान ज्ञानेश्वर जाधव जम्मू-काश्मिर सीमेवर शहीद
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील धकटवाडी गावचे सुपुत्र BSF जवान ज्ञानेश्वर चंद्रकांत जाधव यांना जम्मू आणि काश्मिर मध्ये ड्युटी बजावत असताना वीर मरण आले. त्यामुळे सातारा जिल्ह्यात एकंच शोककळा पसरली आहे. धकटवाडीत अत्यंत शोकाकुल वातावरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपाच्या बैठकीत खडसे समर्थकाला बेदम मारहाण; दानवे आणि महाजनांसमोर तुफान राडा
भाजपा जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत एकनाथ खडसे समर्थक पदाधिकारी सुनील नेवे यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच हा प्रकार घडला. भाजपा जिल्हा सरचिटणीस सुनील नेवे यांना दानवे यांच्यासमोरच भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली. यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी असलेले रावसाहेब दानवे बैठकीतून निघून गेले.
5 वर्षांपूर्वी