महत्वाच्या बातम्या
-
मुंबई आणि नाशिक पोटनिवडणुकीत सुद्धा शिवसेनेचा भाजपाला धोबीपछाड
राज्यातील सत्तेचं टॉनिक मिळताच शिवसेनेला उभारी आली असून त्याचे प्रतिबिंब स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही दिसत आहे. जिल्हा परिषद निवडणुकांत यशाचा आलेख उंचावणाऱ्या शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीतही विजयाचा झेंडा फडकवला आहे. त्यामुळे शिवसेनेचं पालिकेतील बळंही वाढलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
साहित्य संमेलनाला जाऊ नका; ब्राह्मण महासंघाने महानोरांना दिली धमकी
उस्मानाबाद येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला जाऊ नका, अशी धमकी ब्राह्मण महासंघाने संमेलनाचे उद्घाटक कविवर्य ना. धों. महानोर यांना दिली आहे. ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा शुभारंभ शुक्रवार १० जानेवारी पासून होत आहे. संमेलनाच्या पूर्वसंध्येला आलेल्या या धमकीमुळे आयोजक चिंतेत आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदी फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड झाल्यापासून हे संमेलन वादात सापडले आहे. दरम्यान, संमेलनाला जाऊ नये अशी फोनवरून धमकी मिळाल्यानंतरही ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर उपस्थित राहणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
'हा' खेकडा शिवसेना पोखरतोय, वेळीच नांग्या मोडा: शिवसैनिकांचा संताप
जिल्हा परिषदेच्या निवडणुकींमध्ये राज्यात अनेक ठिकाणी फाटाफुटीचं राजकारण झालं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आल्याने बहुतांश ठिकाणी महाविकास आघाडीची सत्ता आली. परंतु काही ठिकाणी शिवसेनेतल्या नाराजांनी भारतीय जनता पक्षाला साथ देत सत्ता मिळविण्याचा प्रयत्न केला अशा नेत्यांविरुद्ध आता शिवसैनिकांनी एल्गार पुकारलाय. उस्मानाबाद जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाला साथ देणारे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पोष्टर्स लावले आहेत. त्यांच्याविरुद्ध तातडीने कारवाई करावी अशी मागणी शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीय.
5 वर्षांपूर्वी -
भगवान गडावर पोहोचले मंत्री धनंजय मुंडे; पंकजा मुंडेंना टोला
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आज भगवानगडावर जाणार आहेत. मंत्री झाल्यानंतर मुंडे पहिल्यांदाच भगवान गडावर जातील. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंना मंत्री झाल्यावर भगवानगडावर दर्शनासाठी बोलावलं होतं. आज ते नारायणगड, भगवानगड आणि गहिनीनाथगडावर जाऊन महंतांचे आशीर्वाद घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर तिन्ही गडावर धनंजय मुंडे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अक्कलकुव्वात शिवसेनेचे कार्यालय जाळले; शहरात जमाव बंदी लागू
काल राज्यात नागपूरसह राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि पालघर या ६ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर बुधवारी सकाळी दहा वाजता सर्वत्र मतमोजणीला सुरुवात झाली होती. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांना मोठा धक्का बसला होता. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले होते. दरम्यान, सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र नंदुरबारमध्ये भाजप आणि काँग्रेसचे समसमान उमेदवार निवडून आले होते.
5 वर्षांपूर्वी -
गॅस पेटवणं सोपं, पण गोरगरीबाच्या घरची चूल आधी पेटली पाहिजे: मुख्यमंत्री
सत्तास्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तिथल्या उद्योजकांच्या प्रदर्शनाला भेट दिली. या भेटीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दोन महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यामध्ये पहिली घोषणा म्हणजे औरंगाबादच्या बिडकिन भागामध्ये ५०० एकर जमिनीवर अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. शिवाय या ५०० एकरपैकी १०० एकर हे फक्त महिला उद्योजिकांसाठी राखीव ठेवण्याचा देखील शब्द मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. ‘२०२०च्या जून महिन्यात या प्रकल्पाचं भूमिपूजन करायचं. त्यानंतर मध्ये कुठेही ते काम अडू नये, याची काळजी आपल्याला करायची आहे. नाहीतर फक्त भूमिपूजनाच्या पाट्या आपल्याला जागोजागी दिसतात’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
पवार कुटुंबियांना बारामतीत संपवता संपवता भाजप नागपूर-कोल्हापुरात संपला
नागपुरात आरएसएस’च्या मुख्य कार्यालयासहित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचा टिकाव लागणार नाही असं म्हटलं गेलं. मात्र काल धक्कादायक निकाल लागले. याबाबत सत्ताधारी मंत्री जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावत म्हटलंय की, भारतीय जनता पक्षाच्या पराभवाची सुरुवात विदर्भातील नागपूरमधून झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थेवर बसवलेली पकड आज उध्वस्त झाली आहे. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये भारतीय जनता पक्ष निवडणूक घेण्यास टाळत होता. वेगवेगळ्या कारणांमुळे ही निवडणूक पुढे जात होती. परंतु, आज निवडणूक झाली असून ज्या नागपूर जिल्हयात भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते आहेत त्याच जिल्हयात भारतीय जनता पक्षाला पराभव पत्करावा लागला. नागपूरकरांनी भारतीय जनता पक्षावर नाराजी व्यक्त केली त्याची दखल महाराष्ट्र घेईल असं त्यांनी सांगितले.
5 वर्षांपूर्वी -
यवतमाळ: पंचायत समितीच्या सभापती निवडीवरून सेना-भाजप नेत्यांमध्ये राडा
यवतमाळ पंचायत समिती सभापती निवडीवरून बुधवारी शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये राडा झाला. पंचायत समिती कार्यालयात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडी आहे. यवतमाळ पंचायत समिती सभापती उपसभापती पदासाठी आज निवडणूक होती.
5 वर्षांपूर्वी -
मनसे आणि भाजपाची वैचारिक भूमिका सारखीच असल्यास भाजप-मनसे युती शक्य: मुनगंटीवार
२३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी राज ठाकरेंनी मनसेच्या महाअधिवेशानचे आयोजन केलं आहे. राजकीय वर्तुळामधील चर्चेनुसार त्याचवेळी मनसेची नवीन भूमिका राज स्पष्ट करणार असल्याचे समजते. इतकच नाही तर मनसेचा झेंडा बदलण्याची घोषणाही या महाअधिवेशनात होण्याची शक्यता आहे. मनसेचा सध्याच्या झेंड्यामध्ये निळा, पांढरा, भगवा आणि हिरवा रंग आहे. मात्र आता हा झेंडा बदलून तो पूर्णपणे भगवा किंवा केशरी केला जाणार आहे. यासंदर्भात पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा झाल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
सध्याचं राजकारण पाहता भविष्यात भाजप-मनसे एकत्र येऊ शकतात: आ. राजू पाटील
३ जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. याच दिवशी राज ठाकरेंनी मनसेच्या महाअधिवेशानचे आयोजन केलं आहे. राजकीय वर्तुळामधील चर्चेनुसार त्याचवेळी मनसेची नवीन भूमिका राज स्पष्ट करणार असल्याचे समजते. इतकच नाही तर मनसेचा झेंडा बदलण्याची घोषणाही या महाअधिवेशनात होण्याची शक्यता आहे. मनसेचा सध्याच्या झेंड्यामध्ये निळा, पांढरा, भगवा आणि हिरवा रंग आहे. मात्र आता हा झेंडा बदलून तो पूर्णपणे भगवा किंवा केशरी केला जाणार आहे. यासंदर्भात पक्षातील नेत्यांबरोबर चर्चा झाल्याचे समजते.
5 वर्षांपूर्वी -
धुळे झेडपी: मूळचे काँग्रेस नेते अमरीश पटेल यांच्या कृपेने भाजप धुळ्यात विजयी
जिल्हा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एका मागून एक जागांचा विजय पुढे येण्यास सुरुवात झाली आहे. यात ५६ जागांपैकी २५ जागांचा निकाल हाती आला आहे. यात ३१ जागांवर भाजपने आपला शिक्कामोर्तब लावला आहे. मूळचे काँग्रेस नेते अमरीश पटेल यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने काँग्रेसचा पारंपरिक मतदार भारतीय जनता पक्षाकडे वर्ग झाला आणि परिणामी त्याचा मोठा फायदा भाजपाला झाल्याचे पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'सेनेतील आ. पाचपुतेंना श्रीगोंद्यात धक्का; पंचायत समिती खालसा
श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचे आमदार बबनराव पाचपुते यांना जोरदार धक्का देत राष्ट्रवादीचा झेंडा फडकविला आहे. या निवडणूकीत सभापतीपदी गीतांजली पाडळे, तर उपसभापती रजनी देशमुख यांनी निवड झाली आहे. त्यामुळे हा निकाल म्हणजे माजीमंत्री पाचपुते यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
फडणवीस यांच्याइतकं भ्रष्ट सरकार यापुर्वी कधीच सत्तेत आलं नव्हतं: अनिल गोटे
राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल गोटे यांनी तत्कालीन फडणवीस सरकारवर गंभीर टीका केली आहे. पाच वर्षांत फडणवीस सरकारने महाराष्ट्र ओरबाडून काढला अशी टीका अनिल गोटे यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी हजारो कोटींचे घोटाळे केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. तसंच स्वातंत्र्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याइतकं भ्रष्ट सरकार यापुर्वी कधीच सत्तेत आलं नव्हतं असंही ते म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
खातेवाटप जाहीर! अजित पवारांकडे अर्थ, देशमुखांकडे गृह, थोरातांकडे महसूल
मागील ६ दिवसांपासून रखडलेलं मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज जाहीर करण्यात आलं. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी खातेवाटपाला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खातेवाटप जाहीर केलं असून अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन, अनिल देशमुख यांच्याकडे गृह, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
बीड जिल्हा परिषद: पंकजा मुंडेंनी पराभव आधीच मान्य केला?
जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीअगोदरच भाजपने बीडमध्ये माघार घेतली आहे. शिवसेनेने पाठिंबा देण्यास असमर्थता दर्शवल्यामुळे पंकजा मुंडेंनी पराभव मान्य असल्याची भूमिका जाहीर केली. लोकशाही प्रक्रियेचा भाग म्हणून निवडणुकीत उतरणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. बीड जिल्हा परिषदेतही काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे.
5 वर्षांपूर्वी -
ही तर महाविकास आघाडी सरकारच्या पतनाची सुरुवात: देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. ”महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर विस्तारच होत नव्हता. एका महिन्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. आता सात दिवस झाले तरी खातेवाटप झालेले नाही. सगळ्यांना मलाईदार खाती हवी आहेत. आता खातेवाटप होण्यापूर्वीत त्यांच्या एका मंत्र्याने राजीनामा दिल्याचे वृत्त आहे. कॅबिनेट मंत्री बनवू म्हणून आश्वासन देऊन राज्यमंत्री बनवल्याने अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे या सरकारच्या पतनाची सुरुवात सरकार बनण्याच्या आतच सुरू झाली आहे,” असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्यानंतर भाजप नेत्यांना गुदगुल्या; अनेक प्रतिक्रिया
शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी खातेवाटपाआधीच राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात असून विरोधी पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष लगेचच सक्रिय झाला आहे. ‘आज अशा अनेक बातम्या मिळतील,’ असं सूचक वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
स्वतःला कॅबिनेट मंत्रिपद व मुलाला आमदारकी जाहीर न झाल्याने अब्दुल सत्तारांचा राजीनामा
मंत्रिमंडळ विस्तारानंतर अवघ्या पाच दिवसात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. तसेच ते आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. सत्तार यांच्या राजीनाम्यामुळे ठाकरे सरकार आणि शिवसेनेसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
सातारा: शहीद संदीप सावंत अमर रहे! लष्करी इतमामात अखेरचा निरोप
दहशतवाद्यांशी दोन हात करताना शहीद झालेले महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद संदीप सावंत यांना अखेरचा निरोप देण्यात येतो आहे. हा नरोप देताना महाराष्ट्रही गहिवरला आहे. संदीप सावंत यांच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. काही वेळापूर्वीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आले. त्यांची अवघी काही महिन्यांची असलेली मुलगी पोरकी झाली. संदीप सावंत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गावातले सगळे लोक जमले. शोकाकुल वातावरणात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची जळगावात भेट
भारतीय जनता पक्षामधील नाराजीनंतर आज जळगावात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांची भेट झाली. नेते देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्यामुळेच आपले तिकीट कापल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. खडसेंच्या या गंभीर आरोपानंतर भारतीय जनता पक्षामध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आज तिघेही एकत्र पाहायला मिळाले.
5 वर्षांपूर्वी