महत्वाच्या बातम्या
-
धक्कादायक! राज्यात नोव्हेंबर महिन्यात ३०० शेतकऱ्यांची आत्महत्या
नोव्हेंबरमध्ये सत्ता स्थापनेसाठी शह-काटशहाचा खेळ सुरू असताना राज्यात मात्र ३०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून गेल्या चार वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत एका महिन्यात शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा हा आकडा सर्वाधिक असल्याचंही स्पष्ट झालं आहे. यापूर्वी २०१५मध्ये महिन्याभरात ३००हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं उघड झालं होतं.
5 वर्षांपूर्वी -
स्वत:चं राजकारण सरळ व्हावं म्हणून फडणवीस व महाजनांनी माझ्या विरोधात डाव आखला
स्वत:चं राजकारण सरळ व्हावं म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांनी माझं राजकारण संपवण्याचा डाव आखला आहे. त्यामुळेच मला विधानसभेचं तिकीट नाकारतानाच माझ्या मुलीचाही पराभव घडवून आणला गेला, असा थेट आणि खळबळजनक आरोप भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पहिल्यांदाच थेट नाव घेऊन आरोप केल्याने भारतीय जनता पक्षामध्ये सुंदोपसुंदी सुरू असल्याचं समोर आलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
नाराज आमदारांचे वेगवेगळे आकडे दाखवून प्रसार माध्यमंच संभ्रम पसरवत आहेत? सविस्तर वृत्त
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांतील नाराजांनी मोठ्या प्रमाणावर डोकं वर काढल्याच्या कपोकल्पित बातम्या पेरण्याचं पेव सध्या प्रसार माध्यमांमध्येच आल्याचं पाहायला मिळत आहे. वास्तविक मंत्रिमंडळ वाटपापूर्वी आणि नंतर लॉबिंग तसेच नाराजीनाट्य काही नवा विषय नाही. शपथविधीच्या दिवशी खासदार संजय राऊत यांचा नाराजीनाट्याच्या वृत्तानंतर त्यांनी अधिकृत प्रतिक्रिया दिली असताना देखील त्यांच्या ट्विटरवरील पोस्टवरून भलतेच चित्र रंगविण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.
5 वर्षांपूर्वी -
मूळ आडनाव बदलून 'भारतीय' केलं, पण गुजराती-मारवाडी-युपीच्या नेत्यांमध्येच भाजपचा भारत?
‘कंबोज हे स्वतःच मूळ आडनाव बदलून ‘भारतीय’ करून त्यावर मोठा इव्हेंट देखील भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील नेते मोहित कंबोज यांनी भरवून आणला होता. मात्र या महाशयांच्या ‘भारतीय’ या व्याख्येत अजून गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय एवढ्याच समाजाचा भारत सामावलेला आहे असंच म्हणावं लागेल. त्यात असे प्रश्न भाजपच्या नेत्यांना केवळ महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाबाबतच पडत असल्याने काळाच्या मंत्रिमंडळात गुजराती, मारवाडी आणि उत्तर भारतीय नेत्यांना स्थान मिळालं नसल्याने त्यांना वेगळीच पोटदुखी होऊ लागल्याचं दिसतं.
5 वर्षांपूर्वी -
नगराध्यक्ष: चंद्रकांत पाटलांचं कोल्हापुर-रत्नागिरीतील भोपळा लपवत सावंतवाडीवर ट्विट
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा भाजप विजयी होत असल्याचं दाखविण्यासाठी आटापिटा. वास्तविक रत्नागिरी नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष पोट निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा एकदा आपले वर्चस्व राखत आपला गड कायम राखला. संघर्षमय झालेल्या या निवडणुकीत शिवसेनेचे प्रदीप उर्फ बंड्या साळवी १०९२ मतांनी विजयी झाले. भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या लढतीत शिवसेनेने बाजी मारली आहे सेना आणि भाजपमध्ये चुरशीची लढत झाली असली तरी काँग्रेस राष्ट्रवादीचे उमेदवार मिलिंद कीर यांनी भाजपा समांतर खालोखाल मते मिळवल्याने शिवसेनेचा विजय सुकर झाला एका परीने सेनेला आपले अस्तित्व दाखवता आले त्यामुळे भाजपचे उमेदवार दीपक पटवर्धन यांना चुरशीच्या लढतीत पराभव पत्करावा लागला.
5 वर्षांपूर्वी -
बेळगाव: महाराष्ट्राला एक इंचही जागा देणार नाही; कर्नाटक भाजप सरकारने ठणकावलं
कर्नाटकातील कनसेच्या नेत्यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना गोळ्या घालण्याचे वक्तव्य केल्याचे पडसाद आता सीमाभागात उमटू लागले आहेत. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने शनिवारी सायंकाळपासून दोन्ही राज्यांदरम्यानची बससेवा बंद करण्यात आली होती.
5 वर्षांपूर्वी -
पवारांची साथ सोडणारे आ. राणाजगजितसिंह पाटील राजकीय अडचणीत
आज राष्ट्र्वादीत असते तर मंत्रीपदी वर्णी निश्चित असली असती, मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी लाटेच्या आशेवर भारतीय जनता पक्षात उडी घेऊन पवार कुटुंबियांशी दगा करणारे आमदार राणा राणाजगजितसिंह पदमसिंह पाटील सध्या राजकीय पेचात पडण्याची शक्यता आहे. मूळ मतदारसंघ सोडून दुसऱ्याच मतदारसंघातून ते निवडून आले खरे, मात्र त्यांचं उस्मानाबाद’मधील राजकीय भविष्य धिक्यात येऊ शकतं.
5 वर्षांपूर्वी -
धनंजय मुंडेंचा देखील मंत्रिमंडळात समावेश निश्चित
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून पाडलेली छाप आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर 30 हजारांहून अधिक मतांनी मिळविलेला विजय यामुळे धनंजय मुंडे यांना पक्षाकडून कॅबिनेट मंत्रिपद निश्चित झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, मुंबईत आज होणाऱ्या शपथविधीसाठी परळीसह जिल्ह्यातून कार्यकर्ते रवाना झाले आहेत. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य ते कॅबिनेट मंत्री असा त्यांचा प्रवास असेल. सोमवारी मंत्रिमंडळाचा विस्तार असून धनंजय मुंडे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी पक्षाकडून रीतसर निरोप आल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
5 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांसाठी झगडणाऱ्या आ. बच्चू कडूंना शिवसेनकडून मंत्रिपद
महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळालंय. आदित्य ठाकरे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात २५ कॅबिनेट मंत्री असणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अजित पवारांकडे उपमुख्यंमत्री पद आणि महत्वाची खाती?
महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळालंय. आदित्य ठाकरे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात २५ कॅबिनेट मंत्री असणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मंत्रिमंडळ विस्तार; शिवसेनकडून कोणाला मिळणार संधी
महाविकास आघाडीच्या सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर होत आहे. या विस्तारात आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांच्या मिळून एकूण ३६ नव्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. सोमवारच्या शपथविधीनंतर सर्व मंत्र्यांना खातेवाटप होईल, अशी अपेक्षा आहे. ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळात आमदार आदित्य ठाकरेंना स्थान मिळालंय. आदित्य ठाकरे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात २५ कॅबिनेट मंत्री असणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
‘वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही'; अमृता फडणवीसांकडून उद्धव ठाकरे लक्ष
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यात सत्तापालट झाल्यापासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि शिवसेनेमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अमृता फडणवीस यांनी वारंवार थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य करताना, ‘वाईट नेता मिळणं ही महाराष्ट्राची चूक नाही, पण त्या नेत्यासोबत राहणं ही मात्र चूक आहे’ अशी घणाघाती टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
पीक कर्जमाफीचा निर्णय घाईगडबडीतला, राज्य सरकारने पुनर्विचार करावा: राजू शेट्टी
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली आहे. मात्र सरसकट कर्जमाफी करू म्हणणाऱ्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांची सरसकट फसवणूक केल्याची भावना आता शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
5 वर्षांपूर्वी -
जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही; अजित पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला
राज्यात सत्तेत असलेल्या महाविकासआघाडी सरकारच्या राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार सोमवार ३० डिसेंबर रोजी होणार असल्याचे निश्चित समजले जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला गृहमंत्रिपद देऊ नये असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. एनसीपीला गृहमंत्रिपद दिल्यास मातोश्रीवरही कॅमेरे लागतील, असंही पाटील म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याला एनसीपीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रसार माध्यामांशी बोलताना उत्तर दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
विखेंमुळे नगरमध्ये भाजपाला काहीच फायदा झाला नाही, उलट तोटाच: राम शिंदे
महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कर्जत-जामखेडच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांचा विजय झाला होता. रोहित पवार यांना १३५८२४ तर भारतीय जनता पक्षाचे राम शिंदे यांना ९२४७७ मते मिळाली. राेहित पावर यांचा तब्बल ४३,३४७ मतांनी विजय झाला आहे. त्यामुळे मंत्री राम शिंदे यांना ५ वर्ष तरी घरी बसावं लागणार हे निश्चित झालं. निवडणुकीपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे राजकीय वारसदार म्हणून चर्चेत आलेले रोहित पवार यांनी पहिल्याचा दणक्यात भाजपच्या एका मंत्र्याला पराभूत करून घरी बसवला होतं. सध्या कर्जत-जामखेडमधील रोहित पवारांचा वाढता राजकीय आवाका पाहता राम शिंदेंना पुढच्या दुसराच मतदारसंघ शोधावा लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे राम शिंदे देखील संतापलेले दिसतात.
5 वर्षांपूर्वी -
एकाही सदस्याच्या केसालाही धक्का लागला तर शिवसेनेशी गाठ: शिवसेना खा. धैर्यशील माने
मराठी भाषिकांवरील अन्याय, अत्याचाराचा संदर्भ देत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात बेळगावसह सीमाभाग पाकिस्तानमध्ये आहे का? असा सवाल केला होता. यानंतर एका कन्नड संघटनेच्या नेत्याने मराठी भाषिकांना थेट गोळ्या घालून हत्या करण्याची भाषा केली आहे. यामुळे याचे सीमाभागात संतप्त पडसाद उमटले. वक्तव्याचा निषेध नोंदवला जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
गृहमंत्रिपद राष्ट्रवादीकडे जाण्याची भाजपाला धास्ती? सविस्तर वृत्त
प्रशासन हाताळण्याचा दीर्घ अनुभव असलेल्या राष्ट्रवादीकडे गृहमंत्रीपद जुन्याची धास्ती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याचं पाहायला मिळत आणि त्यामुळे ती भीती वेगळ्याच मार्गाने ते व्यक्त्त करण्यात गुंतले आहेत असं दिसतं. मुख्यमंत्री पदानंतर सर्वात महत्वाचं पद असलेलं गृहमंत्री पद राष्ट्रवादीकडे गेल्यास त्यावर निश्चित त्यांच्या पक्षातील अनुभवी आणि बलाढ्य नेते विराजमान होतील आणि सर्वात मोठी कोंडी होईल ती भारतीय जनता पक्षाची याची भाजपाला खात्री आहे आणि त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्याला वेगळाच राजकीय रंग देऊ पाहत असल्याचं म्हटलं जातं आहे.
5 वर्षांपूर्वी -
“वांझोट्या बाईला स्त्रित्व नसते”....संभाजी भिडेंचं स्त्रियांबद्दल संतापजनक वक्तव्य
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मंगळवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्याबाबत हिंदू समाज नपुंसक आहे असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरली आहे. यावेळेस त्यांनी थेट गरोदर स्त्रियांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. मुलं नसणाऱ्या स्त्रियांचा आक्षेपार्ह शब्द वापरत भिडे यांनी उल्लेख केला आहे. हिंदू समाजाच्या राष्ट्रीयत्वाबद्दल बोलताना भिडे यांनी “वांझोट्या बाईला स्त्रित्व नसते,” असं वक्तव्य केलं आहे. सांगलीमध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.
5 वर्षांपूर्वी -
पोलीस भरती प्रक्रियेत आधी मैदानी चाचणी घ्यावी: खासदार सुप्रिया सुळे
राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेसंदर्भातील गेल्या शासनाने काढलेला शासन निर्णय रद्द करून ही प्रक्रिया पूर्वीप्रमाणेच राबवण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. आता या मागणीनुसार कार्यवाही झाल्यास राज्यभरातील लाखो उमेदवारांना दिलासा मिळू शकेल.
5 वर्षांपूर्वी -
'राष्ट्रीयत्वा'वर हिंदू समाज नपुंसक होऊन जातो : संभाजी भिडे
शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. जेव्हा राष्ट्रीयत्वाचा मुद्दा येतो, तेव्हा हिंदू समाज नपुंसक होऊन जातो, असं ते म्हणाले. शिवाय त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचं समर्थनही केलं. मुस्लिमांकडून राष्ट्रीयत्वाची अपेक्षा करणं हा मूर्खपणा असल्याचंही ते म्हणाले. जगभरात सीएए कायदा आहे, मग भारतातच का नको? भारतीयांना जोडणाऱ्या या कायद्याबाबत विरोधक संभ्रम निर्माण करत आहेत, असा आरोपही संभाजी भिडे यांनी केला.
5 वर्षांपूर्वी