महत्वाच्या बातम्या
-
शेतकऱ्यांना प्रतिगुंठा ८० रुपये मदतीच्या निर्णयाचा राज्यपालांनी फेरविचार करावा: जयंत पाटील
अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेल्या पीडित शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आर्थिक मदत जाहीर केली आहे. बारामाही पिकांमध्ये फळबागांसह विविध पिकांचा समावेश होतो. अवकाळी पावसामुळे या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. सुरुवातीला पावसाने दडी मारली आणि नंतर अतिवृष्टी झाली. त्यामुळे जे काही पीक आलं होतं, ते सर्व गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.
6 वर्षांपूर्वी -
मदत तुटपुंजी! काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकऱ्यांचे दु:ख कळणार नाही: राजू शेट्टी
अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलेल्या पीडित शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेत आर्थिक मदत जाहीर केली आहे. बारामाही पिकांमध्ये फळबागांसह विविध पिकांचा समावेश होतो. अवकाळी पावसामुळे या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. सुरुवातीला पावसाने दडी मारली आणि नंतर अतिवृष्टी झाली. त्यामुळे जे काही पीक आलं होतं, ते सर्व गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली.
6 वर्षांपूर्वी -
पडद्याआड हालचाली! काँग्रेस-राष्ट्रवादीत फेर-मेगाभरती होण्याची शक्यता? सविस्तर वृत्त
सरकार स्थापनेच्या सुरुवातीलाच बहुमताचा आकडा गाठणं अशक्य असल्याचं लक्षात येताच भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असं जाहीर केलं. मात्र, मागील दोन दिवसांपासून असमर्थ ठरणारे भाजपचे नेते अचानक पुन्हा आमचंच सरकार येणार असं वारंवार बोलू लागले आहेत. परंतु, त्यामागील मुख्य कारण दुसरंच असल्याचं वृत्त आहे. कारण महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होताच भारतीय जनता पक्षातील विद्यमान मंडळी भाजपाला सोडचिट्ठी देण्याचा मार्गावर असल्याची चुणचुण भाजपाला लागली आहे.
6 वर्षांपूर्वी -
क्रिकेटमध्ये चेंडू दिसतो, राजकारणात नाही; भाजपला चेंडू दिसलाच नाही: बाळासाहेब थोरात
‘क्रिकेट आणि राजकारणात खूप फरक आहे. क्रिकेटमध्ये चेंडू दिसतो. राजकारणात तसं होतंच असं नाही. भाजपचंही तेच झालं. त्यांना चेंडू दिसलाच नाही,’ असा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्युत्तर दिलं.
6 वर्षांपूर्वी -
सध्या तरी 'मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन' इतकंच माझ्या डोक्यात: शरद पवार
शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी थेट शेताच्या बांधावर गेलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नागपुरातच ‘मी पुन्हा येईन’वरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला. सध्या तरी ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ इतकंच माझ्या डोक्यात आहे, असं ते म्हणाले. मध्यावधी होण्याचा प्रश्नच नाही. हे सरकार स्थापन होणार असून, ते पाच वर्षे चालणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
६ तारखेच्या बैठकीत निर्णय, पण शेतकऱ्यांना आकस्मित निधी पोहोचलाच नाही: सविस्तर
राज्यात सर्वत्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातील सत्ता स्थापनेवरून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत वाद सुरू असताना दुसरीकडे शरद पवार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले होते. शरद पवार शुक्रवारी अकरा वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाले होते. इगतपुरीमधील भात पिकाच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्यांच्या व्याथा त्यांनी जाणून घेतल्या होत्या. आमच्या हातचं पीक गेलंय. खूप नुकसान झालंय. जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही, असं शेतकऱ्यांनी पवारांना सांगितलं.
6 वर्षांपूर्वी -
४ राज्यात भाजपने जनादेशाचा अपमान केला, पण राष्ट्रपती राजवट लागू झाली नाही
सध्या राज्यातील सत्तास्थापनेच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा तिळपापड होताना दिसत आहे आणि त्यामुळे ते संतापलेले दिसत असून प्रत्येक गोष्टीत जनादेशाचा आदर भाजप करते असे डोस पाजू लागले आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवर देखील भाजपच्या या टीकेला जोरदार प्रतिउत्तर देण्यात येतं आहे.
6 वर्षांपूर्वी -
बीड भाजप'मय करणार होत्या; आज स्वतःच आमदार कसं व्हायचं या पेचात अडकल्या पंकजा?
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील वाद मुख्यमंत्रीपदाच्या निमित्ताने विकोपाला गेला. मात्र, त्यानंतर राज्याच्या राजकारणात ऐतिहासिक घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीत सत्तास्थापनेच्या घडामोडी वेग घेऊ लागल्याचं पाहायला मिळालं. राज्यात राष्ट्रपती राजवट जरी अंमलात आली असली तरी सध्याच्या राजकीय घडामोडी पाहता शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाशिवआघाडी सत्तास्थापन करेल अशी शक्यता अधीक आहे. विशेष म्हणजे स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःच सोशल मीडिया स्टेटस देखील बदलल्याने भाजपच्या अपेक्षा संपुष्टात आल्या आहेत हे स्पष्ट आहे.
6 वर्षांपूर्वी -
'फडणवीस परत आले', पण मुख्यमंत्री नाही तर 'महाराष्ट्राचे सेवक' बनून
युतीला बहुमत मिळाल्यानंतरही भारतीय जनता पक्ष-सेनेत मतभेदांमुळे सरकार स्थापन करता आलं नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू होईपर्यंतच्या काळात त्यांच्याकडे काळजीवाहू मुख्यमंत्रिपद होते. भारतीय जनता पक्षानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला वेळेत सत्ता स्थापनेसाठी दावा करता आला नाही. त्यासाठी वेळ वाढवून मागितली मात्र, राज्यपालांनी त्यासाठी नकार दिला. अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
6 वर्षांपूर्वी -
सरकार तर स्थापन करणार अन मध्यावधी निवडणूक सुद्धा होणार नाहीत: शरद पवार
भारतीय जनता पक्ष-शिवसेनेतील बेबनावामुळं महाराष्ट्राच्या राजकारणानं अनपेक्षित वळण घेतलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय विरोधक म्हणून एकमेकांना पाण्यात पाहणारे काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचे नेते मनाने जवळ आले आहेत. इतकेच नव्हे, हे नेते एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बैठका घेऊ लागले आहेत. त्यांच्यातील या जवळीकीमुळं राज्यात नव्या सरकारच्या स्थापनेची शक्यता बळावली आहे.
6 वर्षांपूर्वी -
सब का हिसाब होगा? राज्यातील सर्व महामंडळं व समित्यांवरून भाजपराज खालसा होणार
राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तास्थापनेचे अंतिम सूत्र ठरल्याची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाटून घेतले जाईल तर पूर्ण पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद हे काँग्रेसकडे राहील या निर्णयावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाल्याचे वृत्त आहे. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिळालेल्या वृत्तानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे खासदार आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अमहमद पटेल यांच्यामध्ये मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
ठरलं! शिवसेना-राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपद तर काँग्रेसकडे उपमुख्यमंत्री
राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तास्थापनेचे अंतिम सूत्र ठरल्याची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाटून घेतले जाईल तर पूर्ण पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद हे काँग्रेसकडे राहील या निर्णयावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाल्याचे वृत्त आहे. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिळालेल्या वृत्तानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे खासदार आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अमहमद पटेल यांच्यामध्ये मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
आमदार फोडून कोण माइकालाल त्याला निवडून आणतो ते बघू; अजित पवारांचं राणेंना आव्हान
सत्तास्थापनेचा तिढा वाढला असून भारतीय जनता पक्षासाठी सर्व अशा जवळपास संपल्यात जमा आहेत. भारतीय जनता पक्षातील दिल्ली ते गल्ली’मधील नेत्यांची अवस्था पाहता आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाम भूमिका पाहता, भाजपने युतीत सत्ता स्थापनेची अपेक्षा जवळपास संपुष्टात आणली आहे. मात्र इतिहासात तोडफोडीच्या राजकारणाचा अनुभव असलेल्या खासदार नारायण राणे यांना बोलावून फडणवीसांनी त्यांच्यावर सरकार स्थापनेच्या शक्यता तपासण्याची जवाबदारी टाकल्याचे वृत्त आहे. त्यालाच अनुसरून आमदार नितेश राणे यांनी खासदार नारायण राणे यांचा फोटो ट्विट करत “अब आएगा मज़ा” असं ट्विट केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
'अब आएगा मज़ा'; आमदार नितेश राणेंचं ट्विट
सत्तास्थापनेचा तिढा वाढला असून भारतीय जनता पक्षासाठी सर्व अशा जवळपास संपल्यात जमा आहेत. भारतीय जनता पक्षातील दिल्ली ते गल्ली’मधील नेत्यांची अवस्था पाहता आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाम भूमिका पाहता, भाजपने युतीत सत्ता स्थापनेची अपेक्षा जवळपास संपुष्टात आणली आहे. मात्र इतिहासात तोडफोडीच्या राजकारणाचा अनुभव असलेल्या खासदार नारायण राणे यांना बोलावून फडणवीसांनी त्यांच्यावर सरकार स्थापनेच्या शक्यता तपासण्याची जवाबदारी टाकल्याचे वृत्त आहे. त्यालाच अनुसरून आमदार नितेश राणे यांनी खासदार नारायण राणे यांचा फोटो ट्विट करत “अब आएगा मज़ा” असं ट्विट केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
सत्तास्थापना अशक्य असल्याने फडणवीसांनी राणेंवर जवाबदारी टाकली? - सविस्तर वृत्त
आपल्याला सत्ता स्थापन करायची आहे, कामाला लागा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं असून सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली आहे, असं सांगतानाच मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे. त्यामुळे भाजपची सत्ता येण्यासाठी मला जे काही करता येईल ते करेल, असं भारतीय जनता पक्ष नेते नारायण राणे यांनी स्पष्ट करून खळबळ उडवून दिली.
6 वर्षांपूर्वी -
अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू
महाराष्ट्रात अखेर तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशीच्या फाइलवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अखेर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे आजपासून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवट लागू असली तरी एखाद्या पक्षाने पुरेसे संख्याबळ दाखवल्यास त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी दिली जाईल. त्यानंतर राज्यातील राष्ट्रपती राजवट उठवली जाईल, असं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे.
6 वर्षांपूर्वी -
केंद्रीय मंत्रीमंडळाची मजुरी; कोणत्याही क्षणी राष्ट्रपती राजवट जाहीर होण्याची शक्यता?
राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम असून राज्यपाल कोश्यारी यांनी तिसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिले आहे. भारतीय जनता पक्षाने वेट अँड वॉचची भूमिका घेतली असून शिवसेनेने पुन्हा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. आज काँग्रेस पक्ष काय भूमिका घेतो यावर सगळी गणितं अवलंबून असून आजचा दिवस निर्णायक मानला जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राज्यपालांची केंद्रीय गृहमंत्रालयाकडे शिफारस: दूरदर्शनचं वृत्त
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं हे दोन्ही पक्ष सरकार बनविण्यात असमर्थ ठरले असून राज्यपालांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं होतं. मात्र राष्ट्रवादी शिवसेनेच्या पाठिंब्यावर अवलंबून असल्याचं दिसून येत असल्याने राज्यपालांनी कायदेशीर सल्ला घेत केंद्रीय गृहमंत्रालयाला ही शिफारस पाठविली असल्याची माहिती सरकारी वृत्तवाहिनी दूरदर्शनने दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज यांनी सांगितलेले 'ते' अदृश्य हात मोठी खेळी खेळत आहेत? - सविस्तर वृत्त
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाला अभूतपूर्व असं नाट्यमय वळण लागलं आहे. सत्ता स्थापनेच्या खेळात सोमवारी अनेक घडामोडी घडल्या. शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पाठिंबा देईल असं वाटत होते. मात्र अखेरच्या क्षणी सेना नेते राज्यपालांना भेटले पण त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा वेळेत मिळाला नाही. त्यातच राज्यपालांनी सेनेला सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी वेळ वाढवून देण्यास नकार दिला. सेनेची वेळ संपल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादीला सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी 24 तासांचा वेळ दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने समर्थन तर मागितलं पण प्रस्ताव सादर न केल्याने समर्थनाचं पत्रं लांबलं?
शिवसेनेला देशपातळीवर राजकारण करायचं आहे, केरळमधील काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या विरोधामुळे शिवसेनेला पाठिंबा देण्यास काँग्रेसने अमर्थता दर्शवल्याचं सांगण्यात येत आहे. परंतु, शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र न देण्यामागे शरद पवारांनी सोनिया गांधी यांनी दिलेली माहिती हेच कारण असल्याचं समजतं. काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्यातील सत्तास्थापनेच्या हालचाली गतीमान असताना, सोमवारी सायंकाळी ६ वाजता शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली होती.
6 वर्षांपूर्वी