महत्वाच्या बातम्या
-
विधानसभा प्रचाराला न फिरकलेलं गांधी कुटूंब आज राज्यात पवारांमुळे अस्तित्व टिकवून? - सविस्तर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुका पार पडून निकाल देखील जाहीर झाले असले तरी सत्ता स्थापनेचा घोळ अजून कायम असल्याचं चित्र आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वच प्रमुख पक्षांचे नेते स्वपक्षाच्या प्रचारासाठी मैदानात उतरले होते, तेव्हा देशातील सर्वात मोठं गांधी कुटूंब मात्र राज्यातील नेत्यांना एकाकी सोडून दिल्लीत रममाण होते. किंबहुना आपला सुपडा साफ होणार याची त्यांना खात्री असावी म्हणून त्यांनी मेहनत न घेण्याचा निर्णय घेतला असावा.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रपती राजवट लागल्यास पवार त्याविरोधात शिवसेनेलासोबत घेत राज्यभर आंदोलन करणार?
सोमवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली त्यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादी सत्तास्थापन करण्यास समर्थ आहे का हे सिद्ध करा, मंगळवारी रात्री ८.३० पर्यंत राष्ट्रवादीला मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आपले पत्ते योग्य वेळी उघडणार आहे. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनासोबत घेऊन राष्ट्रवादी राज्यात महाशिवआघाडीचा प्रयोग यशस्वी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्याने शरद पवार आज पत्ते उघडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
सत्तास्थापनेचा असा देखील गेमप्लॅन असल्याची चर्चा; राष्ट्रवादीचा पुढाकार
सोमवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली त्यावेळी राज्यपालांनी राष्ट्रवादी सत्तास्थापन करण्यास समर्थ आहे का हे सिद्ध करा, मंगळवारी रात्री ८.३० पर्यंत राष्ट्रवादीला मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आपले पत्ते योग्य वेळी उघडणार आहे. शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनासोबत घेऊन राष्ट्रवादी राज्यात महाशिवआघाडीचा प्रयोग यशस्वी करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेचं निमंत्रण दिल्याने शरद पवार आज पत्ते उघडणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
वंचित आघाडी पुढील विरोधीपक्ष असेल सांगणारे फडणवीस स्वतः विरोधी पक्षात बसणार
महाराष्ट्रातील सत्तेचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वैचारिक मतभेद दूर लोटून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेणार का?, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना व याबाबत अनेक उलटसुलट बातम्या क्षणाक्षणाला येत असताना त्याचं उत्तर ‘होय’ असं मिळालं आहे. सोनिया गांधी यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेसाठी गोड बातमी! राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार
महाराष्ट्रातील सत्तेचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वैचारिक मतभेद दूर लोटून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेणार का?, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना व याबाबत अनेक उलटसुलट बातम्या क्षणाक्षणाला येत असताना त्याचं उत्तर ‘होय’ असं मिळालं आहे. सोनिया गांधी यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
6 वर्षांपूर्वी -
भाजपचे ७ आमदार अजित पवारांच्या संपर्कात तर २ अपक्ष आमदार सेनेच्या संपर्कात
भारतीय जनता पक्षाच्या गोटात गेलेले २ अपक्ष आमदार शिवसेनेच्या संपर्कात आहे. दरम्यान, या २ आमदारांची नावे समजू शकलेली नाहीत. परंतु, त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट मागितली आहे. सध्याच्या राजकीय हालचाली बघता उद्धव यांना वेळ नाही. त्यामुळे त्या २ अपक्ष आमदारांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.
6 वर्षांपूर्वी -
पवारांच्या खेळीने भाजपात गेलेल्या अनेक दिग्गजांची राजकारणात दांडी गुल होणार? - सविस्तर वृत्त
भारतीय जनता पक्ष सहकारी पक्षांना संपवतो असा आरोप त्यांच्यावर नेहमीच करण्यात आला आहे. वास्तविक त्यात तथ्य असलं तरी सत्तेतील सहकारी पक्षातील नेते आणि त्यांच्या पक्षाला देखील भाजपने राज्यात अप्रत्यक्षरीत्या स्वतःच्या पक्षाला विसरून भाजपचे अघोषित प्रवक्ते होण्यास भाग पाडलं होतं. महादेव जाणकारांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना, रामदास आठवले यांचा आरपीआय आणि विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष अप्रत्यक्षरीत्या का होईना, स्वतःचे पक्ष विसरून भाजपाच्यामागे फरफटत गेले आणि आज त्यांच्या कार्यकर्त्यांना भविष्य आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागला आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोडचिट्ठी देणारे दिग्गज नेते देखील पवारांच्या राजकीय खेळीने काय करावे आणि काय करू नये या विचाराने पछाडले असणार यात वाद नाही.
6 वर्षांपूर्वी -
सर्व पक्षीच्या नेत्यांचे राज्य व देशासाठी योगदान; काँग्रेस-राष्ट्रवादी हे काय देशद्रोही नाहीत: संजय राऊत
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा आणखी वाढला आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळू नये वेळेप्रसंगी विरोधी पक्षात बसू असं षडयंत्र भारतीय जनता पक्षचं शिवसेनेविरोधात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे देशद्रोही नाही, सर्व पक्षाचे अन् नेत्यांचे राज्यासाठी आणि देशासाठी योगदान राहिलं आहे. सगळ्या नेत्यांच्या एकमेकांशी संवाद सुरु आहे. राजकीय स्थितीचं भान सगळ्यांना आहे. हे महाराष्ट्र राज्य आमचं आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे ही राजधानी ताब्यात राहावी असं कारस्थान सुरु आहे असाही आरोप खासदार संजय राऊतांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपाच्या कोअर कमिटीचीही आज महत्वपूर्ण बैठक
अडीच वर्षांसाठीच्या मुख्यमंत्रिपदाची शिवसेनेची मागणी भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला कोणत्याही परिस्थितीत मान्य नसल्याने युतीतील सत्तास्थापनेचा पेच कायम राहिला. त्यातच देशात स्थिर सरकार देणारे नेतृत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा तयार झाल्याने त्याला तडा जाईल, असे कोणतेही पाऊल न उचलण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला व सत्तास्थापनेसाठी असमर्थ असल्याचे भारतीय जनता पक्षाने राज्यपालांना कळवल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
भाजपच्या भूमिकेने विनायक मेटे, सदाभाऊ खोत आणि मेटेंच्या राजकारणाला यु-टूर्न?
भारतीय जनता पक्ष सहकारी पक्षांना संपवतो असा आरोप त्यांच्यावर नेहमीच करण्यात आला आहे. वास्तविक त्यात तथ्य असलं तरी सत्तेतील सहकारी पक्षातील नेते आणि त्यांच्या पक्षाला देखील भाजपने राज्यात अप्रत्यक्षरीत्या स्वतःच्या पक्षाला विसरून भाजपचे अघोषित प्रवक्ते होण्यास भाग पाडलं होतं. महादेव जाणकारांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांचा रयत क्रांती संघटना, रामदास आठवले यांचा आरपीआय आणि विनायक मेटे यांचा शिवसंग्राम पक्ष अप्रत्यक्षरीत्या का होईना, स्वतःचे पक्ष विसरून भाजपाच्यामागे फरफटत गेले आणि आज त्यांच्या कार्यकर्त्यांना भविष्य आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्याला सक्षम विरोधी पक्षाची गरज होती; आता सर्व मिळून भाजपला विरोधात बसवणार
विधानसभा निवडणुकीपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वच सभांमधून राज्याला एका संक्षम विरोधीपक्षाची गरज असल्याचं वारंवार म्हटलं होतं. एकूणच ढासळत्या लोकशाहीत विरोधीपक्षाचं महत्व राज ठाकरे यांनी मतदाराला वारंवार समजावून सांगितलं. मनसेला निकालाअंती मोठं यश प्राप्त झालं नसलं तरी त्यांनी केलेल्या आवाहनानंतर मतदाराने जे मतदान केलं, त्यानंतर थेट भाजप, म्हणजे १०५ आमदार असलेला सर्वात मोठा पक्ष झाला असून तोच आता विरोधी पक्षात बसणार असं प्राथमिक चित्र निर्माण झालं आहे.
6 वर्षांपूर्वी -
पवारांचं राजकारण संपविण्याचं भाष्य करणाऱ्या भाजपच्या चेहऱ्यावरील हास्य संपलं?
विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस संपविण्यात भाजपचे राज्यातील प्रमुख नेते त्यात स्वतः देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवार आघाडीवर होते. राष्ट्रवादीचे जवळपास ९० टक्के आमदार फोडून पवारांचा आत्मविश्वास संपविण्याचा हेतू पुरस्कर प्रयत्न केला होता. त्यात अनेकांनी राज्यात पवारांच्या राजकारणाचे दिवस संपल्याचं भर सभेत म्हटलं होतं आणि देशात केवळ मोदींच राज्य चालतं असा टोकाचा आत्मविश्वास अनेकदा बोलून दाखवला होता. मात्र निवडणुकीनंतर भाजपच्या त्याच नेत्यांचं हास्य पवारांच्या राजकारणामुळे पूर्ण हरवल्याचं निवडणुकीच्या निकालानंतर पाहायला मिळत आहे. प्रसार माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर बोलल्यासाठी वसवसनारे हेच भाजप नेते सध्या प्रसार माध्यमांच्या कॅमेरापासून तोंड लपवत फिरत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस सेनेला बाहेरून पाठिंबा देण्याची शक्यता; दोन्ही बाजूंनी अप्रत्यक्ष वक्तव्य
महाराष्ट्र विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल २४ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. त्यात भाजप हा १०५ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिवसेना ५६ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. हे दोन्ही पक्ष महायुतीने निवडणुका लढले होते. मात्र, निकालानंतर अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदावरून या दोन्ही पक्षांत संघर्ष सुरू झाला. शिवसेना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवर ठाम राहिल्याने व भाजपने ही मागणी सपशेल फेटाळून लावल्याने या सत्तासंघर्षाने कळस गाठला.
6 वर्षांपूर्वी -
आयपीएस-आयएएस अधिकाऱ्यांना वाढीव वेळ मिळतो; आता मुख्यमंत्र्यांना देखील?
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज १४ दिवस झाले तरी अद्यापही राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नाही. शिवसेना अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून भाजप हे पद सोडण्यास तयार नाही. त्यामुळं अभूतपूर्व सत्ताकोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी प्रत्येक पक्षाचे आपापल्या परीनं प्रयत्न सुरू असल्यानं राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे सोपविला आहे. शिवसेनेने मुख्यमंत्री पदाची अट ठेवल्याने भारतीय जनता पक्षाला पुन्हा युतीची सत्ता स्थापन करण्यास अडचणी आल्या आहेत. यामुळे उद्या सध्याच्या फडणवीस सरकारची मुदत संपुष्टात येणार असल्याने त्यांनी आज राजीनामा दिला आहे. यानंतर फडणवीस हे पत्रकार परिषद घेणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे आमदार घरीच; कारण सगळ्यांना उदयनराजेंचा फोटो मेसेज केला...बाकी सलाम त्या?
राज्यातल्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना आज वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या बैठका एकीकडे सुरू असतानाच दुसरीकडे काल शिवसेनेच्या आमदारांचीही बैठक पार पडली. अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासह सत्तेतल्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे. आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेनेकडून सावधगिरी बाळगण्यात येत असून सर्व आमदारांना काल रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर देखरेख ठेवली जात आहे. ‘मला युती तोडण्याची इच्छा नाही; पण जे ठरलंय तेच व्हावं. आमची बाकी काही अपेक्षा नाही,’ अशी आपली भूमिका उद्धव ठाकरे यांनी आधीच स्पष्ट केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आमदार खरेदीचे आरोप खोटे; काँग्रेस-राष्ट्रवादीने पुरावे द्यावेत: मुनगंटीवार
भारतीय जनता पक्ष सत्ता स्थापनेसाठी आमदार फोडण्याचा प्रयत्न करत असल्याची खोटी माहिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाने दिली असून येत्या ४८ तासांत या पक्षांनी या आरोपाबाबत पुरावे द्यावे, अन्यथा राज्यातील जनतेचा माफी मागावी, असे आवाहन बारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याने कोणत्याही आमदाराला फोन केलेला नाही, कुणाकडे कॉल रेकॉर्डिंग असेल, तर त्यांनी ती सादर करावी, असे आव्हानही मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षांना दिले आहे. मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
८ नोव्हेंबर हा पु.ल. देशपांडेची आठवण जागवण्याचा दिवस, उन्मत्त मोदी सरकारने काळा दिवस केला
आज ८ नोव्हेंबर हा लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणाऱ्या पुलं देशपांडे यांच्या स्मृती जागवण्याचा दिवस. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने २०१६ मध्ये ८ नोव्हेंबरला ऐतिहासिक नोटबंदी जाहीर करून आज हा काळा दिवस करुन टाकला,” अशी खरमरीत टीका महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष अमेय खोपर यांनी केली आहे. आज भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाईट परिस्थितीला कारणीभूत ठरलेल्या त्याच निर्णयाला ३ वर्ष पूर्ण झाली. त्याअनुषंगाने सर्वच थरातून मोदी सरकारवर टीका होताना दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री आमचाच! अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद वाटपाचं काहीही ठरलं नव्हतं: नितीन गडकरी
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आज १४ दिवस झाले तरी अद्यापही राज्यातील सत्तेचा पेच सुटलेला नाही. शिवसेना अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या भूमिकेवर ठाम असून भारतीय जनता पक्ष हे पद सोडण्यास तयार नाही. त्यामुळं अभूतपूर्व सत्ताकोंडी निर्माण झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी प्रत्येक पक्षाचे आपापल्या परीनं प्रयत्न सुरू असल्यानं राज्यात वेगवान घडामोडी घडत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसच्या १-२ आमदारांना भाजप नेत्यांकडून २५ कोटीची ऑफर मिळाली होती: नितीन राऊत
१३ व्या विधानसभेचा कार्यकाळ संपायचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह सर्व विधानसभा आमदार राजीनामा देतील. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. भारतीय जनता पक्षाने अद्याप सत्तास्थापनेचा दावा केला नाही. या पार्श्वभुमीवर राज्यात आमदार फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. शिवसेनेचे सर्व आमदार रंगशारदामध्ये आहेत. काँग्रेसचे नेते जयपूरला गेले आहेत. या पार्श्वभुमीवर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी भारतीय जनता पक्षावर घणाघाती आरोप केले आहेत.
6 वर्षांपूर्वी