महत्वाच्या बातम्या
-
शिवसेनेच्या चिन्हाबाबत सध्या कोणताही निर्णय घेऊ नका, सुप्रीम कोर्टाचे मुख्य निवडणूक आयोगाला महत्त्वाचे आदेश
शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला आणि आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केला. त्यामुळे शिवसेना कुणाची? असा प्रश्न उपस्थितीत केला गेला आहे. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. यावेळी शिवसेनेच्या चिन्हाबद्दल कोणताही निर्णय़ घेऊ नका, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहे. तसंच या प्रकरणाची सुनावणी सोमवारी होणार आहे. तसंच, दोन्ही गटांच्या लिखित युक्तिवादावर निर्णय घेतला जाईल, असंही कोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळे पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे निर्णय जाणार की नाही, याबद्दल सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे.
3 वर्षांपूर्वी -
तुम्ही राजकीय पक्षाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असाल तर ते लोकशाहीला धोकादायक | या टिपणीने शिंदें गटात धाकधूक वाढली
शिंदे गट विरुद्ध शिवसेना वादावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायालयाने शिंदे गट, शिवसेना आणि निवडणूक आयोगाचं म्हणणं ऐकून घेतलं. या प्रकरणावरील पुढील सुनावणी ८ ऑगस्ट रोजी होणार आहे. मात्र, निवडणूक आयोगात असलेल्या प्रकरणात शिवसेनेला दिलासा मिळाला आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे-फडणवीस सरकारच्या 'मायक्रो कॅबिनेट' मंत्रिमंडळाचा जम्बो निर्णय | सुप्रीम कोर्टाच्या निकालापूर्वी प्रभाग रचनांबाबत घाईत निर्णय?
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुकांबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका या 2017 सालाच्या प्रभाग रचनेप्रमाणेच घेण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मनसेची उद्धव ठाकरेंवर नेहमीच राजकीय आगपाखड | पण आज ते पूर्वीपासून शिंदेच मनसे फोडत होते, मनसे कार्यकर्त्यांचं विलीनीकरण सुरु
एकिकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षावर संकटं येत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच्या पक्षविस्तारात लक्ष घालून आहेत. शिवसेनेचे आमदार, खासदार शिंदे गटात दाखल होत असताना आता एकनाथ शिंदे यांनी ठाणे, उल्हसनगर, नवी मुंबई पासून कल्याण-डोंबिवली पट्ट्यात मनसे संपविण्यासाठी पावलं टाकली आहेत. मनसेचे नेतेही शिंदे गटात दाखल होत आहेत. नवी मुंबईतील पनवेल, उरण, खारघरमध्ये मनसेला खिंडार पडले आहे. येथील माजी जिल्हाध्यक्षांसह 100 जणांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे नवी मुंबईतील आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिंदे गटाचं बळ वाढलेलं दिसत आहे.
3 वर्षांपूर्वी -
भाजपकडून माध्यमांच्या कॅमेऱ्यावर शेकडो, हजारो करोडोच्या घोटाळ्याची बोंबाबोंब | पण कोर्टात केवळ लाखाचे दावे
शिवसेना नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. काल त्यांना पीएमएलए कोर्टात हजर केल्यानंतर ४ दिवसांची ईडी कोठडी ठोठावण्यात आली आहे. संजय राऊतांना अटक झाल्यानंतर शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या कुटुंबीयांच्या भेटीला गेले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवरती जहरी टीका केली होती. आता काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी संजय राऊतांच्या सपोर्टमध्ये ट्विट केले आहे.
3 वर्षांपूर्वी -
धक्कादायक माहिती | मी मोदींना थेट भेटली, ईडी प्रकरणात मला कोर्टाची क्लिनचीट, ईडीचा विषय माझ्यासाठी संपला - भावना गवळी
२० जुलै आणि २७ जुलैला समन्स बजावल्यानंतर संजय राऊत हे उपस्थित राहिले नाही. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं उपस्थित राहू शकत नाही, असं संजय राऊतांनी ईडी कार्यालयाला कळवलं होतं. दरम्यान, ३१ जुलै रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांचं एक पथक संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी दाखल झालं. सकाळी पथक दाखल झाल्यानंतर राऊत यांना अटक होणार, अशी चर्चा सुरू झाली होती आणि तसेच घडलं.
3 वर्षांपूर्वी -
केसरकरांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंसोबत भगवी लाट | कोकण दौऱ्यात प्रचंड गर्दी आणि समर्थन मिळतंय
आदित्य ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तरुण, महिला ते ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे म्हणाले रात्रभर याचा विचार मनात येतो. उद्धव साहेबांना सांभाळून घ्यायची वेळ होती, त्यावेळी तुम्ही निर्लज्जपणे निघून गेला. आम्ही डोळे बंद करून मिठी मारली पण पाठीत खंजीर खुपसला. हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरं जा मग बघू सत्य जिंकते की सत्ता जिंकते, असं म्हणत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांचं नाव न आव्हान दिले. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे कोकणाच्या दौऱ्यावर आहे. आज सावंतवाडीमध्ये आदित्य ठाकरे यांनी निष्ठा यात्रा पोहोचली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर घणाघाती प्रहार केला.
3 वर्षांपूर्वी -
सकाळच्या भोंग्यावरील शिंदेंच्या प्रतिक्रियेवर नेटिझन्सकडून तुफान टीका | तुम्ही गुजराती सोमय्याचा भोंगा घेऊन फिरा अशा तिखट प्रतिक्रिया
शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ) अटक करण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोचरी टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबद दौऱ्यावर आहेत. काल रात्री ते एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी, सकाळी 8 वाजताचा भोंगा बंद झाला,. भोंगा आत गेला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर सभेला आलेल्या लोकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून प्रचंड जल्लोष केला. राऊतांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. हे प्रकरण ईडीच्या हातात आहे. त्यामुळे चौकशीतूनच सत्य बाहेर येईल. कर नाही, त्याला डर कशाला? असं राऊत म्हणत होते. त्यामुळे त्यांनी घाबरू नये, असा चिमटाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढला.
3 वर्षांपूर्वी -
खासदार संजय राऊत यांना ईडीने घेतलं ताब्यात | ९ तासांच्या चौकशीनंतर ताब्यात घेण्यात आलं
पत्रा चाळ प्रकरणात ईडीने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ताब्यात घेतलं आहे. संजय राऊत यांना ताब्यात घेऊन दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात घेऊन जाणार असल्याची माहिती आहे. सकाळी सात वाजता संजय राऊतांच्या घरी पोहोचलेल्या ईडीच्या पथकाने ९ तासांच्या चौकशीनंतर त्यांना ताब्यात घेतलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे गटातील भ्रष्ट बंडखोर सेना आमदारांवरील ईडी कारवाया थांबल्या | आता ईडीचं पथक संजय राऊतांच्या घरी
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळीच ईडी अर्थात सक्तवसुली संचलनायलाचे पथक दाखल झाले. संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ जमीन प्रकरणात गैरव्यवहार केल्याचे आरोप असून, गेल्या काही महिन्यांपासून या प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू आहे.
3 वर्षांपूर्वी -
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठी जनता आणि मराठी पत्रकार देखील संताप व्यक्त करताना एकवटले
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या मुंबईबद्दलच्या विधानानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. विविध राजकीय पक्षातील नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपचे नेत्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण आमदार नितेश राणे, विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार यांनी असहमत असल्याचे म्हटले आहे.
3 वर्षांपूर्वी -
दिघे कुटुंबीय शिंदेंवर संतापले | सत्तेसाठी किती खालच्या थराला जाल, दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा शिंदेंनी केल्याचा आरोप
ठाण्यातले शिवसेनेचे दिग्गज नेते अशी ओळख असलेले आनंद दिघे यांच्याबाबत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार आहे. योग्य वेळ आल्यावर मी बोलणार आहे. जेव्हा माझी मुलाखत होईल तेव्हा राज्यात भूकंप होईल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मालेगावातल्या सभेत केलं आहे.
3 वर्षांपूर्वी -
स्वच्छ भारत अभियानातून इथल्या गुज्जुनची साफसफाई सुरू करायची आहे असं पूर्वी विधान करणाऱ्या नितेश राणेंकडून राज्यपालांची पाठराखण
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतो यात काहीही शंका नाही. त्यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी मुंबई आणि ठाण्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
3 वर्षांपूर्वी -
मुंबई आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाणार नाही या राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाची भाजप आमदाराकडून पाठराखण
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होऊ शकतो यात काहीही शंका नाही. त्यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होतो आहे. या व्हीडिओमध्ये त्यांनी मुंबई आणि ठाण्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
3 वर्षांपूर्वी -
ठाकरेंच्या नावा आडून भेटीचा स्क्रिप्टेड स्टंट? | भाजप नेत्याचे जावई तसेच काँग्रेस महिला नेत्याचे पती निहार ठाकरे आणि शिंदेंमध्ये भेट पण...
एकनाथ शिंदे यांना आता उद्धव ठाकरेंचे पुतणे निहार ठाकरे यांची साथ लाभली आहे. निहार ठाकरे यांनी आजच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. निहार ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर त्यांनी यावर आपलं मतही मांडलं आणि माध्यमांवर ठाकरे कुटुंबीय शिंदेंसोबत असल्याच्या हेडलाईन झळकल्या.
3 वर्षांपूर्वी -
MPSC Recruitment 2022 | एमपीएससी मार्फत गट क श्रेणीतील लिपिक ते अधिकारी पदाच्या 228 जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत भरती अधिसूचना जाहीर केली असून २२८ गट क पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार ०१ ते २२ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात. एमपीएससी भरती 2022 साठी अर्ज कसा करावा, वयोमर्यादे, पात्रता आणि आपण अर्ज कसा करावा याबद्दल अधिक माहिती खाली सविस्तर देण्यात आली आहे.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे-फडणवीस सरकार सुप्रीम कोर्टात ओबीसींची बाजू मांडण्यात नापास झाल्याने धक्का | निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश
सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे सरकारला मोठा धक्का दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या आधीच्या आदेशानुसार, 367 ठिकाणच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याच्या सूचना कोर्टाने दिल्या आहेत. ओबीसी आरक्षणाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने ज्या निवडणुका जाहीर केल्या होत्या, त्या ओबीसी आरक्षणाशिवायच घेण्याचे आदेश दिले आहेत.
3 वर्षांपूर्वी -
योगी आणि फडणवीसांच्या विरोधात भाजपमधील गुजरात लॉबी कार्यरत? | नेमका राजकीय गेमप्लॅन काय ते जाणून घ्या
2014 ते 2019 या काळात राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणवीस यांना भाजपने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री केले आहे. इतकंच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्रालयांच्या विभागणीतही हायकमांड देवेंद्र फडणवीसांना फ्रीहँड देण्याच्या मन:स्थितीत नाही, अशा बातम्या आता येत आहेत.
3 वर्षांपूर्वी -
VIDEO | शिंदेंच्या बंडानंतर जनमत उद्धव ठाकरे यांच्याबाजूने झुकतंय हे स्पष्ट होतंय | राणेंची टीका सुद्धा उद्धव यांच्या फायद्याची
एकनाथ शिंदे गटाची बंडखोरी, आमदार, खासदारांसह नगरसेवक,पदाधिकारीही शिंदे गटात सामील होत आहेत. एकीकडे एक-एक जण उद्धव ठाकरेंची साथ सोडत असताना दुसरीकडे खरी शिवसेना कोणती यावरुन कायदेशीर लढाई सुरु आहे. त्यातच नव्याने पक्षबांधणी करण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नव्याने उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. ऑगस्ट महिन्यात ते राज्याचा दौरा करणार आहेत.
3 वर्षांपूर्वी -
शिंदे गटातील अनेकांच्या प्रॉपर्टी ईडीकडून सील, आता उद्धव ठाकरेंना सांगतात, तुमचे जन्मदाते वडील तुमची प्रॉपर्टी नाही
मी मुख्यमंत्री असताना माझ्या मानेवर शस्त्रक्रिया झाल्या. एकदा नाही दोनदा झाली. एका सकाळी मला जाणवलं की मला हालचालच करता येत नाहीये. त्यावेळी माझी जी काही अवस्था झाली तो वेगळाच अनुभव होता. मी आजारपणातून उठूच नये म्हणून काही लोक देव पाण्यात बुडवून बसले होते तेच आज पक्ष बुडवायला निघाले आहेत अशी टीका करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना फटकारलं आहे.
3 वर्षांपूर्वी