महत्वाच्या बातम्या
-
भाजप सत्तास्थापनेचा दावा करणार नसल्याचे वृत्त; राजकीय गोंधळ कायम
शिवसेना-भाजपमधील सत्तास्थापनेचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. संजय राऊत यांनी शिवसेनेची बाजू आक्रमकपणे लावून धरली असताना मात्र, भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा करणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेशी चर्चेच्या प्रतीक्षेत असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेची घाई नाही. चर्चेची दारं शिवसेनेकडून बंद असल्याने भाजप प्रतिसादासाठी शेवटच्या क्षणापर्यंत ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहे.BJP
6 वर्षांपूर्वी -
८ नोव्हेंबरला विधीमंडळ बरखास्त होताच राष्ट्रपती राजवटीची प्रक्रिया सुरु होणार?
अमित शहा यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात लवकरच नवीन सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला मात्र यावेळी त्यांनी महायुतीचा उल्लेख टाळल्याने समोर आलं. तत्पूर्वी राज्याची विधानसभा बरखास्त होण्यापूर्वी नवीन सरकार आलं नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते असं विधान भाजप मंत्र्याने केलं होतं. त्यामुळे जर राष्ट्रपती राजवट लागू झाली तर आमदार फुटण्याची भीती निर्माण होऊ शकते. पुढील ६ महिन्यात भारतीय जनता पक्ष सर्वोतोपरी विरोधी पक्षाचे आमदार पक्षात घेण्याची रणनीती आखू शकते. त्यामुळे काँग्रेस-एनसीपी-शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापनेचा दावा करु शकतील असा अंदाज वर्तविला जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन करून काँग्रेसने पाठिंबा द्यावा, यासाठी हालचाली?
एनसीपी’चे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीनंतर राज्यातील राजकीय घडामोडी वेगळ्या दिशेला वळल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेच्या नेतृत्त्वात राज्यात सत्ता स्थापन करण्यास एनसीपी पक्ष इच्छुक असल्याचे एनसीपी पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला माहिती देताना सांगितले. परंतु, असे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विधानसभेचे अध्यक्षपद हवे आहे. शिवसेनेच्या नेतृत्वात असे सरकार स्थापन होत असल्यास, काँग्रेस पक्षाने सरकारला बाहेरून पाठिंबा द्यावा, असा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेशी चर्चा होत नसल्याने भाजप'मधील दिग्गजांची तोंडं बंद?
राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून बराच कालावधी लोटला असला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा मात्र सुटताना दिसत नाही. मुख्यमंत्रिपद असेल किंवा काही महत्त्वाची खाती असतील यावरून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधील वाद अद्यापही सुटला नाही. भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्रिपद शिवसेनेला न देण्यावर ठाम आहे. तर दुसरीकडे शिवसेना अडीच अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळवण्यावर ठाम आहे. अशातच दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे. अशातच शिवसेनेने पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत ते मावळते मुख्यमंत्री असल्याचा उल्लेख केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
भविष्यात काय घडेल ते आता सांगू शकत नाही: शरद पवार
सरकार स्थापन करण्यासंदर्भात शिवसेनेच्या नेतृत्वाशी कोणतीही चर्चा झाली नाही. त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आला नाही. शिवसेनेचा प्रस्ताव आल्याशिवाय पुढे कसं जाणार, असं सांगून एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकार स्थापन्याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवला. महाराष्ट्रात जाणार नाही, असं स्पष्ट करून त्यांनी मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांनाही पूर्णविराम दिला. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना माहिती दिली, असं त्यांनी सांगितलं.
6 वर्षांपूर्वी -
भाजप नव्हे! राज्यात शिवसेनेचेच सरकार येणार: जयंत पाटील
राज्यात सरकार स्थापनेच्या मुद्यावरून भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीमधील रस्सीखेच सुरूच आहे, आज दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी ही चर्चा अर्धवट सोडत बळिराजाच्या बांधावर धाव घेत त्याच्या व्यथा जाणून घेतल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपत्तिग्रस्त भागांना भेट दिली. अन्य मंत्र्यांनीही तोच कित्ता गिरवला मुख्यमंत्री फडणवीस हे आज दिल्लीला जाणार असून, एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार हे देखील उद्याच कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींची दिल्लीत भेट घेतील. यामुळे आता या सत्तेच्या पेचप्रसंगात थेट पंतप्रधान मोदी किंवा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हस्तक्षेप करून कोणता तोडगा काढू शकतात, याकडे सर्वांचेच लक्ष दिल्लीकडे लागले आहे.
6 वर्षांपूर्वी -
व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून नागरिकांवर पाळत ही हुकूमशाहीच: राष्ट्रवादी काँग्रेस
काही दिवसात प्रसार माध्यमातून स्क्रुटिनचा प्रकार धुमाकूळ घालतोय. एनएसआय कंपनीमार्फत देशातल्या काही लोकांच्या माहिती काढल्या जात आहेत, गुजरातमध्ये मागच्या काळात घेडलेला हा प्रकार घडला होता, आता इतर ठिकाणीही घडतोय ही चिंतेची बाब आहे. चौदाशे लोक फेसबुकवर आहेत ज्यांच्यावर यावरून नजर होती. सॉफ्टवेरमार्फत पाळत ठेवली जाते हे फेसबुकने आधी सांगितले होते. याबाबत संपूर्ण माहिती केंद्र सरकारला मे महिन्यापासून होती, याबातची मीहिती केंद्र सरकारने सर्वांसमोर आणावी असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मंत्रालयासमोर दूध फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असले तरी अजून सत्तास्थापन झालेली नसली तरी इतर पक्ष मात्र दैनंदिन पक्षीय भूमिकेकडे केंद्रित झाले आहेत. त्यालाच अनुसरून राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते नव्या आंदोलनात उतरले आहेत. प्रादेशिक व्यापार आर्थिक भागीदारी योजनेचा करार त्वरित रद्द करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज मंत्रालयासमोर दुधाच्या पिशव्या फोडून आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. सोळा देशांसोबत केल्या जाणाऱ्या या कराराचा फटका शेती, दुग्ध व्यवसाय आणि वस्त्रोद्योग या तिन्ही व्यवसायांना बसणार असल्याचं मत राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं. त्यामुळे हा करार त्वरीत थांबवावा, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली. मंत्रालयाच्या गेटसमोर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दूध फेकत सरकराचा निषेध केला.
6 वर्षांपूर्वी -
संजय राऊत हे शिवसेनेचे पोपट; उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर अंकुश ठेवावा: आ. रवी राणा
सध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरून कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तब्बल दहा दिवस उलटले असले तरी अजून पर्यंत सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. त्यात नक्की युतीचं सरकार स्थापन होणार की आघाडीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार याबद्दल देखील राजकीय अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेत लवकरच फूट पडेल; २०-२५ आमदार फडणवीसांच्या संपर्कात: आ. रवी राणा
सध्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये सत्तास्थापनेवरून कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन तब्बल दहा दिवस उलटले असले तरी अजून पर्यंत सत्ता स्थापनेचा पेच कायम आहे. त्यात नक्की युतीचं सरकार स्थापन होणार की आघाडीच्या पाठिंब्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार याबद्दल देखील राजकीय अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना युतीचा उल्लेख टाळला
महाराष्ट्रातील सत्तेच्या समीकरणाच्या संदर्भात कोण काय बोलतं यावर मी प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्राला नव्या सरकारची गरज आहे आणि ते बनेल त्यासाठी आम्ही पूर्ण आश्वस्त आहोत, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते आज दिल्लीत असून तेथे महाराष्ट्रातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
6 वर्षांपूर्वी -
भाजपकडून शिवसेनेला महसूल आणि अर्थ खात्याची ऑफर?
अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद आणि सत्तेतील निम्मा वाटा यावर शिवसेना अद्यापही अडून असल्याने विधानसभा निवडणुकीच्या निकालास १० दिवस उलटूनही सत्तास्थापनेची कोंडी कायम आहे. शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला असल्याने भारतीय जनता पक्षाने आता शिवसेनेला महसूल, अर्थ अशी महत्त्वाची मंत्रिपदे देण्याची तयारी दर्शविली आहे.
6 वर्षांपूर्वी -
संजय राऊतांचं दबाबतंत्र वापरून पलटी मारण्याची सवय भाजपाला अवगत असल्याने दुर्लक्ष?
राज्यातील जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल देऊनही सत्ता स्थापनेचा तिढा सुटताना दिसत नाही. शिवसेना भाजपमधील संवाद जवळपास बंद झाला आहे. त्यातच दोन्ही बाजूंकडून दबावाचं राजकारण जोरात सुरू आहे. खासदार संजय राऊत सातत्याने भाजपवर शरसंधान साधत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राऊत सकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर तोफ डागत आहेत. मात्र आज राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपावर टीका केली नाही. त्यामुळे उपस्थित पत्रकारांना काहीसा आश्चर्याचा धक्का बसला.
6 वर्षांपूर्वी -
अमित शहा उद्या मुंबईत येण्याची शक्यता; मोठ्या राजकीय हालचालींना वेग
देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत असून भारतीय जनता पक्षात वरिष्ठ पातळीवर जोरदार राजकीय हालचाली सुरु झाल्याचे वृत्त आहे. त्यानुषंगाने राज्यात सरकार स्थापन करण्याच्या हालचाली दोन्ही बाजूने पुढे सरकल्या असून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्या तडकाफडकी मुंबईत दाखल होणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहा: भाजप आ. जयकुमार रावल
राज्यात युतीचे सरकार स्थापन होण्याआधीच दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच सुरु आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील नेते एकमेकावर दबावतंत्र अवलंबत आहेत. दरम्यान पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी तयार व्हा, असं खळबळजनक वक्तव्य पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी केले आहे. धुळे शहरात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. धुळे जिल्ह्यातल्या पाच मतदारसंघांचा आढावा रावल यांनी घेतला त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते. सरकार स्थापन न झाल्यास निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेश रावल यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
‘विदुषका’ला रोज सकाळ झाली की हिंदी शेरोशायरी का आठवते? तरुण भारतचा प्रहार
विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवसांहून अधिक कालावधी लोटला असला तरी राज्यात अद्याप सत्ता स्थापन झालेली नाही. विधानसभा निवडणुकांमध्ये राज्यातील जनतेने महायुतीला जनमत दिले आहे. असं असलं तरी ५०-५० सुत्रामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये सत्ता स्थापनेचे तिढा सुटलेला नाही. एकीकडून शिवसेनेचे नेते संजय राऊत दररोज आक्रामक भुमिका मांडताना दिसत आहे. प्रसारमाध्यमांसमोर येऊन बोलण्याबरोबरच राऊत ट्विटवरुनही रोज एखादे ट्विट करुन भारतीय जनता पक्षाला टोला लगावता दिसत आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेले असतानाच राऊतांनी प्रवास करण्यावरुन ट्विट करत एक टोला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
राज्यातील सरकार स्थापनेवरून आज दिल्लीत घडामोडी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. ते सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा द्यावयाचा काय? या मुद्याभोवती ही चर्चा फिरणार असल्याचे समजते. निकालानंतर ते देखील पहिल्यांदाच दिल्लीला आले आहेत. आज शरद पवार आणि काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात दिल्लीत चर्चा होणार आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय पेचावर आता दिल्लीतच तोडगा निघण्याची शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
लग्न ठरवायच्या बैठकीतच एवढी भांडणं, मग संसार नीट कसा होईल? - आ. रोहित पवार
एनसीपीचे नवनिर्वाचित आमदार रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहून शिवसेना-भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. सत्ता स्थापनेसाठी वाटाघाटीवरून शिवसेना-भारतीय जनता पक्षामध्ये वाद सुरू आहे. लग्न ठरवण्याच्या आधीच इतकी भांडणं मग पुढे काय होणार, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. दोन्ही पक्ष राज्यातील जनतेला निराश करत असल्याचेही रोहित यांनी म्हटले आहे.
6 वर्षांपूर्वी -
एनसीपीच्या बैठकीत असताना अजित पवारांना संजय राऊत यांचा एसएमएस
केंद्रात सक्रीय असणारी एखादी व्यक्ती महाराष्ट्रात मुख्यमंत्री होऊ शकते असं सूचक वक्तव्य एनसीपी’चे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. एनसीपी’च्या मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात याआधी असं झालं आहे, जे या सभागृहाचे सदस्य नाहीत किंवा राज्यसभा सदस्य आहेत किंवा समाजातील महत्वपूर्ण व्यक्ती आहेत ते मुख्यमंत्री झाले आहेत.’ अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे एकीकडे चर्चेला उधाण आलेलं असतानाच दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या बैठकीदरम्यानच अजित पवारांना एक एसएमएस पाठवून या चर्चेला आणखी फोडणी दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
गाड्या सावकाश चालवा, भाजप सरकार ५ वर्षांपासून स्मार्ट रस्ते उभारत आहे
स्मार्ट सिटी परियोजनेंतर्गत निवडण्यात आलेल्या नागपूर, औरंगाबाद, पुणेसह महाराष्ट्रातील आठ शहरांसाठी केंद्र सरकारने आतापर्यंत १,५६८ कोटी रुपये दिले आहेत; मात्र वस्तुस्थिती ही आहे की, ४ वर्षांनंतर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवडत्या योजनेंतर्गत निर्धारित कार्यांतील ५८ टक्के कामांना अद्याप सुरुवातच करण्यात आल्याचे निष्पन्न झालं आहे. सध्या राज्यभर अवकाळी पावसाने थैमान घातलं असून शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र यावेळी शहर आणि ग्रामीण भागांचे दौरे करताना रस्त्यांच्या बिकट अवस्था देखील अनेक ठिकाणी सहज नजरेस पडत आहेत.
6 वर्षांपूर्वी