महत्वाच्या बातम्या
-
माझं वचन आहे! सरकार आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार: उद्धव ठाकरे
औरंगाबादेतील शेतकऱ्यांसोबत जमिनीवर बसून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला. आपलं सरकार आल्यास सातबारा कोरा करीन, हे माझं वचन आहे, अशी घोषणा यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. एकीकडे सत्तास्थापनेची लगबग सुरु असताना उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर निघाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
पवारांनी शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेटी देताच 'डिजिटल' सत्ताधारी जमिनीवर
राज्यातील शेतकर्यांचे अवकाळी पावसाने झालेले नुकसान आणि राज्य सरकारच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना याचा सविस्तर आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला होता. राज्याचे मुख्य सचिव, कृषी, मदत-पुनर्वसन, वित्त आणि विविध विभागांचे सचिव, भारतीय हवामान विभाग आणि विमा कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेकडे १७५चं संख्याबळ; आमचा मुख्यमंत्री शिवतीर्थावर शपथ घेईल: खा. संजय राऊत
विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपा-शिवसेना युतीला सत्ता स्थापनेसाठी स्पष्ट कौल मिळालेला असतानाही राज्यात सत्तेचा रथ मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटपावरून रूतून बसला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सत्तास्थापनेबाबत मोठं विधान केलं आहे. “शिवसेनेकडं १७५ आमदारांचं संख्याबळ असून, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. शिवतिर्थावर शपथविधी होईल,” असा दावा राऊत यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेने भाजपसोबतचे केंद्रापासून सर्व राजकीय संबंध तोडावे; राष्ट्रवादीची अट?
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या जागा कमी झाल्यानं मुख्यमंत्रिपदाबद्दल ‘प्रचंड आशावादी’ असलेल्या शिवसेनेसमोर राष्ट्रवादीनं एक ‘अवजड’ आणि ‘अवघड’ अट ठेवल्याचं समजतं. राज्यात राष्ट्रवादी शिवसेनेला साथ देईल. मात्र त्यासाठी शिवसेनेनं भाजपासोबतचे सर्व संबंध तोडावेत. केंद्रात अवजड उद्योग मंत्रालय सांभाळणाऱ्या अरविंद सावंत यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी अट राष्ट्रवादीकडून घालण्यात आल्याचं पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितल्याचं वृत्त ‘मुंबई मिरर’नं प्रसिद्ध केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
नव्या समिकरणांसाठी हालचाली? पवारांच्या पुढाकारामुळे भाजपाची धाकधूक वाढली
राज्यात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्ष दहाव्या दिवशीही कायम असल्यामुळे एनसीपी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी एनसीपी’च्या निवडक नेत्यांची शनिवारी पेडर रोडवरील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी तातडीची बैठक घेतली. या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यात आली असे सांगण्यात येत असले तरी शरद पवार यांनी राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला. पवार हे आज, रविवारी सायंकाळी दिल्लीला जात असून, ते काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची रविवारीच किंवा सोमवारी भेट घेतील, असे एनसीपी’च्या एका नेत्याने सांगितले.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेची वाट न पाहता सत्ता स्थापनेची तयारी करण्याचे भाजप श्रेष्ठींचे आदेश?
मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसलेल्या शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला बाजूला सारून काँग्रेस -राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थापन करता येते का, याची चाचपणी सुरू केली असून ‘आम्ही बहुमत सिद्ध करु शकतो’ असा इशारा दिला आहे. भारतीय जनता पक्षाने २०१४ प्रमाणे एकट्यानेच शपथविधी ५ किंवा ६ नोव्हेंबरला घेण्याची तयारी चालविली आहे. पण दोघांत सत्तावाटपाच्या चर्चेत ‘डेडलॉक’ कायम आहे.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रपती राजवटीची धमकी हा जनादेशाचा अपमान: शिवसेना
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत सुरू झालेला सत्तास्थापनेबाबतचा वाद अधिकच चिघळण्याची चिन्हे दिसत असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्ष नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या राष्ट्रपती राजवट वक्तव्यावर जोरदार टीकास्त्रे सोडले आहे. राज्यातील जनतेने महायुतीला सत्तास्थापनेसाठी जनादेश दिला असताना सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा उपस्थित करत धमकी दिली असून ही धमकी म्हणजे जनमताचा अपमान असल्याचे राऊत म्हणाले. राष्ट्रपतींच्या नावाचा वापर करणे गैर असून राष्ट्रपती तुमच्या खिशात आहेत का, असा संतप्त सवालही राऊत यांनी केला आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडताना राज्यातील जनतेने भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला जनादेश दिला असून आम्ही युतीधर्माचे पालन करू अशी भूमिकाही राऊत यांनी घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
नुकसान ग्रस्त भागाला पवारांची प्रत्यक्ष भेट तर फडणवीसांचा कार्यालयातून आढावा
राज्यातील शेतकर्यांचे अवकाळी पावसाने झालेले नुकसान आणि राज्य सरकारच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या उपाययोजना याचा सविस्तर आढावा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. राज्याचे मुख्य सचिव, कृषी, मदत-पुनर्वसन, वित्त आणि विविध विभागांचे सचिव, भारतीय हवामान विभाग आणि विमा कंपन्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेसनं शिवसेनेसोबत जाऊ नये: सुशीलकुमार शिंदे
काँग्रेस पक्ष हा सेक्युलर पक्ष आहे सर्वधर्मसमभाव मानणारा पक्ष आहे. काँग्रेसने शिवसेनेसोबत मुळीच जाऊ नये अशी भूमिका सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली आहे. सुशीलकुमाऱ शिंदे हे माजी केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याच्या भूमिकेला कडाडून विरोध दर्शवला आहे. जनमत मान्य करुन काँग्रेसने विरोधात बसावं असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस हा सेक्युलर पक्ष आहे काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि शिवसेनेची विचारधारा या दोहोंमध्ये खूप फरक आहे. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेसोबत जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
सेना आली तर ठीक अन्यथा भाजपाचा एकट्याचा शपथविधी; वानखेडे स्टेडियम बुक
मुख्यमंत्रिपदासह सत्तेचे समसमान वाटप झालेच पाहिजे, असे ठासून सांगताना, ज्या अर्थी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार असे म्हटले आहे, त्या अर्थी मी आपल्याला लिहून देतो की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे ठाम मत शिवसेनेचे प्रवक्ता, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. शिवसेनेने ठरवलं तर आपलं सरकार बनवू शकते असे म्हणत राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला स्पष्ट इशारा दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
...अन्यथा राज्यात राष्ट्रपती राजवट: सुधीर मुनगंटीवार
राज्यात ७ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती शासन लागू होऊ शकतं, असं वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र असं संबोधतो. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारची स्थिती यापूर्वीही कधी उद्भवली नव्हती आणि यापुढेही उद्भवणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. तसंच राज्यात महायुतीतच सरकार स्थापन होईल, असंही ते म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
आघाडी शिवसेनेसोबत जाणार नाही; पवारांनी सेनेची पुन्हा हवा काढली
महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत मोठा संघर्ष सुरू आहे. अशातच ‘आम्हीही बहुमताचा आकडा गाठू शकतो. आता लिहून घ्या, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार,’ अशी भूमिका शिवसेनेनं घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. अशातच एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मी लिहून देतो की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार: खासदार संजय राऊत
‘महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेनेचा मुख्यमंत्री पाहायचा आहे. जर उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार, तर मी लिहून देतो की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार. आम्ही जर ठरवलं, तर बहुमत सिद्ध करून आमचा मुख्यमंत्री होऊ शकतो. त्यामुळे ज्यांच्याकडे बहुमत नाही, त्यांनी सत्तास्थापनेचा दावा करण्याची हिंमत करू नये. भारतीय जनता पक्षात फार मोठी माणसं आहेत, आम्ही त्यांना काय अल्टिमेटम देणार. आम्ही साधा पक्ष आहोत. त्यांचा पक्ष आंतरराष्ट्रीय आहे. जगभरात त्यांचे कार्यकर्ते, अनुयायी आहेत. आम्ही फक्त महाराष्ट्राबद्दल बोलतो’, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला खोचक टोमणा मारला आहे. राज्यात सध्या सुरू असलेल्या सत्तावाटपाच्या गोंधळासंदर्भात संजय राऊत यांनी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
आगरी समाज प्रतिष्ठानसोबत मनसेचे आ. राजू पाटील टोरेंट पॉवर कंपनी विरोधात आक्रमक
महाराष्ट्रात अजून सत्तेत कोण विराजमान होणार आणि मुख्यमंत्री कोण होणार हे निश्चित झालं नसलं तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सामान्य लोकांच्या आंदोलनात सामील होण्यास सुरुवात झाली आहे. मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी काल आगरी समाज प्रतिष्ठानने टोरेंट पॉवर कंपनीविरोधात आयोजित केलेल्या भव्य मोर्चात सहभाग नोंदवला.
6 वर्षांपूर्वी -
युतीत तणाव वाढला, सेनेच्या आघाडीतील नेत्यांशी भेटीगाठी
दिवाळीच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी ते वक्तव्य करायला नको होते, अशी नवनिर्वाचित आमदारांसमोरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मन की बात’ बोलून दाखविल्यानंतर काही तासांतच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे पडद्यामागे राजकारणाचा सारीपाट बदलण्याचे दबावतंत्र सुरु असल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने आम्ही भाजपसोबत नाही, अशी जाहीर आणि ठाम भूमिका घेतल्यास दुसर्याक्षणी आमचा त्यांना बाहेरून जाहीर पाठिंबा असेल, असे काँग्रेसचे नेते दबक्या आवाजात बोलत आहेत.‘हीच ती वेळ’ आहे शिवसेनेला स्वाभिमान दाखविण्याची आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याची, अशी कोपरखळी काँग्रेसच्या एका नेत्याने मारली.
6 वर्षांपूर्वी -
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या गटनेतेपदी पुन्हा निवड
शिवसेनेच्या विधानसभेतील गटनेतेपदी कुणाची निवड होणार? याविषयी गेल्या २ दिवसांपासून राजकीय वर्तुळात बरीच चर्चा सुरू होती. आदित्य ठाकरेंची देखील गटनेतेपदी निवड होऊ शकते, अशी शक्यता देखील वर्तवली जात होती. मात्र, अखेर विद्यमान गटनेते एकनाथ शिंदे यांचीच एकमताने गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेच्या सर्व विजयी आमदारांची शिवसेना भवनावर बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या बैठकीमध्येच एकनाथ शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेतली
सध्या राज्यात विधानसभा राज्यात निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन आठवडा उलटला असला तरी अजून सत्ता स्थापनेवरुन भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये एकमेकांविरुद्ध कुरघोडीचे राजकारण सुरुच आहे. दुसरीकडे एक आमदार निवडून आल्यानंतर देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि एनसीपी’मधील राजकीय जवळीक अजून वाढताना दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपकडे बहुमत असेल, तर खुशाल सत्ता स्थापन करावी: संजय राऊत
‘सामना’च्या अग्रलेखातून भारतीय जनता पक्षावर बोचरी टीका केल्यानंतर गुरुवारी सकाळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. ‘आम्ही दिलेला शब्द आणि नीतिधर्म पाळतो, भारतीय जनता पक्षानेही तो पाळावा’, असं संजय राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे शिवसेना अजून देखील मुख्यमंत्रीपदासह इतर सत्तापदांमध्ये समसमान वाटपाच्या फॉर्म्युल्यावर ठाम असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, ‘जर भारतीय जनता पक्ष किंवा इतर कुणाकडेही बहुमत असेल, तर त्यांनी खुशाल सत्ता स्थापन करावी’, असं आव्हान देखील संजय राऊत यांनी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आपणच मुख्यमंत्री होणार अशी भूमिका आक्रमकपणे मांडल्यानंतर शिवसेना मवाळ भूमिका घेणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र, संजय राऊतांनी शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपाकडून ‘गरज सरो वैद्य मरो’चा दुसरा अंक सुरु: शिवसेना
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी, राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. भारतीय जनता पक्ष -शिवसेना यांच्यात सत्तासंघर्ष सुरू असतानाच, शिवसेनेनं मुख्यमंत्रिपद आणि समान वाट्याच्या मुद्द्यावर आग्रही भूमिका घेतलीय. त्यात आता शिवसेनेनं भारतीय जनता पक्षावर समान वाटपावरून टीका करण्यास सुरुवात केली आहे. ‘गरज सरो, वैद्य मरो’चा दुसरा अंक सुरू झाला आहे, असा टोला शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाला लगावला आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री पद सोडा, 'ती' ४ महत्वाची मंत्रिपदं सुद्धा भाजप देण्यास तयार नाही: सविस्तर
शिवसेना ५०-५०च्या फॉर्म्युल्यावर अडून बसल्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. पण महाराष्ट्रात महायुतीचेच सरकार स्थापन होईल असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विधिमंडळात पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर ते बोलत होते. अफवांवर विश्वास ठेऊ नका. चर्चा झाली नाही तर मजा येत नाही असे ते म्हणाले. १९९५ पासून कुठल्याही पक्षाला ७५ पेक्षा जास्त जागा मिळालेल्या नाहीत. २०१४ आणि २०१९ मध्ये भारतीय जनता पक्षाला १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. हा महायुतीला मिळालेला कौल आहे असे फडणवीस म्हणाले.
6 वर्षांपूर्वी