महत्वाच्या बातम्या
-
विधानसभा निवडणूक: मनसेची पहिली जाहीर सभा ५ ऑक्टोबरला
मुंबईत झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राज यांनी आगामी विधानसभा निवडणूक ताकदीनं लढवण्याची घोषणा केली. तसंच, ५ ऑक्टोबरला जाहीर सभा घेऊन प्रचाराचा नारळ फोडेन, असंही स्पष्ट केलं. वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये हा मेळावा झाला. राज यांनी यावेळी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी राज ठाकरेंच्या उपस्थितीत आज आत्महत्याग्रस्त शेतकरी धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी मनसेत जाहीर प्रवेश केला. मेळाव्यानंतर राज ठाकरे यांनी पत्रकारांशी पाच ते दहा मिनिटे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मनसे निवडणुका लढणार असल्याची माहिती दिली. किती आणि कुठल्या जागा लढवणार याबाबत योग्य वेळी सांगेन असं ते म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
तानाजी सावंत यांच्या गाडीनं तरुणाला उडवल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने एका व्यक्तीला उडवल्याची घटना सोलापुरात घडली आहे. यानंतर संतप्त जमावानं सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली. अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील शेलगावमध्ये हा अपघात झाला. अपघातावेळी तानाजी सावंत गाडीमध्ये नव्हते, अशी माहिती मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता
भाजप केंद्रीय निवडणूक समितीची बैठक राजधानी दिल्लीतील भाजप मुख्यालयात झाली. जवळपास साडेचार तास चाललेल्या बैठकीमध्ये विधानसभा उमेदवारांच्या नावावरती अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. पण अशात भाजप आता विद्यामान आमदारांचं तिकीट कापणार की काय अशी चर्चा आहे. विदर्भात आणि नागपूरमध्ये विद्यमान आमदारांना भाजपकडून डच्चू देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यात बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.
6 वर्षांपूर्वी -
काकडे पुर परिस्थतीत दिसले नाहीत? ते भविष्यवाणीचं दुकान आता बंद करा: रुपाली चाकणकर
भाजपचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी अजित पवारांच्या पत्रकारपरिषदेवर जोरदार टीका केली होती. काकडे यांनी ‘काल भांडायचं आणि आज राजीनामा द्यायचा, पुन्हा शरद पवार म्हणतील ते करायचं, नौटंकी करून सहानुभूती मिळविण्याचा हा प्रयत्न आहे अशी टीका काकडे यांनी अजित पवारांवर केली होती.
6 वर्षांपूर्वी -
सेनेला दुर्लक्षित करत भाजप नारायण राणेंचा २ ऑक्टोबरला पक्ष प्रवेश करून घेणार
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे २ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नारायण राणे यांच्या प्रहार या दैनिकाच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती देण्यात आली आहे. भाजप-शिवसेना युती होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबई येथे घेतलेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात युती होणारच यावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे शिवसेनेचा नारायण राणे यांच्या प्रवेशाला होणारा विरोध देखील निवळल्याचे दिसते. १ ऑक्टोबरपर्यंत युती आणि जागावाटपाची घोषणा होणार आहे. त्यानंतर २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करतील.
6 वर्षांपूर्वी -
सेना-भाजप युतीचं जागावाटप आज ठरणार? भाजपची दिल्लीत महत्वाची बैठक
काही दिवसांवर येऊ ठेपलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील भाजपाच्या उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रविवार, २९ सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल व त्यात शिवसेनेशी युतीबाबतची भूमिकाही याच बैठकीत निश्चित केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. शिवसेनेबरोबरच्या जागावाटपावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
6 वर्षांपूर्वी -
चाणाक्ष राष्ट्रवादी आणि मनसेने शिस्तबद्धपणे प्रसार माध्यमांना स्वतःवर केंद्रित केलं? सविस्तर
विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपने महाजानदेश यात्रा आणि शिवसेनेने जनआशीर्वाद यात्रेने महाराष्ट्र पिंजून काढला आणि प्रसार माध्यमांचे कैमरे स्वतःवर केंद्रित ठेऊन चर्चेत राहिले. विरोधक संपल्याचं चित्र निर्माण करण्यात सत्ताधारी जवळपास यशस्वी झाले होते. दुसऱ्याबाजूला शरद पवार आणि अमोल कोल्हे यांच्या शिवआशीर्वाद यात्रेला ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत असल्याने सत्ताधारी थोडे चलबिचल होते, मात्र ते मान्य करण्यास सत्ताधारी तयार नसल्याचं पाहायला मिळालं.
6 वर्षांपूर्वी -
शिखर बँकेच्या संचालकपदांमध्ये माझं नाव नसतं तर प्रकरणच पुढं आलंच नसतं: अजित पवार
राज्य सहकारी बँके प्रकरणांत शरद पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव नाहक गोवण्यात आले. महत्वाच्या पदांवर शरद पवारांमुळे मी पोहचलो होतो. माझ्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पाहून अस्वस्थ झालो. त्यातून राजीनामा दिला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार भावूक झाले.
6 वर्षांपूर्वी -
शिखर बँकेत भाजप - सेनेचे सुद्धा संचालक; मग बातम्या फक्त माझ्यावर केंद्रित का? अजित पवार
राज्य सहकारी बँके प्रकरणांत शरद पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव नाहक गोवण्यात आले. महत्वाच्या पदांवर शरद पवारांमुळे मी पोहचलो होतो. माझ्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पाहून अस्वस्थ झालो. त्यातून राजीनामा दिला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार भावूक झाले.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO: पवार कुटुंबात गृहकलह नाही; चुकीच्या बातम्या देऊ नका: अजित पवार
राज्य सहकारी बँके प्रकरणांत शरद पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव नाहक गोवण्यात आले. महत्वाच्या पदांवर शरद पवारांमुळे मी पोहचलो होतो. माझ्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पाहून अस्वस्थ झालो. त्यातून राजीनामा दिला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार भावूक झाले.
6 वर्षांपूर्वी -
शिखर बँकेत ठेवी १२ हजार कोटीच्या; मग घोटाळा २५ हजार कोटींचा कसा होईल: अजित पवार
राज्य सहकारी बँके प्रकरणांत शरद पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव नाहक गोवण्यात आले. महत्वाच्या पदांवर शरद पवारांमुळे मी पोहचलो होतो. माझ्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पाहून अस्वस्थ झालो. त्यातून राजीनामा दिला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार भावूक झाले.
6 वर्षांपूर्वी -
आरबीआयने निर्बंध घातलेल्या पीएमसी बँकेत देखील भाजपचे संचालक: अजित पवार
राज्य सहकारी बँके प्रकरणांत शरद पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव नाहक गोवण्यात आले. महत्वाच्या पदांवर शरद पवारांमुळे मी पोहचलो होतो. माझ्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पाहून अस्वस्थ झालो. त्यातून राजीनामा दिला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार भावूक झाले.
6 वर्षांपूर्वी -
शिखर बँकेत भाजपचे संचालक आहेत हे भाजपने जनतेपासून का लपवलं: अजित पवार
राज्य सहकारी बँके प्रकरणांत शरद पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव नाहक गोवण्यात आले. महत्वाच्या पदांवर शरद पवारांमुळे मी पोहचलो होतो. माझ्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पाहून अस्वस्थ झालो. त्यातून राजीनामा दिला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यावेळी पत्रकार परिषदेत अजित पवार भावूक झाले.
6 वर्षांपूर्वी -
येवले चहावरील कारवाई; मनसे मराठी उद्योजकांच्या पाठिशी खंबीरपणे उभी
पुण्यातील प्रसिद्ध येवले चहाच्या चहा पावडर आणि चहा मसाल्याच्या उत्पादनावर पुढील आदेश येईपर्यंत बंदी घालण्यात आली असून, अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ही कारवाई केली आहे. येवलेंच्या चहा पावडर, टी-मसाला आणि साखरेच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे माहितीपर लेबल नसल्याचे आढळले. तसेच, अन्य काही त्रुटीही आढळल्याने ही कारवाई करण्यात आली असून, सहा लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता.
6 वर्षांपूर्वी -
माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याने अजित पवार अस्वस्थ: शरद पवार
माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी आमदारकीचा राजीनामा देऊन राजकारणात प्रचंड खळबळ उडवली. त्यांचा मोबाइल ‘स्विच्ड ऑफ’ असल्याने गूढ वाढले आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील अंबालिका साखर कारखाना स्थळी असल्याचे रात्री उशिरा स्पष्ट झाले.
6 वर्षांपूर्वी -
केंद्राला सरकारी नोकरीत मराठी तरुण नको असल्याने हिंदीची सक्ती; खपवून घेणार नाही: नांदगावकर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा त्यांचा मराठी बाणा दाखवला आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी एलआयसी भरती परीक्षेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हिंदीची सक्ती करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं तीव्र विरोध केला आहे. ‘इतरांची भाषा, संस्कृती डावलण्याचा उत्तर भारतीयांचा डाव आहे. पण महाराष्ट्रात आम्ही हे अजिबात खपवून घेणार नाही. त्यानंतरही महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषिकांची भरती झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे होतील,’ असा गर्भित इशारा मनसेनं केंद्र सरकारला दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुणेकरांनी चंद्रकांत पाटलांवर रोष व्यक्त करताच पालकमंत्र्यांनी काढता पाय घेतला
अरणेश्वर येथील टांगेवाले वसाहत येथे संतप्त नागरिकांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा निषेधाच्या घोषणा देत ते केवळ या ठिकाणी फोटो काढण्यासाठी आले आहेत, असा आरोप केला. टांगेवाले वसाहत येथे आंबिल ओढ्याला आलेल्या पुरामुळे भिंत पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
6 वर्षांपूर्वी -
‘तेल लावलेला पैलवान’ हाताला लागलाच नाही; राज यांचं ते भाषण आज खरं ठरलं
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज, शुक्रवारी दुपारी दोन वाजता स्वत:हून अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबईतील बॅलार्ड पियर येथील कार्यालयात हजर होणार होते. मात्र, चौकशीसाठी अद्याप समन्स बजावलेले नसल्याने पवार यांना ईडी कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता कमीच होती. या सगळ्या घडामोडींमुळं मुंबईत तणावाची परिस्थिती होती.
6 वर्षांपूर्वी -
सहकारी-विरोधक एकवटले? आम्हाला साथ देणाऱ्या सर्व पक्षांचे आभार मानतो: शरद पवार
बँक घोटाळ्याच्या प्रकरणात चौकशीसाठी स्वत:हून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात जाण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तूर्त रद्द केला आहे. मुंबई व महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणून हा निर्णय घेतला आहे, असं खुद्द पवार यांनी आज स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब : शरद पवार

6 वर्षांपूर्वी