महत्वाच्या बातम्या
-
कारण उद्धव ठाकरे म्हणाले, ‘राणे परत आले तर मी घर सोडीन’
राज्याचे माजी मुख्यमंत्री, ‘प्रहार’चे संपादकीय सल्लागार, खासदार नारायण राणे यांचे आत्मकथन असलेल्या ‘झंझावात’ या मराठी पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते, No Holds Barred या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभगृहात शुक्रवारी सायंकाळी एका शानदान समारंभात झाले. या कार्यक्रमास राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, सांस्कृतिक व मराठी भाषा मंत्री विनोद तावडे, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, खा. सुनील तटकरे, आ. कालिदास कोळंबकर, दोन्ही पुस्तकांचे संपादक प्रियम मोदी, मधुकर भावे, सौ. निलमताई राणे, निलेश राणे, आ. नितेश राणे आदी उपस्थित होते.
6 वर्षांपूर्वी -
विरोधकांवर तुटून पडणारा भाजप प्रकाश आंबेडकरांवर टीका का करत नसावा? सविस्तर
महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुका काही महिन्यांतच होणार असून, वंचित बहुजन आघाडीला निवडणूक लढविण्यासाठी निवडणूक आयोगाने कपबशी गायब करून गॅस सिलिंडर हे चिन्ह दिलं आहे. तसेच वंचित आघाडीकडूनही २८८ जागा लढविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र आता मतदारांंपर्यंत कपबशी ऐवजी गॅस सिलेंडर हे नवे चिन्ह पोहोचविण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
डॉ. बाबासाहेबांचे विचार संपविण्यासाठीच भाजप वंचितला चालवत आहेत: जोगेंद्र कवाडे
पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ‘रिपब्लिकन’ हा राजकीय विचार संपविण्याचा प्रयत्न प्रकाश आंबेडकरांकडून होत आहे असं कवाडे म्हणाले आहेत. तसेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीवरही जोरदार टीका केली.
6 वर्षांपूर्वी -
सांगली: पूरग्रस्त दुर्गम भागात मनसेकडून औषधांचा पुरवठा
निसर्गही किती विचित्र आहे, एका बाजूला मराठवाड्यात सुका दुष्काळ पडला असतानाच कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक व कोकणाला निर्दयीपणाने पावसाने झोडपून काढले. इतके की, अनेक वर्षांनी महापूर आला. भयावह पूरसदृश परिस्थिती महाराष्ट्रात १ ऑगस्टपासून निर्माण व्हायला सुरुवात झाली, पण इतकी भयानक परिस्थिती निर्माण होईल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. शहरांना जोडणारे अनेक महामार्ग तसेच गावाकडे जाणारे छोटेछोटे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले, त्यामुळे दररोज या रस्त्यावर धावणारी लोकवाहिनीही ठप्प झाली.
6 वर्षांपूर्वी -
कौतुकास्पद! प्रकाश आंबेडकरांनी दत्तक घेतलं सांगलीतील 'ब्रह्मनाळ' गाव
कोल्हापूर आणि सांगलीच्या भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी राज्यभारातून अनेक हात पुढे येत आहेत. या जिल्ह्यांतील अनेक गावे उध्वस्त झाली आहेत. सांगली जिल्ह्याच्या पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ हे पूरग्रस्त गाव वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दत्तक घेतलं आहे. ब्रम्हनाळ गावात पुराचे पाणी घुसलेले असताना बचावकार्यादरम्यान बोट पाण्यात उलटुन १४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला त्यामुळे या गावावर मोठी शोककळा पसरली आहे. ३५०० लोकसंख्या असलेल्या या गावाचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
पूरग्रस्त व रूग्णांच्या भेटी घेताना गिरीश महाजन पुरग्रस्तांच्या अंथरुणावर शूज घालून
दोन दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याआधी जात असलेल्या बोटीतून हसत सेल्फी व्हिडीओ काढल्याने अनेकांनी त्यांच्यावर टीका केली होती. पुराचं कोणतंही गांभीर्य मंत्र्यांना नाही अशी टीका झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी सांगलीत पाण्यात उतरुन पुन्हा मार्केटिंग केलं. मात्र बोलण्याच्या ओघात ट्विटमध्ये संबंधित गावातील लोकांना ४ दिवस कोणतीही शासकीय मदत मिळाली नव्हती अशी माहिती देताना अप्रत्यक्षपणे सरकार ४ दिवस झोपल्याचे सिद्ध केले होते. त्यात कोल्हापूरमधील शोबाजीवरून विरोधकांनी आणि नेटकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतल्याने त्यांना सांगलीत उपरती आली असेच दिसले.
6 वर्षांपूर्वी -
संवेदनशील नाना पूरग्रस्तांना ५०० घरं बांधून देणार
सांगली आणि कोल्हापूरातील भीषण पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढे सरसावला आहे. त्यामध्ये, स्थानिक कोल्हापूर आणि सांगलीतील नेते, सामाजिक संघटना, समाजसेवक यांसह अनेकांनी मदतीसाठी स्वत:ला झोकून देऊन काम केले. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या मदतीला संवेदनशील अभिनेता नाना पाटेकरही धावला आहे. नाना आज कोल्हापुरातील 5 गावांना भेटी देणार असून तेथे मदतकार्य करत आहे.
6 वर्षांपूर्वी -
संकटकाळात निवडणुकांची चर्चा कशाला म्हणणाऱ्यांकडून महापौर-उपमहापौरांच्या निवडणुकीला मुदतवाढ
सध्या राज्यावर पुराचे संकट असताना निवडणुकांची चर्चा कशाला असा सवाल करत पूरग्रस्तांना मदत पोहोचवण्याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. त्यावेळी त्यांच्या अप्रत्यक्ष रोख हा राज ठाकरे यांचावर होता.
6 वर्षांपूर्वी -
फडणवीसांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावं: रुपाली चाकणकर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूरस्थितीपेक्षा महाजनादेश यात्रेची काळजी आहे, मागील पाच वर्षात जनतेच्या हिताचे निर्णय घेतले असते तर आज यात्रा काढण्याची गरज पडली नसती. सरकार पूरस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले असून मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या राखणे बंद करावे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसे नवी मुंबई-पालघर शाखांकडून जीवनावश्यक वस्तूंचे ट्रक सांगली-कोल्हापूरच्या दिशेने रवाना
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यात सांगलीतील बचावकार्यात तब्बल १६ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना देखील घडली. लाखो लोकांचे घरदार आणि संपूर्ण संसाराचं उध्वस्त झाले आहेत. दरम्यान, मदतीचा ओघ संपूर्ण राज्यातून सुरु झाला आहे तर दुसऱ्याबाजूला उशिरा का होईना, पण प्रशासनाकडून बचाव कार्य देखील युद्धपातळीवर सुरु असून, त्यात अनेक स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे.
6 वर्षांपूर्वी -
शर्मिला राज ठाकरे आज सांगली-कोल्हापूर पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर
सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आल्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. तसेच या पूरग्रस्तांसाठी सरकार सर्वतोपरी मदत करताना दिसत आहे. तसेच पूरग्रस्त भागाच्या विकासासाठी विविध सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेतलेला दिसत आहे.
6 वर्षांपूर्वी -
कल्याण शहर घोषणेचे ६५०० कोटी ५ वर्ष वेटिंगवर; आता पूरग्रस्तांसाठी ६,८०० कोटींची घोषणा
पूरग्रस्त भागांसाठी केंद्र सरकारने ६ हजार कोटींची मदत द्यावी अशी मागणी राज्य सरकारने केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस यांनी दिली आहे. मुंबईतल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. कोल्हापूर, सांगली आणि सातारा अशा एका भागाला एक भाग असेल. तर दुसरा भाग कोकण, नाशिक आणि उर्वरित महाराष्ट्राचा दुसरा भाग असेल. कोल्हापूर, सांगली, सातारा यासाठी ४७०० कोटी तर उर्वरित भागांसाठी २१०० कोटींची मदत मागितली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
वंचित आघाडीचं निवडणूक चिन्ह 'गॅस सिलेंडर'; विधानसभेत तरी शेगडी पेटणार का?
लोकसभा निवडणुकीत कपबशी या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या वंचित बहुजन आघाडीची कपबशी औरंगाबाद वगळता सर्वच मतदार संघात फुटली होती. मात्र त्यानंतर देखील प्रकाश आंबेडकरांनी त्याच निवडणूक चिन्हासाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्याच अनुषंगाने त्यांनी प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांना देखील विनंती केली होती. मात्र नवं चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवणे अत्यंत कठीण काम असल्याने तो संवाद पूर्णत्वास जाऊ शकला नव्हता.
6 वर्षांपूर्वी -
पूरग्रस्त संकटातून बाहेर आले नसताना फडणवीसांच्या 'महा इव्हेन्ट' यात्रा सुरु होणार
कोल्हापूर, सांगलीतील पूर आता ओसरू लागला असला, तरी तेथील जनजीवन अजून पूर्ववत झालेले नाही. पुराच्या पाण्यासोबत शेकडो संसार वाहून गेले आहेत. अन्नधान्य, भांडीकुंडी, कपडे, शैक्षणिक साहित्य यांची वाताहत झाली आहे. प्रसारमाध्यमांतून दाखवले जाणारे भीषण वास्तव पाहून मुंबईकरही हेलावला आहे. म्हणूनच मुंबईच्या विविध भागांतून गणेश मंडळे, सार्वजनिक संस्था, समूह, विद्यार्थी संघटना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
नाशिकच्या रस्त्यावर धावणार 'पिंक ऑटो'
शहरातील महिलांना स्वयंपूर्णतेकडे नेण्यासह त्यांना प्रवासात सुरक्षेची हमी देणाऱ्या पिंक रिक्षा नवी दिल्ली, मुंबई, पुण्यानंतर आता नाशिक शहरातील रस्त्यावरही धावणार आहेत. स्थायी समितीच्या माजी सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या महत्वाकांक्षी योजनेला मूर्त स्वरूप आले असून, महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून शहरातील महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण व परवाने दिले जाणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
सांगली-कोल्हापूर: सरकारी नोकरीच्या परीक्षा जवळ आल्या अन अभ्यासाची पुस्तकंच वाहून गेली
अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांसाठी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. तशीच सांगलीमध्ये परिस्थिती आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्यास वेळ लागणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
सांगली-कोल्हापूर: पुरग्रस्तांचे संसार, महत्वाची कागदपत्रं आणि मुलांची पुस्तकं सगळंच गेलं
अलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. पूरग्रस्तांसाठी ६० हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. तशीच सांगलीमध्ये परिस्थिती आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्यास वेळ लागणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
मनसेकडून जीवनावश्यक वस्तूंचे ६ ट्रक सांगली-कोल्हापूरच्या दिशेने रवाना
कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. त्यात सांगलीतील बचावकार्यात तब्बल १६ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना देखील घडली. लाखो लोकांचे घरदार आणि संपूर्ण संसाराचं उध्वस्त झाले आहेत. दरम्यान, मदतीचा ओघ संपूर्ण राज्यातून सुरु झाला आहे तर दुसऱ्याबाजूला उशिरा का होईना, पण प्रशासनाकडून बचाव कार्य देखील युद्धपातळीवर सुरु असून, त्यात अनेक स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक तरुणांचा सहभाग लक्षणीय आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री कसे होणार हे सांगण्यात व्यस्त; पूरग्रस्तांशी देणं-घेणं नाही
राज्यातील पूरपरिस्थितीवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. त्यांनी शिवसेना पक्ष आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री कसे होणार हे सांगण्यात गुंतला आहे. त्यांना पूरग्रस्तांचं काहीही देणं-घेणं नाहीये अशा शब्दात आदित्य ठाकरेंना लक्ष केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
कोल्हापूर-सांगलीकरांना सावरायला ६ महिने जातील; त्यांच्यासाठी अधिक वेळ घ्या; निवडणूक पुढे ढकला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सांगली आणि कोल्हापूरमधील पूर परिस्थितीला अनुसरून प्रसार माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली. महत्वाचं म्हणजे त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यासाठी थेट निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार करणार असल्याची माहिती यावेळी दिली.
6 वर्षांपूर्वी