महत्वाच्या बातम्या
-
कसबा विधानसभेसाठी चंद्रकांत पाटील आग्रही? वेटिंगलिस्ट'वरील नेते ५ वर्ष वेटिंगवरच?
विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तस तशी सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची धडपड सर्वच पक्षातील उमेदवारांकडून होताना दिसते. भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेते आणि विद्यमान महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये राजकारण खेळत सध्या अचानकपणे पुण्यातील कसबा विधानसभेच्या जागेवर डोळा ठेऊन असल्याचं वृत्त आहे आणि त्यासाठी त्यांनी अंतर्गत चाचपणी देखील सूर केल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
कोकण: महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विधानसभेला कोकणातील सर्व जागा लढवण्याच्या तयारीत
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने रविवारी २८ जुलै रोजी राजापूर-लांजा, साखरपा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे सरचिटणीस व माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे. राजापूर नगर वाचनालय सभागृहात सकाळी १०.३० वाजता ही बैठक होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजप प्रवेशास नकार देताच मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर आयकर विभागाची धाड
लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील विरोधकांच्या घरांवर तसेच कार्यालयांवर अचानक ईडी तसेच आयकर विभागाच्या धाडी पडल्या होत्या. त्यावेळी देखील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते, साखर तथा शिक्षण सम्राट आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर चाणाक्ष आयकर विभागाने धाडी टाकल्याचे वृत्त आहे. आज सकाळी आयकर विभागाची टीम मुश्रीफ यांच्या कागल येथील निवासस्थानी दाखल झाली. हसन मुश्रीफ यांच्या साखर कारखान्यांवर देखील छापा टाकल्याची माहिती मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
काहींना आमदार न झाल्यास राजकारणच करता येत नाही; त्यामुळे असे निर्णय घेतात: अजित पवार
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकावर एक राजकीय धक्के बसत आहेत. मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या माजी आणि विद्यमान आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा सपाटा लावला होता, तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिवसेनेत प्रवेशाचा सपाटा लावला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना थेट मंत्रालयात प्रतिनिधी म्हणून धाडण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी दक्षिण मुंबईतील वरळी किंवा शिवडी या दोन विधानसभा मतदारसंघापैकी एकाची निवड करण्याची दाट शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
वरळी विधानसभा; मिशन आदित्य जोमात!; राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार?
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकावर एक राजकीय धक्के बसत आहेत. मागच्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या माजी आणि विद्यमान आमदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा सपाटा लावला होता, तर राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिवसेनेत प्रवेशाचा सपाटा लावला आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांना थेट मंत्रालयात प्रतिनिधी म्हणून धाडण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी दक्षिण मुंबईतील वरळी किंवा शिवडी या दोन विधानसभा मतदारसंघापैकी एकाची निवड करण्याची दाट शक्यता आहे.
6 वर्षांपूर्वी -
८९% मिळाले पण फी'साठी पैसे नव्हते; शेतकऱ्याच्या लेकीची आत्महत्या; सत्ताधाऱ्यांकडे कर्नाटकी 'लाड' पुरवण्यासाठी पैसा
राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था आधीच नापिकी, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे भीषण झालेली असताना त्याची झळ शेतकऱ्यांच्या कर्तृत्ववान मुलांना देखील मोजावी लागत आहे. राज्यात विषय केवळ शेतकऱ्यांच्या आत्महत्येपुरता मर्यादित राहिलेला नाही तर तो थेट त्यांच्या कुटुंबांनादेखील कुरवाळत आहे असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
मनसे व वंचित हे पक्ष महाआघाडीत येणार नसतील तर स्वाभिमानी स्वतंत्रणपणे त्यांना एकत्र घेऊन लढेल
आगामी विधानसभा निवडणुकीत नक्की कोणती नवी समीकरणं तर उदयास येणार नाहीत ना अशी शक्यता निर्माण झाले आहे. कारण काँग्रेसने जरी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीला काँग्रेससोबत घेण्याच्या हालचाली जरी सुरु केल्या असतील तरी त्यात विशेष प्रगती झाली नसल्याचं समोर येत आहे. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी थेट राष्ट्रवादीला सोबत न घेण्याची अट घातल्याने काँग्रेस पेचात पडली आहे.
6 वर्षांपूर्वी -
भाजपच्या मेळाव्यात महिला कार्यकर्त्यांच्या साड्यांचे पदर ओढले व चिमटे काढले; तक्रारींवर वरिष्ठ म्हणाले?
काही दिवसांपूर्वी भाजपशी संबंधित नेत्यांचे अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कालच्या पुण्यातील मेळाव्यातील प्रकारामुळे भाजपमध्ये असे किती लोकं अजून आहेत, जे महिलांसाठी धोकादायक आहेत. कारण स्वतः भाजपच्या महिलांनी रागाने पक्षाच्या ग्रुपवर मेसेज टाकून तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान घडलेल्या धक्कादायक प्रकाराबद्दल जेव्हा संबंधित महिला पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली तेव्हा, ‘जावू दया सोडून दया. पत्रकार आहेत इथं. उगीच विषय वाढेल. पक्षाचे नाव जाईल असे सांगितले गेले’. सदर घटनेने संबधित महिला हादरून गेल्या असल्या तरी वरिष्ठांनी प्रकरण मिटवण्यासाठी शक्ती पणाला लावल्याचं वृत्त आहे.
6 वर्षांपूर्वी -
आम्ही कॉंग्रेससोबत आघाडीला तयार; पण आघाडीत राष्ट्रवादी नको: वंचितची अट
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वंचित आघाडीची जोरदार चर्चा रंगली आणि त्यांच्यामुळे काँग्रेसचे किती नुकसान झाले याची आकडेवारी समोर आली. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी तब्बल ४० लाखांहून अधिक मतं घेतल्याचे पाहायला मिळाले. वंचित आघाडीच्या उमेद्वारांमुळे लोकसभेत काँग्रेसच्या तब्बल ८ जागा पडल्या होत्या. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेसने वंचित आघाडीला सोबत घेण्याच्या जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
युती पुन्हा नाजूक वळणावर; शिवसेनेकडून देखील स्वबळाची चाचपणी सुरू? सविस्तर
लवकरच राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असल्या तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्षाचे अंतर्गत मनसुबे भलतेच असू शकतात याची शिवसेनेला देखील पूर्व कल्पना असणार. त्यात लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेलं यश देखील मोदीमुळेच आहे असं भाजपचे अनेक नेते पडद्याआड बोलून दाखवत आहेत, तर शिवसेनेचे अनेक खासदार देखील ते पाठीमागे मान्य करतात.
6 वर्षांपूर्वी -
वंचितांच्या कल्याणासाठी प्रकाश आंबेडकरांच्या लढ्याला नक्कीच यश मिळणार: अण्णाराव पाटील
भटक्या विमुक्तांचे नेते लक्ष्मण माने आणि आमच्यात काही मतभेद नक्की आहेत, परंतु मनभेद अजिबात नाहीत. माने आज देखील पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, पक्षाने त्यांना आद्यप देखील काढलेले नाही, तसेच पक्षापासून ते अलिप्त नाहीत. परंतु त्यांनी केलेले आरोप हा केवळ स्टंट बाजीपणाचा प्रकार होता, अशी टीका वंचित बहुजन आघाडीच्या पार्लमेंट्री बोर्डाचे सदस्य ऍड. अण्णाराव पाटील यांनी प्रसार माध्यमांसमोर केली. लातूर येथे विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना ही माहिती दिली.
6 वर्षांपूर्वी -
माझ्या वाढदिवसाला पुष्पगुच्छ व होर्डिंग्ज नको, पैसे सामाजिक उपक्रमांसाठी वापरा : उद्धव ठाकरे
२७ ला जुलै शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. यानिमित्त शिवसैनिक त्यांना प्रत्यक्ष भेटून तसेच रस्त्यावर होर्डिंग्ज लावून शुभेच्छा देतात. मात्र पक्ष प्रमुखांनी या उधळपट्टीला आळा घालून कार्यकर्त्यांनी तो पैसा सामाजिक उपक्रमांसाठी वापरावा असा संदेश दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
आगामी विधानसभा: डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी: अजित पवार
शिरूरचे नवनिर्वाचित आणि जाईंट किलर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे एनसीपी पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्याची मोठी जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सूतोवाच माजी उपमुख्यमंत्री आणि एनसीपीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी केले. डॉ. अमोल कोल्हे खासदार झाल्यापासून भोसरीत आले नसल्याच्या तक्रारींना उत्तर देताना ते आता शिरूरपुरते मर्यादित नसून त्यांचा राज्यासाठी विचार सुरू असल्याचे पवारांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष सध्या त्यांना मोठी जवाबदारी सोपविण्याचा गंभीर पणे विचार करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
6 वर्षांपूर्वी -
तो विद्यार्थी नाही तर शिवसैनिक; त्याला आदित्य यांच्यात छत्रपती शिवाजी महाराजांची झलक दिसली
सध्याच्या कॉर्पोरेट पद्धतीच्या राजकारणात पेड आणि मॅनेज प्रकार असणार हे साहजिकच आलं. नरेंद्र मोदींच्या बाबतीत देखील अनेक इव्हेंट’मधील घटनांना वास्तवात घडल्यासारखे दाखवून होकारात्मक हवा निर्मिती केल्याचे अनेक प्रकार पाहायला मिळाले. त्यात नरेंद्र मोदींच्या परदेशात संपन्न झालेल्या इव्हेंटमध्ये मोदींना प्रश्न विचारणारे अनेक लोक हे भाजपचे पदाधिकारी असल्याचं उघड झालं होतं.
6 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला मोदी-शाह राहणार उपस्थित
दोन महिन्यावर आलेल्या विधानसभेसाठी भारतीय जनता पक्ष जोमाने तयारीला लागला आहे. त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यभर महाजनादेश यात्रा काढणार आहेत. दरम्यान या यात्रेला भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते देखील उपस्थित राहणार असल्याचे ऊत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्रात पक्ष सत्तेत असणं भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्वाचं असल्याने केंद्रातील वरिष्ठ नेत्यांचे देखील निवडणुकीच्या रणनीतीवर बारीक लक्ष आणि मार्गदर्शन देखील होणार आहे.
6 वर्षांपूर्वी -
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपपेक्षा वंचितला पसंती; भाजपाची देखील डोकेदुखी वाढणार
भारिप बहुजन पक्ष आणि एमआयएम’च्या आघाडीनंतर निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी म्हणजे भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा आरोप वरोधकांनी वारंवार केला आहे. इतकंच नाही समाज माध्यमांवर देखील तीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. मागील काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांच्या एकूण प्रतिक्रिया पाहिल्यास त्या काँग्रेस – राष्ट्रवादीच्या विरोधात आणि भारतीय जनता पक्षाला पोषक ठरतील अशाच असल्याची चर्चा देखील प्रसार माध्यमामध्ये पाहायला मिळते.
6 वर्षांपूर्वी -
वंचित आघाडी भाजपची बी टीम असल्याचे ४१ लाख मतदारांना वाटत नाही: सुजात आंबेडकर
भारिप बहुजन पक्ष आणि एमआयएम’च्या आघाडीनंतर निर्माण झालेली वंचित बहुजन आघाडी म्हणजे भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा आरोप वरोधकांनी वारंवार केला आहे. इतकंच नाही समाज माध्यमांवर देखील तीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते. मागील काही दिवसांपासून प्रकाश आंबेडकरांच्या एकूण प्रतिक्रिया पाहिल्यास त्या काँग्रेस – राष्ट्रवादीच्या विरोधात आणि भारतीय जनता पक्षाला पोषक ठरतील अशाच असल्याची चर्चा देखील प्रसार माध्यमामध्ये पाहायला मिळते.
6 वर्षांपूर्वी -
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट प्रश्नी राज ठाकरेंनी मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची भेट घेतली
मुंबई महानगरपालिकेत कित्येक वर्ष शिवसेनेची सत्ता आहे आणि मुंबईतील कोळी समाज हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार देखील समजला जातो. मात्र मागील काही वर्षांपासून याच कोळी समाजात शिवसेनेविरुद्धची धुसफूस दिवसेंदिवस वाढतानाच दिसत आहे. मुंबई शहरातील कोस्टल रोडच्या प्रकल्पामुळे अनेक कोळीवाड्यांचे अस्तीत्वच धोक्यात आलेले असताना, या प्रकल्पाने कोळी समाजातील वस्त्या सर्वाधिक बाधित होणार आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या अनेक वस्त्यांमध्ये कोस्टल रोडला मोठा विरोध होतो आहे. विशेष म्हणजे शिवसेना स्वतः याविषयात आग्रही असल्याने तसेच राज्यात देखील सत्तेत असून आता कोळि समाजाच्या मुळावर येणाऱ्या गोष्टी करत असल्याने सध्या हा समाज शिवसेनेवर अत्यंत नाराज असल्याचं दिसत होतं.
6 वर्षांपूर्वी -
मनसे आणि वंचित महाआघाडीमध्ये असतील तरच स्वाभिमानी येणार : राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि हातकणंगलेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाआघाडीबद्दल मोठं विधान केले आहे. राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी यांचा समावेश असेल तरच स्वाभिमानी महाआघाडीमध्ये सामील होणार असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करुन देणारचं : आदित्य ठाकरे
शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. त्यांच्या पहिल्या टप्प्यातील दौऱ्यात ते नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात झालेल्या सभेत शेतकऱ्यांना आम्ही सरकट कर्जमाफी देणारच असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
6 वर्षांपूर्वी